आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण कुमार,

>> कोब्रा बद्दल असही म्हटल जात कि ते इंग्रजांचे वंशज आहेत

इंग्रज म्हणजे नक्की काय ते ठरवावे लागेल. इंग्लंडमध्ये राहणारे, की ज्या जमातीवरून इंग्लंड हे नाव पडलं त्या जर्मनीतल्या अँग्लेस समूहाचे वंशज, की इंग्रजी बोलणार्‍यांचे वंशज?

जर्मनमधील अँग्लेसशी समानार्थी संज्ञा लॅटिन (angustus) व संस्कृत (अंहु) मध्येही आढळते. तिचा अर्थ अरुंद किंवा निमुळता असा होतो.

आ.न.,
-गा.पै.

कोब्रा बद्दल असही म्हटल जात कि ते इंग्रजांचे वंशज आहेत ,हे खरे आहे काय ?>>

कोब्राच्या वेगवेगळ्या कथा आहेत. त्यातली परशुरामाची कथा ही सर्वात जास्त फेमस आहे. असो.
माझ्या वाचनात जे आलं त्यावरुन खालिल निष्कर्षः

कोब्रा हे विदेश वंशाचे आहेत हे सांगताना कोब्रांच्या घा-या डोळ्याचा संदर्भ दिला जातो. तसं कोब्रा हे रंगाने गोरे आहेत हा दुसरा मुद्दाही लगेच पुढे केला जातो. या व्यतिरिक्त माझा अनूभव असा आहे की कोब्रा हे कोणी असो पण 'दे आर स्पेशल रेस' यावर मात्र मी ठाम आहे. कारण त्यांच्या अंगी असलेली चिकाटी व दिर्गउद्योग हे कमालीचं भांडवल आहे. पण हे गुण तर उत्तर भारतातील व्यापारी समाज व मारवाड्यांत पण आहे. मग कोब्राचं आजून एक गुण पुढे येतो तो म्हणजे हे कोब्रा लोकं इंटेलिजन्ट व इंटेलेक्चुअल्स पण आहेत. मग याही पुढे जाऊन असे दिसते की 'दे आर टेरिबल वॉरिअर्स' आत्ता मात्र मला एक गोष्ट अस्वस्थ करते ती म्हणजे एखाद्या रेस मधे हे सगळं असणं अवाक करणार आहे. भारतीय रेस मधे हे दिसत नाही हे मात्र नक्की. म्हणजे कोब्रा विदेशी रेसच आहे. पण कोण? ते मात्र ठामपणे सांगता येणार नाही.

तरी ते इराणी रेस किंवा पोर्तुगीज्/इंग्रज वगैरे समाजातुन संक्रमित रेस असावेत. असा माझा निष्कर्ष.

वरिल वाक्य खोडण्यासाठी एक जबरदस्त संदर्भ असा आहे की वास्को-द-गामा नंतर हे सगळे गोरे इकडे आलेत अन कोब्रा तर आधीपासूनच इथले आहेत. (काही लोकं हे मानत नाही)

त्या वास्कोला भारतात आणणारा एक गुज्जू होता. तो गुज्जू आर्फिकेत व्यापारी म्हणून होता(गंमत म्हणजे दुस-या गुजूने या गो-याना छोडो भारत म्हणटलं, व सोडायला लावलं) म्हणजे त्या गुज्जूला तो जलमार्ग माहित होता. याचाच अर्थ हा व्यापार्‍याना ज्ञात मार्ग होता. फार फार तर असं म्हणता येईल की एका दमात जाणारे जहाज आपल्याकडे नव्हते. पण मार्ग मात्र माहित होता. थोडक्यात हे व्यापारी लोकांची वरदळ असलेले सागरी किनारे होते.

म्हणून मला वाटतं की वास्कोच्या आधीही कोकणात व्यापार्‍यांची ये जा होती. त्यातून दोन रेस एकत्र येऊन एक संक्रमीत रेस तयार होण्याला वाव होता व ते तसे झाले असावे. तसही प्रत्येक समाज प्रगती करताना संक्रमीत होत गेला हे जाहीर आहेच. म्हणजे कोब्रा हा समाज गोरे (डच,फ्रेंच,इंग्रज वगैरे) लोकांशी शरीर संबंध आल्यावर तयार झालेलं नवीन रेस असेल याची खूप शक्यता आहे.

