आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते 'वार' वरुन...
वझलवार ब्राम्हण असतात ( दे ब्रा) (माझी मावशी आणि एक मैत्रीण सुधा)
पण बाकी सगळे वार बहुतेक तरी कोमटी च पाहीले.

एक मैत्रीण होती 'बत्तुलवार' ती अन्ध्रा ची साउदी होती, पण बरेच वर्ष नागपुरात राहुन छान मराठी बोलायचे सगळे. आता तिचं आड्नाव ततीकोंडा आहे.

(देवा नारायणा!!)

माझ्या आत्याचं आडनाव असुनही लोकं त्यांना सावकार असं म्हणतात. (साधं शेतकरी कुटुम्ब. त्यांच्यात सावकारी कुणी आणि कधी केली काय माहिती)
माझ्या मावशीच्या घराला पुलिस्तांच घर म्हणतात (पोलिसच अपभ्रंश) त्यांच आडनाव खोत आहे.
दोघी एकाच गावात आहेत.
ल्हाणपणी एका म्हातार्‍याने मला भंजाळुन सोडला होता कुणाचा पावणा रे तु म्हणुन.
तेव्हा हे सावकार आणि पुलिस्ताचं घर ही भानगड कळालेली.

ठाकर्,समर्थ इ.
@प्रशांत ठाकुर, सह्याद्रिरांगांमध्ये वसलेली आदिवासी जमात ही ठाकर जमात म्हणवली जाते. या उलट ठाकुर हा एक 'ईश,प्रभू,स्वामी' या अर्थाचा मानाचा शब्द आहे. उत्तर गुजरात, राजस्थानात देवाला,विशेषतः कृष्णाला 'ठाकुरजी' म्हणण्याची प्रथा आहे. ठाकुरचेच ठाकोर्,टागोर झाले. डाकोरनाथही प्रसिद्ध आहे.
@गामा पै. समर्थ हे आडनाव पाठारे प्रभूत नसून चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंत असते. काजोल या अभिनेत्रीची आजी आणि नूतन्,तनुजा यांची आई शोभना समर्थ ह्या कायस्थ प्रभू होत्या.(शोभनाबाईंची आई माणक शिलोत्री ह्याही अत्यंत स्वरूपवान आणि खानदानी अदबीच्या होत्या. शिलोत्री बँक ही खाजगी पतपेढी त्यांच्या कुटुंबाची होती. शिलोत्री किंवा शिळोत्री नावालाही इतिहास आहे. जुन्या काळी ठाणे(यात सध्याची मुंबई समाविष्ट), कुलाबा जिल्ह्यात मीठ बनवण्याचा व्यवसाय जोरात चाले. प्रत्यक्ष मीठ बनवणारे जरी आगरी असले तरी मिठागरांच्या मालकांना मात्र शिळोत्री म्हणत. मिठाचे मोठे दगड (शिळा) फोडून विकण्यायोग्य मीठ बनवणारे ते शिळोत्री अशी व्युत्पती वाचलेली आहे. चू.भू.असू शकते.)
पाठारेप्रभूंचे मूळ गुजरातेत आहे. ते स्वतःला सोमवंशी क्षत्रिय मानतात. ते इथे मुंबईत चौदा/पंधराव्या शतकात आले असावेत. कोणी म्हणतात शिलाहारांच्या काळात ते आले. मुळात क्षत्रिय जमात असल्याकारणाने लढाईतल्या पराक्रमावरूनच जयकर,विजयकर,धुरंधर अशी नावे रूढ झाली असावीत. कै. श्री प्रमोद नवलकर यांच्या पुढाकाराने या ज्ञातीचा समग्र इतिहास प्रसिद्ध झालेला आहे. तो, तसेच त्यांचे 'प्रभूप्रभात'हे ज्ञातिनियतकालिकही माहितीच्या दृष्टीने वाचनीय आणि रंजक असते.

पाटील सरांच्या काही पोस्ट सोडल्या, तर थोडक्यात म्हणजे आडनावांवरून नक्की जात ओळखण्याचा धागा सुरु आहे झालं.

ठाकुर या आडनावाविषयी सुनीताबाई देशपांड्यांनी एक मजेशीर व्युत्पत्ती सांगीतली होती, बहुतेक " आहे मनोहर तरी' मधे -- ठाकुर म्हणजे ठाणे, कुलाबा आणि त्नांगिरी यी तीनही प्रांताचे मालक.

