आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....
हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे
संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा
संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल
संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर
संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड
संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे
संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो
संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी
संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स
आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या
आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कामगिरीमुळे संघाबाहेर गेलेल्या ज्येष्ठ खेळाडूना आयपीएलमधल्या कामगिरीवरून पुन्हा राष्ट्रीय संघात घेणं हा विरोधाभासच होईल >> भाऊ तुमचा Rip Van Winkle झालाय का हो ?
एक हसी नसल्यामूळे CSK ला किती फरक पडतो. मुनफ, R.P., Johnson ह्यांच्यापुढे abu nechim ला घेतात. MI चे team meeting plans काय आहेत हे कळले तर मजा येईल
<< MI चे team meeting plans
<< MI चे team meeting plans काय आहेत हे कळले तर मजा येईल >> बॅटींगला खास अनुकूल नसलेल्या खेळपट्टीवर लेव्ही जर कालच्यासारखा खेळतो, तर मुंबै इंडियन्सना फार डोकं खाजवून प्लान्स करण्याची गरजही नाही भासणार !
पण आयपीएलमधली कामगिरी हा राष्ट्रीय संघात येण्यासाठीचा [ किंवा पुनरागमन करण्याचा ]आतांचा पक्का निकष असेल, तर रिप व्हॅन सारखं वीस वर्षांपूर्वीच्या दुनियेतच रहायला आवडेल मला !!
<< भाऊ तुमचा Rip Van Winkle झालाय का हो ? >> तुम्ही कुठं पाहिलं मला दाढी वाढवून , केंस पिंजारून रस्त्यावर फिरताना ?
<<मुनफ, R.P., Johnson
<<मुनफ, R.P., Johnson ह्यांच्यापुढे abu nechim ला घेतात. MI चे team meeting plans काय आहेत हे कळले तर मजा येईल>>
प्लेइंग ११ मध्ये किती परदेशी, भारताच्या राष्ट्रीय संघात खेळलेले किती, २२ वर्षाखालचे किती, अनकॅप्ड किती खेळाडू असावेत यासंबंधी काही नियम आहेत.
आज केकेआर नक्की!
आज केकेआर नक्की!
आज केकेआर नक्की हारणार असं
आज केकेआर नक्की हारणार असं म्हणतोयेस ना स्वरुप..
आपला सपोर्ट प्रथम मुंबई
आपला सपोर्ट प्रथम मुंबई (सचिन), मग दादा, मग द्रविड, मग इतर>> इ ना चॉलबे.
पुण्यात राहुन पहिला सपोर्ट पुण्ञाला दुसरा सपोर्ट मुम्बईला.
केकेआर हारू देत. मला त्या
केकेआर हारू देत. मला त्या खेळाडूपेक्षा शाहरूखच्या माकडउड्यांचा जास्त राग येतो.
प्लेइंग ११ मध्ये किती परदेशी,
प्लेइंग ११ मध्ये किती परदेशी, भारताच्या राष्ट्रीय संघात खेळलेले किती, २२ वर्षाखालचे किती, अनकॅप्ड किती खेळाडू असावेत यासंबंधी काही नियम आहेत.>> हि माहिती मला नवीन आहे. माझ्या मते ते निकष फक्त फक्त auction साठी होती. playing 11 साठी फक्त maximum चार परदेशी खेळाडू एव्हढाच निकष आहे. तुमच्याकडे लिंक आहे का ?
आयपीएलमधली कामगिरी हा राष्ट्रीय संघात येण्यासाठीचा [ किंवा पुनरागमन करण्याचा ]आतांचा पक्का निकष असेल,>> भाऊ जो दिखता है, वोह बिकता है
मला त्या खेळाडूपेक्षा
मला त्या खेळाडूपेक्षा शाहरूखच्या माकडउड्यांचा जास्त राग येतो>>>> १००% सहमत!
>>आज केकेआर नक्की हारणार असं
>>आज केकेआर नक्की हारणार असं म्हणतोयेस ना स्वरुप.>>
हिम्या, जसे ते आत्ता खेळतायत ते बघून तसेच म्हणावेसे वाटतेय
नंदिनी, तुमची विलपॉवर जबरदस्त दिसतीय
घे स्वरुप घे... हारलेच की
घे स्वरुप घे... हारलेच की नाही केकेआर.. आणि ते पण इरफान पठाणनी धोपटल्यामुळे..
(No subject)
प्लेइंग ११ मध्ये किती परदेशी,
प्लेइंग ११ मध्ये किती परदेशी, भारताच्या राष्ट्रीय संघात खेळलेले किती, २२ वर्षाखालचे किती, अनकॅप्ड किती खेळाडू असावेत यासंबंधी काही नियम आहेत<<< नाही असे नियम पूर्ण संघासाठीच आहेत. प्लेइंग ११ मधे चार परदेशी खेळाडू हाच एक नियम आहे. नियम बदलले असल्याची मेल अजून तरी आलेली नाही
आली तर लिहेन इथे.
<< नियम बदलले असल्याची मेल
<< नियम बदलले असल्याची मेल अजून तरी आलेली नाही >> 'मेलींग लिस्ट'च यंदा बदलली असली तर !
आज दादा वि. दादाचा चेला
आज दादा वि. दादाचा चेला भज्जी. किंवा दादा वि. सचिन. पिक्चर मधे ते भाऊ आहेत कळण्याआधी अमिताभ-शशीची मारामारी होते तेव्हा वाटते तसे वाटेल
भाऊंनी टाकलेलं लेटेस्ट व्यंचि
भाऊंनी टाकलेलं लेटेस्ट व्यंचि मधली पाटी बदलून पुण्याच्या प्रत्येक मॅचला लगू होईल..
