टी२० विश्वचषक स्पर्धा २०१२

Submitted by उदयन.. on 14 August, 2012 - 04:30

ह्या वर्षी श्रीलंकेमधे होणार्‍या टी२० विश्वचषक स्पर्धेबद्दल हा धागा....
.
t20.jpg
.
१८ सप्टेंबर पासुन चालु होणार्‍या स्पर्धेत यावेळी १२ संघाचा समावेश आहे. त्यांची ४ गटात विभागणी केली आहे.
.
(अ) गट : England-Cricket-team-logo.jpg इंग्लंड , India-Cricket-team-logo.jpg भारत, Afghanistan-Cricket-team-logo.jpg अफगाणीस्तान
.
(ब) गट : Australia-Cricket-team-logo.jpg ऑस्ट्रेलिया, West-Indies-Cricket-team-logo.jpg वेस्ट इंडिज, Ireland-Cricket-team-logo.jpg आयर्लंड
.
(क) गट : shrilanka.jpg श्रीलंका, South-Africa-Cricket-team-logo.jpg दक्षिण आफ्रिका, Zimbabwe.jpg झिंबांब्वे
.
(ड) गट : Pakistan-Cricket-team-logo.jpg पाकिस्तान, New Zealand-Cricket-team-logo.jpg न्युझिलंड, Bangladesh-Cricket-team-logo.jpg बांग्लादेश

.
सुपर ८ मधे जाणारे संघ
.
गट १ : अ१ , ब२, क१, ड२
गट २ : अ२, ब१, क२, ड१
.
वेळापत्रक :

१८ सप्टें. .................. गट क : १ ली मॅच : श्रीलंका / झिंबांव्बे......:.. हंबाटा.= श्रीलंका
१९ सप्टें. .................. गट ब : २ री मॅच : ऑस्ट्रेलिया / आयर्लंड....:..कोलंबो = ऑस्ट्रेलिया
१९ सप्टें. .................. गट अ : ३ री मॅच : भारत / अफगाणिस्तान..:.कोलंबो = भारत
२० सप्टें .................. गट क : ४ थी मॅच : द आफ्रिका / झिंबांव्बे....: हंबाटा = द. आफ्रिका
२१ सप्टें ................... गट ड : ५ वी मॅच : न्युझिलंड / बांग्लादेश..: कँडी = न्युझिलंड
२१ सप्टें ................... गट अ : ६ वी मॅच : इंग्लंड / अफगाणिस्तान..: कोलंबो = इंग्लंड
२२ सप्टें ................... गट क : ७ वी मॅच : श्रीलंका / द आफ्रीका ......: हंबाटा = द आफ्रिका
२२ सप्टें .................... गट ब : ८ वी मॅच : ऑस्ट्रेलिया / वेस्ट इंडीज .: कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२३ सप्टें .................... गट ड : ९ वी मॅच : न्युझीलंड / पाकिस्तान ....: कँडी = पाकिस्तान
२३ सप्टें .................... गट अ : १०वी मॅच : भारत / इंग्लंड ...........: कोलंबो = भारत
२४ सप्टें .................... गट ब : ११वी मॅच : वेस्ट इंडीज / आयर्लंड.......: कोलंबो = वे. इंडीज
२५ सप्टें .................... गट ड : १२वी मॅच : बांग्लादेश / पाकिस्तान.....: कँडी = पाकिस्तान
.
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १३वी मॅच : श्रीलंका / न्युझीलंड : कँडी =श्रीलंका
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १४वी मॅच : इंग्लंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १५वी मॅच :पाकिस्तान / द आफ्रिका : कोलंबो = पाकिस्तान
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १६वी मॅच : भारत / ऑस्ट्रेलिया : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १७वी मॅच : इंग्लंड / न्युझिलंड : कँडी = इंग्लंड
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १८वी मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज : कँडी = श्रीलंका
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : १९वी मॅच : ऑस्ट्रेलिया / द आफ्रिका : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : २०वी मॅच : भारत / पाकिस्तान : कोलंबो = भारत
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २१वी मॅच : न्युझीलंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २२वी मॅच : श्रीलंका / इंग्लंड : कँडी = श्रीलंका
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २३वी मॅच : ऑस्ट्रेलिया / पाकिस्तान : कोलंबो = पाकिस्तान
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २४वी मॅच : भारत / द आफ्रिका : कोलंबो = भारत Sad
.
०४ ऑक्टो ................. १ ली सेमीफायनल मॅच : श्रीलंका / पाकिस्तान : कोलंबो = श्रीलंका Lol
०५ ऑक्टो ................. २ री सेमीफायनल मॅच : वेस्ट इंडीज / ऑस्ट्रेलिया : कोलंबो
= वे. इंडीज Lol

