आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देशपांडे :

मूळ नाव उत्तर कर्नाटकातून आले. "देशपंडित" (देश + विद्वान अशी फोड). देवगिरीमधील कृष्णदेवराय राजाने सर्वप्रथम 'देशपांडे' ही accountant (मराठी शब्द?)साठी जागा तयार केली. तिथेच या आडनावाचे मूळ सापडते.

शिवाजीमहाराजांनी याच नावाने महाराष्ट्रात करवसूलीसाठी नेमणुका केलेल्या होत्या.
अजून कोणाला माहिती असल्यास सांगावे. Happy

चांगला धागा रोहन!
आणि
नंदिनी
हेडरमधे इथे जातीपातीवरून भांडू नये अशा अर्थाची एक सूचना घाल >> +१ Happy

आडनाव : पाटील
पुर्वी फक्त पाटील हे आडनाव नसायच तर ते मुळ आडनावाला जोडुन यायच. जस आमच मगर पाटील. काहीजणांनी मुळ आडनाव वगळुन फक्त पाटील ठेवल तर आमच्यासारख्यांनी पाटील वगळल.
पण पाटील हा हुद्दा होता.
१. मुलकी पाटील - काम गावाचा/पंचक्रोशीचा सारा गोळा करणे आणि तो राजदरबारी जमा करणे. पाटील हा राजदरबार आणि गाव यातला दुवा होता.
माझ्या माहीतीप्रमाणे महाराष्ट्राच्या काही भागात पाटीलकी होती तर काही भागात देशमुखी. दोघांचे काम सारखेच असायचे. जाणकार अधिक प्रकाश टाकतील.
२. पोलिस पाटील - ईंग्रजांच्या काळात हा हुद्दा अस्तित्वात आला. नक्की कधी ते माहीत नाही. यांच काम गावात / पंचक्रोशीत होणार्या गुन्ह्यांची माहीती पोलिस स्टेशनला देणे. पोलिसांना तपासात मदत करणे.

हो माझ्या माहीतीप्रमाणेतरी तसच आहे. ज्या गावात देशमुख असतात तिथे मुलकी पाटील मी पाहिले नाहीत आणि जिथे मुलकी पाटील आहेत तिथे देशमुख नाही. याला अपवाद असु शकतात.

मस्त धागा. छान माहीती मिळेल.

कालच मी आणि लेक व्यवसाय आणि त्यावरून आलेली आडनावे आठवत होतो.

मजा येईल इथे वाचायला.

माझ्या पूर्वजांना त्या गावचे "चौधरी" ही पदवी मिळाली होती. मला त्याबद्दल अधिक माहिती हवी आहे. चौधरी पदाला काय अधिकार असत? कुणाच्या काळात ही मिळाली असावी? कारण त्याबद्दल आम्हाला वेगवेगळी माहिती मिळाली आहे पण त्यातली निश्चित अशी कुणाचीच नाही.

शिवाय गावाचे पाटील असतांना चौधरी अशी पदवी का दिली असावी?

परजणे - पुर्वी राजे रजवाड्यांची शस्त्रे परजण्याचे काम करणारे लोक. त्यांचे आडनाव परजणे पडलं.

जमिनदार वगैरेंच्या वाड्यात गायक म्हणून काम करत ते गायकवाड.

माझ्या आडनावाचा इतिहास माहित आहे मला, पण आत्ता विसरले आहे. Sad

पाटील आणि देशमुख ह्या दोन्ही पदव्या आहेत. देसाई देखील पद आहे.

देशावर देशमुख तर कोकणात देसाई. नावे वेगळी मात्र कार्यक्षेत्र सारखेच.

पाटील आणि देशमुख यांचे काम साधारण सारखे असले तरी पाटीलांचे कार्यक्षेत्र कमी आणि देशमुखांचे मोठे.

देशमुख म्हणजे देशाचा (मोठा विभाग / प्रांत) मुख्य अधिकारी. पाटील हा गावचा मुख्य अधिकारी.

फार छान सेना...

मस्त धागा....

