आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कर्नाटकात बंगळुरात गेल्या ३-४ पिढ्या राहिलेले व कानडी भाषिक असे परंतु मूळचे कोकणातील, असे दामले नावाचे पुरोहित आहेत. चेहरा-मोहरा, अंगचण इत्यादी अगदी कोकणी, स्वर सानुनासिक परंतु तोंडात भाषा कानडी, हे कॉम्बो पाहून सुरुवातीला खूपच मजा वाटली होती.

त्याचप्रमाणे काशीकर आडनावाचा माझा मित्र अनेक वर्षे अहमदाबादेला असल्यामुळे गुजराती बोलतो, पण तो मूळचा तंजावरचा... त्याच्या घरी जे मराठी बोलले जाते ते तंजावरी मराठी. वेगळेच वाटते ते ऐकायला.

कर्नाटकात येल्लापुर भागात आफ्रिकन वंशाचे सिद्दी लोक गेली अनेक शतके राहतात. ते जी भाषा बोलतात ती कानडी + मराठी + कोंकणी यांचे मिश्रण वाटते. सिद्दी लोक आफ्रिकेतून गुलामगिरीमुळे भारतात आले / आणले गेले व येथे स्थिरावले. नंतर त्यांनी ख्रिश्चन, मुस्लिम व हिंदू धर्म स्वीकारले व त्या त्या धर्माप्रमाणे नावे घेतली व ज्या प्रांतांमध्ये स्थिरावले तेथील भाषा, वेशभूषा, अन्न इत्यादी स्वीकारले. पण त्यांच्या काही मूळ परंपरा त्यांनी आजही जपलेल्या दिसून येतात.

हिंदू सिद्दींची नावे मोहन सिद्दी, गीता सिद्दी, गणपती सिद्दी, गजवीर सिद्दी अशा प्रकारची आहेत.

करान्त आडनावांची पद्धत महाराष्ट्रात इतर विभागांपेक्षा कोकणात अधिक दिसते. किंबहुना, कुठल्या ना कुठल्या प्रकारे गावाशी नाळ जोडून ठेवण्याची प्रथा एकंदरीतच कोकणात (दमण ते मंगळूर) जरा जास्त असावी. इतकी की, कोकणातील हिंदूंप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन आणि ज्यूंमध्येदेखिल करान्त आडनावे दिसतात.

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम (कासकर), गेल्या पिढीतील एक बुजूर्ग ज्यू अभिनेता डेविड (चेऊलकर) ही काही उदाहरणे.<<<<<<

हे लोक म्हणजे मुळचे हिंदु , त्यांनी फक्त धर्म बदलला आडनाव तेच ठेवले,
कोकणात देसाई, इनामदार या आडनावाचे मुस्लिम आढळतात

>>भोसले घराण्याची दुसरी शाखा तंजावर येथे होतीच. आज तिथे त्यांना तंजावर मराठा असे संबोधले जाते.

तंजावर येथे अनेक नातेवाईक आहेत त्यातले काही दक्षिण दिग्विजय वेळी जाऊन स्थाईक झाले तर काही राजाराम महाराजांच्या बरोबर जिंजी आणि तंजावर येथे गेले.मोहिते ,घोरपडे,भोसले अश्याच नावाचे नातेवाईक आहेत.इतर किंवा वेगळ्या आडनावाचे लोक आढळले नाहीत.
तंजावर,जिंजी,सोंडूर ,बेल्लारी,बेळगाव,गजेंद्रगड या दक्षिण भागात मराठी लोक अजूनही राहतात.
उत्तरेत हरियाना पंजाब येथे सुमारे ८ लाख रोड मराठा राहतात.तसेच ग्वाल्हेर,इंदूर,धार,देवास,बडोदा येथेही अनेक मराठी लोक आहेत.

>>म्हणजे नाव बापाचेनाव व आडनाव हा फोरमॅट कधी पासून आला?
हा फोरमॅट बराच जुना आहे,माझ्याकडील कागदपत्रातील सर्वात जुना उल्लेख ६०० वर्ष जुना आहे.मुलगा आणि बाप यांच्या नावाच्या मध्ये 'बिन' हा शब्द वापरला जायचा. उदा.हिंदुराव बिन म्हाळोजी घोरपडे

