टी२० विश्वचषक स्पर्धा २०१२

Submitted by उदयन.. on 14 August, 2012 - 04:30

ह्या वर्षी श्रीलंकेमधे होणार्‍या टी२० विश्वचषक स्पर्धेबद्दल हा धागा....
.
t20.jpg
.
१८ सप्टेंबर पासुन चालु होणार्‍या स्पर्धेत यावेळी १२ संघाचा समावेश आहे. त्यांची ४ गटात विभागणी केली आहे.
.
(अ) गट : England-Cricket-team-logo.jpg इंग्लंड , India-Cricket-team-logo.jpg भारत, Afghanistan-Cricket-team-logo.jpg अफगाणीस्तान
.
(ब) गट : Australia-Cricket-team-logo.jpg ऑस्ट्रेलिया, West-Indies-Cricket-team-logo.jpg वेस्ट इंडिज, Ireland-Cricket-team-logo.jpg आयर्लंड
.
(क) गट : shrilanka.jpg श्रीलंका, South-Africa-Cricket-team-logo.jpg दक्षिण आफ्रिका, Zimbabwe.jpg झिंबांब्वे
.
(ड) गट : Pakistan-Cricket-team-logo.jpg पाकिस्तान, New Zealand-Cricket-team-logo.jpg न्युझिलंड, Bangladesh-Cricket-team-logo.jpg बांग्लादेश

.
सुपर ८ मधे जाणारे संघ
.
गट १ : अ१ , ब२, क१, ड२
गट २ : अ२, ब१, क२, ड१
.
वेळापत्रक :

१८ सप्टें. .................. गट क : १ ली मॅच : श्रीलंका / झिंबांव्बे......:.. हंबाटा.= श्रीलंका
१९ सप्टें. .................. गट ब : २ री मॅच : ऑस्ट्रेलिया / आयर्लंड....:..कोलंबो = ऑस्ट्रेलिया
१९ सप्टें. .................. गट अ : ३ री मॅच : भारत / अफगाणिस्तान..:.कोलंबो = भारत
२० सप्टें .................. गट क : ४ थी मॅच : द आफ्रिका / झिंबांव्बे....: हंबाटा = द. आफ्रिका
२१ सप्टें ................... गट ड : ५ वी मॅच : न्युझिलंड / बांग्लादेश..: कँडी = न्युझिलंड
२१ सप्टें ................... गट अ : ६ वी मॅच : इंग्लंड / अफगाणिस्तान..: कोलंबो = इंग्लंड
२२ सप्टें ................... गट क : ७ वी मॅच : श्रीलंका / द आफ्रीका ......: हंबाटा = द आफ्रिका
२२ सप्टें .................... गट ब : ८ वी मॅच : ऑस्ट्रेलिया / वेस्ट इंडीज .: कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२३ सप्टें .................... गट ड : ९ वी मॅच : न्युझीलंड / पाकिस्तान ....: कँडी = पाकिस्तान
२३ सप्टें .................... गट अ : १०वी मॅच : भारत / इंग्लंड ...........: कोलंबो = भारत
२४ सप्टें .................... गट ब : ११वी मॅच : वेस्ट इंडीज / आयर्लंड.......: कोलंबो = वे. इंडीज
२५ सप्टें .................... गट ड : १२वी मॅच : बांग्लादेश / पाकिस्तान.....: कँडी = पाकिस्तान
.
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १३वी मॅच : श्रीलंका / न्युझीलंड : कँडी =श्रीलंका
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १४वी मॅच : इंग्लंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १५वी मॅच :पाकिस्तान / द आफ्रिका : कोलंबो = पाकिस्तान
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १६वी मॅच : भारत / ऑस्ट्रेलिया : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १७वी मॅच : इंग्लंड / न्युझिलंड : कँडी = इंग्लंड
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १८वी मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज : कँडी = श्रीलंका
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : १९वी मॅच : ऑस्ट्रेलिया / द आफ्रिका : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : २०वी मॅच : भारत / पाकिस्तान : कोलंबो = भारत
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २१वी मॅच : न्युझीलंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २२वी मॅच : श्रीलंका / इंग्लंड : कँडी = श्रीलंका
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २३वी मॅच : ऑस्ट्रेलिया / पाकिस्तान : कोलंबो = पाकिस्तान
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २४वी मॅच : भारत / द आफ्रिका : कोलंबो = भारत Sad
.
०४ ऑक्टो ................. १ ली सेमीफायनल मॅच : श्रीलंका / पाकिस्तान : कोलंबो = श्रीलंका Lol
०५ ऑक्टो ................. २ री सेमीफायनल मॅच : वेस्ट इंडीज / ऑस्ट्रेलिया : कोलंबो
= वे. इंडीज Lol

०७ ऑक्टो ................. फायनल टी २० मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज: कोलंबो = वे. इंडीज
.
.
चला आपापली मते येउ द्यात..:)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा जिंकणे शक्य नाही हे समजल्यावर त्यांनी त्यासाठी फारसे प्रयन्त केले नाहीत! >> म्हणजे मुद्दामहुनच अस नाही का? एनीवेज, ३ विकेट गेल्या Sad टी २० मधे मॅच ईक्वेशन एका ओवरने बदलते.

