निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी लाल रंगाचं कृष्णकमळ प्रत्यक्षात पाहिलं नाहीये कधी ..

>>>> वर्षु तै... बहुदा माझ्याकडे आहेत काही फोटो आत्ता.. काम झाले की बघतो. नसतील तर मी घरी गेलो की टाकिनच.. Happy

कोकिळेलाच पावश्या असं पण म्हणतात का?>>>> पान १८ वर चिमुरीने हे विचारले होते -
पावशा म्हणजे ब्रेन फिव्हर बर्ड - "पेर्ते व्हा पेर्ते व्हा" असे ओरडतो - खूप जोरात - कर्कश्शच म्हटलं तरी चालेल इतका -
असा दिसतो हा पावशा - (फोटो आंतरजालावरुन).........

images.jpeg800_00591286.jpg

हो शशांक, तेच ते लाल कृष्णकमळ.
---------

वरचे साधनाचे पोस्ट वाचून गमतीशीर विचार मनात आले.
वाघापेक्षा बिबट्या धूर्त खरा, पण त्याने जास्त प्रयत्न करुन जूळवून घेतलेय. तो कुठल्याही वातावरणात राहू शकतो. त्याला उन्हाचा त्रास होत नाही. तो दिवसा आणि
रात्रीदेखील शिकार करु शकतो. त्याला खाण्यासाठी कुठलाही प्राणी चालतो.. वगैरे

आता साधना जसे म्हणतेय कि तो माणसाच्या जवळ यायचा प्रयत्न करतो, त्याचा
अनुभव मीदेखील घेतला आहे. इथल्या नॅशनल पार्कमधे तो गवतात उताणा लोळत
होता. मला त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. म्हणून तिथल्या सुरक्षारक्षकाच्या मदतीने
मी जरा जवळ गेलो. तसे मधे तारांचे कुंपण होते, पण मला बघून तो धावत कुंपणाजवळ आला. आणि गुरकावला.

आता मला ते गुरकावणे वाटले पण कदाचित त्याने हॅलो वगैरे पण केले असेल.
तर या मैत्रीच्या हाताचा फायदा घेऊन, माणसाने त्याला माणसाळवले तर ?
सध्या कुत्रे कसे माणसाच्या सोबतीशिवाय जगूच शकत नाहीत, तसे बिबट्याचे
झाले तर ?

कल्पना करा, एखाद्या सोसायटीत रखवालदार म्हणून दोनचार बिबटे ठेवले आहेत.
सोसायटीतली मुले त्याच्याशी दिवसभर खेळताहेत. सोसायटीतले भटके कुत्रे, घुशी
इतकेच नव्हे तर सोसायटीमधल्या लोकांनी टाकलेले मांसाहारी पदार्थाचे टाकाऊ
भाग खाऊन तो मजेत जगतोय.
रात्री मात्र तो रखवाली करतोय. कुणा चोराची हिंम्मतच होणार नाही, त्या सोसायटी
कडे वाकडी नजर टाकायची.
अगदीच अशक्य नाही हे. आपले कुत्रे पण कोणे एके काळी जंगलातील, कोल्ह्या
लांडग्याप्रमाणेच होते.

ही वेल कसली आहे ? ही फुले आहेत. आमच्या कुंपणाला आहे. पण वेलीला पाने नाहीत. साधारण तोंडल्यासारखी कडक वेल आहे.

पण वेलीला पाने नाहीत.>>>> दोन -चार पाने असली तरी शोधून टाक ना फोटो........ नुसत्या फुलांवरुन अवघड आहे अगदी - दिनेशदांना शक्य आहे म्हणा......

जागू, अमरवेलीचा प्रकार वाटतोय हा. पण ती पिवळी असते. तिलाही पाने नसतात पण अशीच पांढरी फुले येतात. फ्लॉव्हर्स ऑफ सह्याद्री मधे सापडेल नाव.

शशांक, नाही हो. मला पुस्तकातच बघावे लागते.

आजच्या सकाळला आहे की भिमाशंकर रोडवर गौरीशंकराची फुलं फुललेली आहेत..एक एक फुल कलिंगडाएवढं Happy

रच्याकने, निगच्या कुठल्याशा भागात बागेतल्या उंदीर घुशींच्या नियंत्रणाबद्दल लिहिलं होतं... कुणी द्याल का ती लिंक अर्जंटली. मला आज तो बंदोबस्त करायचाच आहे.

मीराधाने वर्णन केलेले पांढर्‍या फुलाचे झाड, बारतोंडी तर नसेल ? आजच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीतील एका लेखात, तशाच एका झाडाचा उल्लेख आहे.