०७ ऑक्टो ................. फायनल टी २० मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज: कोलंबो = वे. इंडीज
.
.
चला आपापली मते येउ द्यात..:)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय मुर्ख पणा............सेहवाग च्या जागी पठाण ओपनिंग ला?????????// शिकार करण्यासाठी हाती वाघ असताना तरस पाठवल्यासारखे आहे हे Uhoh

इरफान चा घो..........हरामखोर स्वत पण खेळत नाही उगाच दुसर्याला पण आउट करतो........लांब मारता येत नाही का ...

<< सेहवाग च्या जागी पठाण ओपनिंग ला >> सेहवाग खेळत नसला तरी पठाण सलामीला ? अगम्य !
ऑसीज ऑफ-स्पीनला बिचकतात यावर आपण जरा जास्तच विसंबून रहातोय, असं नाही वाटत ?

<< भाऊ मी अ‍ॅल्बीला बॉलींग देण्याबद्दल म्हणत होतो >> असामीजी, डिलीव्हर्सला खेळपट्टीचा अंदाज आला असेल, हा माझाच अंदाज साफ चुकला !

धोनी नि रैना फ्लोमधे वाटत नाही त्यामूळे आपण मोठा स्कोर टाकणे अवघड होत जाणार आहे. कदाचित सेहवागला परत आणायची वेळ आली आहे.

ऑसीज ऑफ-स्पीनला बिचकतात यावर आपण जरा जास्तच विसंबून रहातोय, असं नाही वाटत ?>> वरचे तिघे तरी नक्की त्यातले वाटत नाहीत.

पिच फिरकीला साथ देते, आपण तीन स्पिनर्स घेऊन खेळतो वगैरे सगळे ठिक आहे. पण हे तिघे जर प्रत्येक ओव्हरमधे एखादा long hop देणार असतील तर कठीण आहे राव.

धोनीने इरफानला एव्हढे खाली का केले देव जाणे ? old ball and Irfan do not go together. Zaheer was suppose to be old ball expert, right ?

"विश्वास" परत एकदा जाणार असे दिसते.

आपल्या बॉलींगची तर नेहमीची आहेच पण बॅटिंगची देखील वाट लागली आहे. ज्या रितीने आपली पाठवणी वारंवार स्टेडीयमच्या बाहेर होत आहे ते पाहून पिच इतक्या लवकर बदलली की आपण ऑसी गोलंदाजीला खेळण्यास प्रिपेअरच नव्हतो ह्याचा प्रश्न पडला आहे.

"मोस्ट सिक्सेस अगेन्स्ट टीम" चा रेकॉर्ड आपणच घ्यायचा असे ठरविले.

आज आपण ऑसीच्या चांगल्या स्ट्रॅटेजीमुळे हरणार.त्यांनी पहिली ओव्हर स्पिनरला देऊन आपला ओव्हर कॉन्फिडंस अजूनच ओव्हर केला. (स्पिनरच्या बाबतीत) सर्व विकेटस मात्र फास्ट बोलरच्या आहेत.

कांहीही न बोलतां आपण साफ हरलो हे मान्य करावं , हें उत्तम.
[ झहीरचा एक चेंडू जरा वर उसळला व तो खेळताना वॉटसनला किंचित त्रास झाला असावा; कोहलीने ताबडतोब
त्यावर शेरेबाजी केली व अंपायर कडून समज घेतली. वॉटसनने मग न बोलतांच आपल्या थोबाडीत मारल्या ! राहुल, लक्ष्मण व सचिन यांच्या गैरहजेरीत असा उथळपणा वारंवार पहायला लागेल असं वाटतंय ! ]

अनुमोदन भाऊ.

