आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळात मंगेशकर कुटुंब 'हर्डीकर'>>>>

ही एकदम नवी माहिती ( माझ्या साठी)... परत तो घोळ आहेच ... सारस्वत आणि कर्‍हाडे दोन्हीत " हर्डीकर " आडनाव आहे !!!!!

अशोक, अक्षम्य चूक झाली खरी. मंगेश त्या देवाचे नाव, मंगेशी गावाचे.
( पण एका दुर्दैवी प्रथेमूळे लता आणि किशोरी अमोणकर यांना गोव्याशी नाव जोडलेले आवडत नाही. )

केदार....नोटेड.

'शिकलगार' हे आडनाव आमच्या कोल्हापूर भागात खूप आढळते. तुम्ही जसे शस्त्रांना धार लावण्याचा उल्लेख केला आहे या मंडळीबाबत, तद्वतच या भागात 'आतषबाजी....रोषणाई....शोभेचे दारुकाम' या व्यवसायात फार प्रसिद्ध आहे.

शिवाजी पेठेतील चाँदभाई शिकलगार आणि त्यांचे वंशज यानी केलेले तारनळे, कुंडी, धबधबा, सूर्यचक्र आदी पाहणे नेहमी [महालक्ष्मी मंदिरात विशेषतः नवरात्री उत्सवाच्या वेळी] लोकांच्या आकर्षणाचे केन्द्र झालेले दिसतील. फार नाव कमाविले आहे या शिकलगार मंडळींनी या कलेत.

दीक्षित ह्या आडनावाबद्दल मागे नीधप यांनी 'दीक्षा घेतलेला तो दीक्षित' हे सांगितलंय, त्यात थोडी भर घालतो.
पूर्वी 'सत्रयाग', म्हणजे एकापेक्षा जास्त दिवस चालणारे यज्ञ होत.
त्या यज्ञाच्या (बहुतेक) मुख्य ऋत्विजास 'दीक्षित' म्हणायचे. त्यामुळे आज जे दीक्षित आहेत त्यांची खरी आडनावे वेगळीच असणार.
आमचे दीक्षित आडनांव पूर्वी 'श्रोत्रीय दीक्षित' होते.
हे 'श्रोत्रीय' सुद्धा पदवीपैकीच एक. श्रौत/स्मार्त असे कर्माचे प्रकार आहेत. त्यातल्या श्रौत (म्हणजे श्रुतींवर आधारित, म्हणजेच वेदांवर आधारित) कर्मे करणारे ते श्रोत्रीय/श्रोत्री.

अवांतरः दीक्षित हे आडनाव कोब्रा, कब्रा सोडून सुतारांच्यातही असते असे ऐकले आहे, नक्की माहिती नाही.

ज्यांच्याकडे सतत अग्नि जागृत असे ते अग्निहोत्री, असे रति अग्निहोत्रीने सांगितले होते. प्राचीनकाळी ही पण एक सेवाच असणार.

दिनेश....त्यात चूक कसली ? फर्गेट इट.

@ मीरा...

आता 'मंगेशकर' विषय छेडला गेलाच आहे तर त्या संदर्भात थोडेसे....

दिनानाथ यांचे वडील 'गणेशभट हर्डिकर'. मंगेशी देवालयाचे भटजीपण त्यांच्याकडे आले होते. देवळात असलेल्या शंकराच्या पिंडीला ते घालत असलेला अभिषेक पाहणे तसेच त्यांचे मंत्रोच्चार ऐकणे स्थानिकांना फार भावत असे. त्यासाठी देवळात गर्दीही जमत असल्याचे दाखले सापडतात. किंबहुना त्यामुळे गणेशभटांनी आपले आडनाव बदलून "अभिषेकी" केले. आजही 'अभिषेकी' शाखा मंगेशी भागात सापडते.

मात्र दिनानाथ यानी [काही कारणास्तव....ज्याचा इथे उल्लेख नको] ती दोन्ही आडनावे सोडून दिली आणि 'मंगेश' देवतेचा आशीर्वाद लाभू दे सदैव म्हणून 'मंगेशकर' आडनाव स्वीकारले.

आमचे आडनाव पाटिल.
ते कधीतरी पणजोबाच्या काळात आलं असेल असं वाटतय.
कारण त्यांचे नावच पाटलु होते.
अर्थात अशी खुप जुनी माहिती द्यायला सध्या कोणीच नाही. त्यामुळे पाटिलकी वै कधी कशी आली ह्याची माहिती जुन्या पिढीतनं मिळणं मुश्किल. पाटिलच्या आधी आडनाव काय हेही माहिती नाही. हेळव्यांकडे माहिती असते असं आई म्हणते. पण त्याना गाठणं मुश्कील.

