वर्षू नील गटग - मुंबई. फिनिक्स मार्केटसिटी फूडहॉल, कुर्ला. शनिवार, २०/१०/१२, सायं ५ वाजता

Submitted by मामी on 14 September, 2012 - 02:26
ठिकाण/पत्ता: 
पार्ल्यात किंवा दादरात. कोणी आपल्याला उठवणार नाही असं धृवबाळासारखं अढळपद मिळवून देणारं कोणतंही ठिकाण /कॉफीशॉप. सुचनांचे स्वागतच स्वागत!

तर पटापट नाव नोंदणी करा!!!!

काय म्हणता? हे कशाबद्दल आहे तेच कळत नाहीये? काय हे! साधी चायनीज भाषा येऊ नये तुम्हाला? कसं होणार तुमचं?

बरं घ्या आता मराठीतून भाषांतर ....

आपली चायनीज वर्षु नील भारतात येतेय. तिला भेटण्यासाठी शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी किंवा रविवार, २१ ऑक्टोबरला सकाळी किंवा २१ ऑक्टोबरला संध्याकाळी असं गटग करायचं आहे.

त्याबद्दल आपापल्या नावाची नोंदणी करा. ठिकाण सुचवा आणि तारीखही कोणती ते सांगा.

जास्त मंडळींना सोईची तारीख ठरवण्यात येईल याची कृपया नोंद घ्या. कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल.

वर्षु नील गटग शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता फुड हॉल, फिनिक्स मार्कॅट सिटी, कुर्ला इथे आयोजित करण्यात येत आहे.

माहितीचा स्रोत: 
भारतीय हेरखाते
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 20, 2012 - 07:30 to 14:29
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुर्ला स्टेशनवरुन कसं जायचं या मॉलला? मी कदाचित वांद्र्यावरुन ऑटोने येईन. कुर्ला स्टेशनपर्यंतचा रस्ता माहित आहे. ठाण्याहून आले तर गँग असेलच बरोबर. ठाण्याला घरी जाताना गँगसोबत जाणार.

दिनेश दा Lol
बाबु साठी जिवंत मासे.. ह्म्म्म.. इन एक्स्चेंज ऑफ इमू साते Wink
दिनेश्,सेना.. आपको बहुत मिस करेंगे!!!!

मला खूप यायचं आहे पण २० ला पूर्ण दिवसाची मीटिंग ठेवल्या गेली आहे. त्यामुळे काय होईल माहीत नाही. पण शुभेच्छा. थोरल्या अश्विनीताई एनारेत का?

आणि छत्रपतींवरची चिनी बखर, ( मूळ हस्तलिखित ) घेऊन ये, म्हणजे सेनापती, जातीने हजर होतील !>>>> Biggrin

केश्वे आज फोनते तुला. Happy

कुठल्या मिल / इंडस्ट्रीयल इस्टेट च्या जागेवर झालेय हे ? >> दिनेशदा... मुकुंद कं.च्या जागेवर उभारलाय तो फिनिक्स मॉल.

कुर्ला स्टेशनवर उतरल्यावर पश्चिमेला बाहेर पडा आणि तिथुन रिक्षावाल्याला 'कमानी'ला जायचे आहे असे सांगा.

मला जमल्यास येईन. पण नक्की नसल्याने नाव नोंदवत नाही. Happy

पण फिनिक्स लाच जाणार आहात तर आमच्या गरीबाच्या गॉसिप ला नक्की भेट द्या>>>

अरे हां तुम्ही डिझाइन केलेलं स्टोर तिकडेच आहे ना? झकास होते त्याचे फोटो. नक्की जाईन

१. मावसभावाचं लग्न आहे.
२. त्यामुळे मी येउ शकत नाहीये.>>> तुम्ही सगळे बागुलबुवाच्या मावसभावाच्या लग्नातच गटग का करत नाही? Proud

अमी, थँक्स Happy मी वांद्र्याहून येणार असेन तर तुला फोन करेन, मग तू येणार असशील तर कुर्ल्याला तुला घेईन आणि पुढे जाऊ.

मी येणार आहे. तुम्हा सर्वांंना भेटायच आहे. नवर्याला घेउन आले तर चालेल का? त्याच नक्की नाहीये, मी मात्र नक्की येणार.

मी फोनद्वारे गटगणार.
+९१८७९६३७७४२६

Kiran झणझणीत
सध्या- भटिंडा, पंजाब

स्नो वर्ल्ड फोनिक्स ला चालु झालेले नविन स्नो Amusement Park आहे . तीन /चार महिन्यांमागे चालु झालेय , छोटि आईस रिंक, इग्लु, आर्टीफिशिअल स्नो आहे आणि काही स्नो स्लाईड आहेत असे ऐकलेय.

मामी
वर्षुतैच्या फोनवर . त्या दिवशी शक्य झाल्यास टपकेनच आयत्या वेळी. माझा अवतार पाहून द्वारपाल आत सोडेल हे बघा कुणीतरी

अरे हो, बरं झालं हे बोललास. फिनिक्स मार्केटसिटी हा फॅमिली मॉल आहे आणि त्यामध्ये सर्व हायएंड ब्रॅन्डसची दुकानं आहेत. त्यामुळे त्यांना पसंत पडणार नाही अशा वेषात आल्यास दरवाज्यावरूनच परत पाठवतात.

इथे वरून चौथा रीव्हू वाचा. http://mumbai.burrp.com/listing/phoenix-market-city_kurla-west_mumbai_sh...

हा रिव्हू वाचून मी फिनिक्सच्या ऑफिसात फोन केला आणि हे काय प्रकरण आहे हे विचारलं. त्यावर तिथल्या बाईनं सांगितलं की अगदीच टपोरी लोकांना या मॉलात प्रवेश करण्यावर बंदी घालतात. साधारण वेशभुषा आणि एकंदर अवतार पाहूनच आत सोडतात.

म्हणजे एकंदर अवघडच प्रकरण आहे तर. येताना पिवळी पँट, लाल शर्ट आणि गळ्यात रूमाल बांधून द्वारपालाशी हुज्जत घालत असलेल्या व्यक्तीला हाय म्हणालात तर मी देखील हाय बॅक करीन Happy

म्हणजे एकंदर अवघडच प्रकरण आहे तर. येताना पिवळी पँट, लाल शर्ट आणि गळ्यात रूमाल बांधून द्वारपालाशी हुज्जत घालत असलेल्या व्यक्तीला हाय म्हणालात तर मी देखील हाय बॅक करीन >>>>> Biggrin

किरण व्यवस्थित वेषात आलास तर खूप छान. भेटायचंय तुला. Happy

मामी,

माझ्या माहितीप्रमाणे कुडता पायजमा हा भारताचा राष्ट्रीय वेष आहे. हा स्वच्छ वेष परिधान करून जर एखाद्याला सार्वजनिक वावराच्या ठिकाणी प्रवेश मिळत नसेल तर तो कायद्याने अपराध होऊ शकतो.

आ. न.,
-गा.पै.

Pages