कपाळाची रुंदी, नाकाची उंची व टोक, हनुवटीची ठेवण, कवठीचा आकार वगैरे तुलत्नात्मक संशोधनं बरीच झालीत पण निकालात ठामपणाचा अभाव दिसतो. त्याला कारण हे संक्रमण हजारो वर्षाआधी झालं असावं. तसही सातवाहनाच्या काळात प्रचंड मोठ्या आकाराची जहाजं होती व जलमार्गाने हल्ला चढवण्याचं तंत्रही. यावरुन कोब्रांचं संक्रमण फार फार फार जुनं असावं.

बट एनीवे, दे आर स्पेशल रेस ऑफ दिस सॉईल!

आम्ही चित्पावन हा लेखांचा संग्रह आणि चित्पावनिझम हा एक ग्रंथ हे दोन्ही वाचा.
इंग्रजांचा काहीही संबंध नाहीये. असल्या काड्या टाकू नयेत.

>>>त्या वास्कोला भारतात आणणारा एक गुज्जू होता. तो गुज्जू आर्फिकेत व्यापारी म्हणून होता(गंमत म्हणजे दुस-या गुजूने या गो-याना छोडो भारत म्हणटलं, व सोडायला लावलं)
ह्याचा अर्थ पहिल्याने दुसर्‍याला आपल्या दलालीतला वाटा द्यायला नकार दिला म्हणून दुसर्‍याने छोभा म्हटलं की काय? Wink

नीधप,

>> इंग्रजांचा काहीही संबंध नाहीये. असल्या काड्या टाकू नयेत.

जरी असला तरी त्यास काही अर्थ नाही. हूण जरी बाहेरून येऊन स्थायिक झालेले असले तरी स्वत:ला राजपूत म्हणवून घेतात. जो भारतीय परंपरेला आपली मानतो तो मूळचा कुठला का असेना.

हे माझं वैयक्तिक मत. Happy

आ.न.,
-गा.पै.

गा पै
इंग्रजांशी संबंध नाहीये एवढे मला माहितीये.
पर्शिया (आता इराण), बेने इस्रायल या समूहांशी डिएनए मॅपिंगने सारखेपणा दाखवता येऊ शकतो.
चित्पावनिझम या संशोधन ग्रंथात याबद्दल बरेच काम केलेले आहे. तसेच आम्ही चित्पावन या लेखसंग्रहातही आहे. अगदी पार इरावती कर्व्यांपासून सगळ्यांचे लेख आहेत. ते मी वाचलेय पण त्याला बरीच वर्षे झाली आणि माझा तो विषयही नाहीये त्यामुळे मी तपशिलात सांगू शकणार नाही.

इंग्रजांशी संबंध आहे हे म्हणणे इथे काडी टाकायला म्हणले आहे हे कुणीही सांगू शकेल.

चित्पावनिझम या संशोधन ग्रंथात याबद्दल बरेच काम केलेले आहे.>> पुणे व मुंबई दोन्ही विद्यापिठातिल इतिहास प्रमुखाना भेटून या ग्रंथाची चौकशी करा. या पुस्तकाला फार फार तर चित्पावन पुराण म्हणता येईल.

अन पुराणाला ऐतिहासिक संदर्भात काळीचे स्थाना नाही. असो.

आता मी थांबतो.

तंजावर मधील मराठी लोकांबद्दल उत्सुकता असल्याने १-२ जणांशी संपर्क साधला.

त्यांच्याकडून काही माहिती मिळाली..

कांची, अर्णि, रेडिपल्ली, श्रीपथी, वल्लीकड्डु, अगाराम, तंजोर

.......... तसेच......

पिंगळे, कवळे, काशीकर, तंजावरकर, अर्णिकर, नाईक, पुणतांबेकर, शेलवणकर, डोणकर, पठणकर, कणले, किल्लेदार, डबीर, गंधेकर, व्यास, गोस्वामी, केसकर, रामदासी, पंत.

हे वरील सर्व स्वतःला तंजावर महाराष्ट्रीयन म्हणवतात.

नोकरी-धंद्यानिमित्त आता ते सर्वत्र विखुरले गेले असून अनेकजण पुण्या-मुंबईत स्थायिक झालेले आहेत. मध्यंतरी मात्र खूप कमी जणांनी बोली-चाली मध्ये मराठी भाषा वापरली नाही. आता पुन्हा ते मुलांना मराठी भाषा शिकवत आहेत. ह्यातील अनेक SIMA (South Indian Maharastrian Association) सोबत सलग्न आहेत.

रोहन खुप छान पोस्ट आहे आवडले माझ्याही आडनावाविषयी मला कुतुहल आहे..भंडारी हे आडनाव जैन लोकांमध्ये पण आहे आणि ब्राम्हणांमध्ये ही ,हे कसे काय प्लीज..माहिती द्यावी..