@ चैतन्य....

कोल्हापूरात सुतारात 'दिक्षित' आढळत नाहीत, पण सोनारात जरूर आहेत. कार्पोरेशन इमारतीच्या परिसरात असे तीन दिक्षित माझ्या परिचयाचे आहेत जे व्यवसायाने सोनार आहेत [पैकी एक हायस्कूल टीचरही आहेत]. अर्थात हे तिन्ही सोनार स्वतःला "दैवज्ञ ब्राह्मण" म्हणवून घेतात.

अशोकजी... सोनारात आहेत दिक्षित आडनाव हे मी मागेच लिहिलय. आणि 'दैवज्ञ सोनार' असतात. त्यांच्यात कर्मकांड, धार्मिक विधी ब्राम्हणांसारखेच असतात.

सोनारांमधे खालील पोटजाती आहेत.

अहिर सोनार - क्षत्रिय सोनार : आडनाव- घोडके, वाघ,सातभाई, विसपुते, अहिरराव,मोरे, वानखेडे, जगताप, दुसाने ( मृणाल दुसानिस सोनार आहे)
लाड सोनार- वैश्य सोनार : शहाणे, अधिकारी
दैवज्ञ सोनारः ब्राम्हण सोनार : दिक्षित
पांचाळ सोनार: दिक्षित यांच्यातही आहे.

साऊथकडे माळवी सोनार आहेत. आडनावः धर्मठोक

उत्तरेकडील राज्यात वर्मा, सोनी, सुवर्णकार इ. सोनार आहेत.

हो, आर्या...

माझा मुद्दा हा की ज्या 'दिक्षित सोनारा'ला मी ओळखतो [माझ्याच कार्यालयात नोकरीला आहे] त्याच्या जात प्रमाणपत्रावर "दैवज्ञ ब्राह्मण" असा उल्लेख असल्याने त्याला 'सोनार' जातीला....म्हणजेच ओबीसी....मिळणार्‍या शासकीय सवलती मिळाल्या नाहीत. ही बाब त्याला मुले झाल्यावर प्रकर्षाने जाणवली. कारण अकरावी {ज्युनिअर कॉलेज} प्रवेशाच्यावेळी त्याच्या मुलीचे नाव 'ओपन कॅटेगरी' त आले आणि तिच्यापेक्षा कमी टक्केवारे असलेल्या 'सोनार' जातीच्या दुसर्‍या मुलीला 'ओबीसी' कोट्यातून प्रवेश मिळाला.

हो अशोकजी...सोनार ओबीसी कॅटेगरीमधे येतात. Happy आता त्यांच्या जात प्रमाणपत्रावर दैवज्ञ ब्राम्हण कसा काय उल्लेख आला हे काही कळत नाही.

पाटिल हा हुद्दा असल्याने ते ही आडनाव अनेक जाती प्रजातीत सापडते. आई च्या ऑफिसात पाटिल नावाच्या बाई आहेत ज्या कोब्रा आहेत.

तसेच राव आडनावाचे आहे. माझ्या ऑफिसात दोन कलीग आहेत दोन्ही राव पण ते लोक खरे देब्रा कारण दोघांची खरी आडनावे " उखळकर" आणि "कावळे" अशी आहेत. हे देब्रा हैद्राबाद, कर्नाटक अशा राजांच्या पदरी राहिले त्यांना मिळालेल्या ह्या पदव्या आहेत. त्या मुळे "उखळकर" च्या घरी तेलगु बोलतात पण मराठी मिश्रित आणि "कावळे" च्या घरी मराठी मिश्रित तमीळ बोलतात.... तसेच माझे एक क्लायेंट आहे तो पण रावच पण ते मुळचे "देशपांडे" ते घरी कानडी बोलतात

( माझ्या सासरी तेलगु असुनही मराठी मुलींशी लग्न केल्याने मराठी बोलतात. त्यांना अजिबात तेलगु येत नाही)

आर्या....

"सोनार" ही बारा बलुतेदारातील आर्थिकदृष्ट्या सर्वात 'श्रीमंत' गट मानलेली कॅटेगरी होय. आजही शहरातील पेठातील सोनारांचे लखलखते वैभव [जरी ते धंद्यासाठी आवश्यक असले तरी...] नजरेत भरण्यासारखे असते. कोल्हापुरातील सोनारांचे वैभव त्यांच्याकडील बंगले आणि गाड्यांच्या नवनवीन मॉडेल्सवरून समजतेच. त्यामुळे झाल्ये असे की या प्रथितयश सोनारांना आपली कॅटेगरी 'ओबीसी' मध्ये [म्हणजेच इतरांच्या नजरेत 'मागास'] अशी येऊ नये असे वाटत गेल्याने त्यानी स्वतःला 'दैवज्ञ ब्राह्मण" गटात घेतले आणि एकप्रकारे वेगळे पंगतही मांडली.

