राधा हि बावरी

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26

किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोक्यावर काय परीणाम झालाय तिच्या? पूर्णच डोके फिरलेय तिचे.:राग: लहानपणी झोका झोका खेळतांना डोक्यावर पडली असेल नाहीतर योगा शिकतांना कायम शिर्षासनात राहिली असेल.:खोखो:

धन्स मंडळी! Happy ह्या स्टोरीत अस्त्तित्त्व एक प्रेम कहानी ही सिरियल आणि राजेश खन्ना-मुमताझच्या आप की कसमचं मिश्रण आहे. Happy

रच्याकने, त्या यशला एकच बाप आहे ना? मग तो आहे हे सांगण्यात काय प्रॉब्लेम आहे? उगाच कशाला संशयकल्लोळ करायचा?

.

स्वप्ना..लई भारी
सौरभ 'शी यार, काय या बायका' असंम्हणतो आणि आजन्म ब्रह्मचार्याची शपथ घेतो. Proud

सौरभ 'शी यार, काय या बायका' असंम्हणतो आणि आजन्म ब्रह्मचार्याची शपथ घेतो>>>> दोन लग्न आणि मुलबाळ झाल्यावर. it's like करुन करुन भागला आणि ब्रह्मचारी झाला. Proud Lol Biggrin

स्वप्ना .. लई भारी Rofl

अ‍ॅड मधे बघितल की सीमावहिनी राधाला घराबाहेर काढतेय .. का? का? (मी फक्त इथले प्रतिसाद वाच्ते .. मालिका बघत नाही)
आणि ती बावरी रड्तीय की .. असल्या येड्या लोकांचा राहण्यापेक्षा बाहेर गेलेल बरं नाही का ..

सौरभ 'शी यार, काय या बायका' असंम्हणतो आणि आजन्म ब्रह्मचार्याची शपथ घेतो>>>> LOL Lol

दोन लग्न आणि मुलबाळ झाल्यावर. it's like करुन करुन भागला आणि ब्रह्मचारी झाला. >>>> सुपर्ब Lol

स्वप्ना सॉलीड लिहीलयतं तुम्ही ... Lol Lol

अ‍ॅड मधे बघितल की सीमावहिनी राधाला घराबाहेर काढतेय .. का? का?

>> कारण केदार आणी ती राधा-सौरभ च्या बेडरूममध्ये आतून कडी लाउन असतात हे ती बघते.

प्रत्यक्षात केदार राधाच्या नकळत बेडरूममध्ये शिरून आतून कडी लावुन घेतो.

राधा प्रेग असल्यापासून तिच्यावर काही ना काही संकट येतेच आहे. हे बाळ तिच्यासाठी तसं अनलकीच आहे Happy

सीमाला वेड लागलय यात शंका नाहीच पण आता मला, कविता लाड ची पण काळजी वाटायला लागलीये. ज्या आवेगाने ती किंचाळत अस्ते, वाटतं हिला हायपरटेंशन जडेल, नाहीतर डोकं तरी फुटेल.

एक्झॅक्टली!! कविता लाड आत्तापर्यंत किती गोड भूमिकांमध्ये दिसायची. एका लग्नाची गोष्ट नाटकाच्या निमित्ताने तिला प्रत्यक्ष पाहतापण आलं होतं. किती सुंदर दिसते ती आणि काय मस्त अभिनय करते.. वीरेन आणि टीमने ह्या मालिकेत तिला असला रोल देऊन पार वेडं करुन टाकलंय.. अरे किती ओरडायला लावताय तिला!! सतत असलं काम करुन बिचारी खरोखर मनोरुग्ण व्हायची एक दिवस.. ही सिरियलपण फारच डोकं दुखवते हल्ली.. काहीच्याकाही चालू आहे तिच्यात.

>>राधा प्रेग असल्यापासून तिच्यावर काही ना काही संकट येतेच आहे. हे बाळ तिच्यासाठी तसं अनलकीच आहे

ह्या सिरियलच्या सुरुवातीपासून तिच्यावर फक्त आणि फक्त संकटंच येताहेत. राधाच त्या बिचार्‍या बाळासाठी अनलकी आहे ग! आणि झी वर जाहिरात येतेय 'राधा आणि सौरभ कधी एकत्र येणार?'. म्हटलं 'कल्पांताला' Angry

काल म्हणे सीमावैणींना ह्रुदयाचा झटका आल्यागत झाले. मी जाणार होते बघायला पण अचानक पाहुणे आल्याने जमलेच नाही. पण मी काय म्हणते एवढा आक्रस्ताळेपणा आणी थयथयाट या वयात झेपेल का हे बघायला नको का माणसाने?

गेला असेल तो सौरभ राधाला भेटायला,मग काय झाले बायको आहे ना त्याची. अहो तुम्ही तरी समजावा ना तिला. जाऊ दे म्हणावं झाले गेले गंगेला मिळाले.:इती घनाची आई

खरच आहे रश्मी.... हि म्हणेल तेच खर मानायच सगळ्यांनी.... कोणी आपली मत मांडायची नाहित, कोणाला विचारुन, सवरुन गोष्टी क्लिअर करायच्या नाहित...... अरे पोलिससुद्धा गुन्हेगाराला आपली बाजु मांडायची संधी देतात म्हणावं..... इथे हिच स्वतःला न्यायदेवता समजायला लागली आहे. काल पहिल्यांदा सौरभ बरोबर बोललाय मला राधाची बाजु पण ऐकायला हवी म्हणुन.