>>काहींची कुलदैवते खूप लांबच्या ठिकाणची असतात ते कसे काय?
घराण्याच्या शाखा दूरवर विस्तारल्या जातात पण कुलदैवते तिथेच असतात. पूर्वीच्या काळी तुळजापूरची भवानी हीच सर्वांची (विशेषतः ९६ कुळांची) कुलदेवी होती.पण नंतर कौल लावणे,साडी-चोळी करणे,खण-नारळ इ. गोष्टींसाठी नेहमी इतक्या लांब जाणे शक्य होत नव्हते म्हणून देवीचे ध्यान मनात धरून तश्याच मूर्ती असलेली मंदिरे काही शतकांपूर्वी ठिकठिकाणी या घराण्यांनी स्थापन केली आणि त्यांचे रुपांतर कुलदेवीत झाले.
उदा.बोल्हाई ,तुकाई,काळूबाई,कोंडाई,मांडाई इ .

मालोजीराव,

बिन हा शब्द आपल्याकडे पण होता ? छान वाटले वाचून. अरेबिक मधे तो शब्द अजून वापरात आहे. मुलासाठी बिन आणि मुलीसाठी बिन्त असा शब्द वापरतात. पण तो टाळला तरी चालतो.

बिन शब्द मूळ मराठीतला नाही. मुसलमानी अंमलात तो इथे रूढ झाला. तसेच आणखी दोन शब्द म्हणजे वल्द आणि शौहर. ब्रिटिश काळातल्या काही सैनिकांच्या आणि त्यांच्या विधवांच्या पेन्शन ऑर्डर्स बघायला मिळाल्या होत्या. त्यामध्ये रोमन लिपीमध्ये शिपायांची नावे उदा. हिरोजी वल्द खंडुजी अशी असत. म्हणजे पेन्शनर हिरोजी, ज्याचे वडील खंडुजी. अर्थात खंडुजीचा मुलगा हिरोजी हा पेन्शनर. विधवांचे नावही सखूबाई शौहर गंगाराम अर्थात 'ती सखूबाई, जिचे पती गंगाराम'. वालिद वरूनच मराठी वडील आला असावा.

स_सा,

>> हे लोक म्हणजे मुळचे हिंदु , त्यांनी फक्त धर्म बदलला आडनाव तेच ठेवले,

एक अपवाद आहे. कोकणातले बेणे इस्रायल हे लोक मूळचे हिंदु नव्हेत. तेली व्यवसाय आणि शनिवारी प्रार्थनादिन असल्यामुळे त्यांना शनवारतेली म्हणत. विकिवर बरीच रंजक माहीती सापडते. यांची बरीचशी आडनावे राहत्या गावांना कर जोडून तयार केलेली आहेत. इथे एक यादी आहे, तिच्यातले १३ वे आडनाव पिंगळे असे अपवादात्मक आहे.

आ.न.,
-गा.पै.

कर्नाटकात येल्लापुर भागात आफ्रिकन वंशाचे सिद्दी लोक गेली अनेक शतके राहतात. >>>
मी दुसर्‍या कोणत्या तरी धाग्यावर अशीच माहिती लिहिली आहे. जुनागढच्या नवाबाने, त्याने पाळलेले सिंह सांभाळण्यासाठी अफ्रिकन गुलाम विकत आणले होते. गीरच्या जंगलात त्यांचा वंश वाढत वाढत ५-७हजार लोकसंख्या झाली आहे. हे दिसतात १००% अफ्रिकन, त्यांची नावं गुजराथी आणि आडनाव मात्र मुळ घराण्याचं काही तरी अफ्रिकन. आमचा जंगल राइडचा अफ्रिकन ड्रायवर पाहुन आम्हाला वाटलं फॉरिनर्ससाठी इंग्लीश बोलणारे ड्रायवर्स ठेवले असतील, नंतर त्याच्याकडुन बरीच माहिती कळाली. त्याला इंग्लिशचा गंध नव्हता. गुजराथी आणि तुटकं हिंदी हीच त्याची भाषा. मग कळलं कि त्याचं नाव रसिकभाई. आडनाव अफ्रिकन होतं ते लक्षात नाही. सरकारने यांना इथे टिकुन रहाण्यासाठी काही एकर्स सामुहिक शेती दिली आहे. हे कपडे घालतात रंगीबेरंगी अफ्रिकन लोकांसारखे, घरं जंगलामधे थोडी वेगळ्या पद्धतीची आहेत. बोलतात मात्र गुजराथी. 'द रुट्स' ची आठवण झाली होती यांना भेटल्यावर. Happy

माझ आडनाव शेंडे (देब्रा) .. माझ्याच वर्गात एक मित्र होता त्याच आडनाव शेंड्ये (कोब्रा).

