१० दिवस, ३९० स्पर्धक, १५ सुवर्ण पदके
- तीन प्रकारच्या बंदुकांचा वापर केला जातो.
- पिस्तूल
- स्पर्धक १०, २५ आणि ५० मी. लांब असलेल्या स्थिर निशाणावर नेम साधतात.
- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.
- स्पर्धक उभे राहून निशाणाचा वेध घेतात.
- पुरुष व महिलांच्या १० मी. एयर पिस्तूल
- महिलांच्या २५ मी. पिस्तूल
- पुरुषांच्या ५० मी. पिस्तूल
- पुरुषांच्या २५ मी. रेपिड फायर पिस्तूल अश्या पाच स्पर्धा
- रायफल
- स्पर्धक १० किंवा ५० मी. लांब स्थिर असलेल्या निशाणावर नेम साधतात.
- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.
- स्पर्धक तीन प्रकारे वेध घेऊ शकतात.
- उभे राहून
- गुडघ्यावर बसून
- झोपून
- पुरुष व महिलांच्या १० मी. एअर रायफल
- पुरुष व महिलांच्या ५० मी. रायफल ३ प्रकार (ऊभे राहून, गुडघ्यावर बसून, झोपून)
- पुरुषांच्या ५० मी. रायफल प्रोन (झोपून) अश्या पाच स्पर्धा
- शॉटगन
- स्पर्धक हालाणार्या मातीच्या निशाणावर नेम साधतात.
- निशाण स्पर्धकाच्या डोक्यावर आणि समोर उडवले जाते.
- स्पर्धक उभे राहून वेध घेतात.
- पुरुष व महिलांच्या ट्रेप
- पुरुष व महिलांच्या स्कीट
- पुरुषांच्या दुहेरी ट्रेप अश्या चार स्पर्धा
- सर्व स्पर्धक पात्रता फेरीत भाग घेतात.
- सर्वोत्तम खेळाडू अंतिम फेरीत पोहोचतात.
- बहुतेक स्पर्धात अंतिम फेरीतील गुण पात्रता फेरीत मिळवले जातात. त्याला अंतिम गुणफलक असे म्हणतात.
- सर्वात जास्त गुण मिळवणारा स्पर्धक सुवर्ण पदाकाचा मानकरी ठरतो.
- पदकासाठी गुण समान झाल्यास एक एक नेम साधून विजेता ठरवला जातो.
- आधुनिक ऑलिम्पिक १८९६ मध्ये सुरु झाल्यापासून नेमबाजी स्पर्धा सगळ्या स्पर्धात समाविष्ट केली गेली आहे.
- महिला नेमबाजी स्पर्धा लॉस एंजेलिस च्या १९८४ सालच्या स्पर्धापासून घेतली जाते.
राहीची प्राथमिक फेरी अजून
राहीची प्राथमिक फेरी अजून संपलेली नाही का? प्रिसिजन राउंड झालाय. रॅपिड फायर बाकी आहे.
http://www.fuzilogik.com/Sports-Library/Shooting/Shooting-Rules.html
Women's 25 meter --- Pistol
This event is made up of six series of five precision shots, and six series of five rapid-fire shots. Each precision series must be finished in five minutes, while each shot of the rapid-fire series must be finished in 3 seconds. The eight top shooters from the qualification round move on to the final round, which consists of ten rapid-fire shots.
हो ह्याचे रूल्स नक्की काय
हो ह्याचे रूल्स नक्की काय आहेत कळत नाहीये. किती जणी जाणार पुढे ?
शूटिंगच्या सगळ्याच स्पर्धांत
शूटिंगच्या सगळ्याच स्पर्धांत अंतिम फेरीत ८ स्पर्धक असतात असे दिसतेय.
महिलांच्या १० मीटर एअर पिस्तोलचा निकाल :
http://www.london2012.com/shooting/event/women-10m-air-pistol/phase=shw2...
भारताची हीना संधू बारावी, अनु राज सिंग २३वी.
मयेकर, ती लिन्क २९ जुलै ची
मयेकर, ती लिन्क २९ जुलै ची आहे वाटतय.
अश्विनी, माहीत आहे. स्पर्धेचा
अश्विनी, माहीत आहे. स्पर्धेचा फॉर्मॅट समजण्यासाठी दिलीय.
दुसर्या गटाचे प्रिसिजन राउंड सुरू झालेले आहे.
ok
ok
शूटींगचे क्वालिफिकेशन राउंडस
शूटींगचे क्वालिफिकेशन राउंडस टीव्हीवर का दाखवत नाहित कळत नाही. आतापण त्या तिरंदाजीचे प्रक्षेपण चालू आहे ज्यात आपले कोणिच नाही.
शूटिंगपेक्षा तीरंदाजीत
शूटिंगपेक्षा तीरंदाजीत प्रेक्षकांना जास्त मजा येत असावी. थोड्या वेळाने दीपिका कुमारीचा सामना आहे.
दुसर्या गटात दोघींनी १००/१०० स्कोर केलाय.
अनु राज सिंग ९६
राही ११ व्या नंबरवर आणि अन्नु
राही ११ व्या नंबरवर आणि अन्नु राज सिंग २८ व्या नंबर वर.. आता रॅपिड फायर मध्ये काय करतात ते बघायचे.
