आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....
हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे
संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा
संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल
संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर
संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड
संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे
संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो
संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी
संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स
आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
ह्या IPL मधे माझ्या साठी
ह्या IPL मधे माझ्या साठी सर्वात आनंदाची गोष्ट होती ती म्हणजे गंभीरची captaincy. (थोड्या बहुत प्रमाणात सेहवाग ने ज्या तर्हेने पठाण वर दाखवलेला विश्वास, यादवला crunch moments मधे आणणे, मॉर्केल च्या burst च्या वेळी स्लिप्स लावणे वगैरे सुद्धा ह्यात आले) दर वेळी fielding adjust करणे, विशेषतः spinners येत होते तेंव्हा, हा जबरदस्त प्रकार होता. बर्याच वर्षांनी फिरकी गोलंदाजांना एव्हढ्या कुशलतेने वापरणारा नि त्यानुसार fielding लावणारा captain बघितला.
गंभीरवर जरा अन्यायच झालाय.
गंभीरवर जरा अन्यायच झालाय. (तो आणि सेहवाग वर्षभर आउट ऑफ फॉर्म राहून अचानक आयपीएल मधे कसे फॉर्ममधे आले हे मला समजलेले नाही. ठीक आहे, पुढचा आंतरराष्ट्रीय सीझन तसेच खेळले तर तक्रार नाही.), या विजयाचे त्याचे मोठे श्रेय आहे. दोन महिन्यापूर्वीच भारताचे उपकप्तानपद त्याच्याकडून काढून कोहलीला दिले गेले, त्याला त्याने चांगले उत्तर दिले आहे.
पण मीडियात पाहिले तर वाटेल की जणू काही शाहरूखनेच मैदानावर नेतृत्त्व, बॅटिंग ई.ई. करून संघाला जिंकून दिले आहे!
तो आणि सेहवाग वर्षभर आउट ऑफ
तो आणि सेहवाग वर्षभर आउट ऑफ फॉर्म राहून अचानक आयपीएल मधे कसे फॉर्ममधे आले हे मला समजलेले नाही.>> बरीच कारणे आहेत, familier environment,pitches, confidence, financial motivation. एक किंवा अनेक असू शकतात.
<< ह्या IPL मधे माझ्या साठी
<< ह्या IPL मधे माझ्या साठी सर्वात आनंदाची गोष्ट होती ती म्हणजे गंभीरची captaincy. >> खरंय. सचिनसाठी सुरवातीलाच फिरकी गोलंदाजांकडे चेंडू देण्याची त्याची चाल कल्पक होती व यशस्वीही ठरली. फक्त मला एकच खटकतं कीं राष्ट्रीय संघाच्या नेतृत्वाचे योग्य दावेदार असलेले कोहली व गंभीर हे दोघेही प्रतिभावान असले तरीही कांहीसे उर्मट किंवा अहंकारी वाटतात. हा माझा अतिशय चूकीचा पूर्वग्रहही असेल किंवा कांहींच्या मते नेतृत्वाचा तो आवश्यक घटकही असेल. मला स्वतःला मात्र पाँटींग किंवा दादासारख्या यशस्वी कप्तानांपेक्षां लॉईड, कपिल व बॉर्डरसारखे यशस्वी कप्तान अधिक भावतात.
राष्ट्रीय संघाच्या नेतृत्वाचे
राष्ट्रीय संघाच्या नेतृत्वाचे योग्य दावेदार असलेले कोहली व गंभीर हे दोघेही प्रतिभावान असले तरीही कांहीसे उर्मट किंवा अहंकारी वाटतात. >>> अनुमोदन भाऊ.
लॉईड, कपिल व बॉर्डरसारखे यशस्वी कप्तान अधिक भावतात. >>> IPL मधले गिली, वॉर्नी आणि विटोरी सुद्धा चांगले होते.
<< IPL मधले गिली, वॉर्नी आणि
<< IPL मधले गिली, वॉर्नी आणि विटोरी सुद्धा चांगले होते. >> सहमत. स्वतःचा फॉर्म नाही हें स्विकारून कप्तान असूनही बाहेर बसणं, हे कैतुकास्पदच ! शिवाय, शांत, समंजस व आनंदी राहूनही जिगरी झुंजार असणं शक्य असतं, याची हीं उदाहरणं आहेत.
>>राष्ट्रीय संघाच्या
>>राष्ट्रीय संघाच्या नेतृत्वाचे योग्य दावेदार असलेले कोहली व गंभीर हे दोघेही प्रतिभावान असले तरीही कांहीसे उर्मट किंवा अहंकारी वाटतात.
भाऊ, कोहलीबद्दल एकदम मान्य पण गंभीर उर्मट वगैरे नाही वाटत पण शीघ्रकोपी नक्कीच वाटतो... पेशन्स नाहीये त्याच्याकडे!
>>शांत, समंजस व आनंदी राहूनही जिगरी झुंजार असणं शक्य असतं, याची हीं उदाहरणं आहेत
अगदी अगदी..... पण का कोण जाणे व्होकल कर्णधार लोकांना जास्त अपील होतात!
