अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुवा, २७ चा रविवार आणि ३ चा रविवार ह्यांना मिळणार नाही क्लबहाऊस कारण दोन्हीचे आदले दिवस बुकींग आहे. तेव्हा तारीख न बदलता ठिकाण बदलून चालत असेल तर विनय, मै ह्यांना शक्य असल्यास चौकशी करु देत.

काहीच ठरत नाही यहीच तो गम है. मै, देसाई इथे फिरकत नाहीत आणि २६ ला त्यांचं क्लबहाऊस मिळू शकत का, हे सांगत नाहीत.

अरे मला या नव्या नेबरहूड मधे क्लबहाउस कसे काय रेन्ट करायचे काही म्हणता काही माहित नाहिये. देसाई कुठेत ? त्यांना चटकन जमेल.

मी असणार की नाही हे माहीत नाही पण लगेच मेल टाकतो. आणि उत्तर आल्यावर कळवतो..

विनय Happy

(कुणी शिव्या घालायच्या आधी टाकली मेल बरं.. आता पुढे बघू..)

धन्यवाद देसायनू!
आणखिन विघ्न आणि बहाणे नको म्हणून नवस बोलावा की काय? (अजून बहाणे सुरु झाले नाहीयेत म्हणा!) Proud

जागा १/२६ ला मिळते आहे. $१२५ + $२५० डिपॉझीट ...
डिपॉझिट मी भरेन. चालत असेल तर होकार टाका.. १० आले की बुकिंग टाकतो.
आजच्या आज. जे घरी गेले त्यांची मनधरणी वगैरे करा...

Yess!

+१

मेहुणे आणि ताई अशी दोन डोकी पण धरा.

मा आणि बामा ह्यांची २ धरा.

फचिनमामाचं एक आणि त्याच्या सोबतीने अजून एक डोकं येइल.

झाली का १० ?

सायो, नॉर्थ ़जर्सीतून तू, मी आणि बाई (२ शीटं) सध्या फिक्स दिसतायत. तुझा रथ घेणार आहेस की माझाच न्यायचा?

Pages