वर्षू नील गटग - मुंबई. फिनिक्स मार्केटसिटी फूडहॉल, कुर्ला. शनिवार, २०/१०/१२, सायं ५ वाजता

Submitted by मामी on 14 September, 2012 - 02:26
ठिकाण/पत्ता: 
पार्ल्यात किंवा दादरात. कोणी आपल्याला उठवणार नाही असं धृवबाळासारखं अढळपद मिळवून देणारं कोणतंही ठिकाण /कॉफीशॉप. सुचनांचे स्वागतच स्वागत!

तर पटापट नाव नोंदणी करा!!!!

काय म्हणता? हे कशाबद्दल आहे तेच कळत नाहीये? काय हे! साधी चायनीज भाषा येऊ नये तुम्हाला? कसं होणार तुमचं?

बरं घ्या आता मराठीतून भाषांतर ....

आपली चायनीज वर्षु नील भारतात येतेय. तिला भेटण्यासाठी शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी किंवा रविवार, २१ ऑक्टोबरला सकाळी किंवा २१ ऑक्टोबरला संध्याकाळी असं गटग करायचं आहे.

त्याबद्दल आपापल्या नावाची नोंदणी करा. ठिकाण सुचवा आणि तारीखही कोणती ते सांगा.

जास्त मंडळींना सोईची तारीख ठरवण्यात येईल याची कृपया नोंद घ्या. कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल.

वर्षु नील गटग शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता फुड हॉल, फिनिक्स मार्कॅट सिटी, कुर्ला इथे आयोजित करण्यात येत आहे.

माहितीचा स्रोत: 
भारतीय हेरखाते
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 20, 2012 - 07:30 to 14:29
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरातून दुपारी ४:०० वाजता निघाले होते. रात्री १२:०० वाजता परत आले. धमाल आली गटगला. बर्‍याच दिवसांनी भरपूर वेळाचं मोठं गटग अटेंड केलं. भरपूर बडबड केली, हाहा-हीही केलं, खर्‍या अर्थाने शनिवार संध्याकाळ एंजॉय केली.

ऑर्किड, म्हमईकर, नरेंद्र गोळे - या तीन आयडींना प्रथमच भेटले.

मॉलमधे पोचल्यावर आम्ही एका पाठोपाठ एक सरकते जिने पार करत असताना एका बाजूला मला सतत ऑर्किड दिसत होती. तेव्हा मी तिला ओळखत नव्हते, पण तरीही ती गटगला आलेलीच एकजण असणार असं का कोण जाणे पण सारखं वाटत होतं. ते खरंच ठरलं अर्थात. (सार्वजनिक ठिकाणी माबोपणा चेहर्‍यावर दिसतो आणि ओळखू येतो की काय न कळे Wink )

ते रेनफॉरेस्ट मात्र जरा अंमळ अंधारं आणि कोंदटच होतं, ब्वा! नंतर-नंतर तर लईच उकडलं.

मस्त ग ट ग ... खुप मजा आली

ह्या गटग ला जाण्या आधी मी, अशुतोश आणि मनिषा ( हेकाय्नीतेकाय) चे मीनी गटग आमच्या मुलांच्या शाळेत सकाळी आटोपले. खरतर संध्याकाळच्या गटग ला टांगारु होणार होते. कारण मुलीला ताप होता. पण मीनी गटग ला खुप गप्पा झाल्या. मग ठरवलं की जायचच. मुलीलाच विचारलं जाउका... ती म्हणाली जा ( मनात टळलीस तर बरं)

