माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"
खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.
मनावर मळभ आणणार्या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"
http://vishesh.maayboli.com/node/1120
चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.
अन्जू, दधिची देहदान मंडळ
अन्जू, दधिची देहदान मंडळ तुमच्या डोंबिवलीतच आहे.
हो माहीती आहे, आधीचं त्यांचं
हो माहीती आहे, आधीचं त्यांचं माहीती होतं लोकेशन. हल्ली दुसरीकडे गेलंय. जाईन तिथे एकदा किंवा ऑनलाईन भरेन.
तसं नवरा, भाऊ आणि बहीण यांना माझी इच्छा सांगून ठेवलीय आणि माझ्या बाबतीत काही कर्मकांड करायचं नाही हेही सांगून ठेवलंय.
भारतात १००% आरक्षणाच्या
४५०० पैकी ० जागा अनारक्षित गटासाठी. भारतात १००% आरक्षणाच्या दिशेने वाटचाल. जय हो.
@उबो : उपरोधाने लिहिले आहेत
@उबो : उपरोधाने लिहिले आहेत हे समजले पण या बहुतेक बॅकलॉग्स आहेत.
इनक्लुडिन्ग बॅकलॉग आहे म्हणजे
इनक्लुडिन्ग बॅकलॉग आहे म्हणजे रेग्युलर भरती +बॅकलॉग
एक प्रेरणादायी उपक्रम.
एक प्रेरणादायी उपक्रम. स्थानिकांना रोजगार, महिला सबलीकरण... आणि बरेच काही चांगले मुद्दे दिसत आहे.
https://www.bbc.com/marathi/articles/c3gmw4p1m2mo
क्रिकेटर्सना बघायला आलेल्या
क्रिकेटर्सना बघायला आलेल्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन कुणीही दगावले नाही.
आनंद शेयर करत आहे. गेली ६
आनंद शेयर करत आहे. गेली ६ वर्षे माझे बाबा री डेव्हेलपमेंट च्या जिवघेण्या चक्रात अडकले होते/आहेत. मुंबई सारख्या एरियात पेंशन वर स्वःखर्चाने भाडे भरत होते कारण कबूल केल्या प्रमाणे बिल्डर (आमचे घर बनेपर्यंत) महिना भाडी देत नव्हता, आणि ४ पैकी शेवटची (नेमके त्याच बिल्डींग मधे घर असलेली २० लोक्/बिर्हाडं आहेत) इमारत न बांधता पळपुटेपण करत होता. भाडी भरता भरता काही लोक अगदीच झोपडपट्टीत गेले त्याचेही भाडे कमी नाही. १ शब्दाची अ तिशयोक्ती मी करत नाहीये. खूप निराश वाटत होते.
ह्या वर्षी देव पावला, सतत च्या वकिली दाव्यात सोसायटी ची केस जिंकली & बिल्डर ने ३७ लोकांची गेल्या ४ वर्षांची थकबाकी क्लियर केली & बँकरप्ट झाल्याने कोर्टाने दुसर्या कंपनी च्या हाती रे-डेवेलोप. काम सोपवायचा आदेश दिला.
लोक अक्षरशः रडत होते, काही काका तर घर होण्याची वाट बघत मरून गेले
मागिल वर्षी १ करप्ट जज होता, त्याला बिल्डर ने पैसे चारले, मग १ दा तर काय सोसायटीचा वकील च फुटला अशी दारूण स्थिती. फायनली प्रामाणिक वकील & जज असा काँबो मिळवला & विजय मिळाला. आणि अभिमानाने सांगते की कामाची तडप & सरकारी कामांचा दांडगा अनुभव असल्याने माझ्या बाबांचा वकीली पेपरवर्क, नोटीशी, पुरावे वगैरे मधे सिंहाचा वाटा होता/आहे.
थोडीशी पॉझीटिव्ह सुरूवात झाली आयुष्याची
आता यापुढे सर्व चांगलं आणि शुभ च होणार असे आशीर्वाद द्या माबो मंडळी
https://www.mahamtb.com/
https://www.mahamtb.com//Encyc/2024/7/11/milind-chhatre.html
हार्दिक अभिनंदन मिलिंद छत्रे
Aashu 29 खुप छान झाले ..
Aashu 29 खुप छान झाले ..
किती सहन करावे लागले असेल त्या सर्व लोकांना. कल्पना पण करवत नाही ..
आता लवकरच त्यांची इमारत पूर्ण नवीन घर मिळू दे.
अभिनंदन!
अभिनंदन!
छान! असं काही सकारात्मक घडलं की पुढील वाटचालीसाठी बरीच ऊर्जा मिळते. The best feeling in the whole world is watching things falling into place.
आशु, छान बातमी! आमची
आशु, छान बातमी! आमची बिल्डिंगपण द्यायची आहे अजून तरी कोणी बिल्डर आला नाहीयै. ... बघू काय होतं ते.
मिलिंद छत्रेंच अभिनंदन!
आशु, केवढे सोसले! आता सगळे
आशु, केवढे सोसले! आता सगळे व्यवस्थित होवून लवकरच बिल्डिंग उभी राहो.
मिल्या, अभिनंदन!
