आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावे आडनावाचा इतिहास किंवा अर्थ नाही माहित. पण बहुतेक कोल्हापूरजवळ एक सावे नावाचं गाव आहे. त्याच्याशी संबंधित काही असू शकेल.

मी ckp (चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ) माझे आडनाव देशपांडे . पूर्वी वैद्य होते असे म्हणतात. आम्ही मुंबईला ठाणे परिसरात राहणारे. मुळगाव दापोडे. नसरापूरच्या जवळ आहे. आजोबाच्या आधीची पिढी राहायला बडोदाला. काही जण म्हणतात आमचे मूळ उत्तरेकडचे. आम्ही मूळचे ब्राम्हण होतो. आजही ब्राम्हण आणि आमचे रीतिरिवाज सारखेच आहेत. फक्त आम्हाला नॉन व्हेज मान्य आहे. मासे हे आमचे मुख्य अन्न आहे आजही. अजून कोणाला काही माहिती आहे का??

माझे आडनाव "दाईटकर" असे आहे.. इन्ग्रजी मधे "Daitkar" असे लिहितो. या विषयी कोणाला काही माहीत असेल तर प्लिज share करा ...
किवा कुळदैवत काय आहे हे सुधा माहीत असेल तर सान्गा प्लिज.....

कोल्हापुरजवळ सावे नावाचे गाव असेलही. पण माझ्या माहितीतील किमान अर्धा डझन तरी सावे हे डहाणू परिसरातील आहेत!>>>>>>>>१००

वाडवळ आणि घोड्वळ समाज

माझे नाव सुजाता तुकाराम जगताप. आमच्या तिनहि पिढ्या मुंबईत अस्ल्यामुळे गावी येणे जाणे न्हवते . ह्ल्लीच मला माझ्या गावाचे नाव कळले. नगर मधिल कामरगाव. मला आमच्या कुल दैवते बद्दल काहीच माहित नाही. कुणाला इथे माहित असल्यास कळवावे. अ धिक महिती हवी असल्यास मी देईन.

मोकासा mōkāsā m ( A or A?) Villages or lands, or a share in the rule over them and revenue arising from them, granted on condition of military service or in Inám. 2 The share of the state or government in the rule over a village and in the revenue arising from it: also a village or the portion of it ruled by the state and yielding its revenue to it. 3 The balance of चौथ after the deduction of राजबाबती.

या मोकासा शब्दावरून मोकाशी हे आडनाव आलं आहे. मोकासा गोळा करणारे ते मोकासे किंवा मोकाशी. मोकासदार हे आडनावही समानार्थी आहे.

काटे आडनाव आहे
आमचे मूळ गाव कोणते आहे त्याबद्दल काही माहिती असेल तर सांगा
आमचे कुलदैवत पालीचा खंडोबा आहे या वरून काही माहिती मिळत असेल तर सांगा

अमेरिकेत काम करताना एका कलीगचे आडनाव होते Nicome (उच्चार: "निकोम" असा करायचा). तो म्हणाला की तो विंडीजचा आहे आणि त्याचे पूर्वज भारतीय होते. मी त्याला म्हटलं की तू बहुधा "निकम" असावास म्हणजे आपण दोघे मराठी Lol .

पण त्याला तेवढी काही महिती नव्हती. त्याच्या आडनावामुळे तो माझ्या लक्षात राहिला.

माझे आडनाव " *रांगणकर* " आहे. या विषयी कोणाला काही माहीत असेल तर प्लिज share करा ...मला आमच्या कुल दैवते बद्दल काहीच माहित नाही. कुणाला इथे माहित असल्यास कळवावे.

बर्‍याचदा गावाच्या नावापुढे "कर" लावून आडनाव केलेले बघितले आहे. कणकवलीजवळ "रांगणा किल्ला" आहे. कदाचित त्याच्यावरून हे नाव आले असेल असा अंदाज, नक्की माहीत नाही.

माझं नाव यश चुनेकर (कर्हाडे ब्रा.कौशिक गोत्र)
चुनेकरांच मूळ गाव माहीत आहे का? माझे आजोबा, पणजोबा सगळेच उज्जैन म.प्र. लाच राहात होते. उज्जैन, रतलाम, इंदूर इथे हे आडनाव सापडतं
आमची कुळदेवी गोव्याची महालसा नारायणी..

