Submitted by मामी on 14 September, 2012 - 02:26
ठिकाण/पत्ता:
पार्ल्यात किंवा दादरात. कोणी आपल्याला उठवणार नाही असं धृवबाळासारखं अढळपद मिळवून देणारं कोणतंही ठिकाण /कॉफीशॉप. सुचनांचे स्वागतच स्वागत!
तर पटापट नाव नोंदणी करा!!!!
काय म्हणता? हे कशाबद्दल आहे तेच कळत नाहीये? काय हे! साधी चायनीज भाषा येऊ नये तुम्हाला? कसं होणार तुमचं?
बरं घ्या आता मराठीतून भाषांतर ....
आपली चायनीज वर्षु नील भारतात येतेय. तिला भेटण्यासाठी शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी किंवा रविवार, २१ ऑक्टोबरला सकाळी किंवा २१ ऑक्टोबरला संध्याकाळी असं गटग करायचं आहे.
त्याबद्दल आपापल्या नावाची नोंदणी करा. ठिकाण सुचवा आणि तारीखही कोणती ते सांगा.
जास्त मंडळींना सोईची तारीख ठरवण्यात येईल याची कृपया नोंद घ्या. कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल.
वर्षु नील गटग शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता फुड हॉल, फिनिक्स मार्कॅट सिटी, कुर्ला इथे आयोजित करण्यात येत आहे.
माहितीचा स्रोत:
भारतीय हेरखाते
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, October 20, 2012 - 07:30 to 14:29
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी , येण्याची भारीच इच्छा
मामी , येण्याची भारीच इच्छा आहे. सगळ्यांची भेट होईल. पण आयत्यावेळी काय होईल काही सांगता येत नाही......
का नाव्नोंदणी करुन ठेवु?
का नाव्नोंदणी करुन ठेवु?
मोकिमी, तू पवईहून ठाण्याला का
मोकिमी, तू पवईहून ठाण्याला का जाणारेस पुन्हा? पू.द्रु.म.ला लागल्यावर थेट गटगचे ठिकाण गाठणे तुला शक्य आहे (ना? / की!) वेळही वाचेल (ना? / की!)
लले नाहीग... गटग ला जाताना
लले
नाहीग... गटग ला जाताना मी पवई वरुनच जाणार.... परत येताना ठाणे... पवई हुन तर मला खुप जवळ आहे एल.बी.एस. वरुन....
मुग्धा, नाव तर नोंदव म्हणजे
मुग्धा, नाव तर नोंदव म्हणजे मॉरल रिस्पॉन्सिबिलीटी म्हणून तरी येशील.
मोकिमी, मला शनिवारी सुट्टी
मोकिमी, मला शनिवारी सुट्टी आहे नाहितर आलो असतो तुझ्याबरोबर


रच्याकने, हिरानंदानीहुन कैलाश कॉप्लेक्सवरून जवळच एलबीएस
हिरानंदानीहुन कैलाश
हिरानंदानीहुन कैलाश कॉप्लेक्सवरून जवळच एलबीएस>>>
हो रे !! कालच बी.के.सी ला एका मीटिंगला जाताना पाहुन ठेवला मॉल....
ओशिवर्याहून या मॉलला यायला
ओशिवर्याहून या मॉलला यायला कुठला रस्ता बरा पडेल लोकहो?
नी, इथे बघ. गुगलरावांनी
नी, इथे बघ. गुगलरावांनी डिरेक्शन्स दिल्या आहेत.
https://maps.google.co.in/maps?saddr=Millat+Nagar,+Milat+Nagar,+Andheri+...
डावीकडच्या खिडकीतील सजेस्टेड रूटस च्या खाली काही ऑप्शन्सही दिसत आहेत. ट्रॅफिकचा विचार करून ठरव.
दुसरा ऑप्शन - वेस्टर्न एक्सप्रेस हायवे - जास्त चांगला वाटतोय. पटकन येशील.
