आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....
हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे
संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा
संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल
संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर
संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड
संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे
संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो
संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी
संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स
आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
पुण्याचा निदान आजचा संघ तरी
पुण्याचा निदान आजचा संघ तरी अत्यंत टुकार आहे. ज्या संघात वेन पार्नेल ३ र्या क्रमांकावर येतो, त्या संघाची कीव कराविशी वाटते. याला प्रत्युत्तर म्हणून मुम्बईने मुनाफला ३ र्या क्रमांकावर पाठवायला पाहिजे होते.
रच्याकने, सचिन आज खेळत नाही हे लक्षात आल्याआल्या मी सामना बघायचे थांबविले.
मुंबई फलंदाजांनी सामना
मुंबई फलंदाजांनी सामना रंगतदार बनवला! ५-६५ बारा षटकात!!!
पोल्लार्ड गेला..........
पोल्लार्ड गेला..........
मास्तुरे.. मुंबईची परिस्थिती
मास्तुरे.. मुंबईची परिस्थिती पण फार काही चांगली नाहीये... चवथ्या नंबर जेम्स फ्रॅंकलिन ला पाठवतात म्हणजे...
आज मुंबई नक्कीच हारणार असं दिसतय.. एका टुकार संघाकडून...
पुणे वॉरिअर्स जिंकले ! चेंडू
पुणे वॉरिअर्स जिंकले ! चेंडू सीमेपार मारा म्हटलं मीं वर , त्याऐवजीं प्रत्येक चेंडू धरा ऐकलं असावं त्यानी !![ मुंबईचे ४झेल घेतले व दोन यष्टीचित केले पुणे वॉरिअर्सने !! ]. 'धचा मा'ऐवजी हें असं उलटं ? पुणे साफ बदललं, म्हणायचं !!! मनःपूर्वक अभिनंदन.
बुकी जिंकले...कारण बहुसंख्य
बुकी जिंकले...कारण बहुसंख्य लोकांनी मुंबईवरच पैसे लावलेले असणार..तेव्हा पुण्याला जिंकवणं हेच बुकींच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार हे ओघानेच आले.
चवथ्या नंबर जेम्स फ्रॅंकलिन
चवथ्या नंबर जेम्स फ्रॅंकलिन ला पाठवतात म्हणजे...>>अरे champions league मधे तो चांगला खेळला होता. रोहित शर्माचे बारा वाजलेत. लेव्हीला काढलेला मुरली कार्थिक चा बॉल कसला मस्त होता. मुरली कार्थिक ला ज्यांनी political कारणांनी संघाबाहेर ठेवले गेले त्यांना भर चौकात बडवले पाहिजे. म्हणे quality spinner नाहि मिळत.
मलाही मुरली कार्तिक का सतत
मलाही मुरली कार्तिक का सतत बाहेर राहिला कळत नाही. जरा बघायला पाहिजे त्याचे स्टॅट्स - पण जेव्हा त्याच्या मॅचेस पाहिल्या तेव्हा त्यात तो काही विशेष करतोय असे वाटले नाही. कदाचित अजून संधी द्यायला हवी होती.
आगरकर जसा कप्तान कोणीही असला तरी संघात असायचा (अझर, सचिन, गांगुली, द्रविड) तसा कोणीही कप्तान असला तरी मुरली कार्तिक बाहेर असतो
आता पर्यंत घरच्या मैदानावर
आता पर्यंत घरच्या मैदानावर प्रत्येक टिम हारलेली दिसतेय.
एकही मराठी नांव नाही! एकही
एकही मराठी नांव नाही! एकही महाराष्ट्र संघातला खेळाडू नाही...
अहो हे आय पी एल आहे! परदेशी खेळाडू सुद्धा चालतात इथे. मग भारतातल्या भारतात आणखी भेद कशाला? उद्या म्हणाल आमच्या सदाशीव पेठेतल्या गल्लीतल्या शाम ला का घेत नाही??!
कुठे हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार घेऊन बसला आहात? अहो सबंध भारत देश एकच, कुणिहि कुठेहि यावे, जावे.
सगळे नाहीतरी इंग्रजीच बोलतात!!