उज्जैन चे चुणेकर/चुनेकर हा परिवार माझ्या माहिती अनुसार मूळ चा दक्षिण गोव्याचा आहे व मूळ आडनाव उपाध्ये आहे पोर्तुगिजांच्या अत्याचारा मुळे तिथले बरेच कऱ्हाडे व सारस्वत ब्राह्मण परिवार तेथून पलायन करून रत्नागिरी कोल्हापूर पुणे व महाराष्ट्रातील इतर जागी गेले व जेव्हां पेशवे उत्तर भारतात मोहिमेला गेले त्यांच्या सरदारान् बरोबर बरेच मराठी परिवार बुंदेलखंड माळवा नंतर ग्वाल्हेर येथे स्थायिक झाले माळव्या मध्ये बाजी रावांनी ३ सरदार नेमले मल्हार राव होळकर इंदूर राणोजी शिंदे उज्जैन व उदाजी पवार धार (मांडू) राणोजी शिंदे यांनी महांकाळ मंदिरा चा जीर्णोद्धार करविला तेव्हां ह्या परिवाराचे मुख्यांना चुना भंडाराचा प्रभारी नेमले तेव्हां पासून आडनाव
चुणेकर उपाध्ये व नंतर चुनेकर असा झाला हा परिवार एकच आहे हे आडणाव कॉमन नाही म्हणून ह्या आडणावा ची लोकसंख्या फारचं मर्यादित आहे
ही माहिती जवळ जवळ ५० वर्षा पूर्वी एका चुणेकर व्यक्तीनी बस प्रवासात दिली होती>>>>>>>
ही माहिती माझ्या मैत्रिणीच्या मामेसासर्यांनी दिली. ते स्वत: म प्र चे आहेत, कर्हाडेच आहेत.

(माझ्या माहेरची कुलस्वामिनी महालसा नारायणीच, म्हार्दोळ, गोवा. त्यामुळे माझीपण उत्सुकता चाळवली आणि मी मैत्रिणीला काम लावलं)

माझे आडनाव चान्ड्वले आहे >> राजस्थान आणि सिंध प्रांताच्या मध्ये पूर्वी चंद्रवलीय लोकांची वस्ती होती. हे लोक चंद्राची उपासना करायचे. पुढे ग्रीक, पर्शियन, कुशाण हल्ले झाल्यावर तिथली घराणी पूर्वेकडे सरकली व भारतात इतस्ततः पसरली. त्यात महाराष्ट्रातले चांदवले, चांडवले हे वंशज येतात. काही लोकांच्या मते चांडक पण ह्याच वंशातील आहेत.

दांडेकर ह्या कोळी लोकांमधल्या नावाचा उगम त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून आलेला आहे. समुद्रकिनाऱ्यावर कित्येक ठिकाणी पाण्यात मध्येच वाळूचे लांब पट्टे तयार झालेले दिसतात त्याला दांड अथवा दांडा म्हणतात. पूर्वी जुन्या लुगड्याला फाटक्या ठिकाणी बायका दुसऱ्या लुगड्याची पट्टी अथवा तुकडा जोडीत असत त्याला दांड लावणे म्हणत. दांडवरून अनेक गावांची नावे आहेत. खार(दांडा)
दांडा राजपुरी, रेवदांडा वगैरे. ( इथे तर रेव म्हणजे वाळू आणि दांडा म्हणजे पट्टा असा उघड अर्थ आहे.)
बाकी कोंकणस्थानविषयी माहीत नाही.कदाचित हाच उगम लागू पडत असेल. (अनुस्वार व्यवस्थित उमटत नाहीत.)

गूगल इंडिक मराठी हा की बोर्ड ॲप दिलेल्या आज्ञा पाळीत नाही. मला android साठी दुसरा पर्याय सुचवाल का ? मीमराठी मिंग्लिश हा कीबोर्ड प्ले स्टोअर वर नाहीय पण एका साइटवर आहे. तर तो इंस्टॉल करण्यात धोका आहे का? सुरक्षितता वगैरे?

कोकणस्थ मुळ दांडेकर आडनांव, दांडेअडोम ह्या रत्नागिरीजवळच्या गावावरुन पडलं असावं. बहुतेक दांडेकर मुळ तिथले मग पांगले, गोनिदांच्या एका पुस्तकात पण आहे ते मुळ तिथले. मग कोकणात दुसरीकडे गेले, काही दांडेकर पालघरला आले.

Pages