आयपीएल - ५ (२०१२)

Submitted by स्वरुप on 30 March, 2012 - 06:34

आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.

मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....

हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे

संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा

संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल

संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर

संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड

संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे

संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो

संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अ‍ॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी

संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स

आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'पुणे वॉरिअर्स' मुंबईवरच्या विजयाने प्रेरीत होऊन आपली छाप उमटवणार ह्या आयपीएलवर असं दिसतंय; सॅम्युअल्स व उथपा धमाल खेळले ! १६ षटकात १२१-४ !!

पुणे वॉरिअर्स १६६ !
सॅम्युअल्सचं फिरकी खेळण्याचं तंत्र आवडलं. फूटवर्कचा मस्त वापर व लेगस्पिनला अप्रतिम 'इन अँड आऊट' फटके !!

सॅम्युएल्स जबरी खेळला आज. मजा आली बघायला. तसेच ते शेवटचे ४-५ षटकार!

ही मॅच मुळातच गांगुली आणि गिलख्रिस्ट याच्या कप्तान व फलंदाज म्हणून कौशल्यातील. कप्तानपदाचे कौशल्य वय झाल्याने कमी होणार नाही, पण बॅट्समन म्हणून दोघेही आपल्या शिखरावरून उतरले आहेत कधीचे.

गिलख्रिस्ट हा मागच्या काही वर्षातील एकमेव ऑसी कप्तान ज्याने भारताला भारतात टेस्ट सिरीज मधे हरविले (२००४ - फायनल फ्रंटियर!). गांगुली हा एकमेव कप्तान ज्याने ऐन भरात असलेल्या स्टीव वॉ च्या १६ मॅचेस सलग जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला टेस्ट सिरीज मधे हरवले (२००१).

>>द्रविडचा हा आक्रमक पवित्रा खूप भावला !!
खरच भाऊ, मस्त रंगात आला होता तो .... रन आउट नाही व्हायला पहिजेल होता!
या सीझन मध्ये अजुनतरी तो दबाव न घेता खेळाची मजा लुटताना दिसतोय
कॅप्टन्सीपण मस्त केली त्याने.... बॉलिंग चेंजेस खुप सही होते Happy

आणि आज परत एकदा भावले ते त्याचे मॅनर्स्.... प्रेझेंटशन च्या वेळी तो उपस्थित सर्व मान्यवरांशी हस्तांदोलन करुन मगच मांजरेकर कडे गेला आणि त्याच वेळी मागुन येणारा गंभीर कोणाहीकडे न बघता तडक मांजरेकरसमोर जाऊन उभा राहिला.... हाच फरक आहे!

<< आणि आज परत एकदा भावले ते त्याचे मॅनर्स्.... >> मॅनर्सच्या बाबतीत द्रविड कायमचा ' मॅन ऑफ द मॅच ' आहेच !!
<< स्पर्धा सुरु होताना मिनोज वाटणारे दोन संघ सध्या गुणतक्त्यात सगळ्यात आघाडीवर आहेत >> ' पुणे वॉरिअर्स'चं यश हें 'बीगिनर्स लक' नक्कीच नाही, हें कालच्या खेळावरून सिद्ध झालंय. मला उथपाबद्दल अजूनही राष्ट्रीय पातळीवरही कामगिरीच्या अपेक्षा आहेत . [ त्याची आंकडेवारी कृपया माझ्या थोबाडावर कुणी फेकूं नका; मला आंतून कुठेतरी असं नेहमीच वाटत आलंय, तें बोलून टाकलं इतकंच ! डोमा: ]

IPlromans.JPG

द्रविड तर अफलातून खेळत होता. कूपरची बॉलिंग पण सोल्लिड होती. तज्ञ लोक त्याला भेदक वगैरे म्हणतील का? Happy

मॅनर्सच्या बाबतीत द्रविड कायमचा ' मॅन ऑफ द मॅच ' आहेच !!
>>> अनुमोदन.

जीतेगा भई जीतेगा आज मुंबई जीतेगा. Happy

आज तरी सचिन खेळणार आहे का? परवाच्या सामन्यात सचिन नसल्यामुळे मुम्बईचा दारूण पराभव झाला. आज तो नसेल तर आजही काही खरं नाही.

मॅनर्सच्या बाबतीत द्रविड कायमचा ' मॅन ऑफ द मॅच ' आहेच !!>>> अफलातून!