पाठारेप्रभूंचे मूळ गुजरातेत आहे. ते स्वतःला सोमवंशी क्षत्रिय मानतात. >>> ह्या बद्द्ल जरा शंका आहे. माझी मामी सोमवंशी क्षत्रिय आहे. पण ते लोकं पाठारे प्रभू नाहीत. त्यांचं मूळ गुजरातेत असण्याची शक्यता खूप आहे. कारण त्यांची वस्ती बोर्डी, डहाणू, घोलवड या भागात म्हण्जेच गुजरातच्या बॉर्डरलाच आहे. त्यांच्यातली आडनावे म्हात्रे, चुरी, सावे, पाटील अशी आहेत. यांचा शेती हा मुख्य व्यवसाय. विशेषतः वाडया करणे. यावरून हे लोक स्वतःला 'वाडवळ' असेही म्हणतात.

वाडवळ म्हणजे एस्.के.पी.(वर्तक,म्हात्रे, पाटील,चौधरी,इ.)हे सोमवंशी असतात हे खरे पण पाठारेप्रभूसुद्धा स्वतःला चंद्र म्हणजेच सोमवंशी मानतात. ते बिम्ब राजाबरोबर पैठणहून आले असेही मानले जात असे.यांना पाताणे असेही म्हणत किंवा ती त्यांची एक पोटजात मानली जात असे. पैठणचे म्हणून पैठणे,पाटाणे,पाताणे अशी उत्पत्तीही सांगितली जात असे, पण आता ते गुजरातमधल्या पाटणहून आले असे मानण्याकडे कल आहे. साष्टीची बखर नावाची एक जुनी पुस्तिका आहे त्यात वसई किल्ल्याच्या पोर्च्युगेझ्-मराठा लढाईची हकीगत आहे. हे पुस्तक आजपावेतो जरा दुर्लक्षित असले आणि प्रमाण मानण्यात येत नसले (ह्या दुर्लक्ष्याचे कारण प्रस्तावनेत सापडते.) तरी या पुस्तकाची प्रस्तावना मोठी अभ्यासपूर्ण आहे. त्यात हे सर्व सविस्तर दिलेले आहे.

सोमवंशी क्षत्रिय पाठारे (पाठारे/पातेणे प्रभू )आणि सोमवंशी क्षत्रिय पाचकळशी (वाडवळ) हे दोघेही गुजरातेच्या बाजुने उत्तरकोकणात स्थिरावलेत. त्यावर मी इथेच ११ भागात महिकावतीची बखर हे लिखाण केलेले आहे.

सोबत साष्टीची बखर आणि बिंबाख्यान देखील नजरेखालून घातल्यास अधिक बरीच माहिती मिळते.

पाताणे / पाठारेची व्युत्पत्ती राजवाडे यांनी वेगळी दिली आहे. पण मला ती व्यक्तिशः पटलेली नाही.

हीरा, रोहन अधिक माहिती बद्द्ल धन्यवाद.
रोहन , महिकावतीची बखर च्या लिंक बद्द्ल धन्यवाद. सवडीनी वाचीन. तसम्च जमेल तेव्हा मामीशी पण बोलुन घेईन. ती बोर्डीलाच असते.

कोब्रे मुळात आर्यन ओरीजनचे आहेत असे ऐकले होते ,परंतु एक प्रश्न पडतो ,कि हे शिवकाळाच्या आधी कुठेच का सापडत नाहीत?
म्हणजे संत परंपरेत वगैरे. 1750 नंतर अचानक यांचा महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात उगम झालेला आढळतो. शिवकाळात कोणी लिमये,टिळक,सावरकर परांजपे, गाडगीळ,साठ्ये तोंडी लावायला देखिल सापडत नाहीत आणि अचानक हे एकोणिसाव्या शतकात सर्व क्षेत्रात दिसतात. याची काय कारणे असावीत?

