किल्ला ओळखा

Submitted by इंद्रधनुष्य on 26 December, 2012 - 03:44

प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२

डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.

किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन

*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्‍याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रची ४३ घनगडच आहे. सुधागडच्या एको पॉईंटवरून वाटतोय...

माझ्याकडून पहिला प्रची Happy

प्रची ४४

उत्तर : तेलबैला (डावी भिंत)
(जिप्सी)

प्रचि ४४ : कर्नाळा >> +१

प्रचि ४५:

क्लू : पायथ्याशी मोठं तळ आहे ज्यात गडाच मस्त प्रतिबिंब उमटत...
उत्तर : कोहोजगड, पालघर.
( स्वच्छंदी, रोहीत एक मावळा)

अरे क्लू द्यायला विसरलोच...
प्रची ४४ चा क्लु: जिल्हा पुणे...

इंद्रा कर्नाळा नाही...

यो.. प्रची ४५ माणीकगड वाटतोय.. पायथ्याच्या धरणात त्याचे मस्त प्रतिबिंब दिसते.. माणिकगड नसेल तर कोहोज असू शकतो...

रोमा.. तोरण्याची बुधला माची नाही...
प्रची ४४ हा किल्ल्याचा भाग किंवा सुळका नाहीये तर पुर्ण किल्लाच आहे Happy

मृगगड आहे का हा...???

मनोजच्या पहिल्याच प्रचिने डोक्याचा भुगा केलाय

हो माहीती होते, पण मी हळूच पुणे जिल्ह्याची सीमा पलीकडे ढकलून पाहिली...

च्यामारी आता उरला तरी कुठला...
सिंहगड, राजगड, तोरणा, पुरंदर नाही
खालच्या बाजूला रोहीडा, रायरेश्वर, केंजळगड नाही
तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, कोरीगड, घनगड नाही
वरती शिवनेरी, नारायणगड जीवधन, हडसर, चावंड, निमगिरी, दुर्ग, धाकोबा नाहीत.
चाकण, मल्हारगड नाही

अजून एखादा क्लू देणेची करावे

Pages