आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....
हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे
संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा
संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल
संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर
संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड
संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे
संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो
संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी
संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स
आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
कालच्या सामन्यातल्या आरआरच्या
कालच्या सामन्यातल्या आरआरच्या चुका:
नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारणे
मलिंगा, मुनाफ, भज्जी या आक्रमणासमोर हॉजला बाहेर ठेवून आणि त्या बदल्यात हॉगला घेउन मधल्या फळीतली फलंदाजी कमकुवत करणे
आणि शेवटच्या काही षटकात पॉलार्ड मुक्तहस्ते धावा लुटत असताना कोणताही सापळा न लावणे किंबहुना हतबल होणे
आणि या सगळ्यात कर्णधार म्हणून दोष दुर्दैवाने द्रवीड कडे जातो
पण ऑवेस शाहने हवा टाइट केली होती मुंबईची.... मस्त लढत
<< तुमचे एक पेज सुरू करायला
<< तुमचे एक पेज सुरू करायला हरकत नाही >> फारएण्डजी , कल्पना वाईट नाही. करतो विचार. धन्यवाद. [चेपुवर माझ्या व्यंचिंमुळेच 'उदास ग्रूप' निर्माण नाही झाले म्हणजे मात्र मिळवलं !
]
<< पॉलार्ड मुक्तहस्ते धावा लुटत असताना कोणताही सापळा न लावणे >> पोलॉर्डसारखे कांही 'प्राणी' असे असतात कीं ते 'सुटले' तर सांपळ्यात पकडणं अशक्यच होतं !!
पोलॉर्डसारखे कांही 'प्राणी'
पोलॉर्डसारखे कांही 'प्राणी' असे असतात कीं ते 'सुटले' तर सांपळ्यात पकडणं अशक्यच होतं>>>>> अगदी सहमत!
सहवाग असाच होता पण आजकाल सर्वच विरोधी कप्तानांकडे त्याच्यासाठी विविध प्रकारचे सांपळे आहेत!
कुठेतरी हमखास सापडतो!
>>> पोलॉर्डसारखे कांही
>>> पोलॉर्डसारखे कांही 'प्राणी' असे असतात कीं ते 'सुटले' तर सांपळ्यात पकडणं अशक्यच होतं
पोलार्डकडे एकच फटका आहे. कोणताही चेंडू सरळ रेषेत सीमारेषेपलिकडे भिरकावून देणे, या फटक्याव्यतिरिक्त त्याच्याकडे दुसरे काहीही नाही. त्याच्याकडे ऑफचा एकही फटका नाही. लेगसाईडचे फ्लिक, ऑनड्राईव्ह, ग्लान्स वगैरे फटके मारताना तो क्वचितच दिसतो. बर्याचदा त्याने उचललेला चेंडू लाँगऑनच्या दिशेने पण जातो. भात्यात दुसरे कोणतेही फटके नसल्याने तो ऑफचे चेंडू सुद्धा सरळ किंवा लाँगऑनच्या दिशेने मारतो. काल बाद झाला तो ऑफच्या खूप बाहेर असलेला चेंडू त्याने लॉन्गऑनच्या दिशेने उचलून मारला होता. त्याला ऑफच्या खूप बाहेर चेंडू टाकला की तो हमखास जाळ्यात सापडतो.
तसं पाहिलं तर मलिंगाकडे देखील यॉर्कर हे एकच अस्त्र आहे. यॉर्कर सोडला तर तो एक सामान्य गोलंदाज आहे.
'उदास ईलेव्हन' संघात दिलशानचा समावेश देखील अत्यावश्यक आहे. तो कायम फुल टाईट अवस्थेत असल्यासारखा उदास दिसतो.
<< पोलार्डकडे एकच फटका
<< पोलार्डकडे एकच फटका आहे....... मलिंगाकडे देखील यॉर्कर हे एकच अस्त्र आहे. >> मास्तुरेजी, केवळ टी-२० पुरतं बोलायचं तर असं म्हणणं म्हणजे ' विंचवाकडे फक्त एक नांगी आहे म्हणून, नाहीं तर त्याला सहज चिरडता येण्यासारखं आहे', असंच होईल ! अहो, पोलार्डच्या दोन-चार सिक्सर्स मग त्या कुठेही व कशाही मारलेल्या असोत किंवा मलिंगाच्या यॉर्कर्समुळे फक्त दोन-तीन धांवा दिलेल्या शेवटच्या दोन ओव्हर्स असोत, सामन्याचा निर्णय ठरवतातच ना ! [ तसं तर वेस्ट इंडीजच्याच कुणीतरी पूर्वीच्या श्रेष्ठ खेळाडूने म्हटलय कीं पोलार्ड हा मुळात खरा फलंदाजच नाहीय ! पण तें टी-२०ला नाही ना लागू होत
!]