पण ज्यावेळी 'शैक्षणिक' सोयीसवलतीचा प्रश्न समोर आला त्यावेळी मात्र तो 'दैवज्ञ ब्राह्मण" टॅग आडवा आला आणि मग यांच्यातीलच काही सुजाणांच्या लक्षात ओबीसीना मिळणार्‍या सवलतीचे महत्व लक्षात आल्यावर आता ही मंडळे आपल्या जात प्रमाणपत्रावर 'ओबीसी' चा शिक्का बसावा यासाठी प्रयत्नशील आहेत.

दिनेशदा,

>> आडनावात गावांची नावे आकारांत रहात नाहीत. बडोदा ( बडोदेकर ), अमोणा ( अमोणकर )
>> म्हापसा ( म्हापसेकर )... असे का बरं ?

गावांची मूळ नावे बडोदे, आमोणे, म्हापसे अशी आहेत असं ऐकलंय. बोलीभाषेत बडोदा, आमोणा, म्हापसा असं म्हणतात. चूभूदेघे.

आ.न.,
-गा.पै.

बडोदा म्हणजे वटोदर चा अपभ्रंश. अमोणा ला गोव्यात अमोणाच म्हणतात. आणि म्हापसा ला पण म्हापसाच.
पोर्तूगीज स्पेलिंग पण MapuÇa असे.

पण एकंदर आकारांत गावांची नावे आडनावात कमीच आहेत. उदा. वर्धा, सटाणा

दिनेशदा,

रेल्वे स्थानकांची सफर आवडली
. कुरल्याचे कुरलेकर (कुर्लेकर?) आणि कल्याणचे कल्याणकर अशी आडनावे सापडतात. कर्जतकर असे आडनाव ऐकून आहे. तसेच कसारा मार्गावरील खरडी/खर्डी चे खरडीकर/खर्डीकर अशी आडनावेही ऐकली आहेत.

रच्याकने : मुंबईतील कुर्ला आणि चेंबूर ही नावे कुरल्या आणि चिंबोर्‍या या भक्षणीय खेकड्यांवरून पडलेली दिसतात. तोंपासु! Proud

आ.न.,
-गा.पै.

गा.पै.
आम्ही आधी चेंबूरमधे होतो पण पिनकोड बदलला आणि कुर्ल्यात आलो. पण १९७४ पर्यंत कुर्ला पूर्व वसलेले नव्हते. नेहरुनगर आणि कामगार नगर होते. आम्ही राहतो तो भाग खाडीचाच होता. आमच्या असोशियनने तो बुजवला. तात्पर्य काय, तिथे कुर्ल्या आणि चिंबोर्‍या असू शकतील. शीव म्हणजे मुंबईची हद्द होती.
मानखुर्दहून ट्राँबे ( तूर्भे ) ला बैलगाडीतून जात असू आम्ही !

००००००००

मी वाचले होते, किहिमच्या किनार्‍यावर आलेल्या इस्रायली ज्यू लोकांनी, सरसकट किहिमकर आडनाव घेतले होते.

मी माहेरची वाघ. ह्या नावामागचा "इतिहास"... आपल्या घराण्यात वाघ मारलेत पूर्वजांनी.. असं डरकाळी फोडत धाकट्या काकाने लहानपणी (माझ्या) अनेकदा सांगितल्यानं माझा पाठ झालाय. पण खरे खोटे पूर्वज, देव अन त्यावेळचे वाघ जाणे. कुणाला माहीत असल्यास प्लीज सांगा.
सासरची माळगावकर. गावावरून नाव घेण्याच्या पद्धतीतलं हे नाव. मूळ गाव अर्थात माळगाव (कोकणात). पर्देसाइंनी सांगितल्याप्रमाणे कुडाळदेशकरांची नावं प्रभू-देसाई, प्रभू-गावकर इ. होती. काहींनी देसाई ठेवलं, काहींनी प्रभू. तीच कथा
माझ्याही आडनावाची. हे मुळात नाईक-माळगावकर (माळगावचे नाईक?). पुढल्या पीढ्यांमधे माळगावकर लावीत राहिले. काहींनी नाईक ठेवलं.
माळगावचा कुणीही माळगावकर हे आडनाव लावू शकतो. त्यामुळे सरनाईक-माळगावकर, पाटील-माळगावकर अशीही नावं होतीच.
मला स्वतःला हा गावाचं नाव घेण्याचा प्रकार अतिशय आवडला. जात-बीत ह्यात कुठं येत नाही.
असो... त्या वाघ आडनावाचं काय ते बघा कुणीतरी.
वाघ आडनाव कोकणस्थं किंवा देशस्थांच्यातही असतं. (ते उगीच दात पाडलेल्या वाघासारखं बिच्चारं वाटतं). तसच वाघ आडनाव सारस्वतांमधेही आहेच.
(झककास धागा ... येत रहाणार इथे. खूप छान माहिती मिळतेय)

दाद....