<< एकही मराठी नांव नाही! एकही
<< एकही मराठी नांव नाही! एकही महाराष्ट्र संघातला खेळाडू नाही... >> मुंबैच्या कालच्या संघात तरी कुठे होतं एक तरी मराठी नांव ? आणि, रहाणेने एकहाती [ ६६ चेंडूत ९८ धांवा- १६ चौकार, १ षटकार ]सामना जिंकून दिलाय राजस्थान रॉयल्सला ! [ पूर्वी ब्रिटीशानी स्थापलेल्या राज्यनिहाय/ जातीवाचक आर्मी डिव्हीजनच्या शौर्याच्या परंपरा जपल्या जात असल्या तरी त्यांत त्याच राज्यातल्या, जातीतल्यांचीच नेमणूक करणं आपण बुद्धीपुरःसर बंद केलंच ना !!
]
पुण्याचं पानिपत आज पुण्यातच
पुण्याचं पानिपत आज पुण्यातच होणार बहुतेक>>. :रागः
काय रे विशल्या कोणाच झालं रे पानिपत .
झकासराव, मग अश्या मराठीचा लवलेशही नसलेल्या पुणे संघाला कसला हो पाठिंबा तुमचा??
ह्या संघाचे नांव आज तरी 'सुब्रतो रॉय सहारा वॉरियर संघ'.>>> शेवटचं वाक्य खरच आहे. फक्त पुण्याच्याच नाही सर्वच आयपीएल च्या संघाच्या बाबतीत.
पाठिंबा फक्त आमचं पुणे म्हणुन. मी मॅचेस पाहतच नाहिये. उगा आपलं धाग्याचा टीआरपी वाढवायच्या म्हणुन पोस्टी टाकतोय.

आणि ते जाज्वल्य अभिमान नको काय पुण्याचा.
मी फक्त शेवटच्या काही मॅचेस पाहिन ते ही वेळ मिळाला तर.
आणि ते जाज्वल्य अभिमान नको
आणि ते जाज्वल्य अभिमान नको काय पुण्याचा. >> +१
असामी... फ्रँकलिन champions
असामी... फ्रँकलिन champions league ला चांगला खेळला होता हे ठिक आहे.. पण जिथे त्यांच्या देशाच्या टीममध्ये पण त्याला घेत नाही.. तिथे तो एक बॉलिंग ऑलराउंडर असताना ४थ्या नंबरला खेळायला येतो ही गंमतच नाही का???
पुण्याचा निदान आजचा संघ तरी
पुण्याचा निदान आजचा संघ तरी अत्यंत टुकार आहे. ज्या संघात वेन पार्नेल ३ र्या क्रमांकावर येतो, त्या संघाची कीव कराविशी वाटते. याला प्रत्युत्तर म्हणून मुम्बईने मुनाफला ३ र्या क्रमांकावर पाठवायला पाहिजे होते.
>>> मास्तुरे, एवढ्यात विसरलात का? आपल्या टीम इंडियानेपण चॅपेल गुरुजींच्या काळात इरफान पठानला ३र्या क्रमांकावर अनेक मॅचेसमध्दे पाठवले होते. तेव्हा नाही ती तुम्हाला भारतीय संघाची कीव करावी वाटली.
काल अजिबात वेळ मिळाला नाही
काल अजिबात वेळ मिळाला नाही ऑनलाईन यायला.....
काल मुंबई अतिशय वाईट खेळल्यामुळे पुणे जिंकल्यासारखे वाटले.... नाहीतर पुण्याचीही हालत खराबच होती.... हरभजनने गांगुलीची विकेट काढल्यावर दिलेली खुन्नस अगदीच चकीत करणारी होती
राजस्थान मात्र जबरदस्त खेळले.... रहाणे तर अगदी लाजवाब.... कूपर हा फाईंड ऑफ द टुर्नामेंट होण्याची शक्यता दिसतीये.
मिनोज म्हणून गणले गेलेले हे दोन संघ आजच्या घडीला टॉप ऑफ द चार्ट आहेत.