शेंड्ये हे मूळचे गणपतीपुळे येथील आहेत....माझ गाव रत्नागिरी-सातारा सीमेवर पण कोकण अधिक जवळ चिपळूण ही जवळची बाजारपेठ......काका/आजोबा यांच्याकडून असं ऐकलं होत की आम्ही खालून म्हणजे कोकणातून देशावर आलो.

शेंडे/शेंड्ये - हे आडनाव कस पडल असाव ? या आडनावाचा इतिहास कोणाला माहिती आहे का ?

आडनावांच्या संदर्भात हे काही लेख -

१. आडनाव लावण्याची प्रथा कधी व कशी सुरू झाली याबद्दलचा विश्वकोशातला लेख - http://www.marathivishvakosh.in/index.php?option=com_content&view=articl...

२. यादव कुळातील आडनावांबद्दलचा लेख - https://www.facebook.com/permalink.php?id=224252764280594&story_fbid=444...

३. चित्पावन आडनावे आणि त्यांचा राजस्थानाशी असलेला संबंध याबद्दलचा एक लेख - http://www.karmarkarfoundationmumbai.org/karmarkar/html/Kulach6.html

या वरच्या लेखात 'शेंडे' आडनावाबद्दल माहिती आहे.

वा काय भन्नाट माहितीपूर्ण धागा आहे हा. सगळी १४ पाने वाचून काढली आज, एका दमात. रोचक माहिती आहे. Happy कुठेच केळकर आडनावाचा उल्लेख आला नाही म्हणून विचारते. कुणाला माहिती आहे का केळकर आडनावाविषयी? माझ्या आजी आजोबांच्या बोलण्यात कधीतरी आले होते की मूळ केळकर कोकणातील केळशी गावचे. पुढे त्यातले काही गणपतीपुळ्याजवळ कुठेतरी सेटल झाले. पण खखोदेजा. अशा माहितीचे दस्ताऐवजीकरण काहीच कुठेच नाही. मध्यंतरी चित्त्पावनांचे एक संमेलनपण पुण्यात झाले होते. आई गेली होती त्यासाठी. कुलवृत्तांत लिहीण्यास सुरुवात पण झाली होती म्हणे पण नंतर काहीच बातमी नाही.

हटके आड्नावे देशस्थांत जास्त असतात. पण कोब्रांमधेही लेले, नेने, बाम, ओक, फडके, ढमढेरे ही आडनावे कशी आली असावीत? ओक-लेले-फडके चा जोक तर बालवाडीपासून ऐकला आहे.
एक अगदी खरी खरी गोष्ट - माझ्या एका मैत्रिणीने ओक आडनावाचे स्थळ त्या नावामुळे नाकारले होते. (पण कोब्राच हवा या हट्टापायी लग्नास उशीर होऊ लागला तेव्हा नावावरुन नकार द्यायचा नाही हे ठरले) आणि आता ती आहे भडभडे. Happy एकीने पडवळ आडनावामुळे तब्बल १ महिना घेतला होता होकार कळविण्यासाठी.
सोलापूरला शाळेत आमच्या वर्गात काही प्रचंड विनोदी आडनावे होती. आणि आम्ही त्यांचे अपभ्रंशपण जबरी केले होते, यादी वाचा मग समजेल - थोबडे (थोबडी), बोबडे (बोबडी), अळवंडी (अळी), साळुंके (साळी), केळकर (केळी), कोल्हापुरे (कोल्ही), गौडगाव (गौडी), याशिवाय हत्ती, वाघ, कोल्हे, सुपे, सुरे, लोखंडे ही पण नावे आमच्याच वर्गात होती. हजेरी घेताना बाईच हसायच्या. Happy आता हे सगळं आठवताना जाम मजा आली. Happy

साठे, साठ्ये, साठये या आडनावांविषयी ऐकलेली माहिती - ही तीनही आडनावे कोब्रा. माझ्या ओळखीत, नात्यात हे तिन्ही लोक आहेत. यांचे मूळ एकच, गोत्र सारखे पण आडनाव वेगळ्या पद्धतीने लिहिल्यामुळे ३ वेगळी घराणी वाटतात. खरेतर एका संमेलनात त्यांनी एकच आडनाव चालु ठेवून परत एक होण्याचे ठरवले होते म्हणे पण नक्की कोणते आडनाव पुढे न्यायचे यावर एकमत झाले नाही. Happy
तसेच उत्तरेकडचे खेर आणि आपल्याकडच्या कोकणातील खरे सुद्धा मुळचे एकच असं म्हणतात.
व्यवसायाने सराफ असलेले सगळे सोनार नसतात - अनेक प्रसिद्ध सराफ कोब्रा आहेत - गाडगीळ, आपटे, वेलणकर, लागू, पेठे, सोलापूरातील खाडिलकर ही सगळी सोनार मंडळी कोब्रा आहेत.

