वर्षू नील गटग - मुंबई. फिनिक्स मार्केटसिटी फूडहॉल, कुर्ला. शनिवार, २०/१०/१२, सायं ५ वाजता

Submitted by मामी on 14 September, 2012 - 02:26
ठिकाण/पत्ता: 
पार्ल्यात किंवा दादरात. कोणी आपल्याला उठवणार नाही असं धृवबाळासारखं अढळपद मिळवून देणारं कोणतंही ठिकाण /कॉफीशॉप. सुचनांचे स्वागतच स्वागत!

तर पटापट नाव नोंदणी करा!!!!

काय म्हणता? हे कशाबद्दल आहे तेच कळत नाहीये? काय हे! साधी चायनीज भाषा येऊ नये तुम्हाला? कसं होणार तुमचं?

बरं घ्या आता मराठीतून भाषांतर ....

आपली चायनीज वर्षु नील भारतात येतेय. तिला भेटण्यासाठी शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी किंवा रविवार, २१ ऑक्टोबरला सकाळी किंवा २१ ऑक्टोबरला संध्याकाळी असं गटग करायचं आहे.

त्याबद्दल आपापल्या नावाची नोंदणी करा. ठिकाण सुचवा आणि तारीखही कोणती ते सांगा.

जास्त मंडळींना सोईची तारीख ठरवण्यात येईल याची कृपया नोंद घ्या. कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल.

वर्षु नील गटग शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता फुड हॉल, फिनिक्स मार्कॅट सिटी, कुर्ला इथे आयोजित करण्यात येत आहे.

माहितीचा स्रोत: 
भारतीय हेरखाते
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 20, 2012 - 07:30 to 14:29
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, ते आत येऊ न देण्याचे जरा अतिच आहे.
आपल्यापैकी बहुतांश कोणी हायफाय दिसत नाही/ रहात नाही आणि बहुतेक सगळे सडेच येणारेत. तेव्हा हे असे प्रॉब्लेम आले तर काय?

बाकी कायद्याने अपराध वगैरे ती जागा काय म्हणून रजिस्टर्ड आहे यावर अवलंबून आहे. पण जनरली रेस्टॉरंटस, ऑडिटोरियम्स अश्या ठिकाणी असे कपड्यांवरून किंवा सिक्युरिटीच्या मनात आले म्हणून डिस्क्रिमिनेशन करता येत नाही.

अगं त्या एरीयाच्या आजूबाजूला बरीच झोपडपट्टी आहे, टपोरी पब्लिक खूप असतं, मॉलमध्ये येऊन इतरांना त्रास देण्याची वृत्ती, चोर्‍यांचे प्रसंग इ काही कारणांमुळे त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असण्याची शक्यता वाटते. मलाही पहिल्यांदा वाचून आणि मग ऐकून जरा धक्काच बसला.

गामा, मॉल ही सार्वजनिक जागा होऊ शकते का ते माहित नाही. कुर्ता पायजम्याला कोणी हरकत घेत नाहीये किंवा तुम्ही टक्सिडोच घालून गेलं पाहिजे असंही नाही. प्रेझेंटेबल असलं की झालं. मॉल खरंच हायएंड आहे त्यामुळे त्यांनी डेकोरम पाळावा अशी तजवीज केली असेल.

तेव्हा हे असे प्रॉब्लेम आले तर काय? >>>> आपण जाऊन त्यांना दरवाज्यावरून घेऊन येऊ. Proud

अगदी हवाईचप्पल घालून येऊ नका म्हणजे झालं. Happy

...

त्या मौल च्या साईट वर गेले .रिव्हू मध्ये एकानी लिहिलंय "स्पेशली हा मौल बघायला म्हणून मी आणि माझे तीन मित्र पुण्यावरून आलो. सकाळी जुहू वरच्या आमच्या हॉटेल वरून मौल वर पोचलो तर आम्हाला बाहेरच अडवण्यात आल . कारण काय दिल तर फक्त फ्यामिली वाल्यांनाच आम्ही एन्ट्री देतो. तो माणूस पुढे लिहितो " माझी अख्खी फ्यामिली यु एस ला राहते. केवळ या मौल मध्ये एन्ट्री मिळावी म्हणून मी माझ्या फ्यामिली ला यु एस मधून बोलावून घेऊ का?" Lol

मामी,

>> मॉल खरंच हायएंड आहे त्यामुळे त्यांनी डेकोरम पाळावा अशी तजवीज केली असेल.

