राधा हि बावरी

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26

किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धा.रानडेंच्या पोस्टीवरून पुढे चालू, सिच्युएशन क्र. ३ :
राधा आणि सौरभची दुबई टू मुंबई फोन वरून दिलजमाई होते, कारण त्यांचं प्रेम "सच्चा प्यार" क्यॅटेगिरीत 'मोडतं'....पण दुबईहून परत येताना सौरभ व रियाचं प्लेन क्रॅश होतं आणि सीरियलीत रिया कायमची आणि सौरभ लौकिकार्थाने मरतात. म्हंजे रियाची डेडबॉडी सापडते आणि सौरभची नाही. यानन्तर सीरियलीत दु:खाचा डोंगर कोसळतो, अश्रूंचामहापूर लोटतो, (आणि त्यात सीरियलची नाव वाहून जाते....असं वाटून गेलं ना? पण नाही लोकहो, असं होत नाही), ई.ई. एकता कपूर ष्टाईल गोष्टी घडतात. मग पुढे-
सबसिच्युअएशन ३अ: स्वतःच्या डिलिवरीच्या जस्ट आधी राधाला कळतं ़की सौरभची
डेड्बॉडी मिळाली, ती धक्क्याने ज्यु. राधा किंवा ज्यु.सौरभ अथवा ज्यु. जुळी बाळे
जन्माला घालून अनन्ताच्या प्रवासाला निघून जाते. मग सीमावहिनी त्याला/ तिला/
त्यांना वाढवण्याची जबाबदारी घेते. सौरभ आणि राधाचे हार घातलेले फोटो दिसतात
आणि त्यांच्या 'अमर' प्रेमाबद्दल चार शब्द प्रेक्षकांना सुनवून मालिका
संपते हुश्श
सबसिच्युएशन ३बः सौरभ (अर्थातच ) वाचतो, पण त्याला स्मृतिभ्रंश होऊन तो अरबी
समुद्रातील एका बेटावर 'लॉस्ट' झालेला असतो. मग तिकडे लोकल आदिवासी
जमातीतल्या मुलीशी सूत जमवतो, क्योंकी वो सौरभ है. मग त्या मुलीला मूल
झाल्यावर विश्वामित्रांप्रमाणे त्याला फ्लॅश साक्षात्कार होतो. कर्मधर्मसंयोगाने ती
आदिवासी मुलगी मरते / उदार अंतःकरणाने जीव देते. सौरभ बाळसकट रिटर्न टू
मुंबई. राधा (अर्थातच) त्या बाळाचा स्वीकार करते. तीनही बाळांचे ( तिचं बाळ,
ं आदिवासीकन्येचं बाळ आणि सौरभ) संगोपन करते आणि साईड बाय साईड
जागतिक कीर्तीची ब्येष्ट गायनॅकॉलॉजिस्ट सुद्धा होऊन जाते. समाप्त. पुनश्च हुश्श!

बाकीचे विग ऑल्सो रॅनमधे हो मॅक्ससाहेब, तसंही ह्या ढोबळमानाने स्टोरीलाईन्स आहेत. मुख्य कथानकाच्या साईड ला त्यांच्याही कथा टुकूटुकू चालू राहतील. उदाहरणार्थ वरील कुठल्याही कथानकात वेळ काढण्यासाठी केदार बावर्या राधेचाच तिच्या प्रेग्नन्सीमधे घात करण्यासाठी सपत्निक कारस्थानं करू शकतो ( धा ssधकत ). उर्वरीत पात्रांचा निरनिराळ्या समज गैरसमजांमधे 'तळ्यात-मळ्यात' खेळ राऊंड घेता येईल

अरे मला वेड लागेल हसून हसून.. कसल्या भन्नाट प्रतिक्रिया आहेत सगळ्या.. ______/\_______

रच्याकने खरंच ते सौरभचं टाईम-टेबल कम प्लानिंग (कुठुन कुठे जाणार आहे) हे सगळ्या जगाला पाठ झालं इतक्या वेळा त्याने बोलुन दाखवलं.. बकवास म्हणजे किती असावी एखादी मालिका? Angry

अबोलीजाह्नवी आणि मुग्धा.रानडें तुमच्या दोघींचा "कल्पना विलास" अफाट आहे. .उद्या मी निर्माती झाले तर तुम्हा दोघींना पटकथा विस्ताराच काम देईन Happy

राधा ही कावरी बावरी असं नाव पाहीजे मालिकेचं. मुळात ती त्या निर्बुद्धं सौरभ शी लग्न करते इथेच सत्यानाश.. बाकी अबोलीजाह्नवी आणि मुग्धा.रानडें, हॅटस ऑफ टू यू.. लईच भारी..अशक्य भारी..सिरीअल पाहून मनावर झालेल्या सगळ्या अत्याचारांचं औषध आहे इथे. मी तर आजकाल फक्त माबो च फॉलो करते. वे वे बेटर दॅन द सिरिअल. Happy

अबोलीजाह्नवी>>>> पुढचे प्लॉट्स पण छान आहेत. अगदी Rofl
रमा, सुजा आणि पियु परी, तुम्हाला धन्यवाद.