हिम्या सहमत. भाऊ कार्टून
हिम्या
सहमत. भाऊ कार्टून चांगले आहे हे ही.
आज दादा वि. दादाचा चेला
आज दादा वि. दादाचा चेला भज्जी. किंवा दादा वि. सचिन. पिक्चर मधे ते भाऊ आहेत कळण्याआधी अमिताभ-शशीची मारामारी होते तेव्हा वाटते तसे वाटेल>>
फारेंडा तुझ्या मनात, तनात, श्वासात क्रिकेट आणि सिनेमा आहे बघ.
भाउ मस्त आहे कार्टुन.
>>> केकेआर हारू देत. मला त्या
>>> केकेआर हारू देत. मला त्या खेळाडूपेक्षा शाहरूखच्या माकडउड्यांचा जास्त राग येतो.
+१
मला शाहरूख खान अजिबात आवडत नाही आणि मल्ल्याच्या उर्मटपणाचा संताप येतो. त्यामुळे केकेआर आणि आरसीबी हे संघ सर्व सामने हरावेत अशी माझी इच्छा आहे.
मुंबईकर विरुद्ध पुणेकर...
मुंबईकर विरुद्ध पुणेकर...
मी सचिनच्या बाजूने म्हणजे
मी सचिनच्या बाजूने म्हणजे सध्या तरी मुम्बई इंडियन्सच्या बाजूने.
भाऊ, आहे मी अजून तरी मेलिंग
भाऊ, आहे मी अजून तरी मेलिंग लिस्टमधे.
मी कायमच मुंबईच्या बाजूने.
बाकी पुणेकर आणि सौरव ही जोडी एकदम सही आहे ना?
मी सचिनच्या बाजूने म्हणजे
मी सचिनच्या बाजूने म्हणजे सध्या तरी मुम्बई इंडियन्सच्या बाजूने.
>>>>
आज सचिन नाही !!
तरी पुणे जिंकले तर एक आश्चर्य कारक घटना असा पुण्याचा आज खेळणारा संघ!
१२ षटकात ७१ धावांवर ४
१२ षटकात ७१ धावांवर ४ बळी...
पुण्याचं पानिपत आज पुण्यातच होणार बहुतेक
पुण्याचं पानिपत आज पुण्यातच
पुण्याचं पानिपत आज पुण्यातच होणार बहुतेक >>>
आज मुंबईत होणार! परत आहेत पुण्यात आल्यावर आहेर म्हणून विजय देतील प्रतिस्पर्ध्याला!
हा कुठला पुणे संघ???!!!! आजचे
हा कुठला पुणे संघ???!!!!
आजचे खेळणारे ११ खेळाडू.
१. सौरव गांगुली
)
२. मनिष पांडे
३. वेन पार्नेल
४. रॉबिन उथ्प्पा
५. कॅल्लम फर्ग्युसन-- ( ह्याचा पुण्याशी काही तरी संबंध वाटतो
६. स्टिव्हन स्मिथ
७. मार्लन सॅम्युअल
८. भुवनेश्वर कुमार
९. मुरली कार्तिक
१० राहुल शर्मा
११ अशोक दिंडा
एकही मराठी नांव नाही! एकही महाराष्ट्र संघातला खेळाडू नाही...
मग ते स्थानिक खेळाडू वैगेरे नियम आहेता ना म्हणे??!!
झकासराव, मग अश्या मराठीचा लवलेशही नसलेल्या पुणे संघाला कसला हो पाठिंबा तुमचा??
ह्या संघाचे नांव आज तरी 'सुब्रतो रॉय सहारा वॉरियर संघ'.
सुब्रतो रॉय सहारा वॉरियर
सुब्रतो रॉय सहारा वॉरियर संघाने धोनीच्या संघा पेक्षा चक्क १७ धावा जास्त केल्या मुंबई विरुद्ध!!
९ बाद १२९ - २० षट़कात!
कुठलेही नियम नाहीत... फक्त
कुठलेही नियम नाहीत... फक्त प्रत्येक संघात खेळताना ४ पेक्षा जास्त फॉरिनर नसावेत.. एवढाच नियम आहे.. पाहिजे असल्यास मुख्या साईटवर जाऊन चेक करावे.. तिथे सगळे नियम दिलेले आहेत...
रच्याक... मुंबईची पण अवस्था गंभीर झालेली आहे.. २७/३ फक्त ६ ओव्हर मध्ये..
कुठलेही नियम नाहीत... >>> नसू
कुठलेही नियम नाहीत... >>>
नसू देत! पण संघ पुण्याचा वाटावा असे औषधाला एक तरी नांव हवे ना! बाकी सर्व संघात आहेत.. मग पुणे संघात का असा स्थनिक नांवाचा दुष़्काळ?
मग पुणे संघात का असा स्थनिक
मग पुणे संघात का असा स्थनिक नांवाचा दुष़्काळ?>> ते गांगुलीलाच विचारायला पाहिजे... पुण्याच्या टीम मध्ये धीरज जाधव, हर्षद खडीवाले, श्रीकांत वाघ हे खेळाडू आहेत.. पण ते बहुतेक बाकडीच गरम करणार... जो पर्यंत ह्या सध्याच्या निवडीतील कोणाला काही होत नाही तोपर्यंत..
Pages