आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे विशिष्ट देवकार्यात 'भाट' लोकांना बोलावले जाते. >> आर्या ते भाट आहे की भुत्ये? कारण भुत्यांकडे वंशावळ असते असे ऐकले आहे. आमच्या चिंचवडच्या वाड्यात दिवाळी आसपास यायचे हे लोक. भाट हे स्तुती करणारे लोक असतात बहुदा..

हो नीधप....

पेणचे एक देव आमच्या ऑफिसात आहेत. ते कोब्रा आहेत ( अत्ताच त्यांना विचारलं !!!!)

बाकी देब्रा, कब्रा तर नात्यातच आहेत

@अशोकमामा ---
नागपूर, लातूर, निलंगा भागात आडनावाच्या शेवटी "वार" येते त्याचा अर्थ काय ? हे लोक मुळ मराठी की आंध्रचे ? हेडगेवार, वझलवार, सोमलवार, मुत्तेमवार, वडेट्टीवार, इ.

त्या मुळे बहुतेक कर्‍हाडे ब्राम्हणां चे कुलदैवत एकतर शांतादुर्गा आहे नाहीतर मग कोल्हापुरची अंबाबाई. त्यांची नावं पण बहुतेक "....कर" >>> नाही नाही, आमचं कुलदैवत कोकणात आहे. आणि आडनाव ही 'कर' वालं नाही.>>>>

ममा ... म्हणुनच मी बहुतेक म्हंटले...

३३कोटी देव आहेत असे म्हणतात..त्यामुळे ते सगळीकडे आणि सगळ्या जाती जमातीत विखुरलेले मिळतील. Wink

बहिणीच्या एका मैत्रीणीचे आडनाव होते मीठभाकरे. त्यांनी म्हणे कधी काळी दुष्काळात मीठ आणि भाकरी वाटली होती म्हणून त्यांचे असे आड्नाव पडले.

चिमुरी...

"निंबळक" बरोबरच आहे. सातारा डिस्ट्रिक्ट गॅझेटमध्ये गावाच्या नावाचे स्पेलिंग Nimblak...उच्चारी "निम्ब्लक" असे सापडते. गावकरी मात्र गावाच्या नावचा उच्चार थेट 'निंबळ' असे करताना दिसून येईल. मग त्या गावच्या मराठ्यांनी त्याच नावाला आपल्या आडनावाला जोडल्यावर 'निंबळकर' असे झाले. त्याचे स्पेलिंग मग Nimbalkar केल्यावर उच्चारी 'निंबाळकर' असेही झाल्यामुळे पुढे तेच रुढ झाले असे समजण्यास वाव आहे.

गुजराथमधील मराठा समाज "बडोदा" म्हणतो तर गुजराथी वडोदरा...आणि इंग्लिश स्पेलिंगमध्ये 'Baroda' तसेच रेल्वे स्टेशनवर Vadodara असेही केले जाते, त्यातलाच हा प्रकार.

अशोक पाटील

नी ... ते "आठले" की "आठल्ये" ?

हे असे प्रकार फार असतात "मुळे" म्हणजे देवरुखे आणि "मुळ्ये" म्हणजे कर्‍हाडे....

अशा अनेक आडनावांच्या गमती असतिल!!!!

गुजराथमधील मराठा समाज "बडोदा" म्हणतो तर गुजराथी वडोदरा...आणि इंग्लिश स्पेलिंगमध्ये 'Baroda' तसेच रेल्वे स्टेशनवर Vadodara असेही केले जाते>>>>

अनुमोदन.... अहमदाबाद ला गुज्जु लोक "अमदावाद" म्हणतात

लंपन, पुर्वी राजदरबारी भाट असाय्चे स्तुतीपाठक म्हणतात ना त्यांना?
पण आमच्याकडे ह्या वंशावळी लिहिणार्या लोकांना 'भाट'च म्हणतात. आता कित्येक पिढ्यांपासुन त्यांचे जळगावला वास्तव्य आहे.

हे असे प्रकार फार असतात "मुळे" म्हणजे देवरुखे आणि "मुळ्ये" म्हणजे कर्‍हाडे....>> हो बीएमसीसी ला अम्हाला एक प्रोफेसर होती अरुणा साठ्ये Happy

हो कुळकर्णी म्हणजे सीकेपी आणि कुलकर्णी म्हणजे देब्रा असं एका कुळकर्णी मित्राने सांगितलं होतं >>> हो आणि कुळकर्णी हे सारस्वत सुध्धा असतात. जसे देशपांडे देब्रा, सीकेपी, सारस्वत, देवरुखे ह्यात सगळ्यात असतात. आणि हो भागवत व महाजन सुध्धा. महाजन तर लेवा पाटिल पण असतात. ( माझे सध्याचे शेजारी) हे त्या काळी हुद्दे असल्याने अशी नावे अनेक प्रांत, उप प्रांत, जाती, मधे सापडतात

जसे चिटनीस म्हणजे सी.केपी. आणि चिटणीस म्हणजे देब्रा. माझ्या "चिटणीस" मैत्रिणी कडुन मिळालेली माहिती

( रामा शिवा गोविंदा !!!!!)

