शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिन (१४ एप्रिल) ड्राय डे म्हणून घोषित करावा, या मागणीसाठी पुणे कँटोन्मेंट नागरी हक्क समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष संदीप भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय समाजकल्याण मंत्री थावरचंद गहेलोत यांना निवेदन दिले आहे.

सविस्तर माहिती http://www.maayboli.com/node/57555

मी एक उत्साहवर्धक बातमी (फेसबुक, outlook) वाचली... गरजवन्ताला योग्य वेळी हवी असलेली मदत मिळाल्यास त्याच्या जिवनात किती मोठा फरक पडू शकतो याचे एक उदाहरण. लाल दाम्पत्याचे अभिनन्दन.

http://www.outlookindia.com/magazine/story/benefactors-best-stroke/297338

Masood Azhar Global Terrorist: Masood Azhar, Man Behind Parliament Attack, Pulwama, Blacklisted At UN

https://www.ndtv.com/people/masood-azhar-global-terrorist-after-4-failed...

खरोखरचे शुभ वर्तमान.... संसदेवर हल्ला, पुलवामा हल्ला असे भारतावर अनेक हल्ले करणाऱ्या पाकिस्तान स्थित जैश ए महम्मद ह्या दहशतवादी संघटनेचा मास्टरमाईंड मसूद अझहर एकदाचा global terrorist म्हणून बॅन केला गेला. चीन व पाकिस्तानने भरपूर प्रयत्न केले त्याला वाचवण्याचे, पण भारताने केलेला जबरदस्त पाठपुरावा आणि काही पाश्चात्य देशांनी घेतलेला पुढाकार ह्यामुळे चीनला नमावे लागले आणि UN security council ने त्याच्यावर बंदी आणली.

विकासाच्या नावाखाली, नवीन बांधकामाकरता झाडांची कत्तल सर्रास करण्यात येते त्या काळात जबलपूर येथील एका कुटुंबाने त्यांच्या घराच्या विस्तार प्रकल्पामधे आवारात असलेल्या १५० वर्ष वयाच्या झाडाला ही सामावून घेतले आहे आणि नवीन बांधकाम त्या झाडाच्या भोवताली केले आहे.

https://in.yahoo.com/news/goodnews-save-150-yr-old-043026895.html

हर्पेन खरच खूप मोठी माणसं ही. आमच्या सोसायटीत लोकांनी फांदीवरून घरात खार येते, बाल्कनीतलं वाळवन खाते म्हणून आधी फांदी मग झाडं कापली.

चारपाच दिवसांपूर्वी कुमाऊं पर्यटनच्या कार्यालयात गेलो होतो चौकशी करायला .... हरिद्वार, ऋषीकेश जोशीमठ व औली असा फिरायचा बेत होता पण त्याऐवजी अल्मोडा, मुन्सियारी जातोय ऐकून श्री नेगी (मंडळाचे कर्मचारी) म्हणाले बरं झालं .... बहोत भीड है वहाॅं कारण एका बड्याउद्योगपतीकचं लग्न आहे .... २०० करोड ₹ .... डोळे, तोंड विस्फारून विचार करू लागले दोन वर किती पूज्य लागतील व ह्या पुजनीयभुमीचं काय होईल ? तीच चिंती श्री नेगींनाही वाटत होती . कालच्या टाईम्सला सुकोर्टाने हेलीपॅड बांधायला परवानगी नाकारल्याची बातमी वाचून आनंद झाला.
हर्पेन, छान बातमी. गौहाटीलाही दोन नारळाची झाडं वाचवून घर बांधलेलं घर बघितलंय...

गोसावी (भिकारी) समाजातील एक मुलगी सर्व अडचणींवर मात करून एमबीबीएस। डॉक्टर होते! तिची कहाणी तिच्याच शब्दात. अत्यंत प्रेरणादायी भाषण.

https://youtu.be/MtAw2Kd_jyY

गोसावी (भिकारी) समाजातील एक मुलगी सर्व अडचणींवर मात करून एमबीबीएस। डॉक्टर होते! >>>>>
तिच्या जिद्द आणि चिकाटीला सलाम...

