टी२० विश्वचषक स्पर्धा २०१२

Submitted by उदयन.. on 14 August, 2012 - 04:30

ह्या वर्षी श्रीलंकेमधे होणार्‍या टी२० विश्वचषक स्पर्धेबद्दल हा धागा....
.
t20.jpg
.
१८ सप्टेंबर पासुन चालु होणार्‍या स्पर्धेत यावेळी १२ संघाचा समावेश आहे. त्यांची ४ गटात विभागणी केली आहे.
.
(अ) गट : England-Cricket-team-logo.jpg इंग्लंड , India-Cricket-team-logo.jpg भारत, Afghanistan-Cricket-team-logo.jpg अफगाणीस्तान
.
(ब) गट : Australia-Cricket-team-logo.jpg ऑस्ट्रेलिया, West-Indies-Cricket-team-logo.jpg वेस्ट इंडिज, Ireland-Cricket-team-logo.jpg आयर्लंड
.
(क) गट : shrilanka.jpg श्रीलंका, South-Africa-Cricket-team-logo.jpg दक्षिण आफ्रिका, Zimbabwe.jpg झिंबांब्वे
.
(ड) गट : Pakistan-Cricket-team-logo.jpg पाकिस्तान, New Zealand-Cricket-team-logo.jpg न्युझिलंड, Bangladesh-Cricket-team-logo.jpg बांग्लादेश

.
सुपर ८ मधे जाणारे संघ
.
गट १ : अ१ , ब२, क१, ड२
गट २ : अ२, ब१, क२, ड१
.
वेळापत्रक :

१८ सप्टें. .................. गट क : १ ली मॅच : श्रीलंका / झिंबांव्बे......:.. हंबाटा.= श्रीलंका
१९ सप्टें. .................. गट ब : २ री मॅच : ऑस्ट्रेलिया / आयर्लंड....:..कोलंबो = ऑस्ट्रेलिया
१९ सप्टें. .................. गट अ : ३ री मॅच : भारत / अफगाणिस्तान..:.कोलंबो = भारत
२० सप्टें .................. गट क : ४ थी मॅच : द आफ्रिका / झिंबांव्बे....: हंबाटा = द. आफ्रिका
२१ सप्टें ................... गट ड : ५ वी मॅच : न्युझिलंड / बांग्लादेश..: कँडी = न्युझिलंड
२१ सप्टें ................... गट अ : ६ वी मॅच : इंग्लंड / अफगाणिस्तान..: कोलंबो = इंग्लंड
२२ सप्टें ................... गट क : ७ वी मॅच : श्रीलंका / द आफ्रीका ......: हंबाटा = द आफ्रिका
२२ सप्टें .................... गट ब : ८ वी मॅच : ऑस्ट्रेलिया / वेस्ट इंडीज .: कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२३ सप्टें .................... गट ड : ९ वी मॅच : न्युझीलंड / पाकिस्तान ....: कँडी = पाकिस्तान
२३ सप्टें .................... गट अ : १०वी मॅच : भारत / इंग्लंड ...........: कोलंबो = भारत
२४ सप्टें .................... गट ब : ११वी मॅच : वेस्ट इंडीज / आयर्लंड.......: कोलंबो = वे. इंडीज
२५ सप्टें .................... गट ड : १२वी मॅच : बांग्लादेश / पाकिस्तान.....: कँडी = पाकिस्तान
.
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १३वी मॅच : श्रीलंका / न्युझीलंड : कँडी =श्रीलंका
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १४वी मॅच : इंग्लंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १५वी मॅच :पाकिस्तान / द आफ्रिका : कोलंबो = पाकिस्तान
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १६वी मॅच : भारत / ऑस्ट्रेलिया : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १७वी मॅच : इंग्लंड / न्युझिलंड : कँडी = इंग्लंड
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १८वी मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज : कँडी = श्रीलंका
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : १९वी मॅच : ऑस्ट्रेलिया / द आफ्रिका : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : २०वी मॅच : भारत / पाकिस्तान : कोलंबो = भारत
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २१वी मॅच : न्युझीलंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २२वी मॅच : श्रीलंका / इंग्लंड : कँडी = श्रीलंका
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २३वी मॅच : ऑस्ट्रेलिया / पाकिस्तान : कोलंबो = पाकिस्तान
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २४वी मॅच : भारत / द आफ्रिका : कोलंबो = भारत Sad
.
०४ ऑक्टो ................. १ ली सेमीफायनल मॅच : श्रीलंका / पाकिस्तान : कोलंबो = श्रीलंका Lol
०५ ऑक्टो ................. २ री सेमीफायनल मॅच : वेस्ट इंडीज / ऑस्ट्रेलिया : कोलंबो
= वे. इंडीज Lol

