आयपीएल - ५ (२०१२)

Submitted by स्वरुप on 30 March, 2012 - 06:34

आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.

मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....

हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे

संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा

संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल

संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर

संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड

संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे

संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो

संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अ‍ॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी

संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स

आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचे आपले मुंबई इंडियन्स. अनेक स्फोटक फलंदाज आहेत आणि स्लिंगा मलिंगा.
शिवाय साहेबांच्या डोक्यावरचे ५० किलो उतरलेत त्यामुळे ते मनमुराद खेळतील.
हे मुंबई इंडियन्सचे ट्विटर हँडल

भाऊ, प्लीज नुसत स्वरुप म्हणा, जी वगैरे नको Happy

पण प्रश्न उरतो तो हा की स्पर्धा सुरु व्हायला दोनच दिवस उरले असताना इतके अचानक सचिनने हा निर्णय का घेतला असावा?

<< शिवाय साहेबांच्या डोक्यावरचे ५० किलो उतरलेत त्यामुळे ते मनमुराद खेळतील. >> मयेकरजी , खरं सांगू, आतां साहेबांचां पूर्वीचा खेळ पुन्हा एकदां पहायला मिळेल, हाच मुख्य विचार माझ्याही मनात आला होता !!
साहेब आपली फिरकी गोलंदाजीची अतृप्त इच्छाही अधूनमधून पूरी करून घेतील, अशीही आशा आहे !!

डोक्यावरचे ५० किलो उतरलेत>>> १०० टन उतरलेत म्हणजे जास्त योग्य होईल ना? Happy

भाऊ - सहमत :). आता तुमची कार्टुन्स येउ देत रोज.

स्वरूपः मलाही काल ती शंका आली होती. सचिनच्या कॅप्टनशिप मधे पहिले एक दोन सीझन मुंबईने विशेष काही केले नव्हते, पण गेले दोन सीझन्स ते जबरी खेळले.

साहेबांनीच ५० किलो उतरलेत म्हटलं होतं. अंबानी दादा आणि वहिनींनी साहेबांचे औक्षण केले होते १०० x १०० केल्याबद्दल त्या कार्यक्रमात.

<< पण प्रश्न उरतो तो हा की स्पर्धा सुरु व्हायला दोनच दिवस उरले असताना इतके अचानक सचिनने हा निर्णय का घेतला असावा? >> मिडीया याची चर्चा पुढील दोन आठवडे चघळणारच आहे; आजच लोकसत्तेचा पहिल्या पानावरचा मुख्य मथळा आहे - 'श्रद्धाळू सचिनने कर्णधारपद सोडले !'

मीं जागतिक दर्जाचा एक चांगला फलंदाज होतो हेच माझ्या आयुष्याचं सार उरेल !". मला वाटतं जें बॉयकॉटला इतक्या उशीरां समजलं, तें सचिनला खूपच आधीं उमगलं, इतकंच !!>>>> भाऊ, प्रचंड सहमत !

आमचा पाठिंबा अर्थातच मुंबई इंडियन्सनाच Happy

आजकाल त्यातील लोकांची मते बातम्या म्हणून छापतात.>> सहमत.

सचिनने कप्तानपदाचा निर्णय पूर्वीच घेतलेला असावा. फक्त आता न्युज स्पेस जास्त मिळेल म्हणून जाहीर केले असावे. प्रश्न फक्त खेळाचा नाहीय्ये, जाहिरातींचा पण आहे. Proud

भज्जीसाहेब म्हणजे एकदम थोबाडफोड कॅप्टन्सी. Happy

<< फक्त आता न्युज स्पेस जास्त मिळेल म्हणून जाहीर केले असावे. >> दोन फायदे - १] मिडीयाला चघळायला असं कांही हंवच असतं, त्यामुळे मिडीया खूष, व २] आयतीच आयपीएलसाठी पोषक वातावरण निर्मितीही झाली ! Wink
<< भज्जीसाहेब म्हणजे एकदम थोबाडफोड कॅप्टन्सी >> मधें 'स्वतःचं' शब्द चुकून राहिला का घालायचा ? Wink

थोबाडफोड कॅप्टन्सी>>:फिदी:
आमच्या ऑफिसमधल्या मित्रमंडळींच्या मते यंदाच्या आयपीएल मध्ये आता कदाचित वेगळा भज्जी पाहायला मिळेल आणि तो चमकला तर त्याचे भारतीय संघात पुनरागमनसुद्धा होईल.... किंवा कदाचित त्याचसाठी त्याला कर्णधार बनवले असेल!