महेश....

"सरसंघचालक हेडगेवार" यांच्या संदर्भात पूर्वी काही वाचन झाले होते त्यातील स्मरणाच्या आधारे इतके सांगू शकतो की विदर्भ मराठवाडा भागात आडनावाचा शेवट 'वार' ने करण्याचा अर्थ 'ती व्यक्ती त्या भागाशी निगडित आहे'. जसे प.महाराष्ट्रात '....कर' म्हणजे त्या गावातील नागरिक...उदा. रत्नागिरीकर, चिपळूणकर, नागावकर इत्यादी. इंग्रजीमध्ये जसे A person in the custody\control of.... म्हटले जाते तोच अर्थ '...वार' मध्ये अभिप्रेत आहे. मुत्तेमवार म्हणजेच मुत्तेम भागाशी निगडित असलेले विलासराव.

अशोक पाटील

मुंबईतल्या काही खास गोष्टी..

मुंबई हि पुर्वी सलग नव्हती. पण त्या काळात जी गावे वसलेली होती, तिथल्या स्थानिक समाजात ती आडनावे प्रचलित झाली. सोपारकर, मनोरीकर, वेसावकर, खारकर, दांडेकर, वांद्रेकर, माहीमकर, वरळीकर, बंदरकर, शिवडीकर, तूर्भेकर.

पण लोकल स्टेशन्स मात्र खुपच नंतर तयार झाली. त्यातली फारच कमी नावे आडनावात आहेत. मला माहित आहेत ती कंसात देतोय.

चर्चगेट-मरीन लाईन्स- चर्नी रोड - ग्रांट रोड - मुंबई सेंट्रल - महालक्ष्मी - लोअर परेळ - (यापैकी एकही नाही)
दादर ( दादरकर ) माटुंगा -माहीम जंक्शन ( माहीमकर ) वांद्रे ( वांद्रेकर ) खार ( खारकर ) सांताक्रूज - विले पार्ले ( पार्लेकर ) अंधेरी ( ?) जोगेश्वरी ( जोगेश्वरीकर ) गोरेगाव ( गोरेगावकर ) मालाड ( मालाडकर ) कांदिवली (?) बोरिवली ( ?) दहिसर ( दहिसरकर ) मिरा रोड - भाईंदर ( भाईंदरकर ) नायगाव ( नायगावकर ) वसई ( वसईकर ) नाला सोपारा ( सोपारकर ) विरार ( विरारकर )

व्हीटी / बोरीबंदर / छ.शि.ट. - मस्जिद ( ? Wink ) सँडहर्स्ट रोड - भायखळा ( भायाचे खळे ) चिंचपोकळी ( ?) करी रोड - परळ ( परळकर / नायगावकर ) - दादर ( दादरकर ) माटुंगा - शीव / सायन - कुर्ला - विद्याविहार - घाटकोपर - विक्रोळी - कांजूरमार्ग - भांडुप - नाहूर - मुलुंड - ठाणे ( ठाणेकर ) कळवा - मुंब्रा - दिवा ( दिवेकर ?)
डोंबिवली - ठाकुर्ली - कल्याण

व्हीटी / बोरीबंदर / छ.शि.ट. - मस्जिद ( ? Wink ) अपर सँडहर्स्ट रोड -डॉकयार्ड रोड - रे रोड - शिवडी ( शिवडीकर ) वडाळा - जी. टी. बी. नगर / सायन कोळीवाडा - चुनाभट्टी - कुर्ला - टिळक नगर - चेंबुर ( चेंबूरकर ) गोवंडी ( गोवंडीकर ) मानखुर्द ( मानखुर्दकर )

०००

गोव्यातील छोट्या छोट्या गावांना लाभलेले सुरेलपण - मोगुबाई कुर्डीकर, किशोरी अमोणकर, कान्होपात्रा किणीकर , सुहासिनी मुळगांवकर, प्रभाकर कारेकर .. इतर गावातले सूर . पंडीतराव नगरकर, मा. कृष्णराव फुलंब्रीकर - कृष्णराव चोणकर, श्रुती सडोलीकर, पंढरीनाथ कोल्हापुरे, मिरजकर बुवा, कागलकर बुवा

महाराष्ट्राबाहेरील गावांची आडनावे बेळगावकर, धारवाडकर ( बोला बेळगाव धारवाड सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ) कागलकर, विजापूरकर, गाणगापूरकर.