माझे सासर चे आडनाव एकदम वेगळेच आहे.... "भारती" आर्थात उत्तर प्रदेशात हे खुप प्रचलित आहे. ह्यांचं घराणं मुळ उत्तरे कडिल. आधीचं आडनाव " वाजपेयी" उत्तरेत हरिद्वार ला मुख्य घराणे होते. त्यांना काही गावांचे " दिक्षीत " म्हणुन नेमले होते. मग ते "वाजपेयी- दिक्षीत" असे नाव लावत. हरिद्वार ला गंगेवर आमचे घाट आहेत

मग भास्कर राय म्हणुन महान पुरुष होवुन गेले. त्या काळी विद्वानांनाही राजाश्रय लागायचा. हे घराणे मग हैद्राबाद येथे आले. तिकडे असताना भास्कर रायांनी अनेक संस्कृत काव्य व स्तोत्रांचे तेलगू मधे भाषांतरे केली. ललिता सहस्त्रनाम मुख्य. तिकडेच भास्कररायांना "भारती" ही पदवी मिळाली . भास्कररायांना पेशव्यां बद्दल प्रचंड आदर होता. हैद्रबाद च्या राजाने आपलं म्हंटलं तरी पेशव्यांनी आपलं म्हणावं ही आस होती. त्या मुळे ते पेशवे दरबारी गेले. त्या वेळेस सवाई माधव राव सत्तेत होते. आणि नाना फडणविस कारभारी होते. भास्कररायांच्या विद्वत्ते मुळे नाना फडणविस खुप प्रभावित झाले आणि दोन गावे इनाम म्हणुन दिली. एक कर्नाटक मधलं "अळहळ्ळी' आणि दुसरं कोकणात खारेपाटण शेजारचं "शेजवली". ( आमच्या कडे शेजवली राहिलं)

नंतर भास्कर रायांचे वंशज मग ह्या दोन गावी इनामदारकी करत राहिली. पण मुळ पाळं मुळं मात्र हैद्राबादचीच राहिली. मुख्य कुटुंब स्थान हैद्राबादच राहिले. भास्कररायांच्या नावाने अजुनही आंध्रा मधे एक पंथ आहे. भास्कर रायांचं एक पोर्ट्रेट सासर्‍यां कडे आहे. मला वाटतं इनामदारकीचे नाना फडण्वीसां च्या सही चे पत्र ही नवर्‍या च्या अत्या कडे होते.

अशी ही आडनावाची कथा.....

माझ्या माहेरच्या आडनावा विषयी नंतर लिहिते....

रोहन देशमुखी ही पंचक्रोशीसाठी असायची. मान्य पण देशमुख देशावरपण सगळीकडे आहेत अस नाहीये. आमच्याकड पंचक्रोशीची पाटीलकी होती. आमच्यकड देशमुखी नव्हती. कारण बहुतेक निजामशाही मुळची नगरची असल्यामुळ तस असाव.
गावात पुर्वी न्याय निवाडा करण्यासाठी पंचायत असायची त्याच्या प्रमुखाला चौधरी म्हणायचे ना?

प्रिंसेस.. माझे स्वतःचे आडनाव चौधरी आहे. 'चौधरी' आडनावाविषयी काही माहिती विकिपेडियावर आहे पण मी त्याबाबतीत समाधानी नाहिये.

ही पदवी मुघल काळात दिली जायची अशी माहिती तिथे आहे. चौधरी हे पद आता आडनाव सर्वत्र भारतात आणि पाकिस्तानात देखील आहे. पण मी वाचलेला पहिला 'चौधरीपणा बहाल केला' हा उल्लेख ११ व्या शतकातला बिंब राजाच्या काळातला आहे. तेंव्हा विकिवरच्या माहितीला अर्थ उरत नाही.

तुमच्याकडे असलेली माहिती इथे लिहा. मलाही काही नव्याने कळेल.. धन्यवाद.

कुलकर्णी हे आडनाव सुध्दा एक प्रकारचे पद आहे, हे लोक बहुधा गावातील प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करुन ठेवत असावेत.