याबद्दल बहुधा पूर्वीही चर्चा
याबद्दल बहुधा पूर्वीही चर्चा झालेली असावी - पण २०-२० च्या सीमारेषा टेस्ट च्या मानाने आत आहेत का? म्हणजे लहान आहेत का? चेपॉकवर तरी आत घेतल्यासारख्या वाटत होत्या.
(No subject)
<< पोलार्डकडे एकच फटका
<< पोलार्डकडे एकच फटका आहे....... मलिंगाकडे देखील यॉर्कर हे एकच अस्त्र आहे. >> मास्तुरेजी, केवळ टी-२० पुरतं बोलायचं तर असं म्हणणं म्हणजे ' विंचवाकडे फक्त एक नांगी आहे म्हणून, नाहीं तर त्याला सहज चिरडता येण्यासारखं आहे', असंच होईल ! अहो, पोलार्डच्या दोन-चार सिक्सर्स मग त्या कुठेही व कशाही मारलेल्या असोत किंवा मलिंगाच्या यॉर्कर्समुळे फक्त दोन-तीन धांवा दिलेल्या शेवटच्या दोन ओव्हर्स असोत, सामन्याचा निर्णय ठरवतातच ना ! [ तसं तर वेस्ट इंडीजच्याच कुणीतरी पूर्वीच्या श्रेष्ठ खेळाडूने म्हटलय कीं पोलार्ड हा मुळात खरा फलंदाजच नाहीय ! पण तें टी-२०ला नाही ना लागू होत >> होल्डींग ने म्हटलय ते. पोलार्डचे दुसरे बलस्थान म्हणजे power. तो एव्हढ्या ताकदीने मारतो कि mis hit सुद्धा बाहेर जातात. शाह्ने काल चकित करणारी फलंदाजी केली. मला तो नेहमीच ok ok वाटत आला होता.
गेल तुफान धुत होता.. मिसक्यूड
गेल तुफान धुत होता.. मिसक्यूड शॉटला आऊट झाला.. पण तोपर्यंत चेन्नैच्या बॉलर्सची पार वाट लावून ठेवलीये..
कायच्याकाय चालू आहे मॅच...
कायच्याकाय चालू आहे मॅच... शेवटच्या ४ षटकात ७ विकेट पडल्या... त्यातल्या ५ शेवटच्या ७ बॉल मधे पडल्या..
CSK आसपास पोहोचेल का ? विजय
CSK आसपास पोहोचेल का ? विजय दोन आकडी धावसंख्या काढेल का ? धोनी १००+ strike rates ठेवू शकेल का ?
... Go Raina go. तो पेट्ला तर मजा येईल. हसीला जबरदस्त मिस करणार CSK.
<< मला तो नेहमीच ok ok वाटत
<< मला तो नेहमीच ok ok वाटत आला होता. >> टी-२० साठी सचिनचाही पोलार्डवर खूप भंरवसा असल्यासारखं नेहमी जाणवतं !
<< विजय दोन आकडी धावसंख्या काढेल का ? >> मीं पूर्वीही इथं यावरून टपल्या खाल्या आहेत तरीही मला वाटतं विजय हा सध्या दृष्टीपथात असलेल्या ' सलामीच्या' फलंदाजांत उजवा असावा. अर्थात, टी-२० हा त्याचा प्रांत नव्हे !
अशक्य ........ अशक्य
अशक्य ........ अशक्य मॅच........
'बिचारा' एव्हढे एकच विशेषण कोहली साठी......... अत्यंत चुकीची captaincy पण वेटोरी चा नाईलाजही समजू शकतो...... २० ओव्हर संपेपर्यंत बेंगलोर १९व्या ओवर च्या hangover मधून बाहेरच आले नाहीत......