०७ ऑक्टो ................. फायनल टी २० मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज: कोलंबो = वे. इंडीज
.
.
चला आपापली मते येउ द्यात..:)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

... बदला पुर्ण होईल >>
तात्यानू, बदला आपण घ्यायचा असतो. इतरांनी नाही. Happy

कालची मॅच खूपच छान झाली. जयवर्धनेच्या लिडरशीप मधून धोणीने शिकायला हवे. टेस्ट आणि टि २० मध्ये धोणी कप्तान नको.

बदला आपण घ्यायचा असतो. इतरांनी नाही >>>>>>>>>>> अरे आपल्या तर्फे दुसरे पण घेउ शकतात ना....... आता बदला घ्यायला नेहमी सरदार खानच असायला हवे असे नाही...आपला फैजल पण घेउ शकतो ना

<< जयवर्धनेच्या लिडरशीप मधून धोणीने शिकायला हवे. >> खरंय. काल मलिंगाने एक सोप्पा झेल सोडला, स्टंपच्या मागे उभं न राहिल्याने एक सहजची धांवचित करायची संधी घालवली . चेहर्‍यावरची निराशेची एक पुसटशी क्षणिक रेषा सोडली तर जयवर्धनेने त्याचा बाऊ केला नाही कीं आक्रस्ताळेपणाचं प्रदर्शन नाही. तत्परतेने पुढच्या खेळावर लक्ष केंद्रीत करून त्याने सर्वाना , मलिंगासकट, प्रेरीतच केलं .

<< बदला आपण घ्यायचा असतो. >> मला वाटतं भारताला या स्पर्धेतला बदला घ्यायचाच असेल तर तो द. आफ्रिकेशी; पाकिस्तानला तर आपण हरवलंच होतं ! Wink

हुर्रे..................धो धो धुतला.....ऑसी बॉलर्स ना.............. २०५-४ ........गेल ७१ धावा ४१ चेंडु........ नाबाद....
.
.
आता नरेन नी स्पिन च्या तालावर ऑसींना नाचवायला हवे Happy

तब्बल १४ षटकार आणि १३ चौकार चा पाउस...........पडला.........शेवटच्या ओवर मधे ४ षटकार.....१ गेल चा आणि सलग ३ पोलर्ड चे............;)

<< पण मला वाटतय उद्या गेल फ्लॉप जाणारेय >> अख्खी श्रीलंका तुम्हाला डोक्यावर घेवून नाचवेल.... पण या भाकीताला कांही सबळ आधार असेल तरच !!! Wink

मला तरी विंडीज ने हा कप जिंकावा असे वाटत आहे. ३० + वर्षे झाली आहेत त्यांनी एखादा कप जिंकून. गेल, पोलार्ड आणि सॅम्युअल (दोन्ही) चालले तर ते जिंकतील सुद्धा. लंकेची टीम पण सुपर आहेच. मॅच मस्त होईल ह्यात शंका नाही.

नवभारत टाईम्स - पोलार्ड हनूमान और गेल श्रीराम का एकबार फिरसे लंका दह्न" Happy

effectively it boils down to how effective badree and narine will be spin savvy lankans. Since T-20 can be carried by one man's brilliance, it's tough call.

गेल आणि पोलार्ड याना कन्सिस्टन्सी आहे काय?
गेलः७५,३०,२,५८ पोलर्डः३८,२८,१,१,१०,२८*,७ (उलट्या क्रमाने)
भारतीय लोकांसारखे एक मॅच चांगली हाणायची आणि त्या भांडवलावर १० मॅच व्याज वसूल करायचे असे नाही काय? लंकेची स्ट्रेंग्थ बोलिंग आहे मला तर लंकेचेच पारडे जड वाटतेय....

<< गेल आणि पोलार्ड याना कन्सिस्टन्सी आहे काय? >> पोलार्डचं नाही सांगतां येत पण गेल सध्यां बर्‍यापैकी नियमितपणे व आत्मविश्वासाने खेळतोय. शिवाय, वे.इंडीजचे इतरही फलंदाज अधुनमधून चांगला खेळ करताहेत. मला तरी मलिंगापेक्षां मेंडीस हाच त्याच्या फसव्या फेकीमुळे वे. इंडीजच्या वाटेतला मुख्य अडथळा ठरण्याची शक्यता वाटते. दोन्ही बाजूच्या फिरकी वर्चस्वामुळे सामना मोठ्या धांवसंख्येचा न होण्याचीच शक्यता अधिक.

