टी२० विश्वचषक स्पर्धा २०१२

Submitted by उदयन.. on 14 August, 2012 - 04:30

ह्या वर्षी श्रीलंकेमधे होणार्‍या टी२० विश्वचषक स्पर्धेबद्दल हा धागा....
.
t20.jpg
.
१८ सप्टेंबर पासुन चालु होणार्‍या स्पर्धेत यावेळी १२ संघाचा समावेश आहे. त्यांची ४ गटात विभागणी केली आहे.
.
(अ) गट : England-Cricket-team-logo.jpg इंग्लंड , India-Cricket-team-logo.jpg भारत, Afghanistan-Cricket-team-logo.jpg अफगाणीस्तान
.
(ब) गट : Australia-Cricket-team-logo.jpg ऑस्ट्रेलिया, West-Indies-Cricket-team-logo.jpg वेस्ट इंडिज, Ireland-Cricket-team-logo.jpg आयर्लंड
.
(क) गट : shrilanka.jpg श्रीलंका, South-Africa-Cricket-team-logo.jpg दक्षिण आफ्रिका, Zimbabwe.jpg झिंबांब्वे
.
(ड) गट : Pakistan-Cricket-team-logo.jpg पाकिस्तान, New Zealand-Cricket-team-logo.jpg न्युझिलंड, Bangladesh-Cricket-team-logo.jpg बांग्लादेश

.
सुपर ८ मधे जाणारे संघ
.
गट १ : अ१ , ब२, क१, ड२
गट २ : अ२, ब१, क२, ड१
.
वेळापत्रक :

१८ सप्टें. .................. गट क : १ ली मॅच : श्रीलंका / झिंबांव्बे......:.. हंबाटा.= श्रीलंका
१९ सप्टें. .................. गट ब : २ री मॅच : ऑस्ट्रेलिया / आयर्लंड....:..कोलंबो = ऑस्ट्रेलिया
१९ सप्टें. .................. गट अ : ३ री मॅच : भारत / अफगाणिस्तान..:.कोलंबो = भारत
२० सप्टें .................. गट क : ४ थी मॅच : द आफ्रिका / झिंबांव्बे....: हंबाटा = द. आफ्रिका
२१ सप्टें ................... गट ड : ५ वी मॅच : न्युझिलंड / बांग्लादेश..: कँडी = न्युझिलंड
२१ सप्टें ................... गट अ : ६ वी मॅच : इंग्लंड / अफगाणिस्तान..: कोलंबो = इंग्लंड
२२ सप्टें ................... गट क : ७ वी मॅच : श्रीलंका / द आफ्रीका ......: हंबाटा = द आफ्रिका
२२ सप्टें .................... गट ब : ८ वी मॅच : ऑस्ट्रेलिया / वेस्ट इंडीज .: कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२३ सप्टें .................... गट ड : ९ वी मॅच : न्युझीलंड / पाकिस्तान ....: कँडी = पाकिस्तान
२३ सप्टें .................... गट अ : १०वी मॅच : भारत / इंग्लंड ...........: कोलंबो = भारत
२४ सप्टें .................... गट ब : ११वी मॅच : वेस्ट इंडीज / आयर्लंड.......: कोलंबो = वे. इंडीज
२५ सप्टें .................... गट ड : १२वी मॅच : बांग्लादेश / पाकिस्तान.....: कँडी = पाकिस्तान
.
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १३वी मॅच : श्रीलंका / न्युझीलंड : कँडी =श्रीलंका
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १४वी मॅच : इंग्लंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १५वी मॅच :पाकिस्तान / द आफ्रिका : कोलंबो = पाकिस्तान
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १६वी मॅच : भारत / ऑस्ट्रेलिया : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १७वी मॅच : इंग्लंड / न्युझिलंड : कँडी = इंग्लंड
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १८वी मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज : कँडी = श्रीलंका
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : १९वी मॅच : ऑस्ट्रेलिया / द आफ्रिका : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : २०वी मॅच : भारत / पाकिस्तान : कोलंबो = भारत
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २१वी मॅच : न्युझीलंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २२वी मॅच : श्रीलंका / इंग्लंड : कँडी = श्रीलंका
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २३वी मॅच : ऑस्ट्रेलिया / पाकिस्तान : कोलंबो = पाकिस्तान
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २४वी मॅच : भारत / द आफ्रिका : कोलंबो = भारत Sad
.
०४ ऑक्टो ................. १ ली सेमीफायनल मॅच : श्रीलंका / पाकिस्तान : कोलंबो = श्रीलंका Lol
०५ ऑक्टो ................. २ री सेमीफायनल मॅच : वेस्ट इंडीज / ऑस्ट्रेलिया : कोलंबो
= वे. इंडीज Lol

०७ ऑक्टो ................. फायनल टी २० मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज: कोलंबो = वे. इंडीज
.
.
चला आपापली मते येउ द्यात..:)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकि लिक्स? Lol (टेनिस हा विषय खुफिया होता हे माहित नव्हतं). Proud