वर ninja यानी 'श्रोत्रिय' संदर्भात विनंती केल्याचे वाचले. मला वाटते एक दोन वर्षापूर्वी इथेच [किंवा मनोगतवरही कदाचित असेल...पक्की खात्री नाही] 'श्रोता' शब्द व्युत्पत्तीबाबत काही चर्चा झाली होती. त्या स्मरणाच्या आधारे तसेच अन्य वाचनाच्या अनुषंगाने सांगू शकतो की, उत्तर भारतात [विशेषतः उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या तीन राज्यात] श्रोत्रिय आडनावाची बरीच घराणी आहेत. वेदविद्याभ्यास आणि अध्यापन यात ही मंडळी गुंतलेली असतात. "श्रुति अथवा वेद' यांचा शिकवण देणारा गुरु...म्हणून तो 'श्रोत्रिय'. तीन गुण ज्या व्यक्तीत आहेत...म्हणजे ब्रह्माचे ज्ञान, संस्कारामुळे द्विज आणि वेदाच्या अभ्यास केल्यामुळे चालून आलेले विप्र हे पद....ह्या तिन्ही गुणांचे एकत्रिकरण म्हणजेच 'श्रोत्रिय' व्यक्ती. यजमानाच्या घरी पूजाअर्चना करणे, त्या घराण्याचे वंशावळीचे दप्तर सांभाळणे, कौटुंबिक कार्ये, विवाह, मुंज, श्राद्ध आदी नित्यनेमाने चालत आलेल्या कार्याचे पौराहित्य करण्याचे काम याच 'श्रोत्रिय' मंडळीकडे परंपरेने येत राहिले आहे. पौराणिक कथांचे संदर्भ सांगण्याची यांच्यात विलक्षण हातोटी असते, कदाचित त्यामुळेच असावे की ते सांगत असलेल्या कथा तल्लीन होऊन ऐकणार्‍याला 'श्रोता' हे नाम पडले.

याहीपेक्षा जास्त उगम आहेत या आडनावाची. पण मला वाटते इथल्या चर्चेच्या मर्यादेचे भान ठेवल्यास इतका खुलासा पुरेसा ठरू शकेल.

अशोक पाटील

@रोहन, दिलेल्या दुव्यावरून महिकावतीची बखर संबंधी मालेचे दोन भाग वाचले. दुसर्‍या भागात जुनी व नवी ग्रामनामे दिली आहेत त्यात दोन नावांविषयी वेगले मत आहे. एक कोंडविटे हे गाव आजही कोंडवटे किंवा कोंडि/दिवटे या नावाने मरोळ प्रांतात आहे. महाकालीच्या गुंफा याच भागात आहेत. कोंदिविट्याचा डोंगर ते चकाल्याचा डोंगर उतार एव्हढा बराच मोठा टापू कोंडिविट्यामध्ये मोडतो. कर्जतजवळही कोंडिवटा आहे आणि आज अंधेरीतल्या कोंडिवट्यापेक्षा अधिक प्रसिद्ध आहे.पण एकतर महिकावतीची बखर ही मुख्यत्वेकरून अपरांताविषयी त्यातूनही पश्चिम किनार्‍याविषयी आहे आणि दुसरे म्हणजे कर्जतजवळच्या कोंडिविट्यापेक्षा अंधेरीतले कोंडिवटे महाकालीगुंफांमुळे म्हणा किंवा पोर्च्युगेझ धर्मप्रसारामुळे म्हणा, बखरकाळात जास्त चर्चेत होते. दुसरे नाव आसनपे हे घाटकोपरनजिकच्या आसलफ्याशी जास्त जवळीक दाखवते. इतर काही सोर्स हाती आल्यावर अधिक लिहीन.

प्रोफेसर ऑफ डुआयलॉजी , तुमचा >>> कोणी लिमये,टिळक,सावरकर परांजपे, गाडगीळ,साठ्ये तोंडी लावायला देखिल सापडत नाहीत आणि अचानक हे एकोणिसाव्या शतकात सर्व क्षेत्रात दिसतात. याची काय कारणे असावीत?<<<<
हा जो प्रश्न आहे त्याचे काहिसे संदिग्ध उत्तर आमच्या कुलवृत्तांतात आहे. कॉपी- पेस्ट होत नाहीये. टायपावे लागेल. जराशाने करेन.

हीरा... धन्यवाद. अशीच काही नावे मी तिसर्‍या वा चौथ्या भागाच्या शेवटी विचारली आहेत.

शक्य असल्यास त्या धाग्यासंबंधी प्रतिसाद त्या-त्या धाग्यावर येउ द्या. माहितीचे संकलन या दृष्टीने. Happy

झकासराव,

>> माझ्या मावशीच्या घराला पुलिस्तांच घर म्हणतात (पोलिसच अपभ्रंश) त्यांच आडनाव खोत आहे.

नक्की 'पोलीस'चा अपभ्रंश आहे का? मला पुलस्तिन् ऋषींच्या नावावरून पडलेलं वाटलं.

आ.न.,
-गा.पै.

