वर्षू नील गटग - मुंबई. फिनिक्स मार्केटसिटी फूडहॉल, कुर्ला. शनिवार, २०/१०/१२, सायं ५ वाजता

Submitted by मामी on 14 September, 2012 - 02:26
ठिकाण/पत्ता: 
पार्ल्यात किंवा दादरात. कोणी आपल्याला उठवणार नाही असं धृवबाळासारखं अढळपद मिळवून देणारं कोणतंही ठिकाण /कॉफीशॉप. सुचनांचे स्वागतच स्वागत!

तर पटापट नाव नोंदणी करा!!!!

काय म्हणता? हे कशाबद्दल आहे तेच कळत नाहीये? काय हे! साधी चायनीज भाषा येऊ नये तुम्हाला? कसं होणार तुमचं?

बरं घ्या आता मराठीतून भाषांतर ....

आपली चायनीज वर्षु नील भारतात येतेय. तिला भेटण्यासाठी शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी किंवा रविवार, २१ ऑक्टोबरला सकाळी किंवा २१ ऑक्टोबरला संध्याकाळी असं गटग करायचं आहे.

त्याबद्दल आपापल्या नावाची नोंदणी करा. ठिकाण सुचवा आणि तारीखही कोणती ते सांगा.

जास्त मंडळींना सोईची तारीख ठरवण्यात येईल याची कृपया नोंद घ्या. कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल.

वर्षु नील गटग शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता फुड हॉल, फिनिक्स मार्कॅट सिटी, कुर्ला इथे आयोजित करण्यात येत आहे.

माहितीचा स्रोत: 
भारतीय हेरखाते
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 20, 2012 - 07:30 to 14:29
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाहीतर पवईला या Saffron Spice>>

जोरदार अनुमोदन.... पवईला कुठल्याही हॉटेल मधे व्यवस्था करायची असेल तर मला सांगणे... बहुतेक हॉटेल्स मी जिथे काम करते त्यांचे भाडेकरु आहेत... त्या मुळे कालजी नसणे...

फक्त Saffron Spice मधे स्नॅक्स... जरा प्रॉब्लेम होईल ... पण बाकी पापा जोन्स, सी.सी.डी, चील्लीज, .. रेड ऑलिव्ज तर कधीही... तिकडचं फूड मस्तच आहे... स्नॅक्स पण आहेत.

अरे यार! वर्षूताईला काय सोयिस्कर आहे ते बघुया.>>

ते तर कधीही... पहिला प्रेफरन्स उत्सव मुर्तिला.... वर्षु ताई सस्पेन्स फोड... बोल तुझे किधर जाना है....

पण गटगला जेवत कोण बसणार?>>> Uhoh खाण्यापिण्याजेवणाशिवाय का गटग करायचंय??? बरं बरं!!

२० ऑक्टोबरला संध्याकाळी गटग असेल तर मला कदाचित जमू शकेल. २१ ऑक्टोबरला कोणत्याही वेळी मी नाही येऊ शकणार.

सेंट्रल माटुंग्याच्या महेश्वरी सर्कलला न्युयॉर्कर आहे. तिथे वरचा मजला आपल्या ताब्यात घेता येईल. या आठवड्यात जाऊन रेकी करून येते.

कुर्ल्याला एलबीएस रोडवर नविनच झालेल्या फिनिक्स मार्केटसिटीमध्येही त्यांच्या फुडहॉलमध्ये भेटू शकतो. हे सर्वांना अगदी मध्यवर्ती पडेल. वांद्रे आणि इतर पश्चिम उपनगरवाले बीकेसीतून पटकन येऊ शकतात. मध्यरेल्वेवरील मंडळी घाटकोपर किंवा कुर्ल्याहून पोहचू शकतात. ठाणे-मुलुंड वाल्यांनाही एलबीएसरोडवरून कार / बस / रीक्षाने एकदम सोईचे. त्यांचा फुडहॉलही भलामोठा आहे. तिथे अनेकानेक खरेदीची आकर्षक आकर्षणं आहेत. त्यामुळे त्या दिवशी सगळेजण आवर्जून खखाव्रत धरतील. Proud

मामी, तू स्वतःची नाव नोंदणी केलीच नाहियेस अजून. कर आधी!!