>>> << पोलार्डकडे एकच फटका
>>> << पोलार्डकडे एकच फटका आहे....... मलिंगाकडे देखील यॉर्कर हे एकच अस्त्र आहे. >> मास्तुरेजी, केवळ टी-२० पुरतं बोलायचं तर असं म्हणणं म्हणजे ' विंचवाकडे फक्त एक नांगी आहे म्हणून, नाहीं तर त्याला सहज चिरडता येण्यासारखं आहे', असंच होईल ! अहो, पोलार्डच्या दोन-चार सिक्सर्स मग त्या कुठेही व कशाही मारलेल्या असोत किंवा मलिंगाच्या यॉर्कर्समुळे फक्त दोन-तीन धांवा दिलेल्या शेवटच्या दोन ओव्हर्स असोत, सामन्याचा निर्णय ठरवतातच ना !
हे पटतंय.
मीं पूर्वीही इथं यावरून
मीं पूर्वीही इथं यावरून टपल्या खाल्या आहेत तरीही मला वाटतं विजय हा सध्या दृष्टीपथात असलेल्या ' सलामीच्या' फलंदाजांत उजवा असावा. अर्थात, टी-२० हा त्याचा प्रांत नव्हे ! >> मी पण खाल्ल्या आहेत टपल्या पण माझा सुधारीत द्रुष्टीकोन असा कि विजय हा एक उजवा सलामीचा Test फलंदाज होता पण जेंव्हापासून त्याने ते mid on वरून cross shots मारायला सुरूवात केली तेंव्हापासून तो त्या योग्य वाटत नाहि.
आजच्य मॅचएव्हढी विचित्र मॅच नसावी. धोनीला परत त्याच्या नशिबाने हात द्यायला सुरूवात केलेली दिसतेय.
अत्यंत चुकीची captaincy पण वेटोरी चा नाईलाजही समजू शकतो>> २dn change, 3rd change ballers ना मधल्या ओव्हरमधे वापरायच्या conventional wisdom चे काय झाले ?
<<२dn change, 3rd change
<<२dn change, 3rd change ballers ना मधल्या ओव्हरमधे वापरायच्या conventional wisdom चे काय झाले ? >> त्या वेळी भारी प्लेयर्स खेळत असल्याने त्याने तिथे मुख्य लोकांना बॉलिंग ला टाकले असणार...... भटकळ ला १९वी द्यायला काही हरकत नव्हती. ज्यांनी त्याला मारले ते आऊट झालेच होते...... व्हेट्टोरीचे पाहून इतर कॅप्टन आज धडा घेणार....
कोहलीचे राहून राहून वाईट वाटते. अक्षरशः पिसला गेला आज...... कोहली म्हणजे प्रवीण कुमार आहे फक्त स्विंग नाही आणि वेग आणखी कमी.......;)
५० षटकांच्या सामन्यासाठी जर
५० षटकांच्या सामन्यासाठी जर पर्यायी असे एकंदर ३-४ प्लान तयार असावे लागत असले ,तर टी२० साठी प्रत्येक षटकानंतरच्या परिस्थितीसाठी असे २-३ तरी प्लान तयार ठेवावे ; एक-दोन षटकामधे परिस्थितीत व त्याकरता लागणार्या डावपेंचात किती फरक पडूं शकतो हे आजच्या सामन्यात प्रकर्षाने दिसलं. आणि, शेवटच्या चेंडूपर्यंत कांहीही गृहीत धरूं नये हेंही ! चेन्नईचं अभिनंदन.
बोथा इज गुड फॉर नथिंग
बोथा इज गुड फॉर नथिंग
<< पोलार्डकडे एकच फटका
<< पोलार्डकडे एकच फटका आहे....... >> मास्तुरेजी, तुमचंही हें पटतंय ! -
<< ...पुणे-मुंबई मॅच च्या आधी
<< ...पुणे-मुंबई मॅच च्या आधी हरभजन भारताचा कप्तान होऊ शकतो असे गांगुलीने म्हणणे ..... केलेली वक्तव्ये ही आजकाल खूप दिसत आहेत. भारतीय टीममधला हा एक स्वतंत्र गट नक्कीच आहे.>> फारएन्डजी, आज अझरुद्दीनसुद्धा ह्या गटात सामील झालाय ! आजच्या मुलाखतीत तो म्हणतो , धोनी हा मर्यादित षटकांसाठी कप्तान म्हणून ठीक आहे पण कसोटी सामन्यांसाठी मात्र 'he lacks a bit of intelligence ' ! धोनी केवळ कप्तान आहे म्हणूनच कसोटी संघात आहे, असंही खोंचकपणे त्याने सुचवलंय. धोनीविरुद्ध मोर्चेबांधणी धडाक्यात सुरूं झालीय, हें नक्की !!!