सह्याद्री पर्वत रंगांमध्ये वसणारी एक जमात "ठाकूर" म्हणून ओळखली जाते.
ठाकूर ह्या शब्दाची उत्पती "तस्कर" किंवा "ठक", "ठग" या शब्दांपासून झाली असावी.
महाराष्ट्रात ठाकूर हे आडनाव "राजपूत" किंवा "राजस्थानी" लोकांकडून आले असावे.
ठाकूर हे "पद" किंवा "हुद्दा" हि असू शकेल. उत्तर भारतातील एका क्षत्रिय जातीसमूहासही ठाकूर म्हणतात.

@ राजेन्द्र भंडारी....

गोव्यामध्ये जो 'भंडारी' समाज आणि वर्ग आहे तो स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेतो. फार मोठी अशी परंपरा आहे गोव्यातील भंडारी जमातीची. राजकारण आणि कलाक्षेत्रातही भंडारी मंडळी तिथे आघाडीवर असल्याचे तुम्हाला दिसून येईल....[तुम्ही गोव्याचे नाहीत असे गृहित धरले आहे.]

गोमंतकातील रवि नाईक, मधुकर नाईक आदी नेते तसेच मच्छिंद्र कांबळी सारखे कलाकार हे भंडारी होत....मुळात ही सारी मंडळी स्वत:ला "क्षत्रिय भंडारी' गटात मानतो, पण राजकीय वैर इतके जबरदस्त आहे उत्तर आणि दक्षिण गोव्यातील भंडार्‍यांत की एकदा तर चक्क रवि नाईक विरुद्ध श्रीपाद नाईक अशी दोन जबरदस्त नावे निवडणूकीत होती....तिथेच भंडारी समाजात दुफळी झाली.

माझ्या माहितीनुसार 'भंडारी' हे शंकराला मानतात त्यामुळे हे आडनाव जैनात नसेल... महादेवाला तहान लागली होती, पण पाणी कुठेच मिळेना अशावेळी एका भक्ताने नारळाची झाडे शोधून, वर चढून नारळ काढले आणि मग त्यातील पाणी देवून देवाची तहान भागविली म्हणून महादेवाने त्याला आपल्याकडे असलेल्या भांडाराची जबाबदारी सोपविली आणि ती व्यक्ती भांडारपाल झाल्यावर त्याचे आडनाव प्रथम 'भांडारी' व नंतर त्यात अपभ्रंश होऊन त्याचे 'भंडारी' झाले अशीही एक पौराणिक कथा आहे.

अशोक पाटील

वा, झकास माहिती. आणि इतका नाजूक विषय असून, अजूनही वादविवाद नाहीत!

नाशिकला माझ्या ओळखीचे 'काळे' या एकाच आडनावाचे , कोब्रा, देब्रा, महार, कासार, सोनार इतक्या जातींचे लोक आहेत. शिवाय मराठा ही आहेतच. आणखी एक अधिकारी आहेत, जे त्यांचे आडनाव 'काले' आहे, 'काळे' नाही असं बजावून सांगतात.

आमचं पाटणकर आडनावही कोब्रा, सीकेपी, मराठा (सातारा- आमदार विक्रमसिंह पाटणकर) वगैरे बऱ्याच जातीत असतं. आम्ही साताऱ्याचे नाही. कोकणातले. पण तिथे पाटण नावाचे गाव आहे का, काही माहिती नाही. मनसे वाला एक मित्र म्हणतो तुम्ही बिहारमधल्या पाटण्याचे असणार.

नाशिकचं एक भीषण आडनाव म्हणजे म्हैसधुणे. अर्थात व्युत्पत्ती स्पष्ट आहे. आज हे मोठे राजकारणी, शेतकरी, व्यापारी आहेत.

वर कुणीतरी म्हणल्याप्रमाणे आडनावे, त्यातले बदल, स्थलांतर याचा अभ्यास हा खूप महत्वाचा आणि रंजक इतिहास आहे. तहाची कलमे आणि सनावळ्या यांच्यापेक्षा तर नक्की! पण आपल्या समाजाला हे सगळं लिहून ठेवायची, किंवा लिहिलेलं जपून ठेवायची हौस नाही. अगदी आपल्याच घरातली ४०-५० वर्षांपूर्वीची जमा खर्चाची नोंदवही किंवा एखाद्या लग्नाच्या याद्या वागैरेतूनही कितीतरी इतिहास उलगडत असतो.