मला उथपाबद्दल अजूनही राष्ट्रीय पातळीवरही कामगिरीच्या अपेक्षा आहेत >>> मला २००७ साली त्याच्या खेळ बघून खूप वाटल्या होत्या. पण २००७ च्या विश्वचषकात अत्यंत चांगली संधी असताना त्याने ती घालवली. काल मात्र मस्त खेळला तो.

भाऊ,

नेहमीप्रमाणेच जबरी व्यंगचित्र! पुणे वॉरिअर्स सुरूवात चांगली करतात, पण नंतर ढेपाळतात. राजस्थान सुरवातीला ढेपाळतात, स्पर्धा निम्म्यावर आली की जिंकायला सुरूवात करतात, पण शेवटच्या २-३ सामन्यात परत ढेपाळतात. मुम्बईसाठी कुठल्याही परिस्थितीत सचिन परत आला पाहिजे.

<< जीतेगा भई जीतेगा आज मुंबई जीतेगा. >> नंदिनीजी, तोंडात साखर पडो तुमच्या ! Wink
मास्तुरेजी, सचिनचा दिलखुलास खेळ पहायला मिळेल, हे ह्या आयपीलचं प्रमुख आकर्षण ! तो खेळावा अशी प्रार्थना तर अगणित जण करत असावेतच !!! देव नाही दुर्लक्ष करूं शकणार त्याकडे !

http://www.espncricinfo.com/indian-premier-league-2012/content/current/s...

"Finger still not looking good. Had to aspirate blood from my finger twice in 4 days." tweets Sachin Tendulkar @sachin_rt)

सचिन आजही खेळणार नाही. त्याच्या बोटाची जखम अजून बरी झालेली नाही. तो कदाचित परवा ११ एप्रिलला रारॉ विरूद्ध खेळेल.

त्यामुळे आजचा सामना बघायचं काही कारण उरलेलंच नाही.

<< त्यामुळे आजचा सामना बघायचं काही कारण उरलेलंच नाही. >> पण दुसरं काय बरं करावं ,हा विचार करताना मॅच लावावीच लागते ना ! आदतसे मजबूर !! Wink
डेक्कन चार्जर्स १३८-९ [ २० षटकं] !!

>>मॅनर्सच्या बाबतीत द्रविड कायमचा ' मॅन ऑफ द मॅच ' आहेच !>> अगदी अगदी Happy

>>कूपरची बॉलिंग पण सोल्लिड होती. तज्ञ लोक त्याला भेदक वगैरे म्हणतील का>> भेदक वगैरे नाही पण या फॉरमॅटला उपयुक्त नक्कीच आहे!
काल त्याची बॉलिंग पाहून कोणीतरी समालोचक म्हणत होता की एकेकाळी तेजतर्रार गोलंदाजी ही विंडीज प्लेयर्सची ओळख होती आणि आज स्लोअर वन्स हे कूपरचे अस्त्र आहे!

<< ...की एकेकाळी तेजतर्रार गोलंदाजी ही विंडीज प्लेयर्सची ओळख होती आणि आज स्लोअर वन्स हे कूपरचे अस्त्र आहे! >> जे खरंच तेजतर्रार चेंडू टाकूं शकतात त्यांचाच 'स्लोवर वन' फलंदाजांसाठी फसवा असूं शकतो, असंही असेल ! Wink

मुंबईला जिंकण्यासाठी एक बॉल - ३ धांवा ! शर्माने फुलटॉसवर षटकार मारून सामना जिंकून दिला !!
रोहित शर्मा [नाबाद७३] !! सामना पहाणं अगदींच फुकट नाही गेलं !!!

भन्नाट झाल्या शेवटच्या काही ओव्हर्स! रोहितला तो रन आउट दिला नाही ते बरोबरच होते, कारण निर्विवाद काही कळत नव्हते (मला मुळात तो नियमच आवडत नाही. एकदा बॅट टेकवली की बॅट्समन पोहोचला असे समजले पाहिजे. फक्त तो पुन्हा दुसरी रन काढायला निघाला तरच बाद करता आला पाहिजे). पण तो आउट झाला असता तर काय झाले असते कोणास ठाऊक! Happy

शेवटी संयम सुटला व बघितलाच सामना. फक्त मुम्बईची फलंदाजी पाहिली आणि पाहिल्याचे सार्थक झाले. पुन्हा एकदा एक गोष्ट स्पष्ट झाली. सचिनच्या अनुपस्थितीत मुम्बईची फलंदाजी अत्यंत कमकुवत आहे.