गावात पुर्वी न्याय निवाडा करण्यासाठी पंचायत असायची त्याच्या प्रमुखाला चौधरी म्हणायचे ना?
>>> होय सुशांत...

पुर्वी आणि आताही गावांमध्ये ५ पंच अशी पद्धत होती / आहे. त्यातल्या सरपंचाला चौधरी म्हणायचे. चौ - चार. चौधरी म्हणजे चार जणांना धरून काम बघणारा.

पण मी जो 'चौधरीपणा बहाल केला' उल्लेख वर केला आहे तो लढाईमध्ये पराक्रम गाजवल्यानंतरचा आहे. म्हणजे हे पद न्यायनिवाडा या बाबीत दिले जाते की लढाई संदर्भात ह्यात नक्की माहिती हाती येत नाहिये.

मस्त.
हुद्दे नसलेल्या आडनावांचा गावांशी, व्यवसायांशी संबंध असावा असे मानतात.

मा़झे आडनाव उपाध्ये
हे बहुतेक राज्यात वेगवेगळ्या स्वरूपात/अपभ्रंशात( अपभ्रंश -मराठी माणसासाठी) प्रचलित आहे.
उपाध्या- म्हणजे शिक्षक( उत्तर कन्नड- कर्नाटक)
उपाध्याय-म्हणजे शिक्षक( गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश)
- ----- पाध्याय ( उदा. मुखोपाध्याय, बंदोपाध्याय - बंगाल)
पण महाराष्ट्रात मात्र हे नाव उपाध्ये - पौरोहित्य,
घरोघरी जाऊन पूजा अर्चा करणारे या नावाने प्रसिध्द आहे-
ते शिक्षक ही होते -पण संस्कृतमधील पांडित्या मुळे-

इतर राज्यात जे 'ध्याय' जे लागले ते शिक्षकी पेशामुळे

म्हणून उपाध्ये = मग ग्रामोपाध्ये सुध्दा याचेच स्वरूप
जेवढे उपाध्ये आहेत ते मात्र महाराष्ट्रातीलच.
आमच्या बाबतीत ४ पिढ्यांपूर्वी आम्ही 'गजेंद्रगडकर' होतो - पण खापरपणजोबा बडोदयाच्या दरबारात पौरोहित्य करीत असत आणि संस्कृत ही शिकवत म्हणून मग ' उपाध्ये' हे बिरुद मिळाले व आजही टिकून आहे.

पण अजूनही नाव सांगितले व पुढच्याला ते लिहायला सांगितले तर ९०% लोक
उपाध्या,उपाधे , उपाध्याय ( आणि तत्सम स्पेलिंग इंग्रजीत ) लिहितात.

अर्थात आता मी उपाध्ये "उरलो नावापुरता" Happy

रेव्यु.. अर्थात... आता सर्वच आडनावे नावापुरती राहिली आहेत..;)

त्यांचा व्यवसायाशी काही संबंध नाही.

छान धागा.
माहेरचे आडनाव सकळकळे. इंग्रजी शिकवणीचे सर गमतीने सकळकळे = जिला सगळं कळतं ती सकळकळे अशी फोड करत असत. त्यामुळे त्यांनी सर्वज्ञ असे माझे नामकरण करून टाकले होते.
ह्या आडनावाचा इतिहास मला ठाऊक नाही. ह्या आडनावाचे विदर्भात बरेच लोक आहेत. इथे मुंबईत जे कोण आहेत ते माझ्या नात्यातलेच असतील. शिवाजी राजांच्या अनेक गुरूंपैकी एक सकळकळे म्हणूनही होते अशी कर्णोपकर्णी आलेली एक कथा ऐकली आहे. जास्त काही माहीत नाही. व्यवसायावरून मिळालेले हे आडनाव वाटत नाही.