जोक्स अपार्ट, उदयन, मला वाटतं ते स्लॅम चे डेफिनिशन आणि इतरत्र होणारा वापर हे घोळात पाडू शकतं. माझ्या माहिती प्रमाणी, ४ ही मेजर्स (यु एस, फ्रेंच, विंबल्डन, ऑस्ट्रेलियन) ह्यांना इंडिविज्युअली फक्त स्लॅम, मेजर किंवा एक ग्रँड स्लॅम टायटल (जिंकल्यावर) असंही म्हणतात.
सहसा, फक्त ग्रँड स्लॅम (जे तुम्ही लिहीलत) असं म्हंटल्यावर ४ ही मेजर एकाच वर्षात (किंवा लागून वर्ष असली ०९-१०, २०११-२०१२ असं) जिंकलेली असतात असं मला वाटतं. म टा नी लिहीलेलं सुद्धा बरोबर वाटत नाही कारण ग्रँड स्लॅम जेतेपद म्हणजे ग्रँड स्लॅम विनर असा शब्दशः अर्थ होईल जो एरवी (भारताबाहेर) वापरतात त्या काँटेक्स्ट मध्ये चपखल बसत नाही. सेरेनाचे ग्रँड स्लॅम बहुतेक एकदाच आहे जेव्हा तिथे ४ही मेजर्स एका पाठोपाठ जिंकल्या.

हि पन विकि वरीलच महिति ह.....

The four Grand Slam tournaments are considered to be the most prestigious tennis tournaments in the world. They are held annually and include, in chronological order, the Australian Open, the French Open, Wimbledon, and the US Open.

फक्त टेनिस शोधल कि हे भेटत ह.... (http://en.wikipedia.org/wiki/Tennis#Grand_Slam_tournaments) विकिपन confusing च आहे.... त्याच्यावरच्या उड्या पन चुकु शकतात ह.....

फक्त मटा ला कशाला नावे ठेवता????

सहसा, फक्त ग्रँड स्लॅम (जे तुम्ही लिहीलत) असं म्हंटल्यावर ४ ही मेजर एकाच वर्षात (किंवा लागून वर्ष असली ०९-१०, २०११-२०१२ असं) जिंकलेली असतात असं मला वाटतं>>> असं काही नाही. एका स्पर्धेलाही ग्रँड स्लॅम म्हंट्लं जाऊ शकतं.

http://en.wikipedia.org/wiki/Grand_Slam_(tennis). इथे वाचा.

टी २० स्पर्धा जिंकण्यासाठी भारताला शुभेच्छा...!

मी ही वाचलं ते. त्यात सुद्धा पुढे दिलेच आहे. विदाऊट क्वालिफिकेशन ग्रँड स्लॅम म्हंटलं की ते ४ही मेजर्स कॉन्सेक्युटिवली जिंकले की म्हणतात.
ह्या उपर, इथे कॉमेंटरी करताना सुद्धा करियर स्लॅम आणि ग्रँड स्लॅम टायटल असं स्पेसिफिकली म्हणतात त्यावरुन पण मी लिहीलय. असो. घोळ होणं सहाजिक आहे येवढच म्हणत होतो.

टेनिस या खेळात टी-२० विश्वचषक स्पर्धा यंदा जगात प्रथमच होणार आहे का? टेनिस मधे टी-२० म्हणजे काय? क्रिकेटसारखे, टेनिस मधे पण फक्त २० व्हॉलीत जो जिंकेल तो जिंकला असे का?!

मला वाटले क्रिकेटबद्दल धागा आहे म्हणून वाचायला आलो तर हे काही वेगळेच दिसते आहे.

हारलो एकदाचे.................म्हणजे नव्याने सुरुवात आता

जर सर्व संघ आपापल्या पहिल्या गटातून अपेक्षेप्रमाणे वर आले तर सुपर ८ चे गट असे होतील .
१. इंग्लंड, वेस्ट इंडिज , श्रीलंका , न्युझिलंड
२. भारत , ऑस्ट्रेलिया, द आफ्रिका , पाकिस्तान

प्रत्येक गटातून २ संघ सेमीज ला जातील . जरी हे ICC Ranking प्रमाणे असल तरी , पहिल्या गटातून कुणीतरी दोघे असणारच Sad आणी त्याही पेक्षा दुसर्या गटातील दुसरे कुणीतरी नसणारच Sad हे काय पटत नाय बा आपल्याला Happy

केदार धन्यवाद. हे माहीत नव्हते.म्हणजे सुपर ८ मधून नेहमीसारखे टॉपचे ४ जाणार नाहीत सेमीज ना असे दिसते. याचा एक अर्थ असा की महत्त्वाच्या सामन्यांत खेळ उंचावणार्‍या संघांचे महत्त्व कमी केले आहे Happy

आज ऑसी विरुध्द आयर्लँड.........भारत विरुध्द अफगानीस्तान..
.
आर्यर्लड ने गेल्या वर्ल्ड कप मधे इग्लंड ला हरवलेले......;)

जिंकले........भारताने...तब्बल ४५ च्या वर बॉल्स वर रन्स बनवले नाहीत.....अफगाणिस्तान सारख्या नवख्या टीम ने सुध्दा घाम काढला.......काय होईल पुढे देव जाणे

घ्या च्यामारी.........द आफ्रिकेने आपन नंबर १ का आहे हे दाखवुन दिले...झिम्बांबे सारख्या संघाला चिरमुड्या चित केले...याला म्हणतात चँम्पिअन सारखे खेळणे.......नाहीतर आपले खेळाडु....... भारतीय संघ राजेशाही महाल मधे राहत असताना भिकार्यासारखे वागणे कधी सोडेल..??? Angry

अजून सामना संपलेला नाही. इतक्यात निष्कर्ष काढू नका.