काल पुण्याच्या आशिष कसोदेकर यांनी लडाख सारख्या विरळ हवेच्या प्रदेशातील ५५५ किमी अंतराची धावण्याची स्पर्धा पार पाडली. ते ही स्पर्धा पुर्ण करणारे पहिले भारतीय ठरले आहेत. याआधी त्याच भागात त्यांनी १११ आणि ३३३ किमी अंतराच्या स्पर्धा पुर्ण केल्या होत्या. ५५५ किमी अंतराचे हे पहिलेच वर्ष होते.

गोसावी (भिकारी) समाजातील एक मुलगी सर्व अडचणींवर मात करून एमबीबीएस। डॉक्टर होते! तिची कहाणी तिच्याच शब्दात. अत्यंत प्रेरणादायी भाषण.

>> खरोखर! या मुलीची स्टोरी किती प्रेरणादायी आहे. अत्यंत कौतुकास्पद !

Sanitary Napkins To Be Sold For Rs 1 At Jan Aushadhi Stores

https://www.ndtv.com/india-news/sanitary-napkins-to-be-sold-for-rs-1-at-...

उद्यापासून जन औषधी केंद्रांमध्ये फक्त १ रुपयाला १ सॅनिटरी पॅड मिळणार आहेत. सगळ्यांना परवडेल अश्या किंमतीत असल्याने स्त्रियांच्या स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने हे चांगले झाले. योग्य धागा न सापडल्याने इथे लिहित आहे. आपल्या घरी येणाऱ्या मदतनीस बाईंना तरी आपण हे कळवू शकतोच.

आपल्या घराजवळची जन औषधी केंद्रे आपल्याला इंटरनेटवरून सापडू शकतात. ऑफिशियल लिस्टसाठी लिंकवरून ईमेल आयडी देवून उतरवता येईल. मी try केले नाही पण कुणाला हवी असल्यास लिंक देते आहे

https://data.gov.in/resources/state-wise-list-pradhan-mantri-jan-aushadh...

बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधू हिचे अभिनंदन. तिला २०१७ आणि २०१८ साली रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते, पण यंदा सुवर्णपदक मिळवून ती जागतिक विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे.

<< गोसावी (भिकारी) समाजातील एक मुलगी सर्व अडचणींवर मात करून एमबीबीएस। डॉक्टर होते! तिची कहाणी तिच्याच शब्दात. अत्यंत प्रेरणादायी भाषण.

https://youtu.be/MtAw2Kd_jyY
>>
----- छान बातमी...

टण्याने दिलेली लिंक ऐकली. खुप कौतुक व अभिनंदन मनिशाचे. तिची सगळी स्वप्ने पूरी होवोत.
केअश्विनी, चांगली बातमी. मुख्य म्हणजे विघटन होणारे आहेत त्यामुळे पृथ्वीला अपायकारक नाहीत.

गोसावी (भिकारी) समाजातील एक मुलगी सर्व अडचणींवर मात करून एमबीबीएस। डॉक्टर होते! तिची कहाणी तिच्याच शब्दात. अत्यंत प्रेरणादायी भाषण.
>> अत्यंत कौतुकास्पद !

अश्विनी चांगली बातमी ग.

बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधू हिचे अभिनंदन. तिला २०१७ आणि २०१८ साली रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते, पण यंदा सुवर्णपदक मिळवून ती जागतिक विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे.
>>>
बाकी काही कसेही असले तरी क्रीडा प्रकारात भारताला अच्छे दिन आलेले आहेत असे मान्य करावेच लागेल अशी कामगिरी भारताकडून सातत्याने होत आहे. आनंद आहे.

बाकी काही कसेही असले तरी क्रीडा प्रकारात भारताला अच्छे दिन आलेले आहेत असे मान्य करावेच लागेल अशी कामगिरी भारताकडून सातत्याने होत आहे. आनंद आहे. >>> गेल्या आठवड्यात त्या भारतीय उसेन बोल्टचा धावायचा व्हिडिओ बघून क्रिडामंत्र्यांनी त्याला प्रशिक्षणासाठी पाठवले असल्याचे वाचले.

भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूच्या जागतिक विजेतेपदाबरोबरच मानसी जोशीनेही पॅरा बॅडमिंटनमध्ये सुवर्ण अक्षरात आपले नाव नोंदवले आहे. बासेल येथील वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये एसएल-3 च्या अंतिम सामन्यात हमवतन पारुल परमारचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात मानसीने 21-12, 21-7 च्या फरकाने पारुल परमारवर विजय मिळवला.

२०११ मध्ये एका अपघातामध्ये मानसीला आपला पाय गमावावा लागला होता. तब्बल ५० दिवस रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. या दुर्घटनेनंतर आठ वर्षांनी मानसीने मैदानावर पुनरागमन करत जेतेपदाला गवसणी घातली. मानसी पुलेला गोपीचंद यांच्या अकाडमीमध्ये प्रशिक्षण घेतेय. मानसीने तीन वेळच्या विश्व चॅम्पियन परमारला शनिवारी 21-12, 21-7 च्या मोठ्या फरकाने पराभूत केले.

Hats off मानसी जोशी !

गोपीचंद सरांच्या खाणीतून एक एक रत्नं निघतायत.

DRDO च्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलंय की, आपण टी ७२ व टी ९० रणगाड्यांना इमेज इन्टेसीव्ह ट्यूब वापरून रात्रीच्या वेळेस १०० ते १५० मिटरपर्यंत दृक्षमानता मिळवून देऊ शकलो होतो.

२०११-१२ पासून चालू असलेल्या प्रयत्नांना यश मिळून आपण आता थर्मल इमेजिंग तंत्र आत्मसात केलं आहे. हे तंत्र अंमलात आणून प्रत्यक्ष उत्पादन व वापर आता सुरू होतोय.

टी७२ साठी १००० यंत्रणांची जरूरी असून त्यापैकी ३०० यंत्रणा बसवून झाल्या आहेत. हे तंत्रज्ञान खूप अद्ययावत असून ३ किमी पर्यंत याचा आवाका आहे. जास्त अचूकते बरोबर मिट्ट काळोखातही हे वापरता येते. अगोदरच्या यंत्रणातून वेध घेताना बाहेर अंधूकसा का होईना पण थोडाफार तरी उजेड लागायचा.

टी९०ला मात्र काही अडचणींमुळे ही यंत्रणा जरा सुधारित करून बसवायला लागणार आहे. पण त्यामुळे हीचा पल्ला ३ वरून ४ किमी होणार आहे.

नविन यंत्रणेमुळे शत्रू शोधून काढणे. त्यावर नेम धरून मारा करणे शक्य होणार आहे.

स्नायपर्स हेच करत असतात. ते जर रणगाडा करू लागला तर काय होईल हा अंदाजच आश्चर्यकारक असणार आहे. स्नायपरच्या गोळीच्या ऐवजी जर तोफगोळाच शत्रूच्या अंगावर जायला लागला तर . . .
Happy

काही दिवसांपूर्वी बातमी वाचनात आली की एका आयरीश टिनेजरने समुद्रातून प्लास्टिक चे माय्क्रोफायबर्स काढण्याची टेक्नॉलॉजी शोधली. खरच कौतुक वाटलं.
त्याला ५०,००० डॉलर्स चे बक्षीस त्याच्या शिक्षणाकरता मिळालेले आहे.
https://www.cnn.com/2019/08/01/us/irish-teen-wins-google-science-fair-tr...

ब्रिस्बेन येथे भारतीय वंशाच्या एका टॅक्सी चालकाने पाकीस्तानी क्रिकेटपटूंकडून भाड्याचे पैसे घेण्यास नकार दिल्यावर त्या खेळाडूंनी टॅक्सी चालकाला आपल्यासोबत जेवायला नेले
Pakistan cricketers take Indian cab driver to dinner in Brisbane after he refuses fare
https://cricket.yahoo.net/news/pakistan-cricketers-indian-cab-driver-144...

Pages