शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांद्रयान ३
यशस्वी लॅंडींग.
सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी.
सर्वांचे खूप हार्दिक अभिनंदन.
सर्व शास्रज्ञ आणि इतर अनेक हातांना शत शत नमन.
जय हिंद..

इस्रोने पुन्हा अभिमानास्पद कामगिरी केली !
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणार भारत पाहिला देश ठरला . इस्रो आणि तेथील सर्व सायंटिस्ट चे अभिनंदन ......

अभिनंदन इस्त्रो!

सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी.
सर्वांचे खूप हार्दिक अभिनंदन. >> +१

In 2009, a NASA instrument aboard the Indian Space Research Organisation's Chandrayaan-1 probe detected water on the moon's surface. In the same year, another NASA probe that hit the south pole found water ice below the moon's surface.

आज आपण तिथे पोचलो. पहील्या क्रमांकावरती.
आजचा दिवस निव्वळ अविस्मरणीय!!!
चंदामामा दूरके .................... नही नही ................ अभी तो बस टूरके

यससस Happy
अभिनंदन इस्त्रो!
सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगीरी +1

अभिनंदन इस्त्रो!
सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगीरी +1

चांद्रयान मोहिमेचा एक महत्वाचा टप्पा यशस्वी पार पडला... इस्रोच्या शास्रज्ञांचे अभिनंदन.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरज चोप्रानं भारताला पहिलं वहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. गेल्या वर्षी नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. या वर्षी मात्र आपल्या भात्यात जगभरातल्या महत्त्वाच्या स्पर्धांची विजेतेपदं घेऊन बुडापेस्टला दाखल झालेल्या नीरजनं जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकवून देत इतिहास घडवला.

नीरजने सुवर्णपदक मिळवले ही बातमी वाचून जितका आनंद झाला ति तकाच किंबहुना त्याहून जास्त आनंद पदक मिळवल्यानंतरच्या त्याच्या वागणुकीमुळे झाला आहे.

पदक जिंकल्यानंतर फोटो काढण्याच्या वेळेस जेव्हा आपला नीरज आणि चेक रिपब्लिकचा याकुब वडवेज दोघे एकत्र आले होते तेव्हा पाकीस्तानी अर्शद नदीमला (बहुदा त्याच्याकडे पाकीस्तानी झेंडा नसल्याने दूर उभा होता) त्याने ज्या प्रकारे फोटोत सामील करून घेतले ती कृती, ते खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन भारताची प्रतिमा उंचावणारे आणि जगभरातील sports loving community ला त्याच्या प्रेमात पाडणारे ठरले आहे.
ब्राव्हो नीरज.

भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत देशाने प्रथमच १०० पदके जिंकली आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धा अर्थात एशियन गेम्समध्ये याआधी भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी ही ७० पदकांची होती. यंदा मात्र भारतानं तो आकडा केव्हाच पार केला आहे. एवढंच नाही, तर एक नवा इतिहास रचत भारतानं आता पदकांची शंभरी पार केली आहे. या कामगिरीच्या रुपानं भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मोठ्या सन्मानानं रोवला गेला आहे. गेल्या ६० वर्षांतली ही भारताची एशियन गेम्समधली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

https://www.loksatta.com/krida/asian-games-medal-tally-india-crossed-100...

कतारमधील देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या त्या 8 भारतीय नौदल अधिकाऱ्यांची सुटका. >>> अरे वा, मस्त बातमी.

ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची योजना - मरणोत्तर अवयवदान करणाऱ्या लोकांचे अंतिम संस्कार स्टेट ऑनर्स सहित केले जातील.
जनरली काही व्यक्तींची देहदान, अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी जवळच्या नातेवाईक विरोध करून ही गोष्ट हाणून पाडू शकतात. सरकारी सन्मानासहित अंत्यसंस्कार होणार असतील तर कदाचित असा विरोध कमी होईल. अतिशय चांगला पायंडा ओरिसाचे मुख्यमंत्री पाडत आहेत.

Pages