राधा चावरी/ बावरी/ हावरी / ना- आवरी असली तरी ती राधा आहे.:फिदी:

तो टकलु केदार, आक्रस्ताळी सीमावैनी आणी स्वार्थी गार्गी काय धुमाकुळ घालतील देव जाणे.
मुग्धा आणी जान्हवी आगे बढो, माबोकर तुम्हारे साथ है.

लै भन्नाट कथा आहे, तू तिथे मी ची पण अशीच रंगवा..

रश्मि, तुतिमी आता कथाविस्तारापलिकडे गेलेली आहे. कारण मुळात मंजिरीच्या बिनडोकपणाच्या वागण्यावर ती मालिका तग धरुन होती. आता तिचे डोळे लख्ख उघडले आहेत. पण काल/परवा "तुतिमी" किंवा "संथ चालती या मालिका" धाग्यावर लिहिल होत मी की चिमाने स्वतःला फटके मारुन घेतल्यावर मंजिरी चिमाला माफ करेल... डायलॉग: "अहो..... अहो काय करताय? थांबा बघु आधी" तरी पण चिमा थांबणार नाही "नाही मंजिरी नाही, आज मला थांबवु नकोस. मला माझ्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे" मग ही जाउन त्याच्या हातातला हंटर घेउन फेकुन देइल. हट्टी चिमा परत हंटर घेउन स्वतःला मारायला सुरुवात करेल तेव्हा मंजिरी "अहो पण!!!! का शिक्षा देताय अशी स्वतःला? आई तुम्ही तरी सांगा यांना, आजी तुम्ही तरी सांगा ना (इकडे चिमाची फटकेबाजी सुरुच आहे.) अहो! थांबवा आधी ते स्वतःला मारणं" (तरीपण चिमाची फटकेबाजी सुरुच) आणि मंजिरीच निर्वाणीच वाक्य "आधी तुम्ही स्वतःला मारण थांबवा, तुम्हाला आपल्या बाळाची शुभ्राची, आपल्या प्रेमाची शपथ आहे" झाल इथे चिमा थांबेल आणि एपिसोड संपला.
या सगळ्या प्रकारात घरातील झाडुन सगळी माणस तिथे हजर असतील, पण कोणीही मध्ये पडणार नाही. चिमाच्या प्रत्येक फटक्याला उपस्थित सगळ्यांचे चेहरे झिप झॅप झुम करुन दाखवले जातील.....
आता हे सगळ परत तुतिमीच्या धाग्यावर जसेच्या तसेच वाचा......

Proud चालू द्यात.

बाकी दिवसेदिवस ही कथा 'अस्त्तित्व एक प्रेम कहानी' च्या वळणाने जातेय. सौरभ आणि राधाची ताटातूट होऊन सिरियल टाईम लीप घेणार हे नक्की. Happy मग दादा आणि घारुअण्णा भिंतीवर सुध्दा जोडीने नांदतील.

धन्यवाद पियु परी, सुजा,रमा आणि रश्मी....मुग्धा तुमचेही आभार, तुमची झक्कास पोस्ट वाचली आणि एकदम 'खुल गया बंद अकल का ताला' झालं मला....स्वप्ना, तुसी ग्रेट हो.
मी ही ह्या सीरियल्स पहिल्यापासून पाहिल्या नाहीत, पण याधाग्यांवरची धमाल वाचून पहायला सुरुवात केली. तु.ति.मी पण पाहिली काही दिवस मात्रं रोज नाही पाहू शकत, खूप दागिने आणि मेकप ल्यायलेल्या बायका असलेल्या सीरियल्स ची थोड्याच दिवसात अ‍ॅलर्जी होते मला. त्यात आमचं महान घराणं, आमच्या घराची लई भार्री परंपरा वगैरे 'कर' जोडलेले आडनाव असलेल्यांनी 'झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा' च्या चालीवर सुरु केलं की खाल्लेलं वर यायला लागतं की काय असं वाटतं.

