आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्यंतरी एका मित्राने ९६ मराठा कुळांची एकत्र संकलीत माहिती पाठवली.
त्यात देवक आणि सध्याचं आडनाव ह्याप्रमाणे पाहता आम्ही मुळ युपीवाले भैय्येच की. Wink
कृष्ण, कंस, कौरव , पांडव अशा कुळातील म्हणे.
पण मुळ आडनाव यादव / जाधव ही माहिती क्रॉस चेक करायची अवघड आहे.
पण मुळ आडनाव जाधवच होत का पाच सहा पिढ्यांमागे हे पहायचं असेल तर हेळवी गाठला पाहिजे.

आमचे आडनाव पत्की.
आमच्या कडे जुनी वंशावळ आहे त्यात असा उल्लेख आहे कि आमचे एक पूर्वज श्री व्यंकटेश राव हे तोरमल (बहुदा कर्नाटकात असावे) येथे किल्लेदार होते ते लढाईला जाताना पताका घेऊन सैन्याच्या पुढे जात असत तेव्हा पासून (इ.स.१७६२) आमच्या घराण्यास पतकी हे आडनाव पडले आहे .तेव्हा जे कोणी पत्की असतील त्यांनी अधिक माहिती दिल्यास बरे होईल .धन्यवाद धागा छान आहे

धागा वाचताना आठवले कि,
(१) एक लग्न पत्रिका मला आली होती जिच्यात वधू पक्ष होता ----उन्हाळे आणि वर पक्ष होता .........पावशे
(२) माझ्या एका वकील मित्राने सांगितले कि आज एक मजकूर नोटरी साठी आला होता तो काळे यांचा टेलिफोन गोरे यांच्या नावे करण्या संबंधी होता

पाटील हे लोक फार पूर्वी गावातील शेतीचा अभीलेख ठेवत असत . त्या साठी ते कापडी पट्ट्याचा वापर करत . हे कापडी पट्टे ते बांबूच्या नरसाळ्या संभाळून ठेवत. या कापडी पट्ट्यांना पट्टालीक अस संस्कृत नाव होते . त्या वरून पापील हे अडनाव अले अाहे.

माझे माहेरचे आडनाव 'भावे', मूळ गाव भावेअडोम रत्नागिरीजवळचे आताचे गाव कळंबूशी (संगमेश्वर तालुका). सासरचे आडनाव 'केळकर' मूळ गाव रत्नागिरीजवळचे ढोकमळे (नेवरे). साडे-तीनशे,चारशे वर्षांपूर्वी केळकरांपैकी काहीजणांनी देवगड तालुक्यात वाडा-फणसे येथे स्थलांतर केले, आमच्याकडे एक जुने हस्तलिखित आहे त्यात मूळ गाव ढोकमळे हा उल्लेख आहे आणि कुळांच्या चालीरीती आणि कुलदेवता यांचे उल्लेख आहेत त्यानुसार कुलदेव-सोमेश्वर(रत्नागिरी) आणि कुलदेवता ढोकमळे येथील देवी बंदिजाई.

'केळकर' आडनाव कसे पडले तो उल्लेख नाही. पण आमचे मूळ गाव केळशी नाही असे कागदपत्रांवरून दिसते.

पंडित/पंडीत या आडनावाविषयी कुणी सांगु शकेल का?
मी हे आडनाव ब्राम्हण, सोनार आणि चक्क ख्रिश्चन लोकांमध्ये पण ऐकलंय.

माझ्या सासरचं आडनाव गोमरकर आहे. नवरा म्हणतो की आपले मूळ आडनाव बाम आहे पण आपण मूळचे गोमराई गावाचे म्हणून आपण गोमरकर.

माझ माहेर च आडनाव अनगळ आहे .देशस्थ ब्राह्मन. म.प्र. मधे कोनि अनगळ आहे का? कुलदेवा बद्दल माहिति हावि आहे.

दांडेकर हे कोब्रा असतील तर ( sorry जातीचा उल्लेख केल्याबद्दल), मुळचे रत्नागिरीजवळचे 'दांडेअडोम' ह्या गावचे आणि नंतर कुठे कुठे गेले.

'दांडेअडोम' ह्या गावाचा उल्लेख गो नि दांडेकर यांच्या 'कुणा एकाची भ्रमणगाथा' ह्या पुस्तकात पण आहे.

