राधा हि बावरी

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26

किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमावहिनींचं 'मी आई होऊ शकणार नाही' हे वाक्य ऐकून गार्गी बाळंतपणात मरते आणि सीमावहिनी तिच्या मुलाला सांभाळते असा प्लॉट आहे की काय अशी शंका आली.>>>>> होईलही कदाचीत. गार्गीच्या अबोर्शनच्या वेळी काहितरी कॉम्प्लिकेशन्स झाल्या म्हणुन अबोर्शन करता नाही आल ना.... तसच काहितरी डिलीव्हरीच्या वेली होईल आणि सीमावहिनी मुलाला सांभाळेल.

काल तर ती रंजू सौरभला म्हणत होती की माझं असं झालं असतं तर मी धावत जाउन यशच्या मिठित शिरले असते आणि त्याच्या मिठीत सगळी दु:खं विसरले असते. भावाशी असं बोलतात? अजब आहेत धर्माधिकारी. आणि सौरभ पण हो ग, हे माझ्या लक्षातच आलं नाही असं म्हणाला. म्हटलं लेका, तुझ्या कसलं लक्षात येतंय? सदोदित बायकोवर ओरडत असतोस तू.

त्या दादांनी काल राधाला छान समजावलं. एकच सेन्सिबल माणूस आहे.

स्वप्ना :हहपुवा:

बादवे सीमावहिनी आता आई होऊ शकणार नाही हे ऐकुन आमच्या साबांच्या डोळ्यात पाणी आलं अगदी..

मला कळत नाही कि सीमाला आई व्हायचे होते तरी का?

मला कळत नाही कि सीमाला आई व्हायचे होते तरी का?>>>आणि होणार तरी कशी ती आई??? ती स्वतःच कबूल करतीये न कि तिच्यात आणि तिच्या नवऱ्यात काहीच संबंध नाहीत म्हणून. मग हा कुठला वेड्यासारखा हट्ट आहे सीमाचा?

बघा की. एव्हढं होतं तर आत्ता तो नवरा आला होता तेव्हाच काहीतरी खटपट करायची ना? Wink नाहीतर त्याला सोडून देऊन दुसरं लग्न करायचं सरळ. हेही नाही आणि तेही नाही तर काय चमत्कार होणार आहे का?

मी तेच म्हणायला आलेले. इथे मेनोपॉज आला तरी हिचं तेच स्त्रिसुलभ का काय म्हणतात ते सुरूये.
नवर्‍याला पळवून लावलाय.. आई कुठून होणार? Uhoh

स्वप्ना...... रंजू आणि सौरभचा संवाद खरंच विचित्र होता ईईईईक्स......सीनियर धर्माधिकारी म्हणतात तसं प्राणीसंग्रहालयच आहे........बाकी सौरभला लक्षात न येणं नॉर्मलच आहे.....बालवाडीत कुठे हे सगळं शिकवतात....रच्याकने....गणपती झाले, घरातलं लग्नकार्य आटोपलं, दोन पायाने चालता पण येतंय....मग हे धर्माधिकार्यांचं शेन्डेफळ आपल्या बालवाडीत का नाही जात अजून?

मग हे धर्माधिकार्यांचं शेन्डेफळ आपल्या बालवाडीत का नाही जात अजून?>>>बालवाडीत जायचे वय पण निघून गेलय ना म्हणून Happy राधामय्याची कृपा झाली तर पुढे बालवाडीत जाईल तो..त्यांच्या आपत्याला सोडायला...नाहितर...रंजू, गार्गीची मुलं असतिलच.

काल पुण्यात विसर्जन मिरवणुकीला बावरीचा नवरा - सौरभ आला होता ,, मनात आलं होता की मायबोलीची लिंक द्यावी पण कसं ..
त्याला बघुन सुद्धा इथले कॉमेण्ट्स आठवायला लागले मला Happy

काल पुण्यात विसर्जन मिरवणुकीला बावरीचा नवरा - सौरभ आला होता.....>>>> हो??? फोटो-बिटो काढला कि नाही???

चनस.....खरंच द्यायला हवी होती ह्या धाग्याची लिन्क.....किमान सांगायला तरी हवं होतं......मा.बो.वर जाऊन वाच.....आणि सुधर बाबा.....