बाय द वे..... ओपनिंग सेरेमनी बघितला का कुणी?

<< त्याचे भारतीय संघात पुनरागमनसुद्धा होईल....किंवा कदाचित त्याचसाठी त्याला कर्णधार बनवले असेल! >> आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कामगिरीमुळे संघाबाहेर गेलेल्या ज्येष्ठ खेळाडूना आयपीएलमधल्या कामगिरीवरून पुन्हा राष्ट्रीय संघात घेणं हा विरोधाभासच होईल ! केवळ नवीन प्रतिभा हेरण्याची ही स्पर्धा म्हणजे एक प्राथमिक संधी आहे, इतकंच. पुनरागमनासाठी रणजी, दुलीप स्पर्धेतील उठावदार कामगिरी हा निकष असूं शकतो.

कसा झाला उद्घाटनाचा सोहळा? राजीव शुक्लाला काही झेपलं नाही आणि लोकांना ललित मोदीची उणीव भासली म्हणे?

राजीव शुक्लाला काही झेपलं नाही आणि लोकांना ललित मोदीची उणीव भासली म्हणे? >> +१
बाकी अश्विन स्पीन पेक्षा डान्स चांगला करतो. :p

<< बाकी अश्विन स्पीन पेक्षा डान्स चांगला करतो. >> बॅटसमनना नाचवता येत नाही तर आपणच नाचावं, असं नाही ना ! Wink

ओपनिंग शो कमी आणि अ‍ॅवॉर्ड शो जास्त वाटत होता तो.

बंगलोरला स्टेडियममधे ओपनिंग शो केला होता तो एकदम सही होता. लेझर शो वगैरे एकदम चकाचक. त्यावेळेला पहिल्यान्दा चीअरलीडर्स बघायला मिळाल्या होत्या. पेपरात दुसर्‍या दिवशी त्यांचे फोटोच फोटो. Proud

भज्जीने पण काल चांगला ड्यान्स केला. आज चेन्नई वि. मुंबई.

मुंबईच जिंकणार. Happy

<< स्पीनवर नाचवणार्‍यांचा जमाना गेला >> वैसे नचानेवालेही रहे नही , जमानेका क्या कसूर ? Wink
<< आता व्यंचि आलेच पाहिजे >> 'पुणे वॉरिअर्स'चं 'आयपीएल'मधे स्वागत -

Punewarriors.JPG

भाऊ Lol

आजची मॅच मस्त होईल - चेपॉक हे सचिनचे आवडते मैदान. कसोटीत त्याची पाच शतके तेथे आहेत आणि सगळी लक्षात राहणारी. वन डे मधे आणि २०-२० मधे मात्र त्याने तेथे फारसे काही केलेले नाही. आता कप्तानपद सोडल्यावर आज काय करतो बघू.

आयपीएल मधले दोन सर्वोच्च धावा केलेले - रैना आणि सचिन- आज आमनेसामने.

मात्र सचिनने कर्णधारपद सोडल्याने आयपीएल च्या पेपर्समधल्या जाहिरातीवाल्यांची पंचाईत झालेले दिसते. आयत्या वेळेस बदलता आल्या नाहीत, आणि कप्तानांच्या फोटोत सचिनच आहे अजून Happy

मी मुम्बई इंडियन्सच्या बाजूने आहे (कारण फक्त सचिन. दुसरे कोणतेही कारण नाही.). बहुतेक फक्त मुम्बईच्याच मॅचेस बघेन. इतरांमध्ये फारसा इन्टरेस्ट नाही.

चेन्नई -९९-६ [ १६ षटकं ]! सामना रंगायला जरा जास्तच धांवा असायल्या हव्या होत्या !

Pages