पण एक गोष्ट आपली बॉलिंग सुरू असताना सारखी वाटत होती ती म्हणजे watson and warner hardly had any edges or mishits. नंतर धोनी बोलला तेंव्हा लक्षात आले कि बॉल थांबून यायचे बंद झाले होते (पावसामूळे). That went against spinners and ball coming nicely onto bat helped aussies. हे analysis मान्य आहे पण मग प्रश्न हा उरतो कि आपण तीन स्पिनर्स घेऊन जाणार हे आधी ठरले होते. weather forecast मधे पावसाचा अंदाज दिलेला होता तर टॉस जिंकून आधी बॉलिंग का घेतली नाही ? तसेचि जर दुसर्‍या inning च्या आधी पाऊस पडला तर डकवर्थ लूईस सिस्टीम नंतर बॅटींग करणार्‍याला T20 मधे undue advantage देते हे माहित आहेच. असे असूनही अशी tactical mistake ?

जबरदस्त गोलंदाजी.......व्वा काय केली आहे.......५ स्पेशालिस्ट बॉलर्स ला घेउन उतरणे फायद्याचे ठरले
भज्जी , झहीर, अश्विन, चावला, पठाण हे आपले बॉलर्स आज छान फार्मात होते.......मस्त धुलाई झाली....वर भरीस भर हे ५ कमी पडले म्हणुन युवराज, रोहित, विराट हे अजुन तीन वापरले... थोडक्यात ज्याला ज्याला बॉलिंग मिळत होती तो मिळालेल्या संधीचे सोने करत होता.......बॅट्समन तर एकदम कमालच करत होते......धोनी फेवरेट २५ वॉल्स मधे १५ रन्स ठोकले पठ्याने,........... काय ते एक एक रन्स धावुन काढल्या व्वा...........फुलटॉस बॉलवर एक रन्स कशी काढावी याचा धडाच दिला वॉट्सन ला.....प्रत्येक बॉल जपुन बघुन खेळावा लागतो...मग भले रन्स बनो अथवा न बनो...................
.
.
.सुंदर अप्रतिम...........माझ्या कडे अजुन शब्द नाहीत,,,,
.>
>
अ‍ॅडमिन ना विनंती किमान शिव्या मायबोली वर देण्याकरीता वेगळी स्माईली उपलब्ध करुन द्यावी

<< तेंव्हा लक्षात आले कि बॉल थांबून यायचे बंद झाले होते (पावसामूळे). That went against spinners and ball coming nicely onto bat helped aussies >> एक बालीश शंका - आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार्‍या अनुभवी स्पीनर्सना बदलत्या परिस्थितीत आपल्या गोलंदाजीची ढब व डांवपेच बदलण्याचं कौशल्य असावं लागत नाही ? भले त्याना भेदक गोलंदाजी करणं कठीण जाईल , पण त्यांचा अगदीच भाऊ नमसकर होऊं शकतो ? कीं, छान, घोंटीव शब्दप्रयोग वापरून कशाचंही समर्थन करत प्रेक्षकांची/ श्रोत्यांचीच फिरकी घ्यायची ही हल्ली ष्टाईलच झाली आहे ?

धोनीचे स्पष्टीकरण ऐकुन असे वाटायला लागले की पुढच्या काही मॅच मधे "साक्षीने जेवन व्यवस्थित बनवले नाही त्यामुळे भज्जी ला निट बॉल पकडता आला नाही..बाकिच्यांचे पोट बिघडलीत त्यामुळे हारलो.." आता धोनीलाच बसवा......घरी....... Angry

भाऊ Happy

काल आपण फारच टाकाऊ खेळलो..... मागच्या मॅचेसमध्ये लवकर विकेट्स मिळवुन देणार्‍या इरफानला का मागे ठेवले म्हणे.... त्या रोहित शर्माला हाकलुन द्या.... एक मॅच खेळतो आणि चार मॅचेस बोअर करतो!

सेहवागला बहुतेक पाकड्यांसाठी राखुन ठेवलय!

<< काल आपण फारच टाकाऊ खेळलो.... >> खरंय. उगीचच कां समर्थन करत बसायचं . पुढच्या सामन्यात करून दाखवा ना सुधारणा.

त्या रोहित शर्माला हाकलुन द्या.... एक मॅच खेळतो आणि चार मॅचेस बोअर करतो! >>
येकदम खरंय...नको त्या मॅच मध्ये चांगला खेळतो आणि जागा अडवतो. पुढच्या मॅचला सेहवागला
घ्यायलाच पाहिजे

सेहवागला काढूच कसे शकता हाच मुळी प्रश्न आहे . पाचच गोलंदाज खेळवायचे होते तर एक विराट कोहली सोडला तर बाकी कुणाचा फॉर्म चांगला आहे ?

