प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:20

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

Zabbu_Day_09.jpg
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG_2603.JPG

Colors.jpg

DSC_0095_RS.jpg

Natures Canvas...

2012-07-023.jpg

rainbow1.jpg

IMG_2174_RS.jpg

वा मस्त आहेत सगळेच फोटो !
बिल्वा इंद्रधनुष्य सही ! ट्युलिप्स पण छान आहे. झकासराव कास सही !

IMG_7667.JPG

’इंद्रवलय’ : सूर्याभोवती उमटलेलं सप्तरंगी वर्तुळ, जे मला २८-९-२०१० रोजी सकाळी ११-१५/११-३० च्या सुमारास बोरिवली-मुंबई इथे दिसलं होतं. मी घराबाहेर (रस्त्यात) असल्याने फक्त मोबाईलच्या सहाय्याने फोटो घेऊ शकलो. त्यामुळे फोटो-क्वालिटी तितकीशी चांगली नाही. रस्त्यावर वर्दळ असल्याने पूर्ण वर्तुळाचा फोटो घेणं शक्य झालं नाही. माझ्या सुदैवाने असं ’इंद्रवलय’ दिसण्याची आयुष्यातली ती चौथी वेळ. त्याआधी दादर-मुंबई, केळवे-पालघर आणि काश्मिर इथे हे विलोभनीय दृष्य दिसण्याचं भाग्य लाभलं होतं.

Indrawalay2.jpgIndrawalay3.jpg

DSC_0105_RS.jpg

ही देखील निसर्गाचीच रंगपंचमी.
पट्टेरी वाघ. कात्रज मधील. बिचार्‍याचा ह्याच सौंदर्यामुळे जीव धोक्यात आहे.

vaghoba

Pages