तरी ६ वाजता पोहोचले. फिनिक्स चा मॉल शोधुन काढण्यात मामीची कर्तब्गारी (??? ) दिसली. कारण जास्तीत जास्त लोकांनी चुकावे म्हणुन तिथे ४-५ प्रवेश द्वारे आहेत. तरी मी शिताफीने (?) एक एक्सलेटर पकडुन ठेवला. म्हंटलं ह्याने जिथे पोहोचु तिथे पोहोचुच. आश्चर्य म्हणजे जेंव्हा फुड कोर्ट च्या दिशेने जात होते, तेंव्हा समस्त मंडळी माझ्याच दिशेने येत होती. म्हंटल गटग फिनिक्स मधे फिनिश झालं की काय.... नंतर कळलं की अजुन बरेच लोक्स यायचे होते. मी लली सोडुन कोणालाच ओलखत नव्हते... वर्षु ताई म्हणजे एकदम मेन्टेंन्ड सॉफिस्टीकेटेड व्यक्तिमत्व. एकदम झकास. त्या रेन फॉरेस्ट मधे डोळ्यात बोट ( स्वतःच्या व इतरांच्या सुध्धा) घातलं तरी काहीही दिसत नव्हतं माझी पांढरी पर्स फ्लोरोसंट होवुन फीअर फाइल्स मधल्या भुतांच्या डोळ्यां सारखी दिसत होती. माझ्या समोर गप्प गप्प ऑर्किड बसली होती. ती घाबरेल म्हणुन मी पर्स खालीच ठेवली.
जिप्सी नेहेमी प्रमाणे आपल्या बायकोला घेवुन आला होता. येवढ्या आंधारात फक्त त्याच्या बायकोच्या डोळ्यात आम्हा सगळ्यांना बघायची ताकद होती. सगळे स्थानापन्न झाले. हळु हळु एक एक जण यायला लागले.

बरेच जण आले तरी दस्तुर खुद्द मामी चा पत्ता नव्हता. आम्ही वर्षु ताईने दिलेली बिस्किटे खात होतो. फारच मस्त प्रकार!!! माझ्या घरी ही आवडली. अशुतोश ने मागवलेले अगम्य पदार्थ आंधारात दिसले नाहीत तरी चवीला चांगले होते. मँगो डिलाइट तर खासच!!!! आम्ही व्हेज वाले एक टेबलावर बसायचं अशी केश्वीने धमकी वजा सुचना केली. बीचारा जिप्सी मुकाट्पणे माझ्या शेजारी बसला. केश्वीचा दराराच तसा आहे!!!! मुग्धानंद , नीधप, शर्मिला, निलीमा, मोनाली सगळ्यांचे आगमन झाले. मोनाली सहकुटुंब आली होती. बागुलबुवाने बायकोला घाबरत आपण येणार असल्याचे तिला कळु दिले नव्हते. आत आल्यावर नजर सरावली नसताना निलिमाने बाबुला हाय म्हंटले ( बहुदा चुकुन असणार). गजानन चे पिल्लु पण आले होते. पहिले पिल्लाने बराच संयंम दाखवला. पण पोटात आहुती पडताच त्याला पंख फुटले.
मी अजिबात गप्प नव्हते. पण रेस्टॉरंट ची रचनाच अशी होती, की माझ्या आकाराच्या माणसाने मोकळे पणे फिरायचे ठरवले तर ४-५ जणांना नक्की धक्का लागेल. ( ग्यानबाची मेख ही की मी ज्या खुर्चीत बसले होते तिला पुढे मागे व्हायला चांन्स्च नव्हता. मग इकडे तिकडे फिरुन काय कप्पाळ गप्पा मारणार) सगळ्यात जास्त दंगा केश्वी आणि लली घालत होत्या. जिप्सी वाटतो त्या पेक्षा बराच सरळ (?) आहे. नरेंद्र गोळे आवर्जुन सगळ्यांशी बोलत होते. नीधप... तुझ्या प्रोफाइल वरचा फोटो बदल. त्या दिवशी खुप क्युट दिसत होतीस!!!!

ऑर्किड आणि म्हमईकर खुप छान छान हसत सगळी कडे पहात गटग चा आस्वाद घेत होते. आठ वाजले तसे माझ्या घरुन धमकी वजा फोन यायला लागले. मी मुग्धानंद आणि ऑर्किड सगळ्यात आधी निघालो. आणि सव्वा नऊ वाजता घरी पोहोचलो.

त्यादिवशीच्या ट्रॅफिकचा णिशेध!!!! जाम वात आणला. तरी आम्ही बरेच बरे आलो. वरचे एकंदर वेळेचे आकडे डोळे फिरवणारे आहेत.... आम्ही गेल्या वर काय काय झाले ते कोणी तरी सांगारे !!!!!

जिप्स्या फोटो येउ देत.....

( गटग ला ठाणेकरच जास्त होते..... केश्वी.... तुस्सी ग्रेट हो!!!!)

