राधा हि बावरी

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26

किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल एपि संपल्यावर पुढील भागात दाखवल सीमा घरच्यांना सांगते की मार्कंडच साउथ आफ्रिकेत लग्न झालय आणि गेल्या आठवड्यात त्याला मुलगा झाला आहे. आता परत सीमा कित्ती कित्ती चांगली आहेच दळण जात्यात घालणार ही मालिका. Sad

>>होना दक्षिणा, आता घरातल्यांनी तिला लाऊड स्पिकर आणून द्यायला हवा. हळू बोलली तरी बोंबलण्याचा फिल येईल मग.

हॅलो हॅलो, हे सगळं राधामुळे झालंय....
चेक चेक, राधा राधा राधा, तुला दुसरं काही सुचत नाही का सौरभ?
वन, टू, थ्री, मला राधाचं तोंड सुध्दा बघायची इच्छा नाहिये.

त्या दिवशीचा एक सीन तर अचाट होता. सीमाने सगळी इस्टेट आपल्या नावावर करून घेतली आहे म्हणून दादा मी आत्महत्या करेन वगैरे ओरडत होते. मग सीमा म्हणाली गोड शिरा केलाय तो खा आणि मग आत्महत्या करा. लगेच दादा हसून 'गोड शिरा' वगैरे म्हणत खूश झाले. त्यांनाही बहुतेक वेड लागलंय.

रच्याकने, ह्या मालिकेतल्या लोकांना गोड शिर्‍याशिवाय दुसरं काही सुचत नाही का? शेवयांची खीर, दुधी हलवा, नारळीभात वगैरे गोष्टी ह्यांना ऐकून तरी माहित आहेत का? सदानकदा आपला गोड शिरा.

>>काल एपि संपल्यावर पुढील भागात दाखवल सीमा घरच्यांना सांगते की मार्कंडच साउथ आफ्रिकेत लग्न झालय आणि गेल्या आठवड्यात त्याला मुलगा झाला आहे.

हे खरं आहे का सिम्पथी मिळवायला सीमाने केलेलं नाटक आहे? आता सीमाला त्या गोड शिर्‍यातून झोपेचं औषध द्या आणि एक चांगला मुलगा पाहून झोपेतच तिचं दुसरं लग्न लावून तुला धर्माधिकार्‍यांच्या घरातून विदा करा म्हणावं.

हो ना स्वप्ना.... परवा सौरभने आपला पगार सीमाच्या हातात दिला की लगेच ती गोड शिरा करायला निघाली होती. हे म्हणजे पूर्वीच्या हिंदी सिनेमांच्या हिरोंच्या आया कश्या गाजर का हलवा किंवा खीर करायच्या तस हे झाल. यात जो खीर नामक प्रकार आहे तो कायम कोरडा असायचा. अशी कोरड्या खीरीची रेसिपी फक्त या आयानांच जमते.

अजुन एक अट म्हणजे "मैने तुम्हारे लिये गाजर का हलवा किंवा खीर बनाया/बनायी है" हे वाक्य फक्त हिरोंच्या आयाच तोंडी असायच. एकाही हिरविणीची आई हे म्हणाल्याच आठवत नाहिये...... आणि सगळ्यात डोक्यात जाणारं वाक्य "मां तुम्हें कैसे पता की मुझे गाजर का हलवा किंवा खीर बहुत पसंद है?" हे वाक्य ऐकुन ती माउली त्याच्या डोक्यावरुन हात फिरवुन गोड हसायची..... आमची आई असती तर म्हणाली असती "मेल्या दुपट्यात ......... करत होतास तेव्हांपासुन एव्हढा मोठा घोडा मी केलय तुला आणि तुच मला विचार तुम्हें कैसे पता की मुझे गाजर का हलवा किंवा खीर बहुत पसंद है"

इथे कुणाला सई मॅमच्या कपड्यांबद्दल बोलायच नाहिये का? का कुणास ठाउक पण मला नाही आवडत तिला जे कपडे दिलेत ते..... वेस्टर्न फॉर्मल्स आहेत ते ठिक आहे पण त्याच्यावर तो स्कार्फ मला नाही चांगला वाटत... अगदी तुमाज मध्ये मनवाचे सुद्धा स्कार्फवाले ड्रेस मला नव्हते आवडले.... ते स्कार्फ गळ्यापाशी दिसला की का कोण जाणे पण मलाच अवघडल्यासारख होत.

ह्या मालिकेतल्या लोकांना गोड शिर्‍याशिवाय दुसरं काही सुचत नाही का? > त्या सई मॅम नी एकदा काहीतरी वेगळा गोड पदार्थ केला होता ना ? काय होता तो ?