"The first match starts at 3:30 so we can watch on television" - MS Dhoni said in a press conference. Looks like, he will have to do the same for all of the remaining matches! Happy

रैनाला वर (रोहितच्या जागी) पाठ्वायला हवे होते. मागच्या वेळी त्याने RSA विरुद्ध T-20 मधे century केली होती.

आपण १८० वगैरे केले तरच आपल्याला संधी आहे. नाहितर ३२ च्या मार्गिनने त्यांना गुंडाळणे कठीण वाटतेय. फक्त ४-६ मधेच का खेळताहेत ? whatever happened to singles-doubles ?

भाऊ.. मस्तच..
विसरले वीस षटकांचा सामना आहे ते.. शेवटच्या दोन ओवरने पुन्हा आपण डळमळीत..

यात फक्त कोहलीलाच माफ करता येण्यासारखे आहे.बाकीच्यानी कॅज्युअल अ‍ॅप्रोचच दाखवला. कोहलीचा परफॉर्मन्स जबरदस्त होता टूर्नामेन्ट मध्ये. त्यामुळे एखाद्या सामन्यात अपयश येणे स्वाभाविक आहे. पण प्रत्येक मॅचच्या वेळी सेहवाग चालला तर असे होईल आणि तसे होईल किंवा तो चालावा अशी प्रार्थना करू या हे कशासाठी? धोनीसकट सगळेच आपापल्या जागा गृहीत धरत आहेत. आणि टीमपेक्शा खेळाडू मोठे झालेत...

बाळासाहेबांच्या (aka sambhit bal: cricninfo) आजच्या मार्मिक लेखातील शेवटचा अती मार्मिक ऊतारा:
http://www.espncricinfo.com/icc-world-twenty20-2012/content/current/stor...

>>India is the land of milk and honey for Twenty20 cricket. It is the laboratory where international players sharpen their Twenty20 skills. Yet India have failed to reach the final stages of the last three World Twenty20s. Tough questions and tough decisions can't wait forever

कालचा सामना पाहता खालील गोष्टी अ.अ. वाटल्या:
१. १२१ मध्ये आफ्रिकेला रोखाय्चे असताना अश्विन च्या आधी रोहित शर्मा ला गोलंदाजी
२. आफ्रीकेच्या फलंदाजांना एक एक धावा आरामात काढता येतील (पहिले ३ गडी लवकर बाद झाल्यावर देखिल) अशी क्षेत्ररक्षण रचना
३. गांगुली ने अनेक वेळा हे सांगितले आहे: २०/२० व ५० च्या सामन्यात धोणी सारख्या फलंदाजाने वरच्या क्रमांकावर यायला हवे- काल रोहीत शर्मा ला पाठवून काय मिळवले?
४. सेहवाग अजून किती दिवस जागा अडवणार?
५. बालाजी ची फिल्डींग "करमणूक" कॅटेगरीतील असताना २०/२० मध्ये त्याला सिमारेषेवर ऊभा केलेला?
६. पहिल्या सामन्यात पाक च्या फिरकी गोलंदाजांनी एव्हडे थैमान घातले तिथे आपण भज्जी ला बाहेर बसवले? (काल अश्विन हातभर वळवत होता चेंडू!!)

असो..
आपल्या संघाला एकूणात (निवड, डावपेच, तयारी, ई.) बर्‍याच तर्कशुध्द गोष्टी लागू होत नाहीत हा अनेक वर्षांचा इतीहास आहे. तो काही बदलणार नाही.. किमान थोडीशी जिगर दाखवून खेळ खेळावा एव्हडीच अपेक्षा आहे.

३. सोडून सगळ्या मुद्द्यांना अनुमोदन.

१. खर तर आपली बॉलिंग ही आपली कमकुवत बाजू असतानाही आपण चक्क ४ संघांना गुंडाळले.
२. बॅटींग हि मजबूत बाजू होती कि नाही ह्याबद्दल दोन्ही बाजूने बोलता येईल. ऑसीज वगळता इतर सर्व सामन्यांमधे average धावसंख्या केली (१७०+ turned out to be exception surprisingly. ) पण त्याचबरोबर सात बॅट्स्मन असलेल्या संघाकडे sub continental pitches वर भक्कम performance हवा हेही खरय.
३. बॅटिंग विशेषतः धोनी नि रैना प्रचंड scratchy वाटले. They never got it really going no matter runs scored. That turned out to be BIG factor in average scope vs imposing score. Considering that Indian batting was suppose to provide caution for weak balling. This is "the" factor we are out IMHO.
4. झहीर नि सेहवाग बद्द्ल प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह. गंभीर नि शर्माबद्दल शंका.
५. Overall selection policy turned out tobe much wanting. Onus should start with Srikanth. We missed left arm spinner, especially someone like ojha who is tremdeous baller to have in SL. समस्त IPL नि ह्या tournament मधे बघितले तर left arm spinners - raja, peterson, yuvraj have been big ticket items barring freak spinners like mendis etc.
6. Selection of chawla demands CBI inquiry. Lol