वा! वा! एका पहिलटकरणीचा सविस्तर वृ आला... Happy

जिप्सी वाटतो त्या पेक्षा बराच सरळ (?) आहे. >>> जिप्सीबद्दलची या टाईपची कमेंट प्रथमच आलीय Wink

नीरजा, तुझा प्रोफाईल फोटू मुद्दाम जाऊन पाहून आले Lol

ह्या मेळ्यात अनेक अशा व्यक्तींची भेट झाली ज्यांनी
देहावर काळाच्या पाऊलखुणांचे ठसे उमटू देण्यास मनाई केलेली दिसली!

अशांचीही भेट झाली ज्यांचे कुणाशीही
इतक्या झटपट मैत्र जुळते की आश्चर्याने थक्क व्हावे लागते.

भेटलेल्या सर्वच सुहृदांच्या विविधांगी अनुभवांनी
समृद्ध होण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो.

भेटी अशाच व्हाव्या, संदर्भ आठवावे
क्षितीज जाणीवांचे, विस्तारते राहावे

ह्या मेळ्यात अनेक अशा व्यक्तींची भेट झाली ज्यांनी
देहावर काळाच्याचे ठसे उमटू देण्यास मनाई केलेली दिसली!>>>>

गोळे काका +१

शनिवार असूनही मला ऑफिसात थांबावे लागले. Sad Sad
ऑर्किड आणि आशूतोषने लाईव स्टेटस समस मधून कळवले त्याबद्दल मंडळ त्यांचे आभारी नाही.
कंटाळवाण्या मिटिंगमधे मायबोली गटगचे स्टेटस मेसेज मिळणे किती जहाल असेल हे ज्याचे जळेल त्यालाच कळेल. मी काय लिहिलंय हे नाही कळलं तरी चालेल.
गटग चुकले. Sad Sad Sad
परतताना केश्विचा फोन आला होता पण दिल्लीच्या एका कलिगला ठाण्यात त्याच्या नातेवाईकांकडे सुखरुप पोचते करायचे होते, आणि त्याला मुंबई लोकल ट्रेननेच जायचे होते त्यामुळे ट्रेन पकडून जागा अडवायच्या घोळात वर्षुशी बोलताही आले नाही.
थोडक्यात काय तर गटग चुकले Sad Sad Sad

ए मोकीमी, आपला जिप्सी एकदम सभ्यच आहे गं>>>

अगं त्याच्या लिखाणातुन एक खोडकर मुलगा दिसतो. तो त्या दिवशी आला नव्हता बहुतेक !!!!!

हम्म्म्म बाकी मजा आली लोक्स गटगला. बाबुची अशी मेख होती होय. म्हणुनच पत्नीचे आगमन होताच टेबल सरकवुन तो तिच्या स्वागताला बाहेर आला.

मी त्या वाईट्ट ट्रॅफीक (च्यायला हा शब्द लिहायला मी ४-५ वेळा खाडाखोड केली Sad तरी बरोबर आहे का न कळे) मधुन मॉलला पोहोचते तोच गाडीने बॅटरीचा सिग्नल देऊन असहकार पुकारला. आता बंद केली की सुरु करताना धक्का कोण देणार म्हणून नवरा तसाच गॅरेजच्या शोधमोहिमेवर निघाला व मी जंगलात घुसले. पोहोचताच आशुतोषने काय घेणार असे म्हणत मेन्यु कार्ड समोर धरले. त्या अंधारात काय कप्पाळ वाचणार तेव्हा पोरासाठी टोमॅटो सुप व माझ्यासाठी काहिहि व्हेज मागव असे त्याला सांगुन मी स्वतःची सुटका करुन घेतली. Wink

नविन आयडींची ओळख करुन घेतली मात्र अगदी शांत बाजुलाच बसलेल्या आयडीला मी काहिच विचारले नाही. (मले वाटले वर्षूतैची ती मैतरीन आलीया तसेच कोनी मैतर पन आलाय. म्हनुन्स्यान म्या त्यास्नी काय बी ईचारल न्हाय.) अहो मम्हईकर माबोवाले असे गप्प बसत नाहीत. पुढच्यावेळी तुम्हीही गप्प नसाल म्हणा :).

