टी२० विश्वचषक स्पर्धा २०१२

Submitted by उदयन.. on 14 August, 2012 - 04:30

ह्या वर्षी श्रीलंकेमधे होणार्‍या टी२० विश्वचषक स्पर्धेबद्दल हा धागा....
.
t20.jpg
.
१८ सप्टेंबर पासुन चालु होणार्‍या स्पर्धेत यावेळी १२ संघाचा समावेश आहे. त्यांची ४ गटात विभागणी केली आहे.
.
(अ) गट : England-Cricket-team-logo.jpg इंग्लंड , India-Cricket-team-logo.jpg भारत, Afghanistan-Cricket-team-logo.jpg अफगाणीस्तान
.
(ब) गट : Australia-Cricket-team-logo.jpg ऑस्ट्रेलिया, West-Indies-Cricket-team-logo.jpg वेस्ट इंडिज, Ireland-Cricket-team-logo.jpg आयर्लंड
.
(क) गट : shrilanka.jpg श्रीलंका, South-Africa-Cricket-team-logo.jpg दक्षिण आफ्रिका, Zimbabwe.jpg झिंबांब्वे
.
(ड) गट : Pakistan-Cricket-team-logo.jpg पाकिस्तान, New Zealand-Cricket-team-logo.jpg न्युझिलंड, Bangladesh-Cricket-team-logo.jpg बांग्लादेश

.
सुपर ८ मधे जाणारे संघ
.
गट १ : अ१ , ब२, क१, ड२
गट २ : अ२, ब१, क२, ड१
.
वेळापत्रक :

१८ सप्टें. .................. गट क : १ ली मॅच : श्रीलंका / झिंबांव्बे......:.. हंबाटा.= श्रीलंका
१९ सप्टें. .................. गट ब : २ री मॅच : ऑस्ट्रेलिया / आयर्लंड....:..कोलंबो = ऑस्ट्रेलिया
१९ सप्टें. .................. गट अ : ३ री मॅच : भारत / अफगाणिस्तान..:.कोलंबो = भारत
२० सप्टें .................. गट क : ४ थी मॅच : द आफ्रिका / झिंबांव्बे....: हंबाटा = द. आफ्रिका
२१ सप्टें ................... गट ड : ५ वी मॅच : न्युझिलंड / बांग्लादेश..: कँडी = न्युझिलंड
२१ सप्टें ................... गट अ : ६ वी मॅच : इंग्लंड / अफगाणिस्तान..: कोलंबो = इंग्लंड
२२ सप्टें ................... गट क : ७ वी मॅच : श्रीलंका / द आफ्रीका ......: हंबाटा = द आफ्रिका
२२ सप्टें .................... गट ब : ८ वी मॅच : ऑस्ट्रेलिया / वेस्ट इंडीज .: कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२३ सप्टें .................... गट ड : ९ वी मॅच : न्युझीलंड / पाकिस्तान ....: कँडी = पाकिस्तान
२३ सप्टें .................... गट अ : १०वी मॅच : भारत / इंग्लंड ...........: कोलंबो = भारत
२४ सप्टें .................... गट ब : ११वी मॅच : वेस्ट इंडीज / आयर्लंड.......: कोलंबो = वे. इंडीज
२५ सप्टें .................... गट ड : १२वी मॅच : बांग्लादेश / पाकिस्तान.....: कँडी = पाकिस्तान
.
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १३वी मॅच : श्रीलंका / न्युझीलंड : कँडी =श्रीलंका
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १४वी मॅच : इंग्लंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १५वी मॅच :पाकिस्तान / द आफ्रिका : कोलंबो = पाकिस्तान
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १६वी मॅच : भारत / ऑस्ट्रेलिया : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १७वी मॅच : इंग्लंड / न्युझिलंड : कँडी = इंग्लंड
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १८वी मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज : कँडी = श्रीलंका
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : १९वी मॅच : ऑस्ट्रेलिया / द आफ्रिका : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : २०वी मॅच : भारत / पाकिस्तान : कोलंबो = भारत
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २१वी मॅच : न्युझीलंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २२वी मॅच : श्रीलंका / इंग्लंड : कँडी = श्रीलंका
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २३वी मॅच : ऑस्ट्रेलिया / पाकिस्तान : कोलंबो = पाकिस्तान
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २४वी मॅच : भारत / द आफ्रिका : कोलंबो = भारत Sad
.
०४ ऑक्टो ................. १ ली सेमीफायनल मॅच : श्रीलंका / पाकिस्तान : कोलंबो = श्रीलंका Lol
०५ ऑक्टो ................. २ री सेमीफायनल मॅच : वेस्ट इंडीज / ऑस्ट्रेलिया : कोलंबो
= वे. इंडीज Lol