ती सीमा वाहिनी अतीच करते. आणि तो सौरभ तरी का ऐकतो . कायमचच बायकोशी बोलणार नाही म्हणजे काय? काहीही दाखवतात . तेव्हा त्या सई मैम च पटत . राधाची तुला बोलायची ईछ्या नाही ना नको बोलुस. पण सौरभ नी पण बोलायचं नाही म्हणजे काय . वरती सीमा धमकी पण देते. राधाशी बोललास तर मी जीवाच बर वाईट करून घेईन म्हणून

सीमाला हार्टअ‍ॅटॅक आला हे ऐकुन नवल वाटल हार्टलेस पर्सनला हार्टअ‍ॅटॅक कसा येइल? Uhoh

तिथेच मानसोपचारतज्ञ मानस असायचा म्हणजे तो मल्टीस्पेशालिटी दवाखाना आहे>>>> चांगल आहे मग दोन्ही उपचार एकदम करा म्हणाव सीमावर हार्ट ट्रबलसाठी हार्ट स्पेशालिस्ट आणि सायकिअ‍ॅट्रिक ट्रिटमेंट मानसकडुन. एक तीर में दो शिकार Lol

>>पण मार्कंडच्या साऊथ आफ्रिकावालीला कॅन्सर झाला होता ना?

तिला कॅन्सर + प्रेग्नंसी दोन्ही असेल. कॅन्सरमुळे ती मरेल आणि तिच्या बाळाला महान त्यागमूर्ती सीमावहिनी आपलं म्हणतील. लगेच त्या स्वत:ही प्रेग्नंट रहातील (मार्कंडला आता दुसरी सोय नसल्याने घरच्या दालला मुर्गी समजावंच लागेल ना!). मग मार्कंडभाई एमबीबीएस.....मार्कंड बिवी बच्चोंसमेत.

ए फॉर आरडाओरडा
बी फॉर बकवास
सी फॉर केऑस
डी फॉर डढ्ढंभारती
इ फॉर इमोशनल अत्याचार
एफ फॉर फडतूस + फालतू
जी फॉर गाढवपणाचा कळस
एच फॉर हाईट ऑफ नॉनसेन्स
आय फॉर इडियटस
जे फॉर जोकर्स

स्वप्ना तुझे एमबीबीएस खरे होणार बघ... कालच रिया सौरभ ला सांगत होती की आपला नेक्स्ट शो आफ्रिकेला आहे..मग आता सौरभ तिथे जाणार आणि हा रहस्यभेद होणार..

बावर्‍या राधाची शाळा,
१ तिचा पहिला विद्यार्थी तिचाच शोनुल्या उर्फ सौरभ धर्माधिकारी उर्फ सौर्‍या.
२ दुसर्‍या अ‍ॅडमिशनचा मान सीमावैनीला अतिशय हट्टी आणि अडेलतट्टु विद्यार्थीनी,
३ नंतर रंजु कायम दुर्लक्षिलेला घटक असतो प्रत्येक वर्गात राधाच्या वर्गात ही,
४ केदार+गार्गी हे एकत्र कारण अशी जोडी पण नेहमी बघावयास मिळते एकजण चुका करतो आणि दुसरा त्याची फक्त री ओढतो
५ दादा धर्माधिकारी वर्गातला वयाने सगळ्यात मोठा विद्यार्थी, अनेक वर्ष नापास झाल्याने तिरस्कारणीय पण वयामुळे सगळे वचकुन असतात असा.
६ मार्कंड कायमच्या गैरहजेरीमुळे ब्लॅक लिस्टेड
७ यश जिजु हा एकमेव चांगला आणि सद्गुणी विद्यार्थी राधाला लाभलेला आहे.

ही फक्त धर्माधिकार्‍यांच्या घरात भरणारी शाळा मांडली आहे. अ‍ॅडमिशन्स अजुनही ओपन आहेत.

8. घारूआण्णा - ऩेहमी घरचा अभ्यास घरीच पूर्ण करून येणारा विद्यार्थी. त्यामुळे वि.क्र. 5 याला धाकदपटशाने कायम शेजारी बसायला लावतो.

स्वप्ने Lol
मला एक बेसिक प्रश्न आहे. यांना बरे पटापटा शोज मिळतात च्यायला. कधी दुबई कधी साऊथ अफ्रिका.. उद्या उठून होनुलूलू ला पण जातील.. बरंय. स्ट्रगल नावाचा शब्द यांच्या डिक्शनरीत नाही दिसत.