या आयपीएल मधली घासुन झालेली पहिलीच मॅच.... संगकाराला अश्या कठीण सिच्युएशन्स हाताळता येत नाहीत हे परत एकदा सिद्ध झाले!

स्वरूप, पण शेवटच्या दोन-तीन बॉल्स पर्यंत मॅच कोठेही जाऊ शकत होती. मी शेवटच्या ५-६ ओव्हर्सच्या आधीची मॅच पाहिली नाही, पण निदान शेवटी संगा बरेच काही करत होता असे वाटत होते.

रोहितच्या फलंदाजीसमोर स्टेनची गोलंदाजी आणि त्याने तो एक झेल घेण्यासाठी मारलेला डाईव्ह विसरून चालणार नाही. त्याचे विकेट मेडन वाले षटक तर अफ़लातून होते. स्टेन ने कमावले आणि क्रिश्च्न ने गमावले.

<<.... संगकाराला अश्या कठीण सिच्युएशन्स हाताळता येत नाहीत हे परत एकदा सिद्ध झाले! >> निदान कालच्या मॅचवरून तरी हा निष्कर्ष काढणं न्याय्य नाही वाटत. शेवटच्या दोन षटकांत २४ धांवा हव्या असताना बॅटीच्या पट्ट्यात मिळतील असे दोन फुलटॉस रोहित शर्माला मिळाले ; त्या दोन षटकारांमुळे सामना फिरला ! संगकाराच काय कोणताही कॅप्टन गोलंदाजाच्या हातात चेंडू दिल्यावर ही सिच्युएशन कशी हाताळणार ?

संगकाराच काय कोणताही कॅप्टन गोलंदाजाच्या हातात चेंडू दिल्यावर ही सिच्युएशन कशी हाताळणार ?>>>>>>

गेल्या काही दिवसांत एकदिवसिय सामन्यात चांगल्या गोलंदाजां अभावी धोनी तेच अनुभवतोय!

शेवटच्या षटकांत प्रविणकुमार, विनय कुमार, अशोक दिंडा, इरफान पठाण, ह्या सारखे गोलंदाज धावांची खैरात करतात आणि मग सामने हारतो आपण!

आर आर ची पार वाट लावलीय मुंबईने Sad
टॉस जिंकून मुंबईला फलंदाजी देण्याचा निर्णय चुकलाच म्हणायचा.... आता १०च्या रनरेटने चेस करणे अवघड दिसतय एकंदरीत!

पोलार्ड - ३३ चेंडूत ६४ [ ६चौकार, ४ षटकार ] !!!
द्रविड बाद झालाय. आरआरचं काम कठीणच दिसतंय. रहाणे, बोथा जातील मुंबैच्या धांवसंख्येच्या आसपास ?

>>रहाणे, बोथा जातील मुंबैच्या धांवसंख्येच्या आसपास ?
रहाणे इज द की मॅन..... आज नेमका हॉज पण नाहीये
ही पेअर टिकली पाहिजेल १०० पर्यंत!

व्वा! जिंकले मुम्बई! पोलार्ड जबरी खेळला. पण १५ व्या षटकात आलेल्या मलिंगामुळे सामना फिरला. नाहीतर त्यावेळी रारॉला ६ षटकात ६४ धावा हव्या होत्या आणि शाह (चेहर्‍यावरून अतिशय गोंधळलेला व बावचळलेला दिसत असला तरी) जबरी मारत होता.

भज्जीच्या गोलंदाजीत यत्किंचितही सुधारणा नाही. त्याची परतीची वाट अवघड आहे.

कायम उदास चेहरे करून वावरणार्‍या मुनाफ, युसुफ पठाण, प्रवीणकुमार, रवी बोपारा इं. चा 'उदास ईलेव्हन' असा एक वेगळा संघ काढावा अशी मी सूचना करतो.

उदास ईलेव्हन>>> Lol

भाऊ - तुम्ही तुमचे कार्टून्स फेसबुकवर टाकत आहात काय? तुमचे एक पेज सुरू करायला हरकत नाही. मग आमच्यासारखे लोक त्याला सबस्क्राईब करतील आणि ते आणखी लोकांपर्यंत पोहोचेल.

Pages