शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह गुलजार, ज्ञानपीठ छान बातमी.

मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा स्तुत्य उपक्रम (आधीची बातमी) .

<< मरणोत्तर अवयवदान करणाऱ्या लोकांचे अंतिम संस्कार स्टेट ऑनर्स सहित केले जातील. >>

------ जिवंत असतांना काही ऑनर करता आला तर चांगली गोष्ट आहे. मरणोत्तर ऑनर केला काय आणि नाही केला काय, अवयव दान करणार्‍याला काही फरक पडणार नाही.

<< मरणोत्तर ऑनर केला काय आणि नाही केला काय, अवयव दान करणार्‍याला काही फरक पडणार नाही. >>

असंवेदनशील प्रतिसाद. ऑनर मिळावा म्हणून मुळात कुणी अवयवदान करतच नाही, त्यामुळे जिवंतपणी पण त्यांना काही फरक पडेल असे वाटत नाही.

डिस्क्लेमर: माझे आई-वडील या दोघांनी देहदान केले, त्यामुळे माझा प्रतिसाद बायस्ड असू शकतो.

ज्याने मरणोत्तर अवयवदानाची इच्छा ऑलरेडी प्रकट केलीय त्याला नाहीच पडणार फरक.
मृत व्यक्तीचा सरकारी सन्मान होण्याच्या शक्यतेने क्लास वन वारस ज्यांचा मोठा ‘से’ अवयवदानाच्या बाबतीत असू शकतो त्यांना फर्म निर्णय घ्यायला मदत होऊ शकते. आणि उगीचच अशास्त्रीय/अधार्मिक/तर्कविसंगत कारणे देऊन डिस्करेज करणार्या इतर नातेवाईकांचे मत ओव्हरराईड करता येऊ शकते. हे एक प्रकारचे आमिष असले तरी ज्याने ग्रेटर गुड अचिव्ह होते आहे व मृताचा सन्मान होतो आहे तर अशा गोष्टीला पाठिंबा दिला पाहिजे.

माझेमन, वावे + १

शिवाय, मला वाटते जिवंतपणी सन्मान केल्याने ज्यांना फरक पडतो त्यांना मरणोत्तर आपला नक्की सन्मान होणार आहे हे कळल्यानेही हयात असतानाच फरक पडेल.

मरणोतपरांतही दिर्घकाळ आपला लौकिक रहावा अशी बहुतांची इच्छा असते. (मसरूफ जमाना मेरे लिए क्यो वक्त अपना बरबाद करे वाले वगळुन.)

नवीन पटनाईक >> स्तुत्य निर्णय. अवयवदान केल्यावर ते अवयव नीट साठवायची यंत्रणा नाही, शवाची देखभाल नीट होत नाही, अवयव खराब होऊन वाया जातात - इत्यादी गोष्टींमुळे अवयवदानापासून परावृत्त झालेल्या व्यक्ती ऐकिवात आहेत. त्यामुळे अशा निर्णयाने त्यांना नक्कीच फरक पडेल.

>>असंवेदनशील प्रतिसाद. ऑनर मिळावा म्हणून मुळात कुणी अवयवदान करतच नाही, त्यामुळे जिवंतपणी पण त्यांना काही फरक पडेल असे वाटत नाही.<< +१

>>मृत व्यक्तीचा सरकारी सन्मान होण्याच्या शक्यतेने क्लास वन वारस ज्यांचा मोठा ‘से’ अवयवदानाच्या बाबतीत असू शकतो त्यांना फर्म निर्णय घ्यायला मदत होऊ शकते.<<
चूक. विल मधे अवयवदान मेंशन केलं असेल तर वारसाचा यात "से" असु शकत नाहि. आणि माझ्या माहिती नुसार अवयवदान हे केवळ तोंडि नसुन त्याची कागदोपत्री नोंद असते..