भाऊ, अनुभवी स्पीनर्सना बदलत्या परिस्थितीत आपल्या गोलंदाजीची ढब व डांवपेच बदलण्याचं कौशल्य असावं लागत नाही >> ह्याचे उत्तर एव्हढेच आहे कि त्यांनी खराब बॉलींग केली. पण धोनीचे पावसामूळे बॉल ग्रिप करणे कठीण गेले हे सांगणे फारसे चुकीचे नव्हते. अश्विनच्या पहिल्या ओव्हरमधेच फरक जाणवत होता. इरफानला सुरूवातीला बॉलिंग दिली नाही हा धोनीचा खरा दोष आहे.

आता पाकिस्तानविरुद्ध काय करायचे ? ५ बॉलर्स कि ४ ? सेह्वागला आता आणा ठिक आहे पण बाहेर कोणाला बसवायचे ? थोडक्यात काय 'नशिब *न्डू तो क्या करेगा पांडू'

कीं, छान, घोंटीव शब्दप्रयोग वापरून कशाचंही समर्थन करत प्रेक्षकांची/ श्रोत्यांचीच फिरकी घ्यायची ही हल्ली ष्टाईलच झाली आहे >> +1

सेहवागचा 'तंदुरूस्तीचा' प्रश्न असावा. >> तसे नाहीये कारण तो सराव करत होता व धोणीनेच मॅचच्या अर्ध्यातासापूर्वी सेहवाग की युवराज हा प्रश्न सोडवला जाईल असे सांगीतलं होते.

आजपर्यंत असा अनुभव आहे की वल्डकपमध्ये (मग तो कुठलाही असो) भारताची सुरूवात खराब होते आणि जसेजसे दिवस जातात तसा खेळ उंचावतो. (स्लो स्टार्टर) तसेच होओ म्हणजे झाले.

पाकिस्तान बरोबर ची मॅच म्हणजे करो अथवा मरो........तेही चांगल्या रनरेट ने जिंकायला हवे........अन्यथा जय हरी विठ्ठल.
.
.न्युझीलंड ने गाशा गुंडाळला........आज.......१४६ काहीच नव्हते......राईट चांगला खेळला आज

<< पण धोनीचे पावसामूळे बॉल ग्रिप करणे कठीण गेले हे सांगणे फारसे चुकीचे नव्हते. >> मान्य. अश्विनला चेंडू वारंवार पुसावा लागत होता,हे दिसत होतं.

आज सेहवाघ ला घ्यायला हवा............ आणि घेतल्यावर त्याने खेळायला हवे.....हे मुख्य आहे.......... Wink

त्या साठी आधी त्याला घ्यावा लागेल ना डोळा मारा >> आज तर धोनी ला त्याला घ्यावाच लागेल Happy
त्याची इच्छा नसली (आणी बहुधा नाहीच) तरी !

नुसता सेहवाघला घेउन फायदा काय, बोलींगच धड नाही केली तर? तिकडे आफ्रिकेचा डोहर्थाने धुव्वा उडवला आहे Happy

आज सेहवाग ल आत आणून रोहीत ला बसवतील बहुतेक.. असेही दोघेही जुगारच आहे, सेहवाग चा डाव लागला तर रिटर्न्स जास्ती Happy
चावला ला मी, भाऊ नमसकर, व असामी या तीघांपैकी देखिल कुणीही कुटू शकतो (बॅट ने वा हाताने) Happy तेव्हा त्याला बसवून बालाजी किंवा ऊमेश आत येईल.
पाक विरुध्द आज नाणेफेक जिंकू नये असेच धोणीला वाटत असेल Wink जिंकलीच तर आधी गोलंदाजी घ्यावी असे मला वाटते- धावसंख्या पाहून पाठलाग करताना नेमकी रिस्क कधी किती घ्यायची हे आपल्या संघाला जरा अधिक चांगले समजते असा आजवरचा अनुभव आहे.
बाकी, ऑसी हे ईंग पेक्षा कईक अधिक पटीने स्पिन गोलंदाजी चांगली खेळतात हे आता एव्हाना जगजाहीर आहे.. धोणी ला बहुतेक शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालाय.

चला मटके लावा:
पाक पहिली फलंदाजी १५०+ (७ बाद)... भारत १९ षटकात विजयी (५ बाद) Happy
भारत पहिली फलंदाजी १६५+ (६ बाद)... पाक १६० (८ बाद).. थोडक्यात एकदम अटीतटीचा सामना

Pages