पोट धरून हसणारी बाहुली....शनिवारचा बावळ्या राधेचा एपिसोड आत्ता पाहिला. देवारे, हसणं आवरेना. ध क्लॅश ऑफ ध अल्टीमेटली worst ड्रामा क्वीन्स ऑफ कॉन्टेम्पररी मराठी सीरियल्स पाहण्याचं भाग्य (?) नशिबी आलं. (कृपया मागील वाक्यातला ध हा, "मतलब, तू ध फुनसुख वांगडू है ?" तल्या 'ध' च्या चालीवर वाचावा). सीमादेवी धर्माधिकारी विरुद्ध सौ.मनोहर.
एव्ह्ढं ओरडून झाल्यावर दोघीही कलाकार ब्लडप्रेशरच्या गोळ्या घेत असाव्यात, नसतील तर त्यांनी त्या घ्याव्यात. किंबहुना ह्या धाग्यावर पूर्वी वाचण्यात आलं होतं की राधाचे वडील मानसोपचार तज्ञ आहेत. त्यांनी सेट वरील सगळ्यांचं बी पी चेक करून ह्या गोळ्या सर्वांना मोफत उपलब्ध करून द्याव्यात ही त्याना नम्र विनंती.

दादा आणि घारुअण्णा भिंतीवर सुध्दा जोडीने नांदतील.>>>>>ईथे पण घारूअण्णा धर्माधिका-यांच्याच भिंतीवर का?

काय ती सीमा वैनी...एव्हडा गोंधळ नवरा मिळवण्यासाठी केला असता तर आतापर्यंत ४ पोरं झाली असती आणि इतरांच्या भानगडीत नाक खुपसायला वेळही मिळाला नसता.

किंबहुना ह्या धाग्यावर पूर्वी वाचण्यात आलं होतं की राधाचे वडील मानसोपचार तज्ञ आहेत.>>>>> अबोलीजान्हवी अग ते मीच लिहिल होत आणि ते खरे खरे मानसोपचार तज्ञ आहेत (म्हणे) मालिकेत नै कै......

मुग्धा असल्या बायकांचा आरडाओरडा ऐकुन त्यांनाच आठवणार नाही ते मानसोपचारतज्ञ आहेत ते आणि त्यांच्यावरच मानसोपचार करावे लागतील Rofl

मुग्धा, हो ते ( श्री मनोहरांची भूमिका करणारे कलाकार) रियल लाईफ मधे मानसोपचार तज्ञ आहेत हे लक्षात घेऊनच बावळ्या राधेच्या सेट वरच्या सर्वांच्या मनःशांति साठी त्यांनी काळजी घ्यावी असं म्हंटलं मी.
शुभांगी.. तुमचंही बरोबर आहे म्हणा..एव्हाना विस्मृती झाली असेल त्याना.

राधा बावरीची पुढील कथा - आपुनका व्हर्जन

राधाला सीमावहिनीने घरातून बाहेर काढल्यावर ती गायब होते. मानस आणि सई मॅडम तिला खूप शोधतात. शेवटी मुंबईच्या एका रस्त्यावरच्या पावसाच्या पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्ड्याच्या बाहेर ती जीव द्यायला उभी असलेली त्यांना दिसते. ती आत पडली तर खड्डा अजून मोठा होईल ह्या भीतीने बीएमसीच्या लोकांचा जीव अर्धा झालेला असतो. मानस आणि सई मॅडम सौरभची शपथ घालून तिला मागे ओढतात (आणि स्वत:च खाली पडतात). काही दिवस सई मॅडमच्या घरी काढल्यावर राधाला पॅरीसच्या एका मोठ्ठ्या हॉस्पिटलातून ऑफर येते. त्याना एका प्रतिथयश वगैरे डॉक्टरची गरज असते. ती आढेवेढे घेते. शेवटी फ्रेंच डॉक्टरांची एक फौज तिची मनधरणी करायला येते आणि ती जायला तयार होते. पण जाण्याआधी आपण सौरभच्या बाळाला जन्म देणारच हा निश्चय करते.