ईराण मधे गोखलान नामक प्रांत असल्याचे ऐकिवात आहे.. ख. खो. दे. जा...
हे लिहिल्यानंतर गुगल वर गेलो. एक पान पाहिलं..

http://prabodhankar.com/node/245/page/0/128

माहीतीसाठी देतोय. सगळी पानं वाचली नाहीयेत.

हीरा,

मी वाचलेली शिलोत्री या आडनावाची उपपत्ती इथे आहे. त्यानुसार मिठाच्या शेतातील बसवलेल्या दगडावर देखरेख करणार्‍या अधिकार्‍यास शिलोत्तरी (वा शिलोत्री) म्हणतात.

आ.न्.,
-गा.पै.

पाठारे प्रभू देवगिरी(दौलताबाद)च्या रामदेवराव यादवांच्या साम्राज्यात सरदार होते असं मानलं जातं. अल्लाउद्दिन खिलजीच्या पहिल्या आक्रमणाच्या लढाईत त्यांनी पराक्रम गाजवला म्हणून त्यांना अजिंक्य, किर्तीकर, जयकर, विजयकर, धैर्यवान, धुरंधर, सेन्जित ही पराक्रम सूचक आडनावे मिळाली असावीत. खिलजीच्या दूसर्‍या स्वारीत यादवांचा पराभव झाला आणि रामदेवरावाचा मुलगा राजा बिंबदेव याच्या बरोबर पाठारे प्रभू १४ व्या शतकात मुंबईत आले असं म्हणतात. पण या बाबतीत कोणतेही गंभीर संशोधन झालेले नाही. (संदर्भ : 'पाठारे प्रभूंचा इतिहास'- ले़खक श्री. प्रताप वेलकर). पण आमच्या पाठारे प्रभू समाजात इतरांप्रमाणे गावावरून आलेली आडनावे नाहीत आणि आमची ही आडनावे महाराष्टातील इतर कोणत्याही समाजात आढळत नाहीत.

गा.पै., आपण दिलेली व्युत्पत्ती अचूक दिसते. मिठाच्या पत्थराविषयीची व्युत्पत्ती वाचलेली होती पण आपण दिलेलीच जास्त बरोबर वाटते. कालांतराने शिळोत्र्याचे कामाचे स्वरूप बदलले आणि मिठाच्या व्यापारावर केंद्रित झाले असेही असू शकेल. धन्यवाद आणि आभार.

मला पुलस्तिन् ऋषींच्या नावावरून पडलेलं वाटलं.>>
छे छे. शक्यता पुर्ण नाकारण्यासारखीच परिस्थिती आहे.
घरी विचारलं असता ते कधी काळी पोलिस पाटिल होते अशी माहिती मिळाली.
कागदपत्रं फारशी नाहियेत. मध्यंतरी घराच काम करताना काही सापडली होती म्हणे.
मी पाहिली नाहियेत. आणि हल्ली वर्षे वर्षे जाणही होत नाही. Sad

हातीवलेकर हे आड्नाव राजापुर मधल्या हातीवले गावावरुन पड्ले असावे. कोक्णात मराठ्यामध्ये 'सरफरे' हे एक आड्नाव कसे आले या बद्द्ल कुणी सान्गेल का?

नी...
कुडाळला जिकडेतिकडे धडाम आहेत...>>>... कुडाळची पूर्ण बाजारपेठ धडाम, शिरसाट, वर्दम, पडते, तेली, भोगटे, बोभाटे, भाट,काणेकर ... या लोकांनी व्यापलेली आहे. हे सर्व लोक अभिमानाने 'वैश्य वाणी' समाजाचे प्रतिनिधित्व करतात. पैकी 'भाट' आडनांव लावणार्‍या लोकांचे पूर्वज 'राज दरबारा'मधे 'राजा'चे गुणगान करण्याचे कार्य करायचे, याचे पुरावे सापडतात, मात्र हे लोक 'व्यापारा'कडे कसे वळले?, याच शोध लागत नाही.
कोकणातील (विशेषतः सिंधुदूर्गातील) 'वैश्य-वाणी' समाज दरवर्षी न चुकता कारवार जवळ्च्या 'हळदीपूर' इथल्या 'गुरुपीठा'ला जाऊन यथामती आपली सेवा-चाकरी रुजू करुन येतात. तेव्हा या समाजाचा 'हळ्दीपूर' अर्थात कर्नाटकाशी असलेला संबंध मात्र आजुन तरी वाचनात आलेला नाही.