मला एक (ऐकीव) घटना आठवली. मुळुंदच्या आरमाळात एकदा एक भुरटा चोर घुसला आणि त्याने काहीतरी चिल्लर वस्तू (ब्लेड?) चोरली. पण चोरी उघडकीस आली. मग त्याला सुरक्षावाल्यांनी धू धू धुतला. यात बिचार्‍याचा मृत्यू झाला. बहुतेक ताकद कमी असलेला गर्दुल्ला असावा. तलफ आल्याने चिल्लर वस्तू लांबवायची असावी!

हे सुवर्तमान कळल्यावर मनसेची लोकं धावून आली. लगेच खळ्ळ्ळ्ळ खट्याक्क्क्क सुरू झालं. आरमाळाचा सगळा थोबडा फुटून गेला. असला प्रकार टाळायचा असेल तर सुरवातीपासूनच खबरदारी घेण्याचं धोरण फिनिक्सवाल्यांनी राबवलेलं दिसतंय! Happy

आ.न.,
-गा.पै.

हे मॉल सुरू होऊन तसे बरेच दिवस झाले ना? जर खरोखरीच्या डिस्क्रिमिनेशनच्या घटना झाल्या असत्या तर कुठल्या तरी राजकीय पक्षाने आपले अस्तित्व दाखवायला का होईना काहीतरी केलेच असते.

Yaayala aavdel.. Pan 50-50 aahe. Ek training aadav jaatay.
Naav nondani keli aahe. Kurla stn varun yenaar kuni aahe ka?? Mi parel varun yenaar.

अगदी flipflops घालुन गेलोय त्या मॉल मधे सुरूवातीला तेव्हा कुणी नव्हते अडवले. >>> नंतर पॉलिसी बदलली असेल. आणि एकंदर परसनॅलिटी मॅटर्स! Happy

चांगली हेप मुलं मुली पण हवाई चप्पल ( प्लीजच बाटा डोळ्यासमोर नका आणु, छान कलरफुल आणि फॅन्सी हवाई चप्पल पण मिळतात) घालुन सर्रास फिरतात. खरं तर शॉर्ट्स, टी आणि हवाई चप्पल हा शॉपिंगसाठी आयडियल आणि मोस्ट कंफर्टेबल ड्रेस आहे. Happy (ट्रायल्सच्या वेळेला कितीही वेळा काढायला लागलं तरी कंटाळा येत नाही. )

अरे त्या दिवसापुरते सगळे मामीचे भाचा / भाची ना ? ऑल इन द फॅमिली Happy

गेटवर अडकवलेल्या प्रत्येकाला सोडवायला मामी जातेय, हा माझाच भाचा सोडा याला / ही माझीच भाची सोडा हिला... असे सांगत फेर्‍या मारतेय.. आणि बाहेर विद्या ( बालनाची ) मला जौ द्या, म्हणत ड्यान्स करतेय.. कल्पनाच किती मस्त आहे ना !

गटग किती वाजेपर्यन्त असेल.... ६ पर्यन्त पोहोचणे कठीण वाटतय्....उशिर झाला तर चालेल का?
>>>>>>>>>>>

मी देखील हेच विचारायला आलो होतो.. लेट झाला तर फोन करावा लागणार.. म्हणजे निदान वर्षूदी तरी थांबून राहील.. बाकीचे काय कधीही भेटतील पण नंतर परत तिला भेटायला म्हणून चायनाला कोण जाणार.. Sad

अभिषेक, निदान ७.३० पर्यंत तरी मंडळी असतील. त्यानंतर प्रत्येकाला किती वाजता घरी परतण्याची धमकी मिळाली आहे त्यावर अवलंबून.

मामी,
बायकांनाही धमकी????

बाकी मी अश्या धमकीपासून वाचायला धमकीखोरालाच बरोबर घेऊन फिरतो.. Proud

Pages