राधावर चिडलेला सौरभ दुबईला आणि तिथून मस्कत, अबुधाबी, शारजाह वगैरे ठिकाणी जातो. तिथे एके ठिकाणी त्याच्या त्या दु:खी मैत्रीणीचं दु:ख निवारण करण्याच्या प्रयत्नात होऊ नये ते होतं. मैत्रिणीला राधा त्याच्या आयुष्यात आता नाही हे माहीत नसतं. त्याचं लग्न झालेलं आहे हे माहीत असल्याने रातोरात एक चिठ्ठी ठेवून ती गायब् होते. राधा प्रेग्नंट असल्याचं सौरभला माहीत नसतंच. त्यात मैत्रीण असं वागल्याने तो आणखी वैतागतो आणि 'काय यार ह्या बायका. शी!' असं म्हणून आजन्म ब्रह्मचारी राहायची शपथ घेतो.

इथे सिरियल १५ वर्षांनी पुढे जाते. एव्हाना सौरभ नावारूपाला आलेला आहे. जगभर त्याचे संगीताचे कार्यक्रम होत आहेत (रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांचे जसे भारताबाहेरच होतात तसे). असाच एक प्रोग्राम पॅरीसमध्ये होतो (म्हणजे आपल्याला आयफेल टॉवरचा लॉन्ग शॉट दाखवतात). तिथे प्रेक्षक अंधारात बसलेले असूनही त्याला मानस् आणि राधा तिथे बसलेले दिसतात. त्याच्यावर वीज पडते. कार्यक्रम संपताच तो त्यांचा पाठलाग करतो (स्वत: कार ड्राईव्ह करून). त्यांच्या आलिशान घरात त्याला एक मुलगी दिसते. राधाने मानसशी लग्न केलंय आणि त्यांना एक मुलगी आहे असं वाटूण तो खूप चिडतो. ती मुलगी सौरभची आहे हे मानस-राधा आणि मायबाप प्रेक्षक ह्यांनाच ठाऊक असतं (देवाला ठाऊक असायचं कारण नाही. तो झी मराठी पहात नाही!)

सौरभची ती मैत्रीण सुध्दा पॅरीसमध्येच रहात असते (ऑल रोडस लीड टू पॅरिस). पॅरिसमध्ये फिरत असताना त्याला ती दिसते (Champs-Élysées चा लॉन्ग शॉट). तिलाही एक मुलगी असते. ती मात्र ही मुलगी तुझी आहे असं सौरभला सांगते. सौरभचा विश्वास बसत नाही म्हणून पॅटर्निटी टेस्ट करतात ती राधा डॉक्टर असते त्याच हॉस्पिटलात. मैत्रीण रिपोर्ट बदलते कारण ती मुलगी सौरभची नसते. पॅरीसमध्ये त्या दिवशी मोठं वादळ होतं. आणि तो रिपोर्ट उडून राधाच्या टेबलावर पडतो. आता तिच्यावर वीज पडते. ती मानसच्या गळ्यात पडून रडत असताना नेमका toilets च्या दिशेने जाणारा सौरभ बघतो आणि आपण कुठे निघालो होतो ते विसरून खोलीत शिरून दोघांना खूप बोलतो. एपिसोडच्या शेवटी त्याला आपण कुठे जात होतो ते आठवतं आणि तो घाईघाईने निघून जातो. तो गेल्यावर राधा आणि मानस त्यांची मुलगी सौरभची असल्याचं आपापसात बोलतात ते सौरभची मैत्रीण ऐकते. सौरभच्या गडगंज इस्टेटीचे वाटे होऊ नयेत म्हणून ती सौरभच्या मनात राधा-मानसबद्दल तिरस्कार निर्माण करते. गैरसमजांची एक साखळी होते.

मग सौरभ कॅन्सर पेशंटांना भेटायला आणि त्यांचं मनोरंजन करायला विकांताला एका हॉस्पिटलात जातो तर तिथे उपचार घ्यायला आलेला मानस दिसतो. तो काही महिन्यांचाच सोबती असतो. राधाची शपथ घालून तो सौरभला आपलं म्हणणं ऐकायला लावतो आणि खरं काय ते सांगतो. दरम्यान सौरभच्या मैत्रिणीला अपघात होतो. मरता मरता ती आपली मुलगी सौरभची नसल्याचं सांगते. पण सौरभ तिची काळजी घ्यायचं वचन तिला देतो. मानस राधा आणि मुलीचा हात सौरभच्या हातात देऊन (आणि खूप डायलॉगबाजी करून उदा. मैने तुम्हारी अमानत इतने बरसो तक सम्भालकर रखी. राधा सीता जैसी पवित्र है. उसने जीवनमे सिर्फ तुम्हे चाहा.....वगैरेचं मराठी व्हर्जन!) मरतो. राधा सौरभला गार्गी प्रकरणाविषयी सगळं खरंखरं सांगते. तो मुठी आवळून 'केदार, कुत्ते कमीने मै तेरा खून पी जाउंगा' असं म्हणतो. सौरभ राधा मुलीसह भारतात परततात.