प्रेझेंटेशन दरम्यानचे गंभीरचे वक्तव्य: "It proves captain is only as good as his team. Team makes successful captain, Successful captain does not make successful team"
धोनीला चिमटा काढलेला दिसतोय
शांत, समंजस व आनंदी राहूनही
शांत, समंजस व आनंदी राहूनही जिगरी झुंजार असणं शक्य असतं, याची हीं उदाहरणं आहेत>>> आपल्याकडे कपिल असावा तसे उदाहरण (त्यातील 'समंजस' हे तो बॅटिंग करताना सोडून एरव्ही
).
गंभीर मलाही उर्मट वाटत नाही. फार फ्रेण्डली नसावा असे आपल्याला टीव्हीवर दिसतो त्यावरून वाटते.
मधे एक दोन वर्षे त्याची आणि सेहवागची जोडी अभेद्य वाटायची.
गंभीर मलाही उर्मट वाटत नाही.
गंभीर मलाही उर्मट वाटत नाही. फार फ्रेण्डली नसावा असे आपल्याला टीव्हीवर दिसतो त्यावरून वाटते. >> +१. त्याचे विचार वाचले कि त्याला खेळाची छान समज आहे हे जाणवते नि तो त्याबाबत खूप प्रामाणिक वाटतो. कोहलीपेक्षाही गंभीर काहि वर्षे कप्तान असावा असे मला मनापासून वाटते. कोहली वर फारच अपेक्षा पडणार आहेत नाहि तर.
कोहली पूर्णपणे उर्मट वाटतो हे मात्र खरे. किती तरी मॅचेस मधे आउट झालेल्या फलंदाजाला send off देताना त्यांच्या sexual habbits ना reference करणे सारखे खटकत राहिले. एखाद्या वेळी वादावादी झालेल्या फलंदाजाला करणे समजू शकते पण प्रत्येकाला ?
शिवाय, शांत, समंजस व आनंदी राहूनही जिगरी झुंजार असणं शक्य असतं,>>बाकी सगळे राहू दे, कप्तान lucky असावा लागतो
गंभीरच्या खरच गंभीर अन अचाट
गंभीरच्या खरच गंभीर अन अचाट नेतृत्वामुळे कोहली त्यासमोर अचानक खुजा वाटतो. (नेतृत्वात). गंभीर खूप व्होकल आहे पण त्याने व्होकलपणा कमी करावा असे वाटते. सेहवाग/ कोहली पेक्षा तो नक्कीच उपकप्तान म्हणून उजवा ठरेल.
http://www.loksatta.com/index
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=230...
कोहली अत्यंत उर्मट
कोहली अत्यंत उर्मट आहे.....उध्दट आहे...विश्वकप च्यावेळी द. अफ्रिकेची मॅच नागपुर ला होती माझा ऑफिस चा मित्र गेलेला ती मॅच बघायला..येताना विमानातुन आला त्या विमानात सगळीच भारतीय क्रिकेट टिम होती..
स्वाक्षरी साठी अथवा फोटो साठी विराट ने सरळ नकार दिला.. तेही अत्यंत उर्मट भाषेत.. इतर सदस्यांनी हसत फोटो स्वाक्षरी काढु दिलेत.. सचिन, गंभीर, युवी.. या तिघांनी काही ही न बोलता मित्रा सारखे फोटो काढुन दिलेत...
गॅरी ने तर स्वतः उभे राहुन स्वतः बरोबर काढुन तर दिलेच वर कॅमेरा घेउन इतर खेळांडुंबरोबर सुध्दा काढुन दिले...
.
.
गॅरी आणि सचिन सारखी माणस मिळणे खरच कठिण आहे ....
गंभीरने आज खुल्लमखुल्ला
गंभीरने आज खुल्लमखुल्ला सांगून टाकलंय " मला राष्ट्रीय संघाचा कर्णधार व्हायला आवडेल " ! असं सांगण्यात वाईट कांहीच नाही पण त्यापेक्षां इतरानी तसं म्हणून त्याने कप्तान होणं यात खरी गंमत आहे, असं आपलं मला वाटलं.
<< गॅरी आणि सचिन सारखी माणस मिळणे खरच कठिण आहे .... >> खरंय. द्रविड, सचिन, लक्ष्मण व कुंबळे इ.सारखे खेळाडूच क्रिकेटची व देशाची खरी शान वाढवत असतात.
>>पण त्यापेक्षां इतरानी तसं
>>पण त्यापेक्षां इतरानी तसं म्हणून त्याने कप्तान होणं यात खरी गंमत आहे, असं आपलं मला वाटलं
ते खरय भाऊ, पण आपल्याला कप्तानपदात इंटरेस्ट नाही असा अर्थ लोकांनी काढू नये म्हणून त्याने आधीच सांगून टाकल असाव!
गंभीरला खरेच करावे कसोटीचे
गंभीरला खरेच करावे कसोटीचे कप्तान. धोनीने विकेटकीपर म्हणून खेळावे कसोटीत आणि बाकी दोन्हीमधे कप्तान.
Pages