जे कुठलं ठिकाण ठरवाल ते स्पेशियस असूदे.

हायला! हो की ! मीपेंगुळल्याअवस्थेतपाहिलंबहुतेक.

हाहाहा... मामी.. रेकी करून ये बाई या जागेची... बुकच करून टाक कशी..
एकदा जागा आणी वेळ फिक्स झाली की सर्वांना सोप्पं पडेल त्या दृष्टीने विचार करायला
मेरेको ये जगा बेष्ट लग रही है ...
@ मंजूडी,' दिलतक पहुँचने का रास्ता पेट से जाता है' या नियमाप्रमाणे 'खाण्यापिण्याजेवणा शिवाय गटग? नो वे!! Proud

तारीख आणि वेळ ठरवा कि लवकर. मी पुण्याशी गद्दारी करुन मुंबईला येते आहे. २१ संध्याकाळ असेल तर फारच छान होइल. २२ ला सकाळी माझी जुहुला मिटींग आहे. तेवढेच २० ला पुण्याला जावुन २२ ला परत यायचे कष्ट वाचतील.

मात्र २० तारीखच असेल तर, प्लीज फार उशीर नको. पुण्याहुन येणार्‍या लोकांना परत जायला उशीर होइल. Happy

देवा देवा, प्लीजच पुण्याच्या लोकांना या धाग्यावरच्या पोस्टस वाचायची बुद्धी न होइल असं बघ. Proud

ओके मंडळी.

रेकी करून आले. महेश्वरी उद्यानातल्या न्युयॉर्करच्या जागी आता ओन्ली पराठा आलं आहे. पण ते सकाळी बरेच उशीरा - बारा वाजता - उघडतात. आणि खालती जागा असेल तर वर पाठवत नाहीत इ. इ.

त्यामुळे सर्व दृष्टीने विचार करता, गटग शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता फुड हॉल, फिनिक्स मार्कॅट सिटी, कुर्ला इथे आयोजित करण्यात येत आहे.

२० तारेख शनीवार आणि तेही ५ वाजता एकदम मस्तच... मला एकदम चालेल. माझं ऑफिस ४ पर्यंत असतं... एकदम सुटेबल. मी पवई वरुन येणार... जाताना ठाण्याला जाणार.... कोणाला लिफ्ट हवी तर सांगा..... विपु करा....

परत फुड कोर्ट असल्याने कितीही जण कितीही वेळ बसले तरी नो प्रॉब्लेम...

फक्त हे एल.बी.एस. वर सायन कडे तोंड केल्यास , कामरान च्या पुढे आहे का? की आधी?

दिनेश दा.. लगेच निघून या बरं लौकर.... आणी सरप्राईज द्या सर्वांना Happy
मामी.. मी हॅपी.. Happy फूड्कोर्टात आपला गोंधळ खपवून ही घेतला जाईल Wink

वर्षू, एखादी चायनीज डिश मागवा आणि त्यात अमूक तमूक जिवंत प्राणी / किटक कसा नाही, ओरिजीनल मधे असतोच असतो, अलिबागहून आलोय कि काय .... असा (कँटोनीजमधून) गोंधळ घाला... सगळे बिल माफ करतील Wink

मंजूडी.. मोस्ट वेलकम.. Happy
दिनेश दा Lol त्यांनी खरंच हे मनावर घेतलं आणी मला, मी चायनामधून आलेय ते सिद्ध करायला सांगितलं तर???????????

वर्षू विहार साठी नावनोंदणी केली आहे. Happy

अर्थात इथेही सहकुटुंबच,
आता याला बायकोशिवाय मी कुठे जात नाही म्हणा किंवा ती मला एकट्याला कुठे सोडत नाही म्हणा.. Proud

Pages