राधा हि बावरी

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26

किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुजा मार्कंड पाठवतो आफ्रिकेतुन पैसे. एकदा सीमावैनीच्या बोलण्यातुन आलेल होत हे.

हो अंजली, माझ्या पण लक्शात आलं ते. उंच माझा झोका याच्या सारख्या सुंदर सिरियल चे संगीत ह्या सिरियल मध्ये ऐकुन जिवावर येत..

त्या मानसचा चेहरा कसला ठोकळा आहे....>>>+११ आज सई मॅम काहीतरी तावातावाने बोलत होत्या राधाबद्दल आणि याची एकदम मख्खासारखी रिअ‍ॅक्षन होती.

त्या मानसचा चेहरा कसला ठोकळा आहे....माय गॉड ! अगदी पूर्वीच्या प्रदीप, राज, राजेन्द्र वगैरे 'कुमारांसारखा'.>>>>> एक महत्त्वाचा मख्ख चेहरा राहिला ना बॉलिवुड मधला भारत भुषण वरील सर्व मख्ख चेहर्‍यांचा राजा होता हा चेहरा

काल डॉ ची सुचना ऐकलीत का? ६ महिने सीमासाठी द्यायला सांगितलेत सौरभला.>>>>>
अरे व्वा! म्हणजे साक्षात डॉक्टरांकडूनच परवाना मिळाला कि सीमावहिनीला सहा महिने बोंबाबोंब करण्याचा.

याच्यात मधेच उंच माझा झोकाचे बॅकग्राउंड म्युझिक वाजत असते ना?>>>>
हो बरोबर. तसेच ती लहान मुलगी आहे ना जिला विषबाधा झाली म्हणून अ‍ॅडमिट केले आहे, ती पण होती उंच माझा झोकामध्ये. बहुधा लहान मुलांना मालिकेत घेतले कि टिआर्पी वाढतो असा त्यांचा समज असावा.

>>कशाला बघतेस आता जीवावर बेतायलंय तर... उतारा म्हणून जरा बर्‍या सिरियल्स पहात जा की.

अग आमच्याकडे ७:३० ला ससुराल सिमरका बघतात मातोश्री. म्हणून राधाचा रिपिट टेलिकास्ट १०:३० ला बघतात. उतारा म्हणून आधी ११ ला प्रॅक्टीस बघायचे. आता कॅसल बघते Happy

तो केदार प्रत्येक एपिसोड मध्ये का गात असतो? मला कडवेकर मामी आठवल्या. गाणं गाणं गाणं....अरिष्ट मेलं. काल धर्माधिकारी सुखी कुटुंबाची परमावधी करताना दाखवले होते. सई मॅडम कशाला आपलं रक्त जाळतेय?? त्या राधाला हुतात्मा व्हायची खोडच आहे. मरू दे ना तिला. उगाच दुसर्‍याचं दु:ख कशाला ते आपल्यावर ओढवून घ्यायचं? सीमाचे तीर्थरुप अजब आहेत. दादा चक्क डॉक्टरला सांगतात की सीमाचा नवरा असून नसल्यासारखाच आहे. आणि हा माणूस एका शब्दाने जाब विचारत नाही. कधी सीमाला माहेरी न्यायचीही गोष्ट करत नाही तो. तोही वेडाच वाटतो मला.

त्याला तरी गायची संधी कशी मिळणार गं नाहितर????
धर्माधिकार्‍यांच्या घरात सतत खाण्याचीच चर्चा का चाललेली असते? दुसरे काही विषय नाहित का चर्चेला?
काल एपि संपल्यावर पुढील भागात दाखवल आहे की राधा मानस जेवायला बाहेर गेलेले असताना मानस आधार म्हणुन राधाच्या हातावर हात ठेवतो तेव्हढयात तिथे सौरभ आणि रिया येतात आणि ते बघतात. आता आज काय होइल ते सांगते. सौरभची राधावर आणि रियाची मानसवर आगपखड.... सौरभ आणि रिया गैरसमजुतीतुन बोंबाबोंब करतील आणि हे दोन मंद डॉक्टर्स गुपचुप ऐकुन घेतील....... नाही म्हणायला राधा "अरे सौरभ काय बोलतोयस तु?" एव्ह्ढच म्हणेल (तुतिमी मध्ये कस मंजिरी अहो पण शिवाय काही बोलत नाही तस इथे राधा या वाक्याशिवाय काही बोलत नाही) पण दोघांच्याही डोक्यात येणार नाही की हाच प्रश्न आपणही या दोघांना विचारु शकतो की तुम्ही दोघ इथे काय करत आहात. जर एका बॅण्डमध्ये काम केल्याने एकत्र जेवायला जायची मुभा असु शकते तर मग एकाच हॉस्पीटल मध्ये काम करतो म्हणुन आम्हाला का नाही ही मुभा????

मुग्धा लैच अपेक्षा करून र्‍हायलिस..

आणि सीमा घरी आली म्हणून केदार नांदी गातोय नमन नटवरा... कैच्याकैच Rofl

कुठली अपेक्षा ग दक्स?
आणि सीमा घरी आली म्हणून केदार नांदी गातोय नमन नटवरा... कैच्याकैच>>>> आनंदाची सुरुवात झाली ना त्यांच्याघरी म्हणुन नांदी..... बाकी संभाव्य वादळाच्या किंवा भुकंपाच्या घरात येण्याला आनंदाची सुरुवात म्हणणारे धर्माधिकारी व्हिकेपीच (विध्वंसक कार्याचे पुरस्कर्ते) दिसत आहेत.

पुढल्या भागाची झलक....मानस-राधा बद्दल सौरभ-रियाचा गैरसमज>>>>> विनोदी आहे. म्हणजे पुढे मागे राधाबाई प्रेग्नंट आहेत कळल्यावर सौरभला लायसन्स टू (हॅव) संशयकल्लोळ अँड (टू डू) तांडवनृत्य दिलं दिग्दर्शकाने. Sad
ह्या सगळ्यापेक्षा राधाबयेनं त्या सुनील बर्वेंच्या कॅरॅक्टरशी लग्न केल असतं तर बरं झालं असतं. प्रेक्षक सुटले असते. रच्याकने, सौरभला रिया /केसरच जास्त 'suit' होतात. दोघींपैकी कोणीही एक चालेल..हे..हे....सीमादेवी आणि गार्गीपण सुतासारख्या सरळ येतील.

पण दोघांच्याही डोक्यात येणार नाही की हाच प्रश्न आपणही या दोघांना विचारु शकतो की तुम्ही दोघ इथे काय करत आहात. जर एका बॅण्डमध्ये काम केल्याने एकत्र जेवायला जायची मुभा असु शकते तर मग एकाच हॉस्पीटल मध्ये काम करतो म्हणुन आम्हाला का नाही ही मुभा???? >> इथे जास्ती अपेक्षा करतेयस तु मुग्धा Rofl

नाही म्हणायला राधा "अरे सौरभ काय बोलतोयस तु?" एव्ह्ढच म्हणेल (तुतिमी मध्ये कस मंजिरी अहो पण शिवाय काही बोलत नाही तस इथे राधा या वाक्याशिवाय काही बोलत नाही) Lol

गार्गीला अगदीच स्वयंपाक येत नाही अस दाखवलं आहे. अस कस? शिक्शन नौकरी काहीही न करनार्या मुलीला निदान इतक तरी यायला नको का?

Pages