सासरचे आडनाव मोडक. ह्याविषयी तर काहीच माहीत नाही. Happy

रोहन आणि सुशांत दोघांनाही धन्यवाद. माझी माहिती दोघांच्याही मुद्द्यांच्या जवळ जाणारी आहे .
एवढा इंटरेस्टिंग विषय अन ऑफिसात दोन मिटींगा Sad
परत येउन सविस्तर लिहिते. रुमाल सांभाळा माझा Wink

माझं सासरचं आडनाव 'देव'. आम्ही सोलापूरचे. पण आमचा महाराष्ट्रातील इतर कोणत्याही देव आडनावाच्या लोकांशी संबंध नाही. आमचं पूर्वी आडनाव मित्रगोत्री असे होते. आमचा गोत्र मित्रयुव म्हणून. पण आमचे पूर्वज - कदाचित ५-६ पिढ्यांपूर्वी तिरुपतीला बालाजीच्या दर्शनाला जात. (व्यंकटेश आमच्याकडे पाहुणा देव.) पूर्वी असे लांबचे प्रवास करणं खूप खडतर असल्याने आणि एवढ्या लांबच्या देवाचे दर्शन घेऊन आल्याने लोक 'देव आले देव आले' म्हणू लागले. आणि मग आमचे देव हे आडनाव रूढ झाले. (बाकी पुण्याच्या भागात जे देव आडनाव असलेले आहेत ते एक तर देशस्थ ऋग्वेदी किंवा कोकणस्थ आहेत. पण आम्ही मात्र देशस्थ यजुर्वेदी!)

शब्दशः अर्थ घ्यायचा तर पटवर्धन म्हणजे कापड वाढवणारे असा अर्थ आहे.
हा संदर्भ शब्दार्थाने विणकरांशी जाऊ शकतो. पण कुठल्या तरी काव्यात कृष्णाला पटवर्धन (द्रौपदीचे वस्त्र वाढवले या संदर्भाने) म्हणले आहे.
पटवर्धन इतिहासात दिसतात तेव्हापासून पटवर्धनच आहेत. हरभट पटवर्धनांपासून बघितलं तर का माहित नाही पण भिक्षुकी/ पौरोहित्य करणारे फारसे दिसत नाहीत. याचे कारण माहित नाही. एकतर गरीब शेतकरी तरी आहेत किंवा मग संस्थानिक, योद्धे, कारकून इत्यादी.

सावंत लोकांबद्दल फारशी माहिती नाही. शेती आणि लढाई हे प्रमुख व्यवसाय असावेत. सावंत हे आडनावही नुसतं येत नाही. त्याला आधी काहीतरी असतं म्हणे. पण नीट माहिती नवर्‍याला असेल.

आणि हो! माहेरचे आडनाव देशपांडे ज्याचा उल्लेख वर आला आहेच. जे मी इतिहासात शिकले आहे त्या प्रमाणे देशपांडे वतनदार होते एवढे माहीत.

मी माहेरची लिमये - हुद्दा किंवा व्यवसायाशी काहीच संबंध नाही
सासरची देवकुळे - देवांच्या कुळातील Happy

माझे लग्नानंतर चे आडनाव 'देसाई'. घरी असे ऐकले की आधि ते "सावंतदेसाई" असे होते , काही पिढ्यांपासून सावंत बाद झाले . आता नुसतेच देसाई.

अरे वा!! मस्त धागा

मराठे : पेशव्याबरोबर पानिपतात जे कोकणस्थ ब्राह्मण लढले त्याना मराठे म्हटलं गेलं असं ऐकलं पण मग सगळे मराठे कपि गोत्रीच कसे हा प्रश्न आला . अर्थात मराठे ,जाईल, चक्रदेव आणि काही जोशी हे सगळे एकच असं कुलवृत्तान्त सांगतो.

लिमये : याचा आगा पिछा काहीच् माहीत नाही, कुठली पदवी ,उपाधी , हुद्दा, व्यवसाय असं काहीच असावं असही वाटत नाही. व्युत्पत्तीचा संदर्भच लागत नाही.
[ अवांतर : मी नवर्‍याला 'तुम्ही मुळचे चिनी असं म्हणते "ली म ये " कसं चिनी माणसाच नावं वाटतं ना]

Pages