६ साठी अनुमोदन..............चावला ला घेतला का हे खुद्द चावला लाच माहीती नव्हते......... Lol

मुर्खपणा म्हणजे अश्विन ला ज्या कामा साठी घेतलेले होते ते काम करण्यासाठी त्यला ११ व्या षटकात आणले......तो पर्यंत मॅच हातातुन निघुन गेलेली ८५ च्या वर धावा झालेल्या आणि ३ च विकेट्स होत्या.....म्हणजे ३५ रन्स मधे ७ विकेट्स काढायच्या होत्या.... हे तर मलिंगाच्या बापाला पण जमले नसते......तो तर अश्विन होता.......
धोनी कधीच १०० च्या वर रनरेट नी खेळत नाही.......अगदी शेवटी शेवटी मारायचे बघतो......तो पर्यंत फार उशीर झालेला असतो.... त्यालाच बसवा......आणि आता नविन टीम आणा

>>टीम आणा

टीम अण्णा म्हणणार होतो पण ती देखिल बुडाली.. Happy

>>३५ रन्स मधे ७ विकेट्स काढायच्या होत्या.... हे तर मलिंगाच्या बापाला पण जमले नसते......तो तर अश्विन होता.......

होय! तरिही कालचा सामना भारत जिंकला हा चमत्कारच म्हणावा लागेल.. डुप्लेसिस ने पिसे काढली होती.

असामी,
मला वाटते सलामीची फलंदाजी हाच निर्णायक घटक ठरला आहे सर्वच सामन्यात- आपण नेमकी तिथेच गचकलो! युवी चा परफॉरमंस हा एक "बोनस" होता.
अजिंक्य रहाणे चं काय रक्त उकळत असेल कल्पना करू शकतो.. ऑसी निवड समिती असती तर मला वाटते सेहवाग, झहीर, शर्मा, रैना यांना गेल्याच वर्षी डच्चू मिळाला असता.. गंभीर ला या हंगमानंतर डच्चू दिला गेला असता.. कोहली या मालिकेसाठी कर्णधार झाला असता (t 20, one day) आणि सचिन ला सन्मानाने निवृत्ती घ्यायला भाग पाडले गेले असते!
भारतीय संघाची निवड ही ऑसी बोर्डाकडे आउट्सोर्स केली तर आपले बरेचसे प्रश्ण निकालात निघतील.. Happy मुळात थकलेल्या घोड्यांना घेवून कुणि रेस जिंकतो का?

baller ....balling.
असामी, अमेरिकन झालात बरं का!! मला वाटते इंग्लंडमधे अजून जुनेच स्पेलिंग वापरतात - Bowling, bowler वगैरे.

आता मनातले लिहायला वेळ नाही म्हणून घाई घाईत मधेच इंग्रजीत, मधेच मराठीत लिहायचे म्हणजे असे होते. तसेहि काही 'मायबोली' म्हणजे 'मराठी' नव्हे असे इथे बर्‍याच जणांचे मत आहेच.
तेंव्हा काय लिहीले आणि किती लवकर लिहीले ते महत्वाचे - समजा चुकून कुणि दुसर्‍याने हेच मत आधी व्यक्त केले तर लोकांना कळणार कसे ना आपण किती हुषार आहोत. आणि हेहि तितकेच महत्वाचे, कदाचित जास्तच!! मग इंग्रजी, मराठी, स्पेलिंग, शुद्धलेखन याला काय महत्व?
Wink Happy
Light 1 Light 1 Light 1
असो. तूमचे 'coments' वाचनीय असतात नी पटतात.

ऑसी निवड समिती >> नाहि तेही तितकेच विचित्र झाले आहेत. david hussey एकही मॅच खेळत नाही. daniel chistain खेळतो. त्यांच्याकडेही असे विचित्र निर्णय आहेत. त्यांचे नशिब बलवत्तर आहे कि वॅटसन चाल चाल चाललाय, नि स्टार्क द्रुष्ट लागावी अशी बॉलिंग करतोय.

रैनाबद्दल पटले नाही. कोहली वगळता ODI, T-20 साठी डोळे मिटून लावायचे ते एकमेव नाव आहे. बाकी प्याद्यांबद्दल अनुमोदन. जे काही बदल करयाचेत ते पुढच्या ODI series पासून सुरू करावेत.

जाता जात, there needs to be big question mark about Duncan Fletcher.

>>there needs to be big question mark about Duncan Fletcher

असले प्रश्ण बिसिसिआय ला पडत नसतात... Happy

तिवारी ....... रहाणे.............अक्षरशः कुजवले यांना Sad

Pages