Submitted by मामी on 14 September, 2012 - 02:26
ठिकाण/पत्ता:
पार्ल्यात किंवा दादरात. कोणी आपल्याला उठवणार नाही असं धृवबाळासारखं अढळपद मिळवून देणारं कोणतंही ठिकाण /कॉफीशॉप. सुचनांचे स्वागतच स्वागत!
तर पटापट नाव नोंदणी करा!!!!
काय म्हणता? हे कशाबद्दल आहे तेच कळत नाहीये? काय हे! साधी चायनीज भाषा येऊ नये तुम्हाला? कसं होणार तुमचं?
बरं घ्या आता मराठीतून भाषांतर ....
आपली चायनीज वर्षु नील भारतात येतेय. तिला भेटण्यासाठी शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी किंवा रविवार, २१ ऑक्टोबरला सकाळी किंवा २१ ऑक्टोबरला संध्याकाळी असं गटग करायचं आहे.
त्याबद्दल आपापल्या नावाची नोंदणी करा. ठिकाण सुचवा आणि तारीखही कोणती ते सांगा.
जास्त मंडळींना सोईची तारीख ठरवण्यात येईल याची कृपया नोंद घ्या. कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल.
वर्षु नील गटग शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता फुड हॉल, फिनिक्स मार्कॅट सिटी, कुर्ला इथे आयोजित करण्यात येत आहे.
माहितीचा स्रोत:
भारतीय हेरखाते
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, October 20, 2012 - 07:30 to 14:29
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अम्या... आता तोच पर्याय
अम्या... आता तोच पर्याय उरलाय.
गाडी विकली..
पेट्रोल परवडत नाय... 
कुर्ला स्टेशनवरुन कसं जायचं
कुर्ला स्टेशनवरुन कसं जायचं या मॉलला? मी कदाचित वांद्र्यावरुन ऑटोने येईन. कुर्ला स्टेशनपर्यंतचा रस्ता माहित आहे. ठाण्याहून आले तर गँग असेलच बरोबर. ठाण्याला घरी जाताना गँगसोबत जाणार.
दिनेश दा बाबु साठी जिवंत
दिनेश दा

बाबु साठी जिवंत मासे.. ह्म्म्म.. इन एक्स्चेंज ऑफ इमू साते
दिनेश्,सेना.. आपको बहुत मिस करेंगे!!!!
मला खूप यायचं आहे पण २० ला
मला खूप यायचं आहे पण २० ला पूर्ण दिवसाची मीटिंग ठेवल्या गेली आहे. त्यामुळे काय होईल माहीत नाही. पण शुभेच्छा. थोरल्या अश्विनीताई एनारेत का?
आणि छत्रपतींवरची चिनी बखर, (
आणि छत्रपतींवरची चिनी बखर, ( मूळ हस्तलिखित ) घेऊन ये, म्हणजे सेनापती, जातीने हजर होतील !>>>>
केश्वे आज फोनते तुला.
कुठल्या मिल / इंडस्ट्रीयल
कुठल्या मिल / इंडस्ट्रीयल इस्टेट च्या जागेवर झालेय हे ? >> दिनेशदा... मुकुंद कं.च्या जागेवर उभारलाय तो फिनिक्स मॉल.
कुर्ला स्टेशनवर उतरल्यावर
कुर्ला स्टेशनवर उतरल्यावर पश्चिमेला बाहेर पडा आणि तिथुन रिक्षावाल्याला 'कमानी'ला जायचे आहे असे सांगा.
मला जमल्यास येईन. पण नक्की नसल्याने नाव नोंदवत नाही.
मल हि येत येल ह तिथे
मल हि येत येल ह तिथे
जमवण्याचा नक्की प्रयत्न
जमवण्याचा नक्की प्रयत्न करेन
पण फिनिक्स लाच जाणार आहात तर आमच्या गरीबाच्या गॉसिप ला नक्की भेट द्या
पण फिनिक्स लाच जाणार आहात तर
पण फिनिक्स लाच जाणार आहात तर आमच्या गरीबाच्या गॉसिप ला नक्की भेट द्या>>>
अरे हां तुम्ही डिझाइन केलेलं स्टोर तिकडेच आहे ना? झकास होते त्याचे फोटो. नक्की जाईन
१. मावसभावाचं लग्न आहे. २.
१. मावसभावाचं लग्न आहे.
२. त्यामुळे मी येउ शकत नाहीये.>>> तुम्ही सगळे बागुलबुवाच्या मावसभावाच्या लग्नातच गटग का करत नाही?
प्रसन्न अ, मी जाऊन आले तिथे.
प्रसन्न अ, मी जाऊन आले तिथे. खूपच मस्त दिसतं ते स्टोअर.
मल हि येत येल ह तिथे >>>
मल हि येत येल ह तिथे >>> नक्की या.