आमचं पाटणकर आडनावही कोब्रा, सीकेपी, मराठा (सातारा- आमदार विक्रमसिंह पाटणकर) वगैरे बऱ्याच जातीत असतं. >> कोकणी मुसलमानातपण आहे. माझा एक मित्र समिर पाटणकर. हमखास लोक त्याला कोब्रा समजायचे. (दिसायला मात्र अगदी देब्रा होता Proud )

पिंगळे, कवळे, काशीकर, तंजावरकर, अर्णिकर, नाईक, पुणतांबेकर, शेलवणकर, डोणकर, पठणकर, कणले, किल्लेदार, डबीर, गंधेकर, व्यास, गोस्वामी, केसकर, रामदासी, पंत.

हे वरील सर्व स्वतःला तंजावर महाराष्ट्रीयन म्हणवतात. >> अरे वा, हे जरा आजोळच्या नातेवाईकांना विचारतेच! कारण आजोळी तिरुपती बालाजीचे प्रचंड प्रस्थ आहे... गेल्या काही पिढ्या आहे... मला त्याचे प्रयोजन कळालेले नाही अजून, कारण माणसं तर देशावर, मूळची पुणतांब्याला राहणारी आणि कुलदैवत म्हणून बालाजी कसा काय? शिवाय त्यांच्या चालीरीतीही दाक्षिणात्य प्रभावाच्या आहेत. कट्टर वैष्णव वगैरे.... जर ते तंजावरी महाराष्ट्रीयन असतील तर कदाचित बालाजी कुलदैवत, दाक्षिणात्य प्रभावाच्या चालीरीती इत्यादींमागे ते कारण असू शकेल.
आजोळचे काही नातेवाईक हैद्राबादेतही आहेत, बंगळुरात आहेत. आजोळघरातील स्त्रियांच्या, विशेषतः मागच्या पिढीतील स्त्रियांच्या पेहरावावर दाक्षिणात्य प्रभाव दिसून येतो.

वणकुद्रि कशावरून पडले असावे? किंवा किर्तीकर कसे पडले असावे? रावळ(गुजराती) कसे पडले असावे?

जोशी (गुजराती मधले) ह्या कॉमन नावाविषयी वाचले नाही(सगळी पानं वाचली नाहीत म्हणा)

मी एकलेली नावं- झापे, नागडे, तुंबे, पाणदिवे,मुडे (मुंडे नाही).

सामंत (मराठी असलेले) शेणवी सारस्वत सुद्धा असतात. आईची खास मैत्रीण. (ती बहुधा परुळ्याचीच होती.. आठवत नाही).

शेणवी सारस्वत ह्यांना घोडेखाउ असे म्हणतात अश्या त्या मावशी सांगत.. लक्षात नाही आता.

(जात पात वा श्रेणी(कामाची) वर भारत किती विसावला होता/आहे असे आडनावावरून कळतेच. )

चिपळूणचे पाटणकर मराठा, मुसलमान, तेली, कोब्रा असे आढळतील. (बाबांचा मुस्लीम मित्र). (पाटण गाव आहे चिपळूणला)धंदेवाईक ज्यास्त असतात.

रसाळ सुद्धा कोब्रा, तेली मध्ये मिळतात. गुजरातीत सुद्धा. पण ते गावाकडचे लोकं लावतात.

गुजराथ मध्ये जोशी हे आडनाव "जोषी" असे ही लिहितात ( संदर्भ : प्रकाश नु पडछाया या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक "दिनकर जोषी")

आमच्या पेण वरून सुद्धा पेणकर असे आडनाव आहे ते आमच्या गावावरूनच पडले असावे का ? कारण पेणकर आडनाव असणारे क्रिश्चन आहेत>>>

आमच्या ऑफिस मध्ये पेणकर कोब्रा आहे.....

बहुतेक "कर" वाले गावा वरुनच असतात.

"पांडे" व 'देशपांडे' आडनावांचा इतिहास सागीतल्या बद्दल अशोक पाटील
यान्चे आभार. चांगली माहिती आहे इथे वाचायला.

भडकमकर हे कोब्रामधे असते का नाव ? बरीच कोब्रा नावे त्यांचा उल्लेख आला होता का ? लेले, नेने, साने, फडके, इ. अत्रे हे देब्रा ना ? तसेच एक अक्षरी आडनाव पै हे कोणते ? दुसरे एखादे एकाक्षरी आडनाव आहे काय ?

भडकमकर हे कोब्रामधे असते का नाव ?>>>

भडकमकर कर्‍हाडे ब्राम्हण !!!! ( माझी एक मैत्रिण आहे... बाबा कायम तिला " भडक - मकर" असे चिडवायचे)

पै हे आडनाव बहुदा कारवारी, कानडी, लोकांत आढळते.

Pages