>>> पुणे-मुंबई मॅच च्या आधी
>>> पुणे-मुंबई मॅच च्या आधी हरभजन भारताचा कप्तान होऊ शकतो असे गांगुलीने म्हणणे
सध्याच्या कामगिरीवर हरभजन भारताच्या कोणत्याच संघात येऊ शकत नाही. रारॉ विरूद्ध त्याने केलेली टुकार गोलंदाजी सगळ्यांनी पाहिली आहे. मग कप्तान कसा होणार तो?
>>फारएन्डजी, आज
>>फारएन्डजी, आज अझरुद्दीनसुद्धा ह्या गटात सामील झालाय !
विचारतो कोण त्या फिक्सरला..... सचिनला खाली दाखवण्यासाठी त्याच्या संघातुन खेळताना मुद्दाम विकेट फेकणार्या या भ्रष्ट खेळाडूला काय महत्व द्यायचे?..... चर्चेत राहण्याचा चीप मार्ग आहे!
>>पुणे वॉरिअर्स सुरूवात
>>पुणे वॉरिअर्स सुरूवात चांगली करतात, पण नंतर ढेपाळतात
बघुया आज काय होतय ते?
आपला सपोर्ट चेन्नईला
>>> फारएन्डजी, आज
>>> फारएन्डजी, आज अझरुद्दीनसुद्धा ह्या गटात सामील झालाय !
पैशासाठी स्वतःचे इमान विकणार्या (ते सुद्धा स्वतः गर्भश्रीमंत असताना) आणि नंतर पकडला गेल्यावर स्वतःच्या धर्माची ढाल पुढे करणार्या या देशद्रोह्याला त्याचे मत विचारताना व ते प्रसिद्ध करताना माध्यमांना लाज कशी वाटत नाही? निर्लज्जासारखा हा तोंड वर करून समाजात मिसळतोच कसा?
दादा दिखादो धोनीको के
दादा दिखादो धोनीको के इंडियाके सबसे भारी कॅप्टन तुम ही हो!
आज दादा अर्धशतक तरी नक्की काढणार
<< आज दादा अर्धशतक तरी नक्की
<< आज दादा अर्धशतक तरी नक्की काढणार >. वॉरिअर्सच्या फलंदाजाना गेल्या सामन्यानंतर त्याने स्वतःच फैलावर घेतल्यामुळे हें विशेष आवश्यकच आहे ! [ अर्थात, कुणीतरी क्षेत्ररक्षणात चेंडू सोडला तर दांतओंठ खाऊन हातपाय आपटणारा कप्तान सौरव स्वतःकडून तसं झालं तर मात्र चिडत नसे, हेंही खरं !]
पुणे वॉरिअर्स - १४ षटकात
पुणे वॉरिअर्स - १४ षटकात ९९-२. उथापा(१०) व गांगुली(१६) दोघेही 'रन आऊट' ! लक्ष्य १५६.
<< विचारतो कोण त्या फिक्सरला..... >>, << धर्माची ढाल पुढे करणार्या या देशद्रोह्याला त्याचे मत विचारताना व ते प्रसिद्ध करताना माध्यमांना लाज कशी वाटत नाही? निर्लज्जासारखा हा तोंड वर करून समाजात मिसळतोच कसा? >> माझ्या प्रिय मित्रानो, ही मुलाखत अझरने धरमशाला येथे एप्रिल १३ ला दिली आहे; तिथे तो ब्रिटीश एमपीजच्या संघाविरुद्ध खेळल्या जाणार्या मित्रत्वाच्या सामन्यात भारतीय खासदारांच्या संघाचं नेतृत्व करतो आहे ! !!! आणि तुम्ही म्हणतां, विचारतो कोण त्या फिक्सरला !!!!!!!!!
[ ही मुलाखत आजच्या 'एशियन एज'च्या १८व्या पानावर मी वाचली ]
असो... १६ तर १६ पण १००चा
असो... १६ तर १६ पण १००चा स्ट्राइक रेट आहे आणि आता पुणे विजयाच्या उंबरठ्यावर आहे:)
१९षटकात १४६-३. शेवटच्या षटकात
१९षटकात १४६-३. शेवटच्या षटकात जिंकायला १० धांवा हव्या ! रायडर [७०] करेल राडा ?
वॉरिअर्स ७ विकेटसनी जिंकले,
वॉरिअर्स ७ विकेटसनी जिंकले, १९.२ षटकात !! टेरिफीक! ४ सामन्यात तीन विजय !!!
Pages