ववि२०१२-वृत्तांत

Submitted by ववि_संयोजक on 23 July, 2012 - 02:48

मंडळी ,इथे आपला २०१२ वविवृत्तांत किंवा ववि२०१२ संदर्भातला आपला प्रतिसाद टाका.

विषय: 

बाकी मंजात्या म्हणतेय तसे "७५% नवीन आयडींचा ववि" हे खरेच... पण त्यामुळे खूपजणांचे खूप जणांशी 'नमस्कार-चमत्कार' राहूनच गेलेत.... संस ने पूर्णवेळ खेळ इ इ मध्ये इतके गुंगवून ठेवले की नविन ओळखी, जुन्यांशी गप्पा यांना पुरेसा वेळ मिळालाच नाही!!
आता इथे येउन 'अरे! ह्याला भेटलोच नाही, अरे! हिच्याशी बोललेच नाही ' सुरु झालेय.......... शिट्ट्या न वाजवता थोडे मोकळे पण सोडायला हवे होते की मास्तर लोकांनी आम्हाला!! (भा. सं. ल. ठे च!!! )
Happy
हिम्स्कूल ने टाकलेले ताजे फोटो!! Rofl

अगा... हो म्हणायला माझं काय जातंय.. Proud
त्याला लौकरच कळेल दीदीबीदी च्या परमिशन चा कायपण उप्पेग न्हाय ..

च्यायला.... सर्वांचा काहीतरी भलताच गैरसमज झालेला दिसतोय मी आणि माझ्या बायकोच्या गोड नात्याबद्दल.. Angry

आजच माझा क्रमशः वृत्तांत पुर्ण करून त्यातच काहीतरी स्पष्टीकरण दिले पाहिजे बाबा... Proud

रुमा तू आरोही आणि निहिरामध्ये बुडून गेल्यामुळे तुला बाकीचे कोण कोण आले होते तेही आठवत नाहीये का??? >> हिम्या मी तिला तुझी लेक का नव्हती आली असं विचारायचं होतं बघ.. मंजिरीला कळल्या माझ्या भावना पण.. आणि हो आरोही नी निहीरामुळे मी नक्की कोणाकोणाशी बोलले तिथे ते आता खरच आठवत नाहीये...

रुमा, यावर्षी मी अगदी एकटी आले होते, निवांsssssssssत...... पोरं-लटांबर नसलेली>> छान छान Happy

आजच माझा क्रमशः वृत्तांत पुर्ण करून त्यातच काहीतरी स्पष्टीकरण दिले पाहिजे बाबा... >> आत तू पुढच्या वर्षी बाबा होण्याचं स्पष्टीकरण देणारेस.... खरच्च अवघड आहे हा तुझं

सगळ्यांनी 'लई भारी' सर्टिफिकेटवाले वृत्तांत लिहिलेत त्यामुळे लिहायचं काही बाकीच राहिलंच नाही, पण तरी जे राहिलं (असेल) आणि लिहावंसं वाटलं ते.
***