गुगलच्या बघितल्या. कलिना
गुगलच्या बघितल्या. कलिना कॅम्पसच्या इथून यायला सांगतायत.
जोगेश्वरीलाच वे इ हा पकडायचा.
जोगेश्वरीलाच वे इ हा पकडायचा. तेच करणारे. वाकोल्याला न वळता पुढच्या बाजूने वळेन. युनिव्हर्सिटीच्या ग्रॅण्ड हयातच्या बाजूच्या गेटच्या रस्त्याने.
थांकु थांकु दिशादर्शन
थांकु थांकु दिशादर्शन करता.
अभिषेक, स्वागतम... ये ये जीवनसहचारिणीबरोबर..
मुग्धा, नाव तर नोंदव म्हणजे मॉरल रिस्पॉन्सिबिलीटी म्हणून तरी येशील... मा>>मी
मामी, आणि वर्षुताई, आपके
मामी, आणि वर्षुताई, आपके खातिर.........!
Incase nahich jamale tar
Incase nahich jamale tar tangaroonchya yadit nav taknar nasal tar nav nondavu mhanate : Kay karave ha vichar karnari bahuli :
मोनलि येच गं म्हणजे टांगारू
मोनलि येच गं म्हणजे टांगारू ठरणार नाहीस.
धन्स मुग्धानंद.
अभिषेकनं नाव आत्ता नोंदवलं
अभिषेकनं नाव आत्ता नोंदवलं तरी सगळ्यात वरची जागा कशी काय पटकावली?

नाममहीमा मामी......
नाममहीमा मामी......
बाबु, तू तर काहीच बोलू नकोस.
बाबु, तू तर काहीच बोलू नकोस. येत का नाहीयेस?
१. मावसभावाचं लग्न आहे. २.
१. मावसभावाचं लग्न आहे.
२. त्यामुळे मी येउ शकत नाहीये.
१. मावसभावाचं लग्न आहे. २.
१. मावसभावाचं लग्न आहे.
२. त्यामुळे मी येउ शकत नाहीये.
>>>>> असं लिहिल्याने काही ही दोन वेगळी कारणं धरली जातील असं वाटलं की काय तुला?
मावसभावालाही घेऊन ये की!
मग तो आयुष्यभराकरता बाब्याशी
मग तो आयुष्यभराकरता बाब्याशी संबंध तोडेल अश्या ड्यांजर ठिकाणी नेतो म्हणून...
मामे, कुठल्या मिल /
मामे, कुठल्या मिल / इंडस्ट्रीयल इस्टेट च्या जागेवर झालेय हे ? ऐतिहासिक काळात काही ऑडीटं केली होती तिथे, मग जाणेच झाले नाही.
विमानातून, विमान उतरताना, एक
विमानातून, विमान उतरताना, एक भला मोठा मॉल दिसतो, पण तो नसावा हा !
तोच असणार. विमानतळापासून एवढा
तोच असणार. विमानतळापासून एवढा जवळ दुसरा नाही कुठला
बाबु... तू न्हाई भेटणारेस>>>
बाबु... तू न्हाई भेटणारेस>>> ??? च्च!!!
आल्यावर फोनशीलच की.....
आल्यावर फोनशीलच की.....
खरतर जमायला हवे होते..
खरतर जमायला हवे होते.. कामावरून १७ तारखेला मो़कळा होतोय पण त्यानंतर काही दिवस बाहेर असणार आहे त्यामूळे भेट हुकणार...
बराच मोठा आहे कि तो ! वर्षू,
बराच मोठा आहे कि तो !
वर्षू, जिवंत मासे घेऊन ये, तर बाबू धावत येईल !
आणि छत्रपतींवरची चिनी बखर, ( मूळ हस्तलिखित ) घेऊन ये, म्हणजे सेनापती, जातीने हजर होतील !
दिनेशदा....
दिनेशदा....
तसं झालं तर सेनापती
तसं झालं तर सेनापती घोड्यावरुनच येतील
Pages