नव्याने कळलेली अजून काही तंजावर आडनावे...

भोवरे, धुमाळ, देवटे, महाशब्दे, थंडलम, जागिरदार (जहागिरदार), कोवळेकर आणि धोत्रेकर.

याशिवाय भोसले, जाधव ही आडनावे अर्थात आहेतच. Happy

@सस्मित... धोत्रे आडनावाबद्दल फुलाचा संदर्भ सोडला तर काही ठावूक नाहिये. पण हे आडनाव तंजावर मराठ्यांमध्ये पण आहे असे आज कळले आहे. Happy

आडनावांची बरीच मोठी यादी झाली आहे त्यात माझ्या माहितीतील काही आडनावांची भर.

बऱ्याच वेळा एखाद्या गावात ठराविक आडनावाची माणसे भरपूर असतात .इतकी कि एखाद आडनाव सांगितलं कि त्या गावचा का म्हणून विचारले जाते. पंढरपूरला मला शाळेत किंवा कॉलेजात वर्षाच्या सुरवातीला हा प्रकार भरपूर पाहायला मिळायचा. त्यातलीच काही उदाहरणे.

पंढरपूर जवळ गादेगाव म्हणून एक खेडे आहे तिथे बागल भरपूर ,तसेच अजनसोंड चे घाडगे ,खर्डीचे रोंगे, ढवळस चे हेंबाडे , पळशीचे झांबरे, भंडीशेगावचे ननवरे या पैकी कुणी न कुणी आमच्या शाळेत किंवा कॉलेजात असायचेच . शिवाय बडवे आणि उत्पात हे खास पंढरपूरचेच .

अशीच काही एकरांत आडनावे माझ्या जवळपास मला आढळली.शक्य तेवढ्यांचा इतिहास देण्याचा प्रयत्न करेनच , तूर्तास यादी देतो.

गावावरून- सोलापुरे, रामपुरे(सोलापूरचे विख्यात शिल्पकार),ममदापुरे,मांढरे (सुर्यकांत,चंद्रकांत बंधुद्वय)

रंगांवरून -गोरे, काळे,पांढरे,

पशुपक्ष्यांवरून -लांडगे,कोल्हे,कावळे ,गाढवे

इतरही काही एकरांत आडनावे- आयरे,टोणपे , तोळनुरे, आगलावे,तोळबंदे , रणवरे ,ननावरे , डांगे ,लेंडवे ,वेळापुरे, मदने ,दावणे, डोंबे , तोरणे , घाटगे

काही वार'अंती आडनावे - कटकमवार, पारसवार , नलबिलवार , पेन्शनवार ,द्वादशीवार

काही दोन अक्षरी आडनावे - ताड, गुंड ,बाड

काही एकरांत आडनावे भिसे ,रणभिसे ,पिसे , रणपिसे ,तनपुरे,कागदे,बेणारे, भालके ,टकले ,अचलारे ,वाघचौरे,देवमारे ,देवकुळे ,डहाळे , हाके,डोके भरते,सोनटक्के,बारटक्के , भादुले ,भादुगले,

काही कानामात्रा रहित आडनावे - तळवलकर ,भडकमकर ,सणस ,गवस ,गवई ,करमरकर ,नवलकर

इनामदार , सुभेदार , देशपांडे ,देशमुख, पाटील या प्रमाणेच वतनाशी निगडीत आडनाव म्हणजे जहागिरदार . एखाद्या घराण्यास काही जहागिरी असल्यास त्या वरूनच पडलेले हे आडनाव. त्याचप्रमाणे विश्वासराव हे किताबावरून आलेले आडनाव असावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात या दोन उल्लेख येतात. शहाजी महाराजांनी जिजाऊ मासाहेबांना शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस शिवनेरीवर ठेवले ते शिवनेरीचे किल्लेदार विश्वासराव यांच्या कडे , त्यांनीही जिजाऊमासाहेबां च्या संरक्षणाची जबाबदारी चोख पार पाडून आपले विश्वासराव नाव सार्थ केले. दुसरा संदर्भ येतो तो संभाजी महाराजांच्या मथुरेहून सुखरूप आगमनानंतरच्या प्रसंगात . मोरोपंत पिंगळ्यांचे मेव्हणे कृष्णाजी त्रिमल हे युवराज संभाजीराजांना घेवुन जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा हि जोखमीची कामगिरी पार स्वतः महाराजांनी त्यांना विश्वासराव हा किताब दिला.

Pages