आर्या,
ग्लिरीसिडीया / गिरिपुष्प / उंदीरमारी च्या फांद्या रोवाव्या लागतील. त्यापुर्वी मात्र
एखादे औषध टाकून, असतील त्या प्राण्यांचा बंदोबस्त करावा लागेल.

हो दिनेशदा...तुम्हीच त्या धाग्यावर उपाय सांगितला होता हे ही मला आठवतय.
आणि कुठलसं नायट्रस ऑक्साईड की काहीतरी केमिकल पावडर कणकेत मिसळुन घुशींच्या बिळात टाकावी असं कुणीतरी सांगितलं होतं!
नक्की कुठलं केमिकल आहे ते हेच बघायला आज आले होते. Sad
निगच्या ३र्या भागात आहे का ते?

रच्याकने, निगच्या कुठल्याशा भागात बागेतल्या उंदीर घुशींच्या नियंत्रणाबद्दल लिहिलं होतं... कुणी द्याल का ती लिंक अर्जंटली. मला आज तो बंदोबस्त करायचाच आहे.>>>>>> पुण्यातील म. फुले मंडईच्या आसपास किंवा जवळच्या केमिस्टकडे - झिंक का अ‍ॅल्युमिनियम फॉस्फाईड मिळेल (काळी पावडर असते) - ते भज्यां (तयार भजी) सारख्या टेम्पटिंग बेटमधे टाकून पसरवून ठेव - (कुत्री, मांजरे, लहान मुले, पक्षी यांना पोहोचता येणार नाही हे पहा) - हे खूपच प्रभावी औषध आहे. बाकी केमिस्टकडे मिळणारी ती पॅकबंद बेट्स काही कामाची नाहीत.......

धन्स शशांकजी! बघते करुन! घुशींनी वाट लावलीय बागेची.पार शेजारच्यांच्या बागेपर्यंत आरपार बिळे आहेत. Sad

जागुतै...मी आजच्या सकाळ पुरवणीत वाचलं(हार्ड कॉपी)! शोधतेय मी पण नेटवर...थांबा!

http://epaper.esakal.com/Sakal/21Apr2012/Enlarge/PuneCity/PunePctoday/pa...

जागुतै आणि निगप्रेमींनो.. ..गौरीशंकराच्या फुलांसाठी ही लिंक बघा! Happy

उघडली लिंक.
ते झाड कुंभाचे वाटतेय. त्याची फळे मोठी असतात पण कलिंगडाएवढी नाहीत.
फारतर अवाकाडो एवढी. फुलांना भयंकर घाण वास येतो. (नासलेल्या दूधासारखा )
पण फळे गुरे आवडीने खातात.

भिमाशंकराच्या वाटेवर श्रावणात नागफणी अमाप फुलते. पांढरी फुले (खरेतर पानेच)
असतात. अळूच्या कूळातली आहेत.

आणि कॅनन बॉल त्याला नव्हे तर कैलाशपतीच्या फळांना म्हणतात. ती असतात
कलिंगडाएवढी. (बालगंधर्वाच्या आवारात मोठे झाड आहे.) कलाबाशची फळे त्यापेक्षा मोठी होतात, त्याचे झाड संभाजी पार्कात आहे.

काही कळत नाही दिनेशदा... मुळची अफ्रीकेतली फुलं म्हणतायत ती. इंग्रजांनी भारतात आणली असं म्हटलय. आणी सुवासीक म्हणतायत ती फुलं Uhoh

लिंक डायरेक्ट ओपन होत नसेल तर मी कसं केलं ते सांगते. मी esakal.com जाउन ईपेपर वर क्लीक केलं...त्यात स्कॅनड कॉपीसारखा पेपर दिसतोय. त्यात पिंपरीचिंचवड टुडे पुरवणीच्या ५व्या पानावर तो फोटो आहे.

माफ करा लोक्स. मी आता लॉगाऔट होतेय...!

शशांक्..धन्स रे..मस्त दिसत आहे लाल कृष्णकमळ..
@ रोहन- अरे आतापर्यन्त लाल दिसले नव्हते कधी..आता तू ही फोटो टाक तुझ्या घरच्या बागेतल्या कृ.क चा.
याशिवाय कृष्ण हा निळा जांभळाच दाखवतात नेहमी त्यामुळे या फुलाचा रंग समर्पकच वाटे नावानुसार Happy
दिनेश दा.. बिबटे,कुत्रासारखे पाळीव झाले तर... हाहा.. आयडिया मस्त आहे

बापरे किती वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालली आहे निगप्रेमींनो!!! मस्तच!