'जोगदेव' या आडनावाचा इतिहास माहित आहे का कोणाला?
काहीतरी पदवी आहे म्हणे Uhoh

आणि कुकर्णी आणि कुकर्णी यात नक्की काय फरक आहे?
पुर्वी कुलकर्णी सगळे देशस्थ आणि कुळकर्णी सीकेपी असा माझा गै.स. होता.
पण दोन्ही आडनावांची दोन्हीकडे माणसे पाहिली.

कृपया मला गोरे या आडनावा बद्दल कोणी काय माहिती देउ शकेल क?
आम्ही मराठा आहोत पण या आडनावाचा काही इतिहास आहे का हे जाणून घ्यायचे आहे.

कृपया मला गोरे या आडनावा बद्दल कोणी काय माहिती देउ शकेल क?
आम्ही मराठा आहोत पण या आडनावाचा काही इतिहास आहे का हे जाणून घ्यायचे आहे.

खळे आडनावाबद्दल कोणाला काही माहीती आहे का?
रत्नागिरी,खेड
खळे हे आडनाव कुणब्यांप्रमाणे कायस्थांमध्येही आढळते
या शब्दाचा अर्थ काढता येत नाही आहे

खळे, खळं हे बाजरी, गहू, ज्वारी वगैरे धान्यापिके मळण्यासाठीची जागा. पूर्वी मशीन्स नसल्याने शेतात एक खोलगट गोलाकार जागा करुन (बहुतेक शेणामातीने ती टणक करायचे, नक्की माहित नाही) मध्ये एक खांब लावायचा, त्याभोवती घाण्याला जसे बैल जुंपतात तसे चार ते आठ बैल जुंपून गोल गोल फिरवले जायचे, त्यांच्या खुरांनी धान्य मळले जायचे. ती जागा म्हणजे खळे, खळं.

आडनाव देण्यामागे हाच अर्थ असेल असे नाही. खळगं असाही एक शब्द मराठीत आहे, त्याचा अर्थ पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेला खड्डासदॄश्य भाग.

खळे हे एखाद्या गावाचे नाव असू शकते. खर्डे ह्या नावावरुन अपभ्रंशही झालेला असू शकतो. अर्थात हे माझे वैयक्तिक कयास आहे, अभ्यासू मत नाही.

माहित नाही पण एक नरखेड म्हणून गाव सोलापूर जिल्ह्यात आहे, सीना-भोगावती संगमावर. आणखी नरखेड/नारखेड गावं असतील तर सेन्सस मधे शोधायला लागतील.

असावे.. पण आम्ही खान्देशातील आहोत.. लेवा पाटीदार समाज .. आमचे मूळ गुजरात मधले आहे. असे माझ्या आजीकडून कळले. (खान्देश, पारपट्टि, वर्हाडी असा बराच मोठा भाग गुजरात वरुन महारष्ट्रात स्थायीक झाला)

नारखेड आणि नरखेड ही नावं असलेली गावं अनेक आहेत. नागपूर, भंडारा, बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यांमध्ये नारखेड आहे. एक नारखेड खांडव्याजवळ आहे.

गायकवाड या नावाबद्दल चूकीची माहिती लिहिली आहे
सुर्यवन्शी हे आडनाव होते, जिजामातेने गायकवाड हे नाव दिले
शिवरायान्चा अन्गरक्शक याने शिवरयान्च्या आदेशावरुन गाय ओढुन नेणारा कसाई होता, त्याचा हात तोड्ला, त्यावरुन जिजामातेने त्याना गायकैवारी असे सम्बोधले होते.
पुढे त्याचा अपभ्रन्श होउन गायकवाड हे नाव पावले.
हेच बदोद्याचे गायकवाड म्हनुन पुढे प्रसिद्ध झाले

नमस्कार, मी सचिन जाधव.

माझ्या आईचे माहेरचे पूर्वीचे आडनाव ‘पोणारकर’ असून गेल्या काही वर्षांत त्यांनी ‘चित्रगार’ लावायला सुरूवात केली आहे. त्यांचे संपूर्ण घराणे हे मुर्ती बनविण्याच्या व्यवसायात असून कर्नाटकातील हुबळी येथे त्यांच्या गणेशमुर्तींना चांगली मागणी असते. फार पूर्वी ते म्हैसूरला राहायचे. त्यानंतर ते शिकारपूरला राहायला गेले. आता सध्या बहुतांश मंडळी हुबळीला वास्तव्यास आहेत. घरी मराठी बोलतात मात्र म्हैसूरला राहीलेले असल्यामुळे त्यांच्या बोलण्यात कानडी हेलासोबतच ऊर्दूचा थोडा प्रभाव जाणवतो.

माझ्या वडीलांचे गाव मात्र नाशिक येथील ओझर.

Pages