आयपीएल - ५ (२०१२)

Submitted by स्वरुप on 30 March, 2012 - 06:34

आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.

मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....

हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे

संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा

संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल

संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर

संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड

संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे

संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो

संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अ‍ॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी

संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स

आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आश्विनला कसला फुकटचा माज आलाय? तो स्मिथ तर चांगला आतच होता की नॉनस्ट्राईकर ला. उगाच काहीतरी बडबडत होता. दादा, भज्जी माज करतात पण त्यांनी बाहेर परदेशी संघांना हरवलेले आहे. याने काय केले आहे अजून - उगाचच माज.

अझरचा त्या कंपूशी काही संबंध नाही. कंपूमधले काहीही कारस्थाने करत असतील पण ते सिन्सियर आहेत.

>>दादा, भज्जी माज करतात >>
त्याला माज नाही म्हणायचे. ते उगा बांग्ला किंवा लंकेसमोर नाही माज करत, माजोरड्या कांगारुंसमोर करतात.... त्याला जशास तसे म्हणतात!

<< आश्विनला कसला फुकटचा माज आलाय? >> उथळ पाण्याला खळखळाट ... ! द्रविड, लक्ष्मण, सचिन .... यांच्याकडून क्रिकेटेतरही खूप कांही शिकण्यासारखं आहे हें कोण सांगणार याना !!!

>>द्रविड, लक्ष्मण, सचिन .... यांच्याकडून क्रिकेटेतरही खूप कांही शिकण्यासारखं आहे
अगदी खर आहे भाऊ, या नवीन पिढीला थोडा विनय नक्कीच शिकला पाहिजेल या लेजंड्सकडून.
कोहली घ्या, अश्विन घ्या, गंभीर घ्या.... एग्रेशन म्हणजे केवळ शिव्या देणे नाही!

>>> आश्विनला कसला फुकटचा माज आलाय? तो स्मिथ तर चांगला आतच होता की नॉनस्ट्राईकर ला. उगाच काहीतरी बडबडत होता.

अश्विनने हा प्रकार ऑस्ट्रेलियातही केलेला आहे. काल तर वॉर्निंग देण्याचं सुद्धा काही कारण नव्हतं कारण स्मिथ व्यवस्थित क्रीजमध्येच होता. असले अखिलाडू प्रकार करण्यापेक्षा व नॉनस्ट्राइकरकडे लक्ष देण्यापेक्षा त्याने स्वतःच्या गोलंदाजीकडे व क्षेत्ररक्षणाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे.

काल रायडर आणि सॅम्युअल्सची पण काहीतरी बाचाबाची झाली. रायडर बराच वेळ स्वतःशीच पुटपुटत होता. बाचाबाचीनंतर पहिल्याच चेंडूवर सॅम्युअल्स बाद झाल्यावर रायडर त्याच्याकडे पाठ फिरवून उभा राहिला. सॅम्युअल्सला वर पाठविणे ही काल दादाची मोठी चूक होती. केवळ स्टीव्हन स्मिथमुळेच वॉरिअर्स बचावले.

पहिल्या सामन्यात जिन्कल्यावर वॉरीअर्सला कुणीतरी बिगिनर्स लक म्हटले होते. आता तीन विजय मिळवल्यावर काय म्हणणार? महाराजा की जय Proud

काल तर वॉर्निंग देण्याचं सुद्धा काही कारण नव्हतं >>> हो मलाही तसेच वाटले.

आश्विन अजूनतरी मर्यादित कौशल्य पण बाकी गाजावाजाच जास्त असा "फुगा" आहे असेच वाटते. भारतात तो विकेट्स काढेलही पण कुंबळे, हरभजन प्रमाणे परदेशात मोक्याच्या वेळेस कधी विकेट काढेल ते कळायला अजून दोन वर्षे लागतील.

काल रायडर आणि सॅम्युअल्सची पण काहीतरी बाचाबाची झाली.>>> तेव्हा मी दुसरे काहीतरी करत होतो त्यामुळे अर्धवट लक्ष होते. मात्र त्यानंतर सॅम्युएल्स लगेच बाद झाला एवढे लक्षात आहे.

हा जेसी रायडर ही एक वल्लीच असावी असं वाटतं नेहमी मला; खेळाचा मस्त आनंद घेत धमाल खेळतो, मध्यमगती गोलंदाज म्हणूनही उपयोगी व क्षेत्ररक्षणही चांगलं. कालच्यासारखा रंगात आला तर स्पर्धा गाजवणार तो असं वाटतंय मला !
'पुणे वॉरिअर्सचा' वाढता आत्मविश्वास बघून त्यांच्या ड्रेसिंग रूममधे बाजीराव पेशव्यांचा [ अर्थात, पहिल्या] फोटो ठेवत असावेत, असंच वाटतंय !!! Wink

>>त्यांच्या ड्रेसिंग रूममधे बाजीराव पेशव्यांचा [ अर्थात, पहिल्या] फोटो ठेवत असावेत, असंच वाटतंय !!!
अहो एव्हढा जिताजागता द ग्रेट गांगुली असताना ते कोण पेशवे-बिशवेंचा फोटो कशाला लावतील आत्मविश्वास वाढवायला.... उगीच असे बोलून गांगुलीभक्तांचा रोष ओढवून घेउ नका भाऊ Proud