दक्षिणा अजुन एक मार्क कर हे लोक डायरेक्ट फारीनलाच जातात शो करायला भारतात नाव पण माहित नसेल या ब्याण्डच.... आणि आता मार्कंड दादाला मुलगा झाला म्हटल्यावर सौरभकाका जाणारच ना पुतण्याच तोंड बघायला.... मग कारण काय तर साउथ आफ्रिकेत शो तो पण नेमका मार्कंड दादाच्याच शहरात असेल बघा आता.....
योगायोग म्हणतात तो याला आणि असे योगायोग देवानंतर मालिका/सिनेमावालेच आणु शकतात....

ए,अच्चं नाय बोलायचं आमच्या सौर्‍याला. त्या रामदास पाध्येंचे सगळे शोज भारताबाहेर होतात त्यांना कोणी काही नाही बोलत. अमिरोंका खून खून, गरिबोंका खून पानी....असं नाही हं चालायचं Wink

अहो हो स्वप्ना ताई पण पाध्यांनी सुरुवातीला तरी केले ना भारतात शो?? यांच म्हणजे काल जन्माला आलेला बॅण्ड आणि आज लगेच गेले फारीनला गळे काढायला.....

आणि हि राधा अजूनही सौरभ ला प्रेग्नन्सी बद्दल सांगत का नाहीये. म्हणजे मग हे दुसर्याच कुणाचं तरी आहे असा सौरभ ला संशय घ्यायला वाव. Happy

असेच काही वर्षे राधा आणि सौरभला दूर ठेवण्यात वैनीबाय यशस्वी होतिल. मग अचानक सौरभला राधा एका छोट्या मुला/मुली बरोबर दिसेल. ते सौरभ सारखेच माकडचाळे करत असेल + सौरभ लगेच गणित करेल आणि त्याला कळेल कि त्याचेच मूल आहे.

sonalist: अहो, सौरभच्या बालबुद्धीला एव्हढं कुठलं झेपायला....तो आपण सीमेय ( सीमा'नंदन') असल्याचे सिद्ध करेल शिरा ताणून आरडाओरड करून (नेहेमीचेच..मला विश्वासात घेतलं नाही आणि तत्सम. अहो सौरभमहाशय, घरातल्या 'लहानग्या' ना थोडी मोठ्ठ्या लोकांचे प्रॉब्लेम सांगतात).
तोपर्यंत स्वप्नाने सांगितलेले मार्कंडभाई एम.बी.बी.एस. कथानक कम्प्लीट झालेले असेल, आणि सीमादेवींचा रुद्रावतार शांत सौम्यावतारात रुपांतरित झाला असेल. ती(सीमावैनी)च त्यांना परत एकत्र येण्याची परवानगी देईल. मधल्या काळात केदार आणि गार्गी 'आपापल्या' 'KARMA' चे संचित भोगतील.
सीरियलच्या शेवटी घरातील सर्वं मुलं (इन्क्लुडिंग सौरभ) शाळेत सोडून राधा गायनॅकॉलॉजिस्टगिरी करायला जाईल. Biggrin
@स्वप्ना_राजः मार्कंडभाई एम बी बी एस आणि घरकी दाल मुर्गीबराबर..लईभारी..;)

sonalist: अहो, सौरभच्या बालबुद्धीला एव्हढं कुठलं झेपायला....तो आपण सीमेय ( सीमा'नंदन') असल्याचे सिद्ध करेल शिरा ताणून आरडाओरड करून (नेहेमीचेच..मला विश्वासात घेतलं नाही आणि तत्सम. अहो सौरभमहाशय, घरातल्या 'लहानग्या' ना थोडी मोठ्ठ्या लोकांचे प्रॉब्लेम सांगतात).
तोपर्यंत स्वप्नाने सांगितलेले मार्कंडभाई एम.बी.बी.एस. कथानक कम्प्लीट झालेले असेल, आणि सीमादेवींचा रुद्रावतार शांत सौम्यावतारात रुपांतरित झाला असेल. ती(सीमावैनी)च त्यांना परत एकत्र येण्याची परवानगी देईल. मधल्या काळात केदार आणि गार्गी 'आपापल्या' 'KARMA' चे संचित भोगतील.
सीरियलच्या शेवटी घरातील सर्वं मुलं (इन्क्लुडिंग सौरभ) शाळेत सोडून राधा गायनॅकॉलॉजिस्टगिरी करायला जाईल. Biggrin
@स्वप्ना_राजः मार्कंडभाई एम बी बी एस आणि घरकी दाल मुर्गीबराबर..लईभारी..;)

Pages