आपल्या महाराष्ट्रात विदर्भात भंडारा म्हणून एक जिल्हा आहे. त्याला तळ्याचे शहर म्हणतात. कितीतरी तळी जागोजागी विखुरलेली आहेत. मी पाहिले नाही कधी पण वर्‍हाडातला असल्यामुळे मला ही माहिती आहे. इथे एक क्लिप बघा भंडार्‍याच्या तळ्याची: http://www.youtube.com/watch?v=gBrq0TiqqH4

मारुती चितमपल्ली साहेबांनी भंडार्‍याच्या तळ्याचे कितीतरी ठिकाणी संदर्भ घेतले आहेत.

वाशिम मधे देखील प्राचीन असे तळे आहेत.

लोणारमधे तर अश्नीमुळे निर्माण झालेले केवढे मोठे आणि जुने तळे आहे. पण तिथले पाणी कुणी वापरत नाही कारण कुणी निगा राखलेली नाही.

ईंडोनेशिया हा भारतापेक्षा गरीब देश पण तिथली निसर्गसंपदा नीटनेटकी सांभाळून ठेवलेली दिसते.

दिनेशदा,

गौरीशंकराचे एक फुल अबोली गुलाबी रंगाचे पण असते ना? मी तेच अधिक पाहिले आहे. इथे सिंगापुरात तर कित्येक ठिकाणी गौरीशंकराची झाडे आहेत.

माझे करमळ अजून पेंडींग आहे. आज जाऊन फोटो काढून आणतो Happy

हो बी, भंडारा जिल्हा आहेच तसा. मी गुजराथ मधल्या राजकोट मधे पण अनेक सरोवरे बघितलीत. बिहार, बंगाल पूर्वाचल मधे पण अशी सरोवरे प्रत्येक घराच्या मागे असतात.

अबोली रंगाचे म्हणजे कैलाशपतीच असणार. ते झाड आलेय मलेशियामधून. म्हणजे तिकडे असणारच.

ते लोणारमधले तळे खार्‍या पाण्याचे आहे ना ? त्यातला खारेपणा मिठामूळे नाही तर
वेगळ्या क्षाराने आलाय. त्यामूळे त्याचे मीठ करुनही वापरता येत नाही. पूर्वी त्यात
जीवजंतूही तग धरु शकत नसत. पण आता त्या पाण्यातही जगू शकणारी काहि शैवालं, तिथे निर्माण झाली आहेत.

निगप्रेमींनो, इथे वाचा किती छान माहिती दिली आहे भंडार्‍याच्या लोकांची! असे लिहायला हवे: http://bhandara.nic.in/

पहिल्याच पानावर वाचा.. ते काय खातात काय नेसतात रोजचा दिनक्रम सगळी माहिती आवडली.

दिनेशदा,
मी तिथले पाणी चाखावे इतके स्वच्छ नव्हते ते. निदान काठावरचे पाणीतरी तितके स्वच्छ नव्हते. ह्या पाण्याची पी ऐच स्केल फार जास्त आहे असे वाचलेले आहे. रामफळे विपुल प्रमाणात आढळतात इथे. खाली रामफळाचे मळेच आहेत. मधाची पोळे अनेक झाडांना लगडून आहेत. माकडे, मोर, हरिण दिसतात.

सकाळमधल्या फुला-पक्ष्यांच्या बातम्यावर विश्वास ठेऊ नका. परवा रस्त्यावर पडलेल्या सोनमोहोरांच्या फुलांचा फोटो छापलेला आणि चक्क कॅशिया म्हणजे सोनमोहोर हे वाक्य सोबत ठळक अक्शरात छापलेले.

बातमीतले फुल कुंभाच्या फुलासारखे दिसतेय आणि झाडही तेच आहे. मी भरपुर पाहिलीत कुंभाची झाडे. आंबोलीत आंजनी नी कुंभ ढिगाने पडलेत Happy

कैलाशपती उर्फ कॅननबॉल मध्ये लाल रंगाच्या वेगवेगळ्या छटा आहेत - अगदी पांढरट भगवे ते एकदम गुलाबी ते पुर्ण भगवे, लाल.. हव्या त्या रंगात राणीबागेत उपलब्ध आहे. जिप्स्प्याकडे भरपुर फोटो असतील वेगवेगळ्या रंगातले.

बापरे, ४-५ दिवस यायला जमल नाही तर जवळजवळ १०० पोस्टी राहिल्या होत्या वाचायच्या. सर्व फोटो छान.लाल कृष्णकमळ मस्तच!
मीराधा सांगतेय ते फूल बारतोंडीचेच असावे. आमच्या ईथे पण बारतोंडी फूलली आहे. नवल वाटते एवढ्या मोठ्या झाडाला एवढी नाजूक फूल बघून.जमले तर फोटो टाकेन, म्हणजे मीराधा सांगू शकेल की ती म्हणतेय ते झाड बारतोंडीच आहे की नाही ते.
आर्या छान आहेत फूल.

Pages