रॅपिड फायरमध्ये राहीने ५८२
रॅपिड फायरमध्ये राहीने ५८२ स्कोर केलेला दिसतोय
मयेकर पान चुकीचं दाखवत आहेत.
मयेकर पान चुकीचं दाखवत आहेत. ते गुण ऑलिम्पिक्स पात्रतेचे आहेत..
Men's Double Trap च्या
Men's Double Trap च्या क्वालिफायरमध्ये रंजन सोधी दुसर्या क्रमांकावर आहे.
आता पहिल्या नंबरवर आला !!!
आता पहिल्या नंबरवर आला !!!
पहिल्या फेरीनंतर पहिले चौघे
पहिल्या फेरीनंतर पहिले चौघे ४८ गुणांवर... त्यात सोधी चवथ्या नंबरवर
मला तो चौथ्या नंबरावर दिसतोय,
मला तो चौथ्या नंबरावर दिसतोय, पण पहिल्या चारांचे गुण सारखेच आहेत. म्हणजे ते संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत का?
दुसरी फेरी संपली का कळंना.
दुसरी फेरी संपली का कळंना. सोधी ४८+४४=९२ सातव्या स्थानी सरासरी ०.९२ पहिल्या क्रमांकाची ०.९६
नियम काय की कळेनात.. एकूण गूण
नियम काय की कळेनात.. एकूण गूण बघता सोढी संयुक्त चौथ्या स्थानी असायला हवा.
सेम..कळत नाहीये. पहिले ६
सेम..कळत नाहीये. पहिले ६ जाणार पुढे..आता ६ आणि ७ चे गुण समान आहेत.
दुसर्या ईवेंटमधे विजय कुमार ३ नं वर आहे
सोधी सहाव्या नंबरवर... ९२
सोधी सहाव्या नंबरवर... ९२ गुणांसह.
दुसरीकडे विजय कुमार पात्रता फेरी एक नंतर तिसर्या स्थानावर.. अजून ६ स्पर्धक बाकी आहेत. त्यांची नेमबाजी झाल्यावर पूर्ण क्रमवारी कळेल.. पण विजयचे सध्याचे गुण २९७.
पन्नास गुणांची एक पात्रता
पन्नास गुणांची एक पात्रता फेरी अजून आहे.
1 Great Britain WILSON Peter Robert Russell 48 48 0.960 96 +
2 Kuwait ALDEEHANI Fehaid 47 47 0.940 94 +
3 Hungary BOGNAR Richard 44 49 0.930 93 +
4 Russian Federation MOSIN Vasily 48 45 0.930 93 +
5 Russian Federation FOKEEV Vitaly 44 48 0.920 92 +
6 India SODHI Ronjan 48 44 0.920
चौघांन सोधीपेक्षा जास्त गुण आहेत. पाचवा, सातवा दोघांचे ९२ गुण आहेत.
विजयकुमारची पात्रता फेरीची
विजयकुमारची पात्रता फेरीची स्टेज १ दिसतेय. म्हणजे अजून पात्रता फेरी बाकी आहे (?)
डबल ट्रॅपच्या पात्रता फेरीचा
डबल ट्रॅपच्या पात्रता फेरीचा तिसरा भाग सुरू झालेला आहे.
उरलेल्यांची पहिली फेरी
उरलेल्यांची पहिली फेरी झाल्यावर विजयकुमार पाचव्या स्थानी.
विजय कुमार क्रमांक ५ वर
विजय कुमार क्रमांक ५ वर Qualification Stage 2 मध्ये दाखल.. शुभेच्छा..:)
खरेतर क्रमांक २ ते ६ पर्यंत सर्वांना समान गुण आहेत पण Inner 10's चा स्कोअर प्रमाणे विजय कुमार क्रमांक ५ वर..
सोधीचे शेवटचे २५ शॉट्स सुरू
सोधीचे शेवटचे २५ शॉट्स सुरू झालेत.
विजयकुमारची पात्रता फेरी
विजयकुमारची पात्रता फेरी संपली का? वर्ल्ड रेकॉर्ड ५९१. सध्या सगळ्यांचे स्कोर ३०० पैकीच आहेत.
मयेकर.. २५ मी. रॅपिड फायर
मयेकर.. २५ मी. रॅपिड फायर मध्ये पात्रता फेरी पूर्ण झालेली नाही.. अजून ३० शॉट्स उद्या आहेत.. आणि त्या नंतर फायनलचे स्पर्धक ठरतील.. तरीसुद्धा पहिल्या ३० शॉट्स मध्ये ५वा हा नंबर विजयकुमार साठी नक्कीच निकाल आहे..
गो सोधी आणि विजयकुमार
गो सोधी आणि विजयकुमार
सोधी बाद का? अकरावा दिसतोय.
सोधी बाद का? अकरावा दिसतोय.
सोधी शेवटच्या २५ गोळ्यांमध्ये
सोधी शेवटच्या २५ गोळ्यांमध्ये फारच वाईट नेम साधत अंतिमफेरीत नाही... ५० पैकी फक्त ४२ गोळ्या निशाणावर..
Pages