वर्षूतै त्या चायनीज चकल्या पोराला आवडल्या ग. तो आपला, आई यात मधे मधे गोड नसते तर अजुन मस्त वाटले असते म्हणुन मस्त हादडत होता Proud

तर या गटग मधे २ मिनी गटग पण झाले, १. डोंबिवलीकरांचे व २. गिरगावकरांचे. त्यांचा वॄ सेपरेट लिवा.

त्यानंतर मी सटकले कारण मला परत बराच लांबचा पल्ला गाठायचा होता. रच्याकने लले, मी गिरगाव करुन ठाण्याला ११.४५ ला आले. तुला १२ कसे वाजले? की तु कोणाचे १२ वाजवत होतीस मधल्या वेळेत Uhoh

आम्ही, "त्या" क्षणापासुन आत्ताच आंतरजालावर आगमन करते झाल्यामुळे, आणि आत्ता हापिसात बॉस हजर असल्याने, सविस्तर वृतांत यायला थोडा वेळ लागेल. " क्रिपया प्रतिक्षा करें"

पण बागुलबुव्याची बायको बागुलबुव्याबरोबर का नाही गेली? केश्विबरोबर का गेली?
:काडीटाकू चोंबडी बाहुली: Biggrin

पण बागुलबुव्याची बायको बागुलबुव्याबरोबर का नाही गेली? केश्विबरोबर का गेली?
:काडीटाकू चोंबडी बाहुली: >>> मंजे मलाही हा प्रश्ण (धप्पकन) पडला पण मी काडी टाकली नाही एवढेच Wink

मला अज्जिबात नाही पडला हा प्रश्न.. (मी कित्ती बै निरागस!)

तुम्हाला लोकांच्या भानगडीत जाम इंटरेस्ट आहे.. Wink Proud Light 1

मग कशाला हिंट दिलीस उगाच? Wink

मी माझी समजूत घातली की केश्वि ठाण्याला एकटी जायला नको म्हणून निलिमा तिच्या सोबत गेली Happy

टांगारू : तुमचा अभिषेक, कविन, मंजूडी, Reema, भुंगा, manee >
मला पण चुकलच शेवटी गटग. शेवटच्या क्षणी प्लानच चेंज करावा लागला. येउन सगळ्यांना भेटुन जायचा पण विचार केला पण हा मॉल माझ्यासाठी एकदमच आडवाटेला पडत होता.
खुप मजा केली ना तुम्ही सगळ्यांनी!
Sad

हा मॉल माझ्यासाठी एकदमच आडवाटेला पडत होता.
>>> गटगला टांगारू बनल्यावर हे कारण सांगण्याबद्दल रीमाशी चायनीजमधून भांडण्यात येईल. Proud

मी मिस केलं सगळं आणि खास करुन वर्षूला ( आम्हि एकदाही भेटलो नाही, प्रत्यक्ष अजून. फोनवरच बोलत असतो. )

मामी, धावपळ करुन जरा श्रमली होती आणि अंमळ डोळा लागला होता... मी तिला बरोबर ५ वाजता फोन करुन उठवले... हे मी लिहिणार नव्हतो, पण वर्षूने अभय दिले, म्हणून लिहितोय !

वा! सगळ्यांनी आपापली भर टाकली आहे Happy

नीरजाने लिहिलेला माझा आणि अम्याचा संवाद Lol

मंजूडे, ६ वाजता निघू शकली असतीस तर जमलंच असतं यायला.

माझ्या आकाराच्या माणसाने मोकळे पणे फिरायचे ठरवले तर ४-५ जणांना नक्की धक्का लागेल. ( ग्यानबाची मेख ही की मी ज्या खुर्चीत बसले होते तिला पुढे मागे व्हायला चांन्स्च नव्हता. मग इकडे तिकडे फिरुन काय कप्पाळ गप्पा मारणार) >>>>> मोकिमी, मलाही मोकळेपणाने फिरता येत नव्हतं आणि त्यात ते मध्ये मध्ये कट्टे करुन ठेवले होते म्हणजे बुदुच्च्या व्हायचीच भिती. मला ती खुर्चीची मेख लागलीच कळल्यावर मी समोरच्या सोफ्याकडेत मोर्चा वळवला.

वरच्या वाक्याने तूला जर आमच्या ग्यान्गमध्ये जमा होता येईल असं वाटत असेल तर 'ए नॉ चॉलबे'

Pages