हरे रामा! कालच्या एपिसोडमध्ये काय ते तुतारी प्रकरण! लिहायला काही सुचत नाही तर मालिका बंद का नाही करत? आणि वर एपिसोडच्या शेवटी गार्गी राधालाच ठणकावत होती की मी प्रेग्नंट आहे हे घरात कोणाला कसं माहित नाही?त्यांना सांग नाहीतर हे लग्न मोड असं समज. राधाने तोंड वाकडं करून ऐकून घेतलं. तिला सांगायचं की तू शेण खाल्लंस ना, मग तूच सांग मी खाल्लं होतं म्हणून. नाहीतर जा परत बापाच्या घरी. पण ही पडली 'सर्वांमुखी मंगल बोलवावे' टाईप्स. ह्या नाठाळांच्या माथा काठी हाणायला आता तुकारांमानाच पुष्पक घेऊन यायला लागणार.

वर त्या सौरभच्या डोक्याला तेल लावत होती काल. ह्या ठोंब्याचे हात मोडलेत का? बायकोसाठी कधी काही करताना दिसत नाही. राधा म्हणजे लग्नाच्या जाहिरातीतली सोशिक, सोज्ज्वळ, गृहकृत्यदक्ष मुलगी झालेय.

दवाखाण्यात काम करते मग घरी येउन जेवण बनवते जेवण झाल्यावर रीकाम टेकड्या नवर्‍याच्या डोक्याची तेलाने मालीश करते कस जमता हीला?

ती सीमा रंजु आणि यशच्या मुलीला घेऊन म्हणते, "ही माझ्यासाठीच जन्माला आलीये". यांनी विचारुनच प्रेग्नन्सी प्लॅन केली होती ना..

ती सीमा रंजु आणि यशच्या मुलीला घेऊन म्हणते, "ही माझ्यासाठीच जन्माला आलीये" << इतके दिवस सौरभ तीचा मुलगा होता आता कुहु..

आशुचॅम्पने सौरभचा ढोल वाजवताना फोटो काधुन टाकला आहे. मस्त आहे तो.

काल सासर्‍यांना कळल गार्गीबद्दल... आज सौरभ काहितरी उलगडा करणार अस दिसत.

अरे बापरे,राधा एक्स्पेक्टिंग? मग काय आनंदी आनंद गडे असेल धर्माधिकार्यांच्याकडे. सीमावहिनीला एकदम तीन अपत्यांची आई व्हायला मिळेल आणि तिला धन्य धन्य वाटेल.. भाग न पाहताच अंदाज आपला माझा..सौरभने मर्कटनृत्य केले असेल..

सीमा आई बनू शकणार नाही हे खोटेच बनवले आहे असे दिसते आहे. मार्कण्ड आता परत भारतात यायचा नाही म्हणून हा बनाव असावा. आणि घारूअण्णांना याची कल्पना असावी.

भाग न पाहताच अंदाज आपला माझा..सौरभने मर्कटनृत्य केले असेल..>>>>>> अबोलीजाह्नवी, त्याला अजुन माहितच नाहिये...... दोघ भांडले आहेत. त्यात सौरभ गेलाय दिल्लीला, तिकडुन डायरेक्ट दुबईला जाणार आहे. यापुढिल सिच्युएशन नं १: तिथे गेल्यावर दु:ख्खी रिया सौरभजवळ रडेल, हे साहेब इकडे भांडुन आल्याने तोही दु:ख्खीच असेल मग त्या दु:ख्खाच्या भरात त्यांच्याकडुन होउ नये ते होइल आणि भारतात परत आल्यावर याला आपण बाप होणार असल्याच कळेल..... कर्मधर्म संयोगाने रियाबया पण प्रेग राहील.....

सिच्युएशन नं २: सौरभचा राधावर संशय मुलाच्या पितृत्वाबद्दल.

दोन्ही सिच्युएशनमध्ये पडद्यावर अश्रुंचा पूर, आळीपाळीने एकमेकांच्या श्रीमुखात भडकावणे, घर सोडुन निघुन जाणे वगैरे टिपीकल या सदरात मोडणारे प्रकार होतील आणि मालिका "सत्यानाश अटळ" या सदरात पोचेल.

येउद्या आता प्रतिक्रीया.

सौरभ काल तीन तीन वेळा तेच तेच सांगत होता, दिल्लीला जाणारे आणि तिकडुन डायरेक्ट दुबईला जाणार आहे. आर्विभाव तर असा होता जसं काही लोनावळ्याला जाणारे आणी मग तिथूनच पुढे मुंबईला.

Pages