आशु, खरंच चांगली बातमी. मी
आशु, खरंच चांगली बातमी. मी देखील अशाच दुष्टचक्रात अडकलो आहे. 8 वर्षं झाली, आता दोन महिन्यांपूर्वी काम सुरू झाले आहे. भाडे मात्र वेळेवर मिळत होते.
मिल्याचे अभिनंदन आणि पूनम वैनीचे देखिल
आशु, खरच फार छान बातमी.
आशु, खरच फार छान बातमी. सिमिलर त्रासातून गेलोय त्यामुळे आत्ता किती प्रेशर कमी झाले असेल हे समजू शकतेय.
मिल्या, अभिनंदन!
हो माहीती आहे, आधीचं त्यांचं
हो माहीती आहे, आधीचं त्यांचं माहीती होतं लोकेशन. हल्ली दुसरीकडे गेलंय. जाईन तिथे एकदा किंवा ऑनलाईन भरेन.
तसं नवरा, भाऊ आणि बहीण यांना माझी इच्छा सांगून ठेवलीय आणि माझ्या बाबतीत काही कर्मकांड करायचं नाही हेही सांगून ठेवलंय.>>हे आत्ता वाचलं अंजू. तुला काही माहिती हवी असेल तर कॉल कर. आई आणि साबा दोघींनी दधिचीमधे फॉर्म भरला आहे.
Aashu 29 >>> खूपच छान. किती
Aashu 29 >>> खूपच छान. किती मानसिक त्रास होतो याची चांगली जाणीव आहे.
माझ्या भावाची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटची नव्हती. पण त्याच्या बिल्डरला झोपुची बिल्डिंग बांधून मग हे काम सुरु करायचे होते. १० वर्षे गेली. ईएमआय आणि भाडे या चक्रात पिसून गेला होता. गेल्या वर्षी मिळाली जागा ताब्यात.
अभिमानाने सांगते की कामाची
अभिमानाने सांगते की कामाची तडप & सरकारी कामांचा दांडगा अनुभव असल्याने माझ्या बाबांचा वकीली पेपरवर्क, नोटीशी, पुरावे वगैरे मधे सिंहाचा वाटा होता/आहे. >>> वा वा. अभिनंदन आणि शुभेच्छा. त्यांच्या चिकाटीचं आणि कष्टाचं फळ मिळूदे.
मिलींद यांचं अभिनंदन.
कविता तुला मेसेज करेन.
अरे वाह आशु छान बातमी
अरे वाह आशु छान बातमी
लवकरच पुढेही सुकर होईल सगळे.
मिलिंद अभिनंदन
माबोवर नसतो आता फार, पण पोहचेल अभिनंदन तुला.
आशु२९, छान वाटलं वाचुन.
आशु२९, छान वाटलं वाचुन.
खूप आभार सर्वांचे
खूप आभार सर्वांचे
https://www.esakal.com/pune
https://www.esakal.com/pune/ajit-pawar-inaugurated-first-phase-of-flyove...
सिंहगड रस्ता फ्लायओव्हरच्या पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन झाले. विठ्ठलवाडी ते स्वारगेट हा रस्ता खुला झाला आहे.
यामुळे संपूर्ण पुण्यातून अन्यत्र जाणार्या येणार्यांची उत्तम सोय झाली आहे. आता पुण्यात वाहतूककोंडी होणार नाही.
त्या फ्लायओव्हर वरून आजच
त्या फ्लायओव्हर वरून आजच प्रवास करून आले,सिग्नल चा 2 min वेळ कमी होऊन 1 min लागतो. दोन्ही कडच्या स्लोप ला डांबर आणि वर सिमेंट,आणि घाई घाईत उद्घाटन करण्यात आल्यामुळे कडेला खडी वगैरे नेहमीचंच
पुण्यात आता कुणीही वाहतूक
पुण्यात आता कुणीही वाहतूक कोंडी बद्दल तक्रार करू नये.
या उ.पुलाचा वापर केला पाहिजे.
आशु२९ , किती बरं वाटलं म्हणून
आशु२९ , किती बरं वाटलं म्हणून सांगू! खूप छान बातमी.
मिल्याचे अभिनंदन.
भ्रमा बऱ्याच दिवसांनी दिसलास. कुठे आहेस? आमची बिल्डींग झाली.आम्ही परत आलो राहायला.
धनुडी अभिनंदन. किती मजली
धनुडी अभिनंदन. किती मजली टॉवर आणि तुमचा कितवा मजला.
अन्जू थॅंक्यु. टॉवर वगैरे
अन्जू थॅंक्यु. टॉवर वगैरे नाही, १३ मजली आहे बिल्डींग, पार्किंगची लिफ्ट बाजूला आहे.
आमचा दुसरा मजला . आधी तळमजल्यावर राहायचो.
१३ मजली टॉवरच ग आमच्यासाठी.
१३ मजली टॉवरच ग आमच्यासाठी.
आमची बिल्डींग झाली.>> तुझं पण
आमची बिल्डींग झाली.>> तुझं पण अभिनंदन धनुडी
@धनुडी, कालच पाहिलं होतं तुला
@धनुडी, कालच पाहिलं होतं तुला :-)… अभिनंदन
Pages