काल रायडर आणि सॅम्युअल्सची पण काहीतरी बाचाबाची झाली>>
कालच्या सामन्यातले सॅम्युअल्सचे वर्तन जरा संशयास्पदच वाटत होते Sad

स्वरुपजी, तुमचंही 'पुणे वॉरिअर्स'सारखंच झालं ! पहिली 'एंट्री'च धडाकेबाज ! घोडदौड अशीच चालुंद्या !!!
<< उगीच असे बोलून गांगुलीभक्तांचा रोष ओढवून घेउ नका भाऊ >> खरंय,चुकलंच माझं ! या बापड्या 'भाऊ'चाही पानिपतला झाला तसा 'सदाशिवराव भाऊ'च व्हायचा अशाने ! Wink

फारएन्ड, सेनापती धन्यवाद!
भाऊ, आम्ही काही तुमच्यासारखे कलाकार नाही.... सहज वाटले ते त्या कार्टूनच्या तोंडी चिकटवले... तुम्हीच प्रेरणास्थान Happy

आयपीएल मधले अत्यंत भंगार संघ म्हणजे पंजाब आणि डेक्कन. यांच्याकडे बहुतेक सगळा गाळ माल आहे. डेल स्टेनसारखे काही अपवाद डेक्कनच्या संघात कुजत आहेत. स्टेन मुंबईकडे हवा होता.

द्रवीडने धावा कराव्यात पण बेंगलोर जिंकावे अश्याच भावना बंगलोरमधल्या क्रिकेटप्रेमींच्या असतील - अनिल कुंबळे

द्रवीड ३ सामन्यात मस्त खेळलाय पण त्याने अजुन स्थिरावुन मोठी खेळी करण्याची आवश्यकता आहे
रहाणे, हॉज, शाह चांगल्या फॉर्म मध्ये आहेत पण कूपर बहुतेक इंज्युअर्ड आहे
बोथाला अजुन तरी छाप पाडता आलेली नाही आणि बंगलोरची बॅटींग लाइनअप बघता त्याला आज तरी खेळवले नाही पाहिजेल्....आज शॉन टेटला संधी मिळायला हरकत नाही
कूपर खेळणार असेल तर कॉलिंगवूड आणि चंडीमलसाठी संघात जागा रहात नाही!
श्रीसंथ अजुन काही सामन्याला मुकणार असे दिसतेय
आज त्रिवेदीच्या ऐवजी स्टुअर्ट बिन्नीला संधी द्यायला पाहिजेल

कागदावर जरी बंगलोरचा संघ जास्त मजबूत दिसत असला तरी राजस्थान आज जिंकायला पाहिजेल असे फार मनापासून वाटतेय.
बेस्ट ऑफ लक द्रवीड Happy

>>आयपीएल मधले अत्यंत भंगार संघ म्हणजे पंजाब आणि डेक्कन
मास्तुरे, पंजाबने पुण्याला लोळवले आहे आणि आता कोलकत्याची वाट लावली आहे.... इतक्यात काही भाकित करणे अवघड आहे!

मस्त जिंकली पंजाबने मॅच.... शेवटच्या ओव्हरमध्ये ९-१० रन्स डिफेंड करणे नक्कीच अवघड असते!
आता जरा आयपीएलला रंग चढू लागल्यासारखे वाटतेय.... अश्या क्लोज मॅच बघायला मजा येते.
गंभीर एकूणच या स्पर्धेत इतका उदास उदास का वाटतोय?. अस वाटतय की जस काही त्याला इंटरेस्टच नाही आहे!

आपला पण सपोर्ट राजस्थान रॉयल्सला.... फक्त राहुल द्रवीडसाठी Happy

<< शेवटच्या ओव्हरमध्ये ९-१० रन्स डिफेंड करणे नक्कीच अवघड असते! >> हातात विकेटस असताना हें बरोबर असलं तरी ८/९ विकेट गेलेल्या असताना हे तितकंसं लागू नाही होणार; कारण फलंदाजांवर कमालीचा दबाव असतो व क्षेत्ररक्षण करणार्‍याना एक/दोन विकेट घेऊन सामना जिंकण्याची आशा व चेंव असतो . म्हणूनच पंजाबचा विजय खास कौतुकास्पद.
मला आणखी एक विशेष वाटलं तें म्हणजे आजच्या सामन्यातले पियुष चावलाच्या गोलंदाजीचे आंकडे -
४षटकं- १८ धांवा- ३ विकेटस ! व्यक्तीशः मला फिरकीचा परिणामकारक केलेला उपयोग बघायला आवडतं.

द्रवीड आउट... ३२ बॉल २५... Sad
द्रवीडने वन डाऊन यावे का? आणि पॉवरप्लेचा मॅक्स फायदा उठवायला कुणातरी हार्डहिटरला वरती पाठवावे असे वाटतेय!

रहाणे रॉक्स Happy सिक्स फोर् इन अ रो..... जबरा!

अरे तो ओवेस शाह कसला कन्फ्युज करत होता गेलला.... त्या नादात गेलने एक वाईड टाकला Happy

१४०-१ ( १६ षटकं ) ; रहाणे - ८० (५० चेंडूत)!
<< द्रवीडने धावा कराव्यात पण बेंगलोर जिंकावे अश्याच भावना बंगलोरमधल्या क्रिकेटप्रेमींच्या असतील - अनिल कुंबळे >> कुंबळेलाच गुगली खेळावा लागणारसं दिसतंय !!!

Pages