रच्याकने.... काही दिवसांपूर्वी सीमाने सगळी प्रॉपर्टी आपल्या नावे करुन घेतल्याच पाहिल होत नक्की काय आहे ते? भयंकर पात्र दाखवल आहे सीमाचं.
मला वाटत गोड गोड भुमिका करुन कविता लाड कंटाळली असावी म्हणुनच ही भुमिका करायला ती तयार झाली..... इतर भुमिकांमध्ये होणारी घुसमट तिने बाहेर काढलेली दिसतेय इथे. Proud

शक्य आहे. पण उगाचच लांबण लावताहेत मालिकेला. आता काय परत ती ताटातुट. आश्रमशाळेच नविनच. ती गार्गीपण किती खोट बोलतेय. बर गार्गी खोटारडी (मला गार्गी नावाचा आणि या मुलीचा दुरान्वयेही संबंध दिसत नाही कुठल्याच बाबतीत हे वेगळेच) तिचे आई -वडिल पण सांगत नाहीत. केदारला सौरभ बरोबर ओळखुन आहे.

त्यातल्या त्यात त्या यश जीजुला सगळे माहित आहे ना? मग तो का मुग गिळुन गप्प बसलाय?? असो हे सगळे प्रश्न जर सुटले तर मालिका संपेल ना

अग शुभांगी सगळे घडाघडा बोलु लागले तर दोन दिवसात मालिका संपणार नाहि का?रोज रोज नवीन तरी काय दाखवाव ग यांनी??? डोक लागत चांगल आणि पटेल अस दाखवायला.

अरे राधाला डॉक्टर कोणी केल या??? इतकी हळवी बाई डॉक कशी होउ शकते? ही बहुतेक डिलीव्हरीला येणार्‍या बायकांच्या कळा बघुन स्वतःच ढसाढसा रडत असेल आधी आणि मग डिलिव्हरी करायला जात असेल... आणि अजुन एक हिच्या सगळ्या पेशंट्सचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात..... हि कधीही कोणालाही एक गोळी पण देताना दाखवली नाहिये..... गोळी सोडाच साध प्रिस्क्रिपशन पण लिहुन दिल नाहिये..... आणि राधा इतकी लक्की आहे इतकी लक्की आहे की तिच्या कोणत्याही पेशंटची डिलिव्हरी अवेळी(रात्री २ वाजता, सणावारी, घरात पाहुणे आलेले असताना) होत नाही...... त्यामुळे ही रेग्युलर चाकरमान्यांसारखी हॉस्पीटलात जाते आणि परत येउन, स्वयंपाक वगैरे करुन, घरातल्यांचे प्रॉब्लेम्स बघुन (सोडवुन तर नाहीच, पण जमल्यास भर घालुन), रडुन झोपते आणि पुन्हा सकाळी उठुन सगळ्यांच सगळ करुन हॉस्पीटलात जाते........ व्वा!! क्या बात है???

ही सिरियल आता खूपच डोक्यात जायला लागलिये.
काल सगळे जण फक्त आणि फक्त एकमेकांवर ओरडून बोलत होते.. Angry
तो सौरभ हॉलमधून नुसतं राधा राधा.... हाका... अरे फोकलिच्या मग स्वतः आज जाऊन शोध ना तिथेच उभा राहून बोंबलत होता.. वैताग...

मुग्धा....राधाच्या पेशंट्सचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात..पण डिलिव्हरी एकदम कॉप्लिकेटेड असते बरं. (आधि ती डिलिव्हरी करुन बाहेर आली ना तेव्हा 'मॅम' म्हणायच्या कि शाब्बास राधा एव्हढी कॉप्लिकेटेड डिलिव्हरी तूच करु शकतेस......मला वाट्ट नॉर्मल डिलिव्हरी कॉप्लिकेटेड करत असेल ती.)

राधाला कोणीही सौरभची शपथ घालून काहिही सांगितले ना कि ती लगेच ऐकते..... आणि तिला सूपर वुमन सिंड्रोम झाला आहे.

नॉर्मल डिलिव्हरी कॉम्प्लिकेट करत असेल>>>>> मलाही सुरुवातीचे एपिसोड पाहून असंच वाटलं होतं. तेव्हा तर ऐन डिलिवरीच्या वेळेला पेशन्ट OT वर असताना हिला हिची लहानपणची परवड आठवली आणि मग बयाबाई फ्रीझ, बरोबर डोळ्यातून घळाघळा गंगायमुना ( राधेची ' सिग्नेचर ' अदा) आहेतच. आजूबाजूच्या नर्सेस हाका मारत होत्या डॉक्टर बाई जाग्या व्हा म्हणून. मग केस कॉम्प्लिकेट होणार नाही तर काय ! पुन्हा बाहेर आल्यावर 'मॅडम राधा, तुसी ग्रेट हो' हे पालुपद आहेच. मेडिकल कॉलेजमध्ये टिकलीच कशी ही?

Pages