०७ ऑक्टो ................. फायनल टी २० मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज: कोलंबो = वे. इंडीज
.
.
चला आपापली मते येउ द्यात..:)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'वे. इंडीज क्रिकेटच्या पूर्वीच्या सुवर्णयुगाकडे जाण्याच्या दिशेने हे पहिलं पाऊल ठरावं' अशा आशयाच्या भावना सॅमीने चषक स्विकारताना उत्कटपणे व्यक्त केल्या. असेच शब्द आपल्या हॉकीच्या कर्णधाराच्या तोंडून ऐकायला अगणित भारतिय कान कित्येक दशकं आसुसलेले आहेत ! वे. इंडीजमधे या विजयाचं महत्व काय असेल हें त्यावरून लक्षात येतं !

<< RSA पेक्षा लंकनला chokers tag नीट बसेल असे म्हणायला हवे. ४ फायनल्स आणी nothing to show back>> जेत्यांचं कौतुक अत्यावश्यक आहे पण वारंवार फायनलपर्यंत धडक मारुनही तिथं हरणार्‍याना कांहीसं हेटाळणीपूर्वक 'चोकर्स' म्हणण्यापेक्षां त्याना 'जिद्दीचे लढवय्ये' म्हणून कौतुक करणं अधिक उचित नाही का ? Why this 'pamper the winner, hate the loser', even in sports !

Why this 'pamper the winner, hate the loser', even in sports ! >>?दोन चूकीच्या गोष्टींची सांगड घालताय तुम्ही. विनर्सबद्दल बोलललेली वाक्ये नि हरलेल्या टिमबद्दल मारलेला टोमणा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. Was the objective of final नोत to win the trophy ? If not, then I take back what I said. ज्या गोष्टीवरून RSA ची चेष्टा केली जाते तीच गोष्ट लंकेबाबतही तेव्हढीच खरी नाही का ? अशाने ८०% सामने जिंकले म्हणून भारतीय संघाचे कौतुक करावे लागेल Happy

<< ज्या गोष्टीवरून RSA ची चेष्टा केली जाते तीच गोष्ट लंकेबाबतही तेव्हढीच खरी नाही का ? >> माझं मत हरणार्‍यांची कुचेष्टा करण्याबद्दलच आहे, मग ती श्रीलंका असो कीं द.आफ्रिका कीं भारत . << जेत्यांचं कौतुक अत्यावश्यक आहे >> हे तर मीं सुरवातीलाच म्हटलं आहे.
<< अशाने ८०% सामने जिंकले म्हणून भारतीय संघाचे कौतुक करावे लागेल >> कां नाही ? किंबहुना, ८०% सामने जिंकलेला संघ उपांत्य फेरीतही येत नाही, ही स्पर्धेच्या नियमांतली मोठी त्रूटी आहे, असाही दृष्टीकोन असूं शकतो .

<< भाऊ तूट शब्द खरेच खटकला होता पण म्हटले जाऊ द्या...>> खटकणं माझ्यापर्यंत तात्काळ पोचलं होतं ! Wink

<< जेत्यांचं कौतुक अत्यावश्यक आहे >> हे तर मीं सुरवातीलाच म्हटलं आहे. >> जेत्यांचे कौतुक नि पराजितांची हेटाळणी ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी नाहित का ? एक केले म्हणजे दुसरे आपोआप झाले का ? मुद्दा हा आहे कि चार चार फायनल्स हरूनही लंकेचे कौतुक करणे जरुरी आहे का ? मला तसे वाटत नाही. माझ्या मते Finals were played for winning. There is no consolation for losing it 4 times. Everybody is there is no loser वगैरे असेल तर संपूर्ण टूर्नामेंटला अर्थच उरत नाही. अर्थात, तुमचे मत वेगळे असू शकते.

कां नाही ? किंबहुना, ८०% सामने जिंकलेला संघ उपांत्य फेरीतही येत नाही, ही स्पर्धेच्या नियमांतली मोठी त्रूटी आहे, असाही दृष्टीकोन असूं शकतो .>> I hope you are not serious. विधान नियमांबद्दल नसून ८०% टक्के सामने जिंकले म्हणून कौतुक करण्याबद्दल होते. ८०% सामने जिंकले हे मह्त्वाचे नसून जो सामना जसा जिंकायला हवा होता त्याबद्दल घेतलेली strategy, overall team selection वगैरे मधील त्रुटी दाखवण्याबद्दल होते. ८०% सामने जिंकल्याने ह्या त्रुटींकडे दुर्लक्ष करणे किती सोपे आहे.

Pages