'वाघ' असे आडनाव आणि त्यांची विविध रुपे पाहाणास मिळतात [मात्र 'सिंह' ची मिळत नाहीत हेदेखील एक विशेष].

वाघ...वाघे, वाघमारे...वाघचौरे...वाघमोडे अशी आडनावे सर्रास प.महाराष्ट्रात आढळतात. अर्थात यातील वाघमारे हे एस.सी. तर वाघमोडे हे एन.टी. [धनगर] कॅटेगरीत येतात.

अशोक पाटील

दीक्षित हे आडनाव कोब्रा, कब्रा सोडून सुतारांच्यातही असते असे ऐकले आहे, नक्की माहिती नाही.<< मी पण दीक्षित पण देशस्थ . सोनार आणि गुरव समाजातही हे आडनाव प्रचलीत आहे, तुळजापुरचे पुजारी हे दीक्षितच

दक्षिणा | 28 December, 2012 - 08:25.................कोल्हापूरला आमच्या घराशेजारी एक मुलगी पेईंगगेस्ट म्हणून रहात होती.. एक होतं 'dhungalpivale' माझाही तुझ्यासारखाच प्रकार त्यामुळे देवनागरीत लिहिणं टाळलं आहे. आणि दुसरं आडनाव होतं 'परकरवरकर'

परकरवरकर हे आडनाव मूळचे परकरवारकर असावे का असा प्रश्न पडतो. "परकर" हा शब्द मुळात संस्कृत "परिकर" अर्थात "लहान मुलीचा झगा" या शब्दापासून तयार झालेला आहे. आता "वारकर" याचे दोन अर्थ उद्भवतात. एक म्हणजे "वारकर"चा डिक्सनरी अर्थ आहे "वारकरी", दुसरे म्हणजे "वार करणारा'. पहिल्या वरून "परकर घालून एखाद्या ठिकाणची वारी करणारे' (जसे अय्यप्पा मंडळी काळे कपडे घालतात किंवा काहीजण गोणपाटाचे कपडे घालून काही काळापुरते वनवासी होतात तसे काहीतरी) अशी काहीतरी व्युत्पत्ती होऊ शकेल. दुसरे म्हणजे पूर्वीच्या काळी पुरुषांचे देखील झगे असायचे. मग लढाईमध्ये त्यावर वार करणारे असा दुसरा अर्थ होऊ शकेल का? कधी काळी एखादा परकरवरकर जर मायबोलीकर झाला तर उलगडा होऊ शकेल.
आता dhungalpivale यावर विचार करतो आहे. तरी बरं "वरकर" फक्त "परकर" पुरतेच मर्यादित आहे. इकडचे तिकडे झाले असते तर व्यत्पत्ती करणे फार अवघड गेले असते. Lol

बाबांच्या ऑफीसमधे एक 'बेरड' नावाचे गृहस्थ होते. बहुतेक 'बेरड' ही जमात पुर्वी होती/ आहे.
>>>>> आर्या, रामोशी जातीच्या लोकांना बेरड म्हणतात.

चावट (पाटील), चोरगे, खिरिड, भदाणे, बेलसरे, बलकवडे, खोल्लम, इ. आडनावांची कथा काय असेल ?
(यातले बरेचसे माझ्या वर्गात होते)

एक मैत्रीण होती : माहेर- ढोन्नर, सासर - बिन्नर, लग्न स्थळ - सिन्नर Lol
काही मित्रांची आडनावे : लिंगमपल्ली, वडेपल्ली (राहणार नाशिक-मुळगाव माहीत नाही), गोपुलवाड, कथलाकुटे (मराठवाडा), जवादे, मुंदावणे (विदर्भ). अजून बरीच आडनावे इथे आलीच नाहीयेत.
सोमण आडनावाचा उगम कसा, काय, कोठे?

वाघ-वाघमारे शुभविवाह....!! धमालच.

महेश...माझ्या माहितीतील एका गृहस्थाच्या मुलीसाठी स्थळ सुचविले गेले, पण त्या मुलीने पुढील काही गोष्टी होण्याअगोदरच नकार दिला.... कारण ? कारण म्हणजे त्या मध्यस्थाचे आडनाव होते "आगलावे".

Pages