हिराबाई बडोदेकरांचे आडनाव हे माझ्या आठवणीप्रमाणे त्यांच्या मातोश्रींनी घेतले होते आणि दादु इंदुरीकरांचे. इंदुरी आणि मध्यप्रदेशातले इंदूर वेगळे असावे.

तमाशा कलाकारांनी मात्र आपली मूळ गावे आपल्या कलेंनी अजरामर करुन ठेवलीत. रोशन सातारकर, विठा नारायणगावकर, राजश्री काळे नगरकर, सुरेखा पुणेकर..

आडनावात गावांची नावे आकारांत रहात नाहीत. बडोदा ( बडोदेकर ), अमोणा ( अमोणकर ) म्हापसा ( म्हापसेकर )... असे का बरं ?

आडनावात गावांची नावे आकारांत रहात नाहीत. बडोदा ( बडोदेकर ), अमोणा ( अमोणकर ) म्हापसा ( म्हापसेकर )... असे का बरं ?>>>

गुड ऑब्झरवेशन दिनेशदा!!!!!

विदर्भ मराठवाडा भागात आडनावाचा शेवट 'वार' ने करण्याचा अर्थ 'ती व्यक्ती त्या भागाशी निगडित आहे'. >>

अशोकराव, मराठवाड्यात व विदर्भात सरसकट लोक वार लावत नाहीत, तेथेही कर लावतात. "वार" समुदाय हा आंध्रा महाराष्ट्र बॉर्डरवरील जिल्हे, उदा नांदेड, लातूर, निझामाबाद, अदिलाबाद येथे जास्त आढळतो. तसेच हे आडनाव ९९ टक्के "कोमटी" (आर्य वैश्य) समुदायाचेच आढळेल. अपवाद एखाद दुसरा. तो व्यवसाय करणारा समुदाय आहे.
-

माझा एक सहाध्याही होता. शिकलगार. हे आडनाव पण व्यवसायाशी निगडीत आहे. शस्त्रांना धार लावने / पाणी देणे (अर्थात तापवलेल्या) हा तो व्यवसाय. हे आडनाव बहुतांश मुस्लीम समुदायाशी निगडीत आहे.

पण मी उल्लेख केलेले "तगडपल्लेवार" हे गौड सारस्वत ब्राम्हण आहेत कारवारचे !!!!

"मुंबापुरी" आडनावाचा आढावा मस्तच घेतला आहे दिनेशदा यानी.

गोव्यातील गावांच्या सुरेलपणाचा उल्लेख छानच पण त्यात 'मंगेशकर' चाही समावेश असणे खूप गरजेचे आहे. मूळात मंगेशकर कुटुंब 'हर्डीकर', पण दिनानाथांनी ते मंगेशीचे म्हणून 'मंगेशकर' आडनाव स्वीकारले आणि तेच सर्वतोमुखी झाले असा इतिहास.

आपल्या क्रिकेटपटूंचाही '....कर' चा इतिहास मोठाच असल्याचे दिसते. गावसकर, मांजरेकर, सोलकर, वेंगसरकर, पारकर, तेंडुलकर....इ.

तमाशा कलावंत तर आडनावात "....कर" नसेल तर ओळखूच येत नाहीत की काय असाच समज झाला आहे. त्यामुळे राजश्रीचे आडनाव काळे असले तरी त्या मुद्दाम 'नगरकर' असा उल्लेख करतात.

मराठी लोक महाराष्ट्राच्या सीमा पार करुन पानिपत, बडोदा, ग्वाल्हेर, जिंजी, हैद्राबाद ला पोहोचले होते मग त्या किंवा इतर भागातून आपल्याकडे छत्रपतिंच्या / पेशव्यांच्या काळात लोक आलेच असतील. त्यांनी आपली मूळ गावे आठवणीत रहावीत म्हणून ती आडनावे घेतली, अशी उदाहरणे आहेत का ?

काशीकर कोण ?

कुर्ला-कुर्लेकर...माझ्या कार्यालयात होते दोघे कुर्लेकर बंधू आणि ते राहायचे घाटकोपरला...मी त्यांना कधी कधी गमतीने म्हणायचो...घाटकोपरकर...आणि तेही ओ द्यायचे. Happy

Pages