राजाराम पुलाजवळ नेहमीचे यशस्वी आयडी गाडीत आणि ऐन भरात एकाच वेळी आले. पुढे कोथरुड स्टॉपला अजय आला तेव्हा सर्वांनी जमेल तितकं नम्र अभिवादन उरकून घेतलं. अजयनेपण खानदानी नम्रपणे अभिवादन करून घेतलं. माझा हॅपी बड्डे पण झाला. इतक्या शुभेच्छा मिळत आहेत याअर्थी यापुढे त्या लागणारच अशी मी समजूत करून घेतली. मर्फीज लॉची सवय, दुसरं काय.
*
हिंजवडीला केदार चढला तोपर्यंत गायकी बर्‍यापैकी फॉर्मात सुरू झाली. रीयाचं बोलणंही बर्‍यापैकी जास्तीत जास्त सांगितीक होऊ लागलं होतं. ती बोलत असताना गाणं म्हणतेय का काय या संशयाने सारे कान टवकारत, पण ते नुसतंच 'बोलणं' असल्याचं सार्‍यांचं लक्षात येई. केदारने 'दादा अज्जिचब्बात म्हणायचं नाही' असा दम भरला. बाकीच्यांना दादा म्हणवून घेण्यात विशेष प्रॉब्लेम नव्हता. नाईलाजाने असेल.
*
प्रत्येक बोगद्यातून गाडी जाताना, रेडिओ स्टेशनची रेंज जाऊन हलकल्लोळ ऐकू येतो किंवा अनेक गुराख्यांनी एकाच वेळी ओरडावं तसा हाकारा गाडीत होऊ लागला. मग दिवसभर माळावर चरून संध्याकाळी गावात येणार्‍या गुराख्यांना नि जनावरांना शिस्तीत रांगेत लावावं त्याप्रमाणे अजयने 'नुकतीच गेली माझी मामी' हे गद्य गाणं तालासुरात नि कोरस करायला लावून म्हटलं. रीयाचं पद्यात गद्य बोलणं आपोआप काँपेन्सेट झालं.
*
अजयचा पद्यातला गद्य आवाज खूप छान आहे. बाकी त्याच्या नेहमीच्या गद्य आवाजात दीड दशकांच्यावर अ‍ॅडमिनगिरी आणि हेडमास्तरकी करून लागलेला, सापडलेला सूर सापडतो. रीयाचा गद्य आवाज कसा असेल ते शेवटपर्यंत कळलं नाही. केदारचं गद्य आणि पद्य दोन्ही 'इतिहास'जमा झालं असावं. खड्या सुरात वेदपुराणातली पात्रं निवडून त्याने पुंडलिकवरदा हे सुप्रसिद्ध घोषणागीत म्हटलं. मयूरेशचा कार्याध्यक्षाचा सूर अनेक वर्षे कष्ट करून घोटून घेतलेला नि बायकोलेकीच्या सुरांतही तुकारामाच्या गाथेगत तरंगलेला, ओळखीचाच. मल्लिनाथला संयोजकांचा आवाज सापडला, पण सूर मात्र सापडत नाही. मीनू-नीधप-पूनम या सुरांची साथसंगत नसतानाही आपला सूर कसा दणकेबाज लागतो, आणि त्याला गद्यपद्याची कशी फिकिर नसते- हे आशूने त्याआधीच सिद्ध केलं होतं. हिम्याला आपला सूर आरोहीच्या सुरात विसर्जन झाल्याने स्वतःचे असे खास आरोह-अवरोह काहीच राहिलेले नाहीत. परेशचा सूर कवितांबरोबरच संपला का काय असं वाटलं. केदारजाधवचा नवीन दबका सूर अजून लागायचाच होता. मंजिरीचा सूर फक्त वाहत्या बाफांवरच लागतो असं वाटलं. देवाचा सूर संथ पार्श्वसंगीतासारखा मुद्दाम मठ्ठ चेहरा करून सार्‍यांना साथसंगत करणारा, पण खास नाट्यगीतांचा नि गझलांचा. या सार्‍या इतक्या सुरांशी वविला न येणार्‍या मित्रांनी जरा विसंवादीच सूर लावला असं वाटून गेलंच. या सार्‍यांशी सूर मिळवता मिळवता माझा दिवस गेला. किंवा बनला.
*
ओळखीच्या कार्यक्रमात अजयने 'अजय हा माझा आयडी आहे आणि माझे अडतीस हजारांवर ड्युप्लिकेट आयडी आहेत' अशी ओळख करून दिली. यासाठी एकदा टाळ्या झाल्याच पायजेत.
*
संयोजन समितीने गेल्या २-३ वर्षांपासुन नेहमीपेक्षा वेगळा सूर लावायची परंपरा सुरू केली आहे, ती याही वर्षी पाळली. सुंदर आणि कल्पक खेळ, नेटकं नियोजन. म्हणींच्या खेळात काही अगम्य म्हणी होत्या खर्‍या, पण त्या नव्या सुरातल्या असाव्यात अशी समजूत करून घेतली. निंबुडाने लिहिलेले उतारे, त्यांवर सर्कस करून हसून पोट दुखवणारे मायबोलीकर, बागुलबुवासारख्यांची बिलंदरगिरी नि आशूडीसारख्यांची हुशारी सार्‍यांनी बघितली. देवकाका मध्येच वरती हात उडवून सांसबद्दल तकारीचा सूर लावून जणू 'हे म्हणजे थोरच.. हे म्हणजे भलतंच..' असं काहीसं म्हणत होते. भिडेकाका सार्‍यांचा सूर पकडण्याचा प्रयत्न करत असावेत. किंवा मग 'आपल्या क्रीडासाधनेत व्यत्यय तर नाही ना आणत आहे मी?' असं तरी विचारत असावेत.
*
नाटकवाल्यांचा सूर या सार्‍यांत अत्यंत खास म्हणता येईल असा. भेदक डोळे, खर्जातले आवाज, अफाट देहबोली आणि सुंदर अभिनय हे सारं किंवा काहीनाकाही या गुणी लोकांकडे होतं. विवेकदेसाईच्या खड्या सुरांत सुरू झालेल्या गार्‍हाण्यानेच नाटाक भन्नाट असल्याची ग्वाही दिली होती. माफक 'प्रॉपर्टी'मध्ये आणि वीस मिनिटांच्या माफक वेळेत या लोकांनी अफाट मनोरंजन केलं. हसून लोळवलं. विवेक, विनय, अमित, वैभव, घारूअण्णा, आनंद्सुजू, आनंदमैत्री.. मनापासून आभार.
*
येताना पुन्हा सूर लागले. परेशलिमयेचं '..भैय्या गेला गावाला' झोकात झालं. फू बाई फूही कोरसमध्ये झालं. फुल्या फुल्याही गाऊन झाल्या. हे सारं होऊन पोट भरल्यावर पुणं आलं आणि पावलं जड झाली. कॉन्क्ल्युडिंग नोट म्हणजे निरोप घ्यायचा प्रकार. ते फारच जीवघेणं. तेव्हा ते खरं तर तसं नको. पण त्याशिवायही चालत नाही म्हणून मग तडजोड म्हणून हबाच्या ओळी उसन्या घेतो.. ''आयुष्याच्या शंभर पानी वहीचं एक पानं जिव्हाळ्याच्या रंगानी रंगून गेलं... आपल्याचं आयुष्याला आघाशीपणे वाचावं असं वाटणारी खूप कमी लोकं असतात. त्यातली बहुतांश मायबोलीवर असतीलच.... असं आपलं मला सहजच वाटलं..''
***

