आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार ....
माझे सासरचे आडनाव मापुस्कर . श्रीवर्धन सध्याचे गाव पण जुने जाणकार म्हणतात की म्हापसा येथून पळून श्रीवर्धन येथे आलो
त्यावेळी पोर्तुगीज सत्ता होती आणि ते हिंदूंना विहीरीत पाव टाकून बाटवत असत. आपला धर्म बुडू नये म्हणून काही लोकांनी म्हापसा येथून पलायन केले पण आपल्या गावाचे आडनाव तसेच ठेवले.
ह्यापेक्षा आपल्या कुणाकडे जर ह्या आडनावाची माहीती असेल तर कृपया सांगावी ..

म्हापसे ह्या नावाचे पोर्तुगीज स्पेलिंग Mapuca असे आहे आणि त्याचा उच्चार माप्सा (duscuss मधल्या u सारखा अर्धा उच्चार -धड उ नाही आणि धड अ ही नाही) होतो. त्यामुळे मापुसकर म्हणजे म्हापसेकर असेच असावे.

*राजपूत आणि (राणे-राजपूत) आडनावे

पूर्वी एक सारखे आडनावाचे लोक एकच वंशाचे होते म्हणजे एकच होते याचे उत्तम उदारण म्हणजे (राजपूत , राणेराजपुत, भोसले ,अशी आडनावे )
महाराष्ट्रात मराठा समाजात क्वचितच थेट "राजपूत" हे आडनाव मिळते , राजपूत आणि मराठा एकवांशिय आहेत पण राणे ,भोसले असे आडनाव मिळतात पण "राजपूत" क्वचितच परंतु *राजपूत हे आडनाव आता (महार[महारक्षित] आत्ताचे बौद्ध ) यांच्यात सुद्धा मिळते आणि आश्चर्य म्हणजे महार समाजात (राणे राजपूत )असेही आडनावे आहेत यावरून त्यांनी क्षत्रियांची आडनावे घेतली यात शंका आहे कारण क्षत्रिय यांना आपले सर्वच आडनाव का देतील ??? एक तर एकसारखे आडनाव असणारे लोक पूर्वी एक होते किंवा त्यांचा राजघराण्याशी , सैन्याशी संबंध होता नंतर स्थलांतर , किंवा विभक्त झाल्याच्या कारणाने वेगळे पडलेले असावेत

Pages