पण टी-२० मधे सर्वात गंमत असते ती असे अंदाज वर्तवणार्‍यांचीच दांडी गुल होताना बघण्याची;[ पाकच्या हुकमी गोलंदाजाच्या हातात १९व्या षटकापर्यंत चेंडू दिला जात नाही व तोच उमर गुल शेवटी फलंदाजीला येवून अफलातून खेळी करून सामना जिंकून देतो !] तेंव्हा आपण अधिक न बोललेलंच बरं !! Wink

२०/२० मध्ये एखादी खेळी, फलंदाजी वा गोलंदाजी ही "निर्णायक" ठरते असे दिसते. त्यानुसारः
माहेला, दिलशान, हे लंकेसाठी तर गेल, ब्राव्हो, सॅम्युएल्स (पोलार्ड सेहवाग पेक्षा वाईट मटका आहे!) हे विंडीज साठी अशी निर्णायक खेळी करू शकतात.
गोलंदाजीत मलिंगा, मेंडीस विरुध्द रामपॉल, नरीन अशी लढत दिसते. तरिही लंकेची गोलंदाजी जास्ती मजबूत वाटते.

आज खेळपट्टी कशी असेल (बहुदा पाक वि. ऑसी सामन्या सारखीच असेल असे वाटते) त्यानुसार बरेच काही बदलू शकते. लंका धावांचा पाठलाग करण्यात तर विंडीज आधी मोठी धावसंख्या ऊभारणे यात अधिक यशस्वी ठरतील असे वाटते. त्या अनुशंगाने नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार यात शंका नाही.
विंडीज ची पहिली फलंदाजी असेल तर त्यांच्या पक्षात ६०%-४०% सामना होईल असे वाटते, लंकेने पहिले फलंदाजी केली तर लंका ६०-४०.. हा सामना मात्र सुपर ओव्हर मध्ये जाऊ नये.. सर्वच ४० षटकाच्या खेळावर पाणी फिरवल्यागत होते ते.

गेल आज पुन्हा ५०+ करणार यात मला शंका नाही..

बाकी, अंतीम फेरीत दोन "सभ्य" संघ लढणार आहेत तेव्हा झुंज बॅट व बॉल यामध्येच असेल.. मला तरी लंका व विंडीज हे दोन्ही संघ या कारणासाठी खूप आवडतात.. माझ्या आठवणीत अगदी होल्डींग, गार्नर, मार्शल या विंडीज त्रिकूटापासून, तसेच अर्जुना, डिसिल्वा, मुरली याही लंकन त्रिकूटापासून आजवर पाहिलेले जवळ जवळ सर्वच विंडीज वा लंकन खेळाडू कधिही मैदानावर (ऊगाच) शिवीगाळ, नाटके, ई. करताना दिसलेले नाहीत.. प्रतीस्पर्ध्यांनी कितीही डिवचले तरी विंडीज च्या खेळाडूंचे ते टिपिकल निव्वळ हसणे आणि लंकेच्या खेळाडूंचे चेहेर्‍याने राग व्यक्त करणे हे फार फार आवडते.
[पोलॉक व गेल ला शिवीगाळ करण्याचा मूर्खपणा सहसा कुणी करत नसतीलच..]

पण याबद्दल काही सर्वेक्षण, आकडेवारी प्रसिध्द आहे का यावर जाणकार प्रकाश टाकतीलच.

येता जाता "भ" ची बाराखडी वापरणार्‍या कोहली आणि कं ने व "फ" ची बाराखडी वापरणार्‍या ऑसी कंपनीला यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.

श्रीलंका व वे.इंडीजबद्दलच्या योगजींच्या निरिक्षणाशीं व मताशी १००% सहमत. [ मीं तर अगदीं लहानपणीं पाहिलेल्या वॉरेल, विक्स व वॉलकॉट या त्रिकुटापासूनचा हवाला देऊं शकतो ! Wink ] जीवनाचा मनमोकळेपणाने आनंद लुटण्याच्या उपजत वृत्तीमुळेच वे.इंडीज असला फालतूपणा करत नसावेत.

>>जीवनाचा मनमोकळेपणाने आनंद लुटण्याच्या उपजत वृत्तीमुळेच वे.इंडीज असला फालतूपणा करत नसावेत.