"साठे" कोब्राबद्दल एक वदंता अशीही वाचनात येते की एकूण ५९ कोब्रांच्या आडनावांची यादी तयार झाल्यावर ते कार्य थांबल्यावरही जे शेवटचे {जसे राऊंड फीगर करण्यासाठी म्हटले जाते} नाव घेतले ते होते साठावे....म्हणून साठे.

"...व्यवसायाने सराफ असलेले सगळे सोनार नसतात..." ~ अगदी बरोबर. ज्या व्यवसायाला पूर्वी [सामाजिक] प्रतिष्ठा नव्हती पण कालौघात त्यात 'पैसा' नामक घटक चांगल्या प्रमाणात दिसू लागल्यावर अनेक जातीचे लोक तशा व्यवसायात उतरले....'सराफी' धंदा तर नेहमीच दिमाखाने चकाकणारा....त्यामुळे कोब्रा देशस्थ मंडळी त्यामध्ये उतरलेली दिसतात.

आमच्या कोल्हापूरातील 'अभ्यंकर'...जे कोब्रा आहेत....चपला, बूट तयार करण्याच्या क्षेत्रात उतरले आणि आज 'अभ्यंकर फूट वेअर्स' सार्‍या महाराष्ट्रात लोकप्रिय झाले असून अनेक ब्राह्मण तरुणतरुणी {आणि अन्य जातीच्याही अर्थात} त्यांच्या चप्पल फॅक्टरीत चांगल्या वेतनावर नोकरीत आहेत.

तिच गोष्ट....मेन्स ब्यूटी पार्लर्सची....तसे पाहिले तर 'केश कर्तनालय' हा मूळचा न्हावी जातीचा/कारागिरांचा पिढ्यानपिढ्याचा धंदा...व्यवसाय. पण आज गल्लोगल्ली निघत असलेल्या 'सलून्स' च्या प्रोप्रायटर्सची आडनावे पाहिल्यास हा व्यवसाय किती फोफावला आहे हे दिसून येईल.

माझ्या शालेय काळात कोल्हापूरात न्हाव्यामध्ये 'झेंडे, काशिद, टिपुगडे, खेडकर' अशी टिपिकल ओबीसी जातीदर्शन आडनावे ठळकपणे बोर्डावर असायची...आज चक्क 'भोसले...गायकवाड...जाधव...चव्हाण...सुर्वे...' अशी एरव्ही स्वतःला ९६ कुळी...सरदार घराणी...म्हणवून घेणारी आडनावे देखील 'केश कर्तनालयाचे' प्रोप्रायटर म्हणून दिसतात.

कालाय तस्मे नमः

@ धनश्री....

"केळकर" यांच्याबद्दल...

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात केळशी गावे आहे [याचा तुम्ही प्रतिसादात उल्लेख केला आहेच]. महालक्ष्मी आणि बल्लेश्वर यांची मंदिरे आणि हनुमान जयंती दिवशी भरणारी मोठी यात्रा ही केळशीची खास वैशिष्ठ्ये. केळशी, केळ्ये, ढोकमळे, कोतवडे आदी वाडीसदृष्य छोट्याछोट्या गावातील ही कोब्रा मंडळी पुढे रत्नागिरी हे जिल्ह्याचे तसेच इतरत्र म्हणजे आंबोली गणपतीपुळे मलकापूर आदी ठिकाणी स्थायिक झाली. आपल्या गावांच्या नावात असलेल्या 'क' व्यंजनापोटी तसेच त्यातही प्रमुख गाव 'केळशी' म्हणून 'केळकर' हे आडनाव स्वीकारले असा यांचा कुलवृत्तांत सांगतो.