पण ही तर जस्ट सुरुवात आहे.... दोन महीने चालणार्या या स्पर्धेत सातत्य महत्वाचे
हिम्स अरे आताच किविस कडून
हिम्स अरे आताच किविस कडून होता तो एका सिरीज मधे. मला वाटते He can defend and he can hit. आधीच्या तीन विकेट्स लवकर गेल्यामूळे त्याला वर ढकलले असावे कारण खाली फक्त KKD इ pollard उरतात ना. असो.
आजच्या मॅचेस मध्ये आपला
आजच्या मॅचेस मध्ये आपला सपोर्ट आरसीबी ला आणि चेन्नईला
व्हेटोरी आणि मुरलीला एकत्र
व्हेटोरी आणि मुरलीला एकत्र बॉलिंग करताना बघून मस्त मजा येतीय.... साथीला कुंबळे हवा होता
कोणाला जाणवले का? भज्जी,
कोणाला जाणवले का? भज्जी, युवराज, सेहवाग ई. लोक म्हणजे गांगुली चे खरे चेले. द्रविड-चॅपेल काळात जेव्हा दादा बाहेर होता तेव्हा अधूनमधून हेच लोक त्याच्याबद्दल चांगले बोलत असत. सध्या यांचा एक कंपू झाल्यासारखे वाटत आहे. पुणे-मुंबई मॅच च्या आधी हरभजन भारताचा कप्तान होऊ शकतो असे गांगुलीने म्हणणे व मॅचनंतर गांगुलीची तारीफ हरभजन ने करणे, युवराजने आज लिहीलेला (टाईम्स) हरभजन वरचा लेख, सेहवागची अधूनमधून केलेली वक्तव्ये ही आजकाल खूप दिसत आहेत. भारतीय टीममधला हा एक स्वतंत्र गट नक्कीच आहे.
<< भारतीय टीममधला हा एक
<< भारतीय टीममधला हा एक स्वतंत्र गट नक्कीच आहे. > > शिवाय गांगुलीने सचिनला " रिलक्टंट कॅप्टन' म्हणणं ! धोनीविरुद्धची ही मोर्चेबांधणी तर नाही ?
भाऊ.. सॉलिड...
भाऊ.. सॉलिड...
भाऊ फारेण्डा, स्वतंत्र गट
भाऊ
फारेण्डा, स्वतंत्र गट आधीपासूनच आहे. दादा बाहेर होता तेव्हा भज्जी कित्येकदा उघडपणे त्याच्या बाजूने बोलायचा. आतापण गांगुली त्याना कायम सपोर्ट करत असतो अर्थात धोनीचा गट वेगळा आहेच की. पण दादाची सत्ता अशी की इतके दिवस खेळात नसून पण त्याच्याशी लोकं लॉयल राहिली आहेत. उगाच नाही महाराजा म्हणत त्याला
'लॉयल्टी'च्या नव्या व्याखेत
'लॉयल्टी'च्या नव्या व्याखेत चपखल बसतात ही मंडळी ! सचिन, द्रविड, लक्ष्मण इ.इ.सारखं फक्त खेळाशी 'लॉयल' राहून नाही चालत, हे ओळखून असतात हे स्मार्ट लोक !!!
आणि ते जाज्वल्य अभिमान नको
आणि ते जाज्वल्य अभिमान नको काय पुण्याचा. >>> टिपीकल कोल्हापूरी टोनमध्ये वाचलं हे वाक्य
भाऊ, व्यंचि आणि तो
भाऊ, व्यंचि आणि तो लॉयल्टीबद्दलचा शालजोडीतला पण भारी
फारेंडा, हे म्हणजे अगदी आपण
फारेंडा, हे म्हणजे अगदी आपण आपलेच कौतुक करु शकत नाही ना म्हणून मग असे एक हाथ दे एक हाथ ले केल्यासारखे वाटतेय
अरर्र.... द्रवीड रन आउट....
अरर्र.... द्रवीड रन आउट.... चांगला खेळत होता
हुर्रे.... राजस्थान रॉक्स
हुर्रे.... राजस्थान रॉक्स
सुपर बॉलिंग!
द्रविड सलामीला येवून- २४
द्रविड सलामीला येवून- २४ चेंडूत २६; दोन चौकार दोन षटकार !!! द्रविडचा हा आक्रमक पवित्रा खूप भावला !!
Pages