भाऊ,
अगदी.. गोलंदाजांचा कर्दनकाळ असलेले सर विव्ह रिचर्ड्स देखिल निव्वळ शांतपणे चिंगम चघळत अक्षरशः गोलंदाजीची चामडी लोळवत असत.. कुठेही शिव्या वा अपशब्द नाहीत.. फालतू बोलणे, हावभाव नाहीत..
आजकाल "सिंघम" स्टाईल चा जमाना आहे.. Happy

अलिकडे विमान प्रवासात मि विंडीज (विरुध्द ईं.) क्रिकेट चा जन्म, प्रसार, यश, ऊतार चढाव, मानसिकता यावर एक अप्रतीम सुंदर फिल्म पाहिली होती.. "फायर ईन बॅबिलॉन" असे त्याचे नाव (नेट वर नक्कीच त्याच्या लिंक्स उपलब्ध असतील..) त्यात विंडीज संघाचा ऊदय, त्यांची मानसिकता, प्रस्थापित ईग्लंड व आदी संघांना चारलेली धूळ, ते विश्वचषक जेतेपद असा प्रवास.. गार्नर, होल्डींग, ई. तोपखाने हे सर्व त्या ९० मिनीटाच्या डोक्यू मध्ये अतीशय ऊत्कृष्टपणे दाखवले आहे. कुठे सापडली फिल्म तर जरूर पहा..
विमान प्रवासात या अशा अनेक क्रिकेट संबंधीत डॉक्यूज (वा फिल्म्स ज्या आधि कुठे पाहिलेल्या नसतात) पहाणे हा माझा आवडता छंद आहे..

मानसिकतेचा विषय निघालाच आहे म्हणून सांगितल्याशिवाय रहावत नाही-
वेस्ली हॉल हा असाच महाकाय व अतिशय लांब पण लयबद्ध रन-अप असलेला वे.इंडीज फास्ट गोलंदाज. मॅचपूर्वी ब्रेबोर्न स्टेडीयमवर आपलं व वे.इंडीजचं नेट अगदीं शेजारीं लागलेलं. रन-अप घेताना हॉल सीमारेषेवर प्रेक्षकांच्या अगदी जवळ यायचा, हंसून हात हलवायचा व गोलंदाजी करायला मागे वळायचा. मधेच त्याने भारताच्या नेटकडे मिष्कीलपणे बघून प्रेक्षकाना खूण केली व मागे वळून तो सरळ भारताच्या नेटच्या दिशेने वेगाने धांवला. दोन्ही नेटवरचे खेळाडू अचंबित होऊन पहात बसले. नेहमीच्या वेगाने धांवत जावून हॉलने अनपेक्षितपणे भारतीय नेटमधे एक सुंदर लेग-ब्रेक टाकला ! क्षणार्धात सर्वत्र हास्याची लाटच उसळली. हलकसं नाचत हंसत मग हॉलने आपली
प्रॅक्टीस सुरूं ठेवली.

अ‍ॅम्ब्रोज हसतो........ ही अशक्य गोष्ट फक्त मैदानावरच घडते.....जेव्हा तो बाउंसर टाकतो आणि फलंदाज चुकवताना खाली पडतो... Happy

<< अ‍ॅम्ब्रोज हसतो........ ही अशक्य गोष्ट फक्त मैदानावरच घडते.....>> अपवादाने नियम सिद्ध होतो ! Wink

"फायर ईन बॅबिलॉन" >> गावस्करने ७६-७७ मधे मॅच सोडून दिली असे का दाखवलय त्यात ? मॅच नसून इनिंग सोडली होती नि तीही बेदी ने. लोअर ऑर्डर बॉलर्स विरुद्ध बीमर्स वापरल्याबद्दल. चांगली docu. होती पण मला तरी लोअर ऑर्डर बॉलर्स विरुद्ध वापरलेल्या बाऊन्सरमागील justification (roberts नि बहुधा croft चे) खटकले होते.

येता जाता "भ" ची बाराखडी वापरणार्‍या कोहली आणि कं ने व "फ" ची बाराखडी वापरणार्‍या ऑसी कंपनीला यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. >> each one has his own poison. एक यारड्स्टिक लावून सगळे judge करण्यात काय point आहे ? "फ" ची बाराखडी वापरणार्‍या ऑसी कंपनी मैदानावर झालेले तिथेच ठेवून बाहेर गळ्यात गळा घालून बसते ना ? शिव्या देण्याचे justification नाही पण passionate खेळ कसा करायचा ह्याचे प्रत्येकाचे ग्रुहितक वेगळेच असणार.

Pages