अमी, थँक्स मी वांद्र्याहून
अमी, थँक्स
मी वांद्र्याहून येणार असेन तर तुला फोन करेन, मग तू येणार असशील तर कुर्ल्याला तुला घेईन आणि पुढे जाऊ.
अजून कोण कोण येणारे? पटापट
अजून कोण कोण येणारे? पटापट नावं नोंदवा बरं!
मी येणार आहे. तुम्हा
मी येणार आहे. तुम्हा सर्वांंना भेटायच आहे. नवर्याला घेउन आले तर चालेल का? त्याच नक्की नाहीये, मी मात्र नक्की येणार.
ऑर्किड, नवराही चालतोय की!
ऑर्किड, नवराही चालतोय की!
गटगला जाउन आलेल्यानी तीथले
गटगला जाउन आलेल्यानी तीथले snow world कसे आहे त्याचा रिपोर्ट द्या प्लीज.
गटग व्हायचंय. स्नो वर्ल्ड काय
गटग व्हायचंय. स्नो वर्ल्ड काय आहे?
मी फोनद्वारे
मी फोनद्वारे गटगणार.
+९१८७९६३७७४२६
Kiran झणझणीत
सध्या- भटिंडा, पंजाब
स्नो वर्ल्ड फोनिक्स ला चालु
स्नो वर्ल्ड फोनिक्स ला चालु झालेले नविन स्नो Amusement Park आहे . तीन /चार महिन्यांमागे चालु झालेय , छोटि आईस रिंक, इग्लु, आर्टीफिशिअल स्नो आहे आणि काही स्नो स्लाईड आहेत असे ऐकलेय.
ह्म्म अरे पण गटगमधे हे
ह्म्म अरे पण गटगमधे हे करायला वेळ कुठे मिळणारे..
शाब्बास किरण! कोणाला फोन
शाब्बास किरण!
कोणाला फोन करणार आहेस?
पाटिल, स्नोवर्ल्ड चांगलं आहे
पाटिल, स्नोवर्ल्ड चांगलं आहे असं ऐकून आहे. तुम्ही स्वतः येऊन खात्री करून घ्या की शनिवारी.
मामी वर्षुतैच्या फोनवर . त्या
मामी
वर्षुतैच्या फोनवर . त्या दिवशी शक्य झाल्यास टपकेनच आयत्या वेळी. माझा अवतार पाहून द्वारपाल आत सोडेल हे बघा कुणीतरी
अरे हो, बरं झालं हे बोललास.
अरे हो, बरं झालं हे बोललास. फिनिक्स मार्केटसिटी हा फॅमिली मॉल आहे आणि त्यामध्ये सर्व हायएंड ब्रॅन्डसची दुकानं आहेत. त्यामुळे त्यांना पसंत पडणार नाही अशा वेषात आल्यास दरवाज्यावरूनच परत पाठवतात.
इथे वरून चौथा रीव्हू वाचा. http://mumbai.burrp.com/listing/phoenix-market-city_kurla-west_mumbai_sh...
हा रिव्हू वाचून मी फिनिक्सच्या ऑफिसात फोन केला आणि हे काय प्रकरण आहे हे विचारलं. त्यावर तिथल्या बाईनं सांगितलं की अगदीच टपोरी लोकांना या मॉलात प्रवेश करण्यावर बंदी घालतात. साधारण वेशभुषा आणि एकंदर अवतार पाहूनच आत सोडतात.
म्हणजे एकंदर अवघडच प्रकरण आहे
म्हणजे एकंदर अवघडच प्रकरण आहे तर. येताना पिवळी पँट, लाल शर्ट आणि गळ्यात रूमाल बांधून द्वारपालाशी हुज्जत घालत असलेल्या व्यक्तीला हाय म्हणालात तर मी देखील हाय बॅक करीन
म्हणजे एकंदर अवघडच प्रकरण आहे
म्हणजे एकंदर अवघडच प्रकरण आहे तर. येताना पिवळी पँट, लाल शर्ट आणि गळ्यात रूमाल बांधून द्वारपालाशी हुज्जत घालत असलेल्या व्यक्तीला हाय म्हणालात तर मी देखील हाय बॅक करीन >>>>>
किरण व्यवस्थित वेषात आलास तर खूप छान. भेटायचंय तुला.
ओह ! म्हणजे हा व्यवस्थित वेष
ओह ! म्हणजे हा व्यवस्थित वेष नाही तर
जमवतो.
मामी, माझ्या माहितीप्रमाणे
मामी,
माझ्या माहितीप्रमाणे कुडता पायजमा हा भारताचा राष्ट्रीय वेष आहे. हा स्वच्छ वेष परिधान करून जर एखाद्याला सार्वजनिक वावराच्या ठिकाणी प्रवेश मिळत नसेल तर तो कायद्याने अपराध होऊ शकतो.
आ. न.,
-गा.पै.
Pages