अशोक पाटील

मनिमाऊ, सिद्दी लोक हे कर्नाटक - यल्लापुर व इतर गावं (हलियाल, अंकोला, सिरसी इ.), हैद्राबाद (इथे त्यांना निजामाचे शरीरक्षक, घोडदळातील शिपाई व मारेकरी म्हणून नियुक्त केले), गीर पर्वताचा पायथा परिसर या ठिकाणी, या शिवाय पाकिस्तानातही आहेत. आफ्रिकन / आफ्रो-अरेबिक वंशाचे हे लोक मुख्यतः ब्रिटिश, अरब व पोर्तुगीजांनी गुलाम म्हणून भारतात आणले.
विकीपीडिया : सिद्दी

'नवरे' बद्दल मी ऐकलेली कथा अशी : यांचे मूळ आडनाव वेगळे होते. त्यांतील एक पुरुष मोठा पराक्रम करून आल्यावर त्याला एक 'राजा' म्हणाला, '' वा! आहेस खरा नवरा!''

शेतीच्या औजारांवरुन आढळणारी आडनावे - नांगरे, फावडे, कुदळे, खुरपे... या आडनावांच्या व्युत्पत्तीवर शक्य असल्यास प्रकाश टाका...

कुडाळला असताना वडिलांच्या कार्यालयातील लक्षात राहीलेली दोन आडनावे - कुरकूटे, भुईम्बर...

आपला मायबोलिकर 'धून्द-रवि' याचे आडनाव 'मठाधिकारी' आहे. मागच्याच आठवड्यात रवि आणि कौतूक शिरोडकर 'कुडाळ'च्या कॉलेजमधे जाउन आले. कुडाळ्च्या लोकांना 'मठाधिकारी' हे आडनावच माहित नाही... (टिव्ही वर स्कीट्च्या लेखकाचे खरे नाव दाखवूनही). 'पाहुण्यांची ओळख' करुन देताना 'इंग्रजी'तून बोलणार्‍या विद्यार्थीनीने दोन-तीन वेळा कोलांट्या उड्या मारल्या (रविचे नाव कॉम्प्युटर स्लाईडवर देवनागरीतून ठळठळीत दिसत असताना देखिल...)... त्यानंतर बोलणार्‍या प्राध्यापकांनी रविचे आडनाव बदलून धडधडीतपणे 'मठाधीपती' करुन टाकले... आणि कॉलेजच्या प्राचार्यांनी जास्त रीस्क न घेता साधा-सोपा मध्यम मार्ग स्विकारला, त्यांनी प्रमाणिकपणे रविचे आडनाव 'अधिकारी' करुन टाकले... Happy
या अनुभवावरुन कौतूक आणि/ किंवा रविला एकादे 'स्किट' सुचल्यास आम्ही समस्त मायबोलिकर त्याचा आनंद घ्यायला उत्सूक आहोत... Happy

कोकणातील ही काही आडनावे - धरणे/ धर्णे, नालंग, कलिंगण...या नावांचा इतिहास शोधणे गरजेचे आहे...

बाबी नालंग आणि बाबी कलिंगण ही दोन्ही व्यक्तीमत्वं 'दशावतार' कलेतील उत्तूंग व्यक्तीमत्व... पैकी बाबी नालंग यांना केन्द्र शासनाच्या 'संगित-कला अकादमी'चा मानाचा पुरस्कार देखिल मिळाला होता...

कोकणातली अजुन आडनावे --- शिगवण, केरकर, दोडेकर

खुप सुंदर माहिती.....

गीर च्या जंगलात आमचाही गाईड अफ्रिकन वंशाचा होता. मनीमाऊ धन्स.. आठवण करुन दिलीस.

कुडाळला जिकडेतिकडे धडाम आहेत << हे खरं आहे.. बाजारपेठ 'धडाम' लोकांचीच आहे. त्यांचे पूर्वज एवढ्या जोरात पडले होते की दुकानात नेहमी 'धडाम धुडूम' होते म्हणून हे आडनांव घेतलं ते माहीत नाही Happy

हीरा,

>> पाठारे प्रभूंमध्येही धुरंधर,धराधर,धैर्यवान,त्रिलोकेकर ही आडनावे कुणा पूर्वजाच्या पूर्वजाच्या
>> पराक्रमावरून आली असावीत.

जयकर, विजयकर, नवलकर, कीर्तिकर, धुरंधर, धैर्यवान, अजिंक्य, समर्थ ही आडनावे एकाच जातीत दिसून येणे नवलाईचे वाटते. या सगळ्यांच्या पूर्वजांनी मोठमोठे पराक्रम गाजवले असावेत.

आ.न.,
-गा.पै.

कोब्रा बद्दल असही म्हटल जात कि ते इंग्रजांचे वंशज आहेत ,हे खरे आहे काय ?
(कृपया तज्ञांनी खूलासा करावा- कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही)

Pages