बाकिच्यांचे विचार वाचुन सुन्न झालो. अवयवदान केल्याने मरणोत्तर मान मिळतो हा विचार जिहादिंना ७२ हुरची लालुच दाखवण्याच्या लायकिचा आहे. आपल्या काग्निटिव बाय्सची फुटपट्टी नको तिथे लावण्याच्या प्रवृतीचा जाहिर निषेध...

इथे वाद घालायची इच्छा नाही, पण राज, अवयवदान करण्यासाठी आत्महत्या करा, असं कुणाचं म्हणणं नाही. मृत्यू अटळ आहे. तो जेव्हा येईल, त्यानंतर आपल्या शरीरातल्या उपयुक्त अवयवांचा जर कुणा जिवंत व्यक्तीला क्वालिटी लाईफ मिळण्यासाठी उपयोग होणार असेल तर तसा विचार करणाऱ्या लोकांबद्दल/ तसा निर्णय घेणाऱ्या नातेवाईकांबद्दल अतिशय आदर आहे.

वावे >>> +१
एकंदरीत अवयवदान या विषयातील मेडिकल व लीगल बाजूंविषयी समाजात (इंक्लूडिंग मी) फार कमी नॉलेज असावे असे वाटते. या विषयातील अधिकारी व्यक्तीने लेख लिहिल्यास जास्त चांगले.

रूथ गॅाट्समन यांनी अल्बर्ट आइन्स्टाइन कॅालेज अॅाफ मेडिसीन, ब्रॅांक्स ला $ १,०००,०००,००० ची देणगी दिली असून येत्या अॅागस्टपासून तेथील विद्यार्थ्यांना फी माफ असणार आहे. बातमी वाचून फारच भारी वाटले.

विल मधे अवयवदान मेंशन केलं असेल तर वारसाचा यात "से" असु शकत नाहि.
>>>really? पण मग दवाखान्यात जो फॉर्म भरावा लागतो त्यावर सही करायला वारसाने नकार दिला तर? अशा वेळेला काय होतं?
माझ्या पश्चात मला शक्यतो प्रत्येक अवयव दान करायची इच्छा आहे म्हणून विचारते आहे. यावर्षी वदिला मृत्युपत्र बनवून घेतलं आहे. ते आता अपडेट करेन.
देहदानासाठी पण आहे का हा नियम?
माणूस गेल्या गेल्या त्याचं मृत्युपत्र कोणी उघडून बसत नाही. सगळ्या क्रिया झाल्यानंतर ते वाचण्यात अर्थ नाही. अशावेळेला काय होतं?

>>>>.वारसाने नकार दिला तर?
बळजबरी होत नसावी. वारसाच्या इच्छेला मान दिला जात असावा. जुलमाचा रामराम काय कामाचा. नाजूक प्रसंग असतो कोणी हट्टाला पेटणार नाही. वारसाने नाही म्हटले, संपले. अवयव दान केले जात नसावेत.

<< देहदानासाठी पण आहे का हा नियम?
माणूस गेल्या गेल्या त्याचं मृत्युपत्र कोणी उघडून बसत नाही. सगळ्या क्रिया झाल्यानंतर ते वाचण्यात अर्थ नाही. अशावेळेला काय होतं? >>

------- निर्णय घेणार्‍याने तो निर्णय तडीस जाईल अशी व्यावस्था अगोदरच करुन ठेवायची. देहदान करण्याचा निर्णय सर्व जगाला सांगायची गरज नाही पण मोजक्या जवळच्या लोकांना माहित असायला हवा - जेणेकरुन योग्यवेळी तो निर्णय पुर्णत्वास नेण्यासाठी ते प्रयत्न करतील. तो ठाम निर्णय आहे पण सर्व जगासाठी सिक्रेट असायला हवा असे नाही.

बहुतेक प्रसंगात, मृत्युपत्र हे आर्थिक बाबी संबंधात असते असा माझा समज आहे (वाटे हिस्से , कुणासाठी काय ठेवले आहे). ते सिक्रेट असू शकते , लॉकर मधे किंवा रितसर वकिलाकडे पण ठेवतात. देहदान करायचे असेल तर केवळ मृत्युपत्रात तसा उल्लेख असून उपयोग नाही - सर्व राख झाल्यावर काय दान करणार?

