शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लुप्त अग्रणी नदी पुन्हा प्रवाहित!
दीडशे वर्षांपूर्वी शेकडो गावांची तहान भागवणारी सांगली जिल्ह्य़ातील अग्रणी नदी गेली कित्येक दशके निसर्ग आणि मानवी उपद्रवांमुळे हरवून गेली होती. गाळ, माती, झाडाझुडपांनी तिचे अस्तित्वच संपवून टाकले. प्रशासन आणि लोकसहभागातून लुप्त झालेल्या या नदीचे पात्र प्रवाहित करण्याच्या कार्यामुळे आता १०५ गावांना पाण्याचा लाभ झाला असून या कार्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

सांगली जिल्ह्य़ाच्या खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे उगम पावणारी अग्रणी नदी खानापूरसह तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातून ५५ किलोमीटर वाहून कर्नाटकात जाते. या नदीचे २२ किलोमीटरचे पात्र लुप्त झाले होते. सात वर्षांपूर्वी नदीच्या पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेण्यात आले. राज्य शासनाची योजना, जलबिरादरीसह सिंचन क्षेत्रात कार्यरत सेवाभावी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने व लोकसहभागाने वर्षांनुवर्षे कोरडय़ा पडलेल्या नदीला पुनरुज्जीवन मिळाले.

लोकसहभागाने नदी पुनरुज्जीवनाचे २ कोटींचे काम ६५ लाख रुपयांत करण्यात आले. नदीचे पात्र ५० फूट रुंद, ६ फूट खोल करण्यात आले. तसेच विविध ठिकाणी ५० ते ६० नालाबांध घालण्यात आले. यामुळे पात्रात पाणीसाठा होऊन २१ गावांना पाण्याचा प्रत्यक्ष लाभ होत असून अग्रणी खोरे बारमाही होऊन १०५ गावांतील जलस्तर उंचावण्यास मदत झाली.

संपुर्ण बातमी
इथे वाचू शकता

अग्रणीला पाणी Uhoh माझ्या एका मित्राची मळणगावला शेती होती, अग्रणीच्या काठावर. त्यामुळे अनेकदा ते कोरडे पात्र पाहिले आहे.

सोलापूर येथे माढा तालुक्यातले श्री रणजित सिंह डिसले यांना ग्लोबल टीचर हा बहुमान मिळून त्यासोबत १०लाख डॉलर्स (सुमारे साडेसात कोटी रुपये) चा पुरस्कार मिळाला आहे.
त्यातली निम्मी रक्कम त्यांनी अंतिम फेरीतले त्यांचे सहकारी आणि स्पर्धक यांना दिली आहे.

रणजीत डिसलेंची बातमी वाचून छान वाटलं. त्यांच्या कामाविषयी अधिक वाचायला उत्सुक आहे. मुलींचे शिक्षण आणि शिकवण्याच्या अभिनव पद्धती यांत काम केलेलं कळलं.

रणजीत डिसलेंची बातमी वाचून छान वाटलं. त्यांच्या कामाविषयी अधिक वाचायला उत्सुक आहे. मुलींचे शिक्षण आणि शिकवण्याच्या अभिनव पद्धती यांत काम केलेलं कळलं. >> +१

<< >>सोलापूर येथे माढा तालुक्यातले श्री रणजित सिंह डिसले ग्लोबल टीचर हा बहुमान मिळून त्यासोबत १०लाख डॉलर्स (सुमारे साडेसात कोटी रुपये) चा पुरस्कार मिळाला आहे.
त्यातली निम्मी रक्कम त्यांनी अंतिम फेरीतले त्यांचे सहकारी आणि स्पर्धक यांना दिली आहे. >>> खरेच खूप अभिमानाची गोष्ट आहे

त्यांचे नाव "दिसले" आहे ना?
इंग्रजीत डिसले लिहिलंय कारण ती त्या भाषेची मर्यादा आहे.
किमान मराठीत आणि मराठी माणसांनी तरी "दिसले" लिहायला काय हरकत आहे?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धामापूर येथील तलावाचा समावेश WHIS (world heritage irrigation systems) च्या यादीत झाला आहे. ह्या यादीत समाविष्ट होण्यासाठी सिंचनव्यवस्था शंभर वर्षांपेक्षा जुनी आणि अनेक अंगांनी समृद्ध असावी लागते. धामापूर तलाव विजापूरच्या आदिलशाही कारकीर्दीत बांधला गेला. म्हणजे सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीचा आहे. ही व्यवस्था सर्व अटी पूर्ण करीत असल्याने तिचा समावेश झाला. आंध्रप्रदेशातील तीन सिंचनव्यवस्थांचासुद्धा समावेश यंदा ह्या यादीत झाला आहे.

लोकसत्ताने अग्रलेखाच्या मथळ्यात 'दिसले' असा शब्द वापरुन नेहमीप्रमाणेच कोटी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत विनाकारण गोंधळ निर्माण केला आहे.

खूप वर्षांनी लिहितेय इथे..... स्वतःविषयी स्वतःमधला सकारात्मक बदल लिहू शकते का?>>>>

कृपया लिहा, इतके सकारात्मक दुसरे काहीही नसेल.

"थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला.... पणती जपून ठेवा..." याच आशयातून अचानक मला लॉकडाऊन नंतर काय स्फूर्ती आली देव जाणे मी तब्बल 35 वर्षांनी पेन्सिल हातात घेऊन स्केचेस काढायचं ठरवलं..... Believe me confidence अजिबात नव्हता आणि मी काही प्रोफेशनल किंवा त्या क्षेत्रात ट्रेनिंग घेतलेली व्यक्ती नव्हे. पण हळूहळू सूर सापडला आणि काय आश्चर्य मी एकापाठोपाठ एक तब्बल पंचावन्न पोर्ट्रेट काढली. काय आनंद मिळालाय त्यातून तो शब्दात सांगता येणार नाही पण हा माझ्या मधला खूप सकारात्मक बदल आहे. त्यातील एकदोन इथे शेअर करू इच्छिते. पण मोबाईलच्या गॅलरीत असलेली इमेज कशी पोस्ट करायची समजत नाही, कोणी सांगेल का?

मजकूरात image द्या. >>> अपलोड >>>> चूज फाईल >>> मोबाईल मधून निवडा .
ती अपलोड होईल >> इन्सर्ट फाईल >>> इथे कोड उमटेल >>>> सेव्ह >>> चित्र दिसेल.

एकापाठोपाठ एक तब्बल पंचावन्न पोर्ट्रेट काढली. >>> वाह, कमाल!

त्यातील एकदोन इथे शेअर करू इच्छिते. >> जरूर. शिवाय जास्त / दर्दी लोकांपर्यंत पोचण्याकरता एक वेगळा धागाच काढा असेही सुचवेन.

मदर तेरेसा काय सुरेख रेखाटल्या आहेत.

शिवाय जास्त / दर्दी लोकांपर्यंत पोचण्याकरता एक वेगळा धागाच काढा असेही सुचवेन.

मदर तेरेसा काय सुरेख रेखाटल्या आहेत.>>>>>>>
+११

Pages