प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:20

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

Zabbu_Day_09.jpg
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG_3155.jpg

बापरे. मस्त एकसो एक फोटो आहेत.
साडेसहाशे पोस्ट. बघुन कधी होणार आणि मी टाकणार केव्हा!!
बघायला सुरु केलेय.

मात्र पान नं. २० वर स्मितू या आयडीने पोस्ट केलेला हा फोटो त्यांचा नाही असे वाटते. नेटवर हा फोटो अनेक ठिकाणी आहे. मुळात तो नैनीतालचा सिनही वाटत नाहीये.
पोस्ट - स्मितू | 20 September, 2012 - 16:43
बारकाईने पाहिल्यास खाली दुसर्‍या साईटचे अर्धे नाव आहे.

स्मितू यांचा हा फोटोही त्यांचा नाही.

jaswanda.jpg

पाठमोरी .....

अरे थंड पडले बहुतेक लोकं

सशलने पोस्टलेल्या तिच्या 'इकडच्या स्वारीच्या' फोटोंवरून प्रेरणा घेऊन.

नंद्या मस्तच ..

ग्रँड प्रिझ्मॅटीक स्प्रिंग, यलोस्टोन नॅशनल पार्क

Prism.jpg

Happy back to sea.

Somewhere on the californian coast

व्वॉव!!!! भार्रीच!!!

२ दिवस घरी बाप्पा असल्यामुळे इथे यायला वेळ झाला नव्हता आज बघितलं तर २३ पानं!!!!!

एक से एक फोटो आहेत सर्वांचे...

सेना, जिप्सी, शांग, 'सशल चे पाव्हणे' यांनी टाकलेले फोटो तर जबरदस्त!!!!!

बाप्पा मोरया!!! Happy

_MG_2140.JPG

स्टारफिश - सिडनी अक्वेरियम

Pages