वर्षू नील गटग - मुंबई. फिनिक्स मार्केटसिटी फूडहॉल, कुर्ला. शनिवार, २०/१०/१२, सायं ५ वाजता

Submitted by मामी on 14 September, 2012 - 02:26
ठिकाण/पत्ता: 
पार्ल्यात किंवा दादरात. कोणी आपल्याला उठवणार नाही असं धृवबाळासारखं अढळपद मिळवून देणारं कोणतंही ठिकाण /कॉफीशॉप. सुचनांचे स्वागतच स्वागत!

तर पटापट नाव नोंदणी करा!!!!

काय म्हणता? हे कशाबद्दल आहे तेच कळत नाहीये? काय हे! साधी चायनीज भाषा येऊ नये तुम्हाला? कसं होणार तुमचं?

बरं घ्या आता मराठीतून भाषांतर ....

आपली चायनीज वर्षु नील भारतात येतेय. तिला भेटण्यासाठी शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी किंवा रविवार, २१ ऑक्टोबरला सकाळी किंवा २१ ऑक्टोबरला संध्याकाळी असं गटग करायचं आहे.

त्याबद्दल आपापल्या नावाची नोंदणी करा. ठिकाण सुचवा आणि तारीखही कोणती ते सांगा.

जास्त मंडळींना सोईची तारीख ठरवण्यात येईल याची कृपया नोंद घ्या. कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल.

वर्षु नील गटग शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता फुड हॉल, फिनिक्स मार्कॅट सिटी, कुर्ला इथे आयोजित करण्यात येत आहे.

माहितीचा स्रोत: 
भारतीय हेरखाते
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 20, 2012 - 07:30 to 14:29
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवा... सगळ्यान्चे वृत्तान्त वाचून हसून हसून कोलमडलेय...
मोकिमी, केश्विनी, नी ,मोनालिप.... Rofl
मामी.. थाम्ब..चायनीज मधे भान्डायचा कल्लासच काढते कसा ऑनलाईन.. Wink
दिनेश दा... आता हॉन्गकॉन्ग ला मिनी गटग करू डिसेम्बर ला.. हाकानाका!!!!
ऑर्किड... Happy
गोळे काकान्ची कविता एक्दम खासमखास्स्स!!!! Happy
जिप्स्याने अपनी तारीफ वाच्ली नाहीये वाट्ट अज्जून???
. योरॉक्स पण टान्गारून्च्या यादीत आहे..

मी पण पहिल्यांदी निधपचा प्रोफाईल पिक्चर बघून आले Lol
मोकिमी मस्त वृतांत . चायनीज चकल्या /बिस्कीट Happy

नी आत्ता सगळे जण तुझा प्रोफाईल बघतील बघ . आणि याच सगळ... श्रेय जात..... मोकिमी कडे . Lol

आत्ता सगळे जण तुझा प्रोफाईल बघतील बघ <<<
म्हणूनच म्हणलं सगळ्यांनी बघून सव्वादोन सुतं झिजलं असेल माझं प्रोफाइल Wink

टांगारू : तुमचा अभिषेक, कविन, मंजूडी, Reema, भुंगा, manee >
>>>>>

सॉरी लोक्स.. सॉरी वर्षूताई.......
नेमकं त्या दिवशी कोणतीही पूर्वकल्पना न देता फॅक्टरीत मशिनरी आली आणि माझी धावपळ झाली. फॅक्टरीतच १० वाजले रात्रीचे........ मामीचा फोन आला तेंव्हा लक्षात आलं की आपण येऊ शकत नाही हे कळवायचं राहून गेलं........ बेटर लक नेक्स्ट टाईम. Sad

"तुमचा अभिषेक" टांगारूंमध्ये आहे हे पाहून अतीव आनंद झालेला आहे, तो एकदा त्याला भेटून "टांगारू गटग" करून साजरा करणार आहे..........!!!

आता पुण्यातल्या गटगला जायला मिळतेय का ते पाहूया.