गेलेल्या व्यक्तीने देहदानाची इच्छा अगदी लेखी व्यक्त केली असेल तरी ती प्रत्यक्षात येणे त्याच्या मृत्यूच्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. यात वारसांच्या मताचाही भाग येतोच.
दधिची देहदान मंडळ, डोंबिवली यांचे एक द्वैमासिक की त्रैमासिक निघते. त्यात दरम्यानच्या काळात मरण पावलेल्या सभासदांची (देहदानाची इच्छा नोंदवून वर्गणी भरणारे लोक) नोंद असते. सोबत त्यांचे देहदान झाले की नाही, याचीही.

माझ्या माहितीप्रमाणे गेलेल्या व्यक्तीने देहदान अवयव दानाची इच्छा व्यक्त केली नसली तरीही ते करता येते आणि अर्थात उलटही होऊ शकते. याबबत वारसांवर कायदेशीर बंधन नाही.
अगदीच कोणी मृत्यूपत्रात तशी अटच घातली तर बंधन येईल (असा माझा तर्क आहे) .

नैसर्गिक मृत्यू आलेल्या व्यक्तीला नेत्रदान करता येतं, हे माहिती आहे. पण बाकीचे काही अवयवही देता येतात का? माझी समजूत होती की ब्रेनडेड व्यक्तीचे हृदय, किडनी, लिव्हर, फुफ्फुसे इत्यादी अवयव देता येतात. नैसर्गिक मृत्यू झाल्यावर नाही.
देहदान मात्र करता येतं.
मेडिकल कॉलेजमध्ये अशा देहांची अजूनही गरज असते का?

अमेरिकेत, ॲार्गन डोनर म्हणून नाव रजिस्टर (Online किंवा DMV मधे करता येते) केले असेल तर मृत्यूनंतर कोणालाही ते नाकारता येत नाही.

देहदानाच्या बाबतीत अमेरीकेत प्रत्येक राज्याचे नियम आहेत ज्यात कशा परीस्थितील देह स्विकारणार ते येते. यात संसर्गजन्य आजारापासून ते देहाचे वजन पर्यंत बरेच काही येते. हृदय वगैरे महत्वाचे अवयव ऑर्गन ट्रांन्सप्लांटसाठी काढले असल्यास असा देह आमच्या राज्यात वैद्यकीय शिक्षणासाठी स्विकारत नाहीत. मृत्यू आत्महत्येमुळे किंवा वायलंसमुळे झाला असेल तरीही स्विकारत नाहीत.
ऑर्गन आणि टिशू डोनर म्हणून ड्रायविंग लायसन्सवर इच्छा नोंदवता येते. त्याशिवाय नोंदवले नसले तरी नातेवाईकही दानाचा निर्णय घेवू शकतात. तुमची दानाची इच्छा असली तरी शेवटी मृत्यूच्या वेळची परीस्थिती बघून डॉक्टर निर्णय घेतात.

माझी समजूत होती की ब्रेनडेड व्यक्तीचे हृदय, किडनी, लिव्हर, फुफ्फुसे इत्यादी अवयव देता येतात. नैसर्गिक मृत्यू झाल्यावर नाही.
>>
मलाही हेच सांगितले गेले आहे

कुठेही नोंद करा अथवा करू नका, सर्व वारसांच्या हातात असते. >>> हम्म्म, इथेच तर मेख आहे, मला फॉर्म भरायचा आहे पण जवळच्या लोकांनी इच्छेला मान द्यायला हवा.

इतकी वर्ष थांबले कारण मातोश्रीनी वचन घेतलेलं, ती आणि बाबा असेपर्यंत फॉर्म भरायचा नाही. आम्ही दोघं गेल्यावर काय ते कर. आता ते दोघेही नाहीत त्यामुळे फार दिवस राहीलेलं काम करायचं आहे.

Pages