म्हणजे द. आफ्रिका कोलमडेलच असं काही म्हणत नाहीये. फक्त "Cricket is a beautiful game of glorious uncertainties" वगैरे सारख्या वाक्यांची उजळणी कधी करावी लागेल सांगता येत नाही. इतकंच. Happy

आफ्रिका फक्त सेमी मधेच कोलमडते.......एरव्ही बिन्धास्त बेटींग करा Happy

cricgamble.com
इथे ऑनलाईन बेटींग खेळु शकतात... फक्त पाँईट्स वर.....:)

मॅकुलम धोधो धुतोय.............शतक झाले .........केकेआर च्या आयपीएल च्या पहिल्या मॅच ची आठवण झाली....
१२३ रन्स. त्यात...७ षटकार...७ * ६ = ४२.. आणी.११ चौकार...११ * ४ = ४४.... __ ४२ + ४४ = ८६ रन्स तर फक्त १८ बोल्स मधेच आलेत...............................;)

अनुमोदन उदयन , त्याने RCB ची केलेली धुलाई आठवली .
त्याच हिटींग तर जबरदस्त होतच , पण त्यात फक्त १० डॉट बॉल्स होते हे ही महत्वाच .

या मॅच मधे सुध्दा १० च डॉट आहेत त्यात एकामधे तो आउट झाला.......म्हणजे फक्त ९च....... Happy
नाहीतर आपले.................तब्बल ५० डॉट बॉल्स होते आपल्या मॅच मधे..........:(

.उदयन,
नका हो बी सी सी आयच्या संघाबद्दल इतके नकारात्मक लिहू! आशावादी असावे.

जिंकतील तेहि अधून मधून. जरा इतरांनाहि संधि द्यावी, नाहीतर त्यांच्याशी खेळायला कुणीच येणार नाहीत. मग पैसे कसे मिळणार?
Happy

आजचे डिविलियर्स ने केलेले स्टंपिंग पाहिलेत का? जबरी आहे. क्रिकइन्फो वर हायलाईट्स आहेत. लंकेची पहिली विकेट.

संघात खचाखच फलंदाज भरले असताना इंग्लंडविरुद्ध इर्फानला सलामीला कां पाठवला कुणी सांगेल ?

धोनीने सांगितले ना " And we opened with Irfan because he is a gutsy player. He may not look pretty, but he responds to the call. " म्हणजे काय ते विचारू नका फक्त. सेहवाग असता तर left right combo करायचे म्हणून समजू शकतो पण गंभीर बरोबर का ? आणि पाठवलेच तर तो slog करायचा अशा हेतूने खेळत होता असे वाटले नाही.

धोनीने स्वतःच्या ऐवजी युवराजला वर पाठवायला हवे होते, he is completely under cooked going into super 8 now. hardly has spent time in middle. आजच्या मॅचवरून चारच बॉलर का हे कळले Wink

कालच्या विजयाचा आनंद व कौतुक असूनही, त्या सामन्यात मला खटकलेल्या किंवा जाणवलेल्या कांही गोष्टी-
१] इर्फानला प्रयोग म्हणूनही सलामीला पाठवणं व युवराजला एकही चेंडू खेळायची संधी न देणं अनाकलनीय;
२] टीव्हीवर सुरवातीला खेळपट्टीचं वर्णन 'बाऊन्सी' असं करण्यात आलं पण चावला व भज्जीला मिळालेल्या विकेट चेंडू खाली राहिल्यामुळेच मिळाल्या असं मला वाटतं;
३] लागोपाठ दोन चेंडूंवर पूर्णपणे ' बीट' झाला असूनही तिसर्‍या चेंडूवर ठरवून उचलाउचली करणं [ व बाद होणं]
हे कोहलीच्या ' ओव्हरकॉन्फिडन्स'च्या दिशेने होणार्‍या वाटचालीचं लक्षण तर नाही ना ? व
४] ह्या विश्वचषकात जर फिरकीचं असंच वर्चस्व रहाणार असेल, तर आपली फलंदाजी दर्जेदार फिरकीपुढे मोठी धांवसंख्या उभारूं शकेल ? हल्ली फिरकी गोलंदाजी लिलया खेळण्याची आपली मक्तेदारी इतिहासजमा झालेली दिसते, म्हणून ही शंका !

Pages