शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Correct u pointed it out correctly.....Removed those n now successfully created n uploaded a few portraits please do visit the thread name is लॉकडाऊन इफेक्ट्स

Thanks a lot for ur promot n correct guidance

भारतील तुरुंग, तिथली खचाखच गर्दी, वर्षानुवर्षे अडकून पडलेले कच्चे कैदी, वगैरेवर खूप लिहून येत असते.
द वायर या नियतकालीकाने एक रिपोर्ट तयार केला होता, त्यात तुरुंगात आजही पाळले जाणारे जातीभेद व मैला हाताने साफ करण्याची घटनाबाह्य पद्धत यावर लिहिले होते. राजस्थान हाय कोर्टाने या रिपोर्ट ची suo moto दखल घेतली आहे ही खरेच एक आनंदाची बातमी आहे.
सुप्रीम कोर्ट कॉमेडियन लोकांना कम्टेंप्ट नोटीस देऊन स्वतःचे हसे करून घेत असताना विविध हायकोर्ट चांगले काम करत आहेत.

The Wire, on December 10, published a detailed investigative piece on the caste practices prevalent inside prisons across different states in India. These practices, as per archaic prison manuals, were followed in most states that sanction caste-based occupation in jail. While prisoners of the Brahmin caste group in most states are assigned only cooking, or supervision work, those from the ‘lower’ castes are forced to carry out menial work like manual scavenging and cleaning.

एबिपी माझावर आत्ताच बघीतले. विदर्भ व मराठवाडा यांना जोडणारा पैनगंगेवरील पूल तेथील गावकर्‍यांनी श्रमदानातुन बांधला, सरकारची मदत न घेता. १५ लाख गोळा करुन १५ दिवसात पूल बांधला. रोज घरुन शिदोरी घेऊन यायचे. व कष्ट करुन एक मोठा आदर्श आपल्या पुढे ठेवला. हेच काम सरकार कडे गेले असते तर भिजत घोंगडे पडुन कोट्यवधी खर्च झाले असते. मुला मुलींच्या शिक्षणाची सोय झाली कारण ८ वी पर्यंतच शाळा होती. तसेच गावकर्‍यांचा ४० किमीचा फेरा वाचला. गावकर्‍यांना सालाम व मानाचा मुजरा. कौतुक करावे तितके कमीच. शेतीला पाणी पण मिळाले.

>>लोकसत्ताने अग्रलेखाच्या मथळ्यात 'दिसले' असा शब्द वापरुन नेहमीप्रमाणेच कोटी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत विनाकारण गोंधळ निर्माण केला आहे.

मी गावातल्या दुकानांच्या पाट्यावर 'दिसले' असं नाव काही ठिकाणी वाचल्याच्ं स्मरत्ं आहे. तेव्हा हे आडनाव असणार. बाकी लोकसत्ताचे अग्रलेख रोखठोक असतात. जिथे केंद्र सरकार चांगल्या गोष्टी करतं तिथे लोकसत्ता हातचं न राखता कौतुक करतो. अर्थात अशी संधी कमीच मिळते हा लोकसत्ताचा दोष नाही.

ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ प्रा. रोहिणी गोडबोले यांना फ्रान्सचा 'नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट' हा सर्वोच्च स्तरावरील सन्मान जाहीर झाला आहे.

https://in.makers.yahoo.com/meet-68-yearold-physicist-rohini-godbole-who...

https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/prof-rohini-godbole-g...

https://www.loksatta.com/mumbai-news/chief-minister-uddhav-thackeray-pra...

आज पद्म पुरस्कार जाहीर झालेत. सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणेना पद्मश्री जाहीर झालाय. दोघांचं अभिनंदन.

गिरीश प्रभुणे, पुरंदरे वाडा, राम आळी, चिंचवडगाव, पुणे 33... प्रभुणे काका आमचे शेजारी. पुरंदरे वाड्यात पद्मश्री Happy एकदम भारी वाटत आहे आत्ता, शब्दात सांगता येणार नाही..

झोपडीतला तरुण ‘आयआयएम’चा प्राध्यापक! केरळातील मराठी आदिवासी युवकाची गरुडझेप
https://www.lokmat.com/national/ranjith-ramachandran-assistant-professor...
https://indianexpress.com/article/india/night-guard-to-iim-teacher-keral...

जगभरात मिळून गेल्या १०० वर्षात सामाजिक कामासाठी कुणी, किती, कशी मदत केली ह्याचा अहवाल एडेलगिव्ह हूरून नावाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं प्रकाशित केला आहे. त्यात अभिमानाची गोष्ट अशी की त्यात पहिला क्रमांक जमशेटजी टाटांचा आहे, ते वॉरन बफे, बील आणि मेलिंडा गेटस ह्यांच्यापेक्षा खूप पुढे आहेत.

https://www.business-standard.com/article/markets/jamsetji-tata-tops-ede...

अरे वा!
पण हे खालील वाक्य वाचून गोंधळात पडलो. देणगी दिलेली आहे, का देण्याचे कबूल केले आहे यात गोंधळ झाला.
The total philanthropic value of Tata is made up of 66 per cent of Tata Sons, estimated at $100 billion, solely based on the value of listed entities,” the EdelGive Hurun Philanthropists of the Century report said. CLICK HERE FOR THE TOP 10 LIST

रन लिया..
बॉलिवड च्या फर्स्ट फॅमिलीच्या घरी गोड बातमी
आलिया रणवीरला कन्यारत्न !

नुकत्याच पार पडलेल्या राम अर्थात 'रेस अक्रॉस अमेरिका' ह्या दीर्घ पल्ल्याच्या ( अन्दाजे तीन हजार मैल अंतराच्या) सायकल स्पर्धेत , भारताच्या डॉ. श्रीनिवास गोकुळनाथ, डॉ. अमित समर्थ आणि कबीर रायचुरे ह्या तिघांनी भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.

निकाल इथे बघता येईल.
https://www.raceacrossamerica.org/raamweb/raam_menu/

तिघांचेही हार्दीक अभिनंदन. कबीर त्याच्या वयोगटात दुसरा आला आहे.

ह्या तिघांमुळे आणि तिघात मिळून भारताकडे आजमितीस सात सोलो फिनिशर मेडल्स आहेत.

#अतीव_आदर
#भरला_आलेला_ऊर

Pages