वृ भारी आहेत............ सर्व "नेहमीप्रमाणे" भेटलेल्या "साधासरळ, क्यूट आणि इतर" Proud मेंबरांचे आभार.
इतरही कोणाकोणाला काही विशेषणे लावली असल्यास कळविणेचे करावे Wink

स्वॉरी लोक्सांनो Happy
सध्या चिक्कार बिझी असल्याने वेळेत फोटो धाडता आले नाही पण उद्यापर्यंत नक्कीच पोचते करतो, प्रॉमिस!!! Happy

सगळ्यांचे वृतांत मस्तच Happy

बाबूगेनु Rofl

अगं त्याच्या लिखाणातुन एक खोडकर मुलगा दिसतो. तो त्या दिवशी आला नव्हता बहुतेक !!!!!>>>>मोकीमी, त्या मॉलमध्ये खोडकर मुलांना एन्ट्री नसल्याने त्याला घरीच सोडुन आलो होतो. Wink

कृपया मला संपर्कातुन ईमेल आयडी पाठवा. Happy
रेन फॉरेस्टच्या आतील फोटो खास आले नाहीत Happy बाहेरचे फोटो चांगलेत पण सगळी पब्लिक नाही आहेत त्यात. Happy

मोनाली, गिरगावकरांचा मिनी वृत्तांत मंदार मादुस्करांनी लिहावा आणि डोंबोलीकरांचा मोनाली मादुस्करांनी. तू तुझ्या चुलत सासर्‍यांना सांगितलंस का की तुमच्या कारखान्याच्या समोरच्या चाळीतली एक छोटीशी मुलगी रोज शाळेतून आली की गॅलरीत फतकल मारुन गणपती बनवण्याच्या सगळ्या स्टेप्स मन लावून तासनतास तहान भूक विसरुन बघत बसे? हे तिने खूप मोठी होउन आता तुला सांगितलंय ते? Proud :नॉस्टॅल्जिकः

केश्वे Happy अग दोन्ही मिनी गटगच्या वेळी मी नामानिराळी होते पण.

त्यांना (चुलत सासर्‍यांना) माहिती नसणार. त्यावेळी बहुदा माझे सा.बु. व त्यांचे बाबा हे सर्व करायचे. एकदा घरी ये म्हणजे तुला त्यांना भेटता येईल. अजुन नॉस्टॅल्जिक होशील मग Happy

जिप्सी, वर्षूदीचा फोटो मस्तचे. (तुझा मेल बॉक्स चेक कर)

Such a charming face n amazing personality! + १००

Such a charming face n amazing personality! >>>> + १००००००००००००

कसला क्युट फोटो आलाय. धन्यवाद जिप्सी. Happy

क्युट आहे वर्षूतै.. निखळ हास्य आहे वरील फोटोत. Happy मी सुध्दा या जीवनात कधी ना कधी तरी ग्टग ला यायचा प्रयत्न करेन.

नुकताच नागपूरला गेलेलो होतो. तिथला मूनलाईट स्टुडिओ सहजच दृष्टीस पडला.

पूर्वी त्याचे घोषवाक्य असे होते की
"इफ यू आर ब्युटिफूल, वुई विल कॅच युअर ब्युटी. इफ यू आर नॉट, वुई विल मेक यू ब्युटिफूल"

इथे तर वर्षू आणि जिप्सी असा समसमा संयोग झाल्याने प्रकाशचित्राचे दर्शन अवर्णनीय साधले आहे.
आवडले.

वर्षुतै प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे... पोष्टीतून वाटलं तसंच एकदम >>>>>>>>>> अगदी १००% खर, मी अजुन वर्षुतै कधीच नाही भेटले पण मनात जशी त्याच्याविषयी जशी प्रतिमा होती अगदी तश्याच आहेत त्या Happy

जिप्स्याचा कॅमेरा म्हटल्यावर प्रश्नच नाही !.......... हो रे किरण्या... ऑल१००% क्रेडिट गोज टू जिप्सी!!!!!

नरेंद्रकाका.. जिप्स्याला आणी त्याच्या कॅमेर्‍याला आधीच धन्यवाद दिलेत मी Lol

Pages