इथे दादा आणि घारुअण्णा एकाच दिवशी वर गेलेले असतात. त्यांचे फोटो जोडीने भिंतीवर लटकत असतात. यशचा मराठी धीरूभाई अंबानी झालेला असतो. रंजू प्रसिद्ध शेफ झालेली असते आणि एक फुड चॅनेल चालवत् असते. सीमावहिनीला हाय आणि लो बीपी, डायबेटीस, ऑस्टीओपोरोसिस वगैरे बरेच आजार असतात. केदार गाणं म्हणून आणि बासरी वाजवून लोकांवर उपचार करत असतो. केदारवर क्लोजअप आला की दादांच्या फोटोतून 'लांडगा आला रे आला' असा आवाज केदार आणि प्रेक्षक दोघांना (च) ऐकू येत असतो. घारुअण्णा मात्र सायलेंट मोडमध्ये (ते पण विदाऊट व्हायब्रेशन) असतात.

सौरभ आणि राधाला बघून सीमावहिनीचं हाय बीपी हायर आणि लो बीपी लोअर होतं. केदार छद्मी हसतो कारण सौरभची मुलगी चांगलं गात असते. राधा, सीमा आणि रंजू हळदीकुंकवाला गेल्याचं निमित्त करून तो सौरभच्या मनात विष पेरतो की ती मुलगी माझी आहे. सौरभ राधाला पुन्हा घराबाहेर काढतो. सीमा पुन्हा आकांडतांडव करते. पण ह्यावेळी राधाची धाकटी बहिण तिला आधार देते. ती आता नामांकित वकील झालेली असते. राधाचे आईबाबा देवाघरी गेलेले असतात. गार्गी परदेशात लग्न करून स्थायिक झालेली असते. तिच्या मुलीला तिची बहिण सांभाळत असते. ती राधाला गुपचूप मुलीची पॅटर्निटी टेस्ट करून घ्यायला सांगते. कोर्टात केदार मानसिक रुग्ण आहे हे ती पुराव्याने सिद्ध करते. केदारचे सगळे गुन्हे सिद्ध होतात आणि त्याची रवानगी वेड्यांच्या इस्पितळात होते. सीमा राधाची माफी मागते. राधा अर्थातच तिला क्षमा करते.

सौरभ कार्यक्रम करायला आफिक्रेत जातो तेव्हा त्याला सेवाभावी संस्थेसाठी काम करणारा कोट्याधीश मार्कंड भेटतो. राणी दीक्षित देवाघरी गेल्यानंतर त्याला तिथे दुसरी कोणी मिळालेली नसते. सीमाकडे कोणत्या तोंडाने परत येणार? पण सौरभ त्याला आपल्यासोबत आणतो. 'पतीकी लंबी उमरके लिये दुवा मागणारी' सीमा पाहून त्याला तिच्या प्रेमाची खात्री पटते. सीमाच्या करवा चौथच्या चाळणीत तिला मार्कंडचा चेहेरा दिसतो. तो तिची माफी मागतो. 'वीर-झारा' स्टाईल ग्राफिक्सचा खेळ होऊन दोघं आफिक्रेला जातात.

फोटोतून पाहणारे दादा आणि घारुअण्णा गायब होतात. आणि 'राधा ही बावरी' नामक छळवादातून प्रेक्षकांची सुटका होते.

>>>>>>> आणि 'राधा ही बावरी' नामक छळवादातून प्रेक्षकांची सुटका होते.... हे केव्हा होईल??? प्लीज, मी टीव्ही ला हार घालेन त्या सुदिनी

स्वप्ना Rofl धन्य आहेस तू. किती रेलिव्हंटली आणि सातत्याने लिहिल आहेस. जे कुणी नि - दि असतील सिरियलचे त्यांनी एक्दा वाचल आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला तरी मिळवली.

अब्बब्ब!स्वप्ना काय फिल्मी इस्टोरी लिहीलीय.:हहगलो: सकाळ ला किंवा मटाला पाठव, वाचणारे आडवे होतील. चुकुन सिरीयलच्या निर्मात्याने वाचली तर आयुष्यात अशी सिरीयल पुन्हा बनवणार नाही.:हाहा:

Pages