अजून काही सांगण्यासारखं आठवलं तर लिहिन पुन्हा. बाकी सारं काही (आणि अर्थातच सार्‍यांची नावे) इतरांच्या वृत्तात आली आहेतच. शिवाय तर्‍हेतर्‍हेच्या स्मायल्याही. त्यामुळे त्याही टाकल्या नाहीत. काही चुकल्यास दिवा घ्या. उजळून टाका, जीवनाच्या वाटा.

साजिरा.. खूपच सुंदर वृतांत
मर्फीज लॉ.. Lol
सगळ्यांची रसभरित वर्णनं वाचून आपण काहीतरी खूप खूप मिसल्याचा फार्फार खेद वाटतोय Uhoh

साजिर्‍याचा हृद्य का काय म्हणतात तसा वृत्तांत Wink

मस्तच अगदी!

कॉन्क्ल्युडिंग नोट तर अगदी टडोपाआ Happy

साजीरा स्पेशल वृत्तांत... एकदम मस्त...

साजीर्‍या...
तुझा जाहीर निषेद, निषेद, निषेद... माझा उघड-उघड 'अणुल्लेख'???....
Proud
नाही रे बाबा... सहज गम्मत करत होतो... Happy

साजिरा, तू काय 'वृत्तांताच्या नजरेतून' वविकडे बघत होतास काय? >>> पूनम +१ Happy

साज्या,सही वृत्तांत रे. सगळ्यांचे सूर चांगलेच ओळखलेस की तू .. Happy

साजिर्‍याचा सर्टिफाईड वृत्तांत खूपच आवडला...

कृपया भा.वृ.ले. 'साजिरालॉ' आत्मसात करावा. Wink

सगळे वृत्तांत हेडर पोस्ट मध्ये टाकता येतील का???? खाली फक्त प्रतिक्रीया आणि वृत्तांत वरती... परत वाचायचा असेल तर फार कष्ट पडतील नाहीतर..

अरे वा, भारीच वृत्तांत दिसताहेत... मागच्या वर्षी आणि यंदाही ववि मी मिस्स केली... पण मज्जा आली वाचायला.. धम्माल!

विवेक तुझ्या गार्‍हाण्याचा अनुल्लेख ही मोठीच चूक रे भाऊ. (तुझा एकंदर वावर बघता ते गार्‍हाणं इतक्या दणक्यात आणि भन्नाट होईल असं वाटलं नव्हतं खरंच). दुरूस्त केली. Happy

पूनम, कुठच्या नजरेनं बघावं ते मला शेवटपर्यंत सापडलंच नाही. माझ्यासकट सार्‍या वविकरांवर एक हेडमास्तरकी प्रेमळ नजर सतत भिरभिरत होती. Proud वृ लिहायचा कंटाळा आला होता. कारण सारंच वरती येऊन गेलं आहे. तरीही आज अचानक वेळ मिळताच सुरसुरी आली. परंपरा कशी मोडणार ते पण एक.

*
भरत भेटीच्या सोहळ्याचं राहिलंच. इंद्रा, घारू, दोन्ही आनंद, नील, विनय, अमित यांसारख्या काही जुन्या वविकरांबरोबर भेटी-मिठीचा सोहळा करताना एक अगम्य प्रकारे उचंबळून येतं. जास्त काही न बोलता एकमेकांच्या पाठींवर आश्वासक हात थोपटले जातात. तेवढं वर्षभर पुरतं. या वार्षिक भेटी वर्षानुवर्षे अशाच चालत राहाव्यात अशी इच्छा आहे.
*
आता नीरजेने खालील पोस्ट टाकलीच आहे तर.
ते चहाचं प्रकरण दरवर्षी कितीही काळजी घेतली तरी काहीतरी दैवीशक्तीच्या हस्तक्षेपाने होतं म्हणजे होतंच. यावर्षी तर अख्खा अर्धा कप चा आणि तोही शर्टावर सांडला. माझी चूक नाही. (चुकून) धक्का देणार्‍याचीही (बहुधा रीयाची धाकली बहिण) चूक नाही. रस्त्यात फूडमॉलवर चा प्यायला थांबलो तेव्हा खूप गर्दी असताना पाऊस आला नि मागे सरकत असताना एकमेकांच्या पाठींचा धक्का. साग्रसंगीत चाप्रकरण झालं. स्लॅश यापुढे काढण्यात यावा असाही ठराव पास झाला. कळावे. कृपया. धन्यवाद.
*

Pages