आयपीएल - ५ (२०१२)

Submitted by स्वरुप on 30 March, 2012 - 06:34

आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.

मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....

हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे

संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा

संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल

संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर

संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड

संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे

संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो

संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अ‍ॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी

संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स

आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>त्याचा आक्रमकपणा कांहीसा दिखाऊपणाचा व बराचसा चिडखोरपणाचा वाटायचा>>
अहो काही काय, उलट त्याच्या आक्रमकपणामागे एक निरागस मूल लपलय अस मला नेहमीच वाटत आलय
त्याचा राग देखील टोकाचा आणि लोभ देखील... अगदी लहान मुलासारखा खेळता खेळता भांडणारा आणि लगेच विसरुन जाणारा.
उगाच नाही इतके तरुण खेळाडू मानतात त्याला
तो कप्तान असताना एक खुन्नस असायची आणि म्हणूनच खेळात एक जान असायची Happy

लोकप्रिय, तारणहार दादा आउट झाला तुमचा हवेत बेजबदार फटका मारुन ..... आणि पुण्याचे जिंकण्याचे चान्सेस वाढले Wink
मस्त खेळतायत सॅम्युअल्स आणि स्मिथ!

<< उगाच नाही इतके तरुण खेळाडू मानतात त्याला >> मग माझा प्रॉब्लेम हाच असावा; गांगुली कप्तान व्हायच्या खूप आधी मी तरुण होतो !!! Wink
पुणे १४०-५ [१८ षटकं ]. करतील २ षटकांत २५ धांवा ?

>>मला गांगुली फलंदाज म्हणून खूपच आवडायचा पण कप्तान म्हणून मात्र तितकासा नाही ; त्याचा आक्रमकपणा कांहीसा दिखाऊपणाचा व बराचसा चिडखोरपणाचा वाटायचा,
अगदी अगदी भाऊ.... गांगुली सुरुवातीच्या काळात जरा बरा खेळाडू होता पण नंतर नंतर त्याचा खेळ बराच घसरला!
आणि कप्तान म्हणून तर तो निव्वळ हाइप होता.
परवा कुठेतरी असेच वाचले की "तुम्ही एकतर गांगुलीचे कट्टर समर्थक असता आणि नसलात तर कट्टर विरोधक... दादाच्या बाबतीते अधल्यामधल्या काही भावना नसतात"....मलातरी पटले हे!
असो...
मस्त चाललीय मॅच Happy

नावात पुणे असलेल्या संघात पुण्याचा तर सोडा, महाराष्ट्राचा सुद्धा एकही खेळाडू नाही. मनिष पांडे सारख्या पूर्ण फ्लॉप खेळाडूला खेळविण्यापेक्षा बाकावर बसलेल्या खडीवाले किंवा काही इतरांना का खेळवत नाहीत?

>>नावात पुणे असलेल्या संघात पुण्याचा तर सोडा, महाराष्ट्राचा सुद्धा एकही खेळाडू नाही
मास्तुरे, ना संघमालक पुण्याचे, ना कर्णधार पुण्याचा.... इथे लोकांना जिंकण्याशी मतलब आहे.... मग स्थानिक खेळाडूंना संधी मिळो अथवा ना मिळो... such is the way of life!

नावात पुणे असलेल्या संघात पुण्याचा तर सोडा, महाराष्ट्राचा सुद्धा एकही खेळाडू नाही
आय पी एल चा उद्देश काय याबद्दल बर्‍याच जणांची वेगळी वेगळी मते दिसताहेत.
आता काही लोकांना फलंदाजीचे तंत्र खालावले याबद्दल वाईट वाटते, तर काही लोकांना स्थानिक खेळाडूंना संधि मिळत नाही याचे वाईट वाटते.
बहुधा काहीहि करून पैसे मिळवायचे हाच उद्देश त्यातल्या त्यात महत्वाचा दिसतो - जे संघांचे मालक आहेत, ज्यांनी त्यात पैसे गुंतवले आहेत, त्यांचा तरी.
ज्या आय पी एलमधे पैसे देवून जनावरांसारखे माणसांना विकत घेतात, नि डोंबारी जसा माकडाला खेळवतो तसे खेळवून पैसे मिळवतात, जिथे ती माणसेहि माकडासारखेच खेळतात, (काहीहि करून चेंडू हाणायचा! तंत्र गेले खड्ड्यात!) तिथे कसले स्थानिक नि कसले परदेशी? चीनमधून आलेला स्वस्त माल लोक घेतातच ना!

थुत्तरफोड सिनेमे बघायला लोक गर्दी करतातच ना! वेडेवाकडे अश्लील नृत्य बघायला गर्दी होते, लोक पैसे देऊन जातात. कुणि विचार करतो का की संगिताचे, नृत्याचे काही नियम पाळले आहेत का? कथा, दिग्दर्शन, अभिनय इ. कडे कुणि बघते का? नाही. म्हणून तसे सिनेमे निघतच रहातात!
शास्त्रीय संगिताच्या मैफलीला जशी मोजकीच पण दर्दी माणसेच जातात तसे क्रिकेटचे होईल का?

>>बाकावर बसलेल्या खडीवाले किंवा काही इतरांना का खेळवत नाहीत?
मला पण असे वाटते की जसा चार परदेशी खेळाडूंचा नियम आहे तसा एक किंवा दोन स्थानिक (नॉन्-इंटरनॅशनल) खेळाडूंचा नियम असला पाहिजेल!

>>शास्त्रीय संगिताच्या मैफलीला जशी मोजकीच पण दर्दी माणसेच जातात तसे क्रिकेटचे होईल का?
शास्त्रीय संगिताच्या मैफलीला जाणार्‍या लोकांच्यात खर्‍याखुर्‍या दर्दी लोकांपेक्षा आपण दर्दी आहोत हे दाखवण्यासाठी जाणारेच बरेच असतात.... ठेवणीतले झब्बे आणि शाली लेवुन न कळणारे आणि न झेपणारे (याला अपवाद हे आहेत... खर्‍याखुर्‍या दर्दी लोकांनी राग मानू नये... अर्थात ते राग मानणार नाहीत कारण त्यांचापण हाच अनुभव असणार Wink ) काहीतरी ऐकायला जाणार्‍या सो कॉल्ड दर्दी लोकांपेक्षा उधारी-उसनवारी करुन, अभ्यासाच्या ओझ्यातुन वेळ काढुन आपापल्या आवडत्या खेळाडूंना बघण्यासाठी जाणारे सामान्य लोक जास्त सच्चे वाटतात Happy

परवापासून क्रिकइन्फो साईटला काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. परवा बराच वेळ ती साईट ओपन होतच नव्हती. कालपासून ओपन होत आहे पण ओपन झाल्या झाल्या, 'हार्मफुल वेब साईट', असा अ‍ॅन्टीव्हायरसचा अखंड मेसेज येत आहे. आज ओपन केल्यावर असाच मेसेज येत आहे. इतर कोणाला असा काही अनुभव आला आहे का?

<< शास्त्रीय संगिताच्या मैफलीला जशी मोजकीच पण दर्दी माणसेच जातात तसे क्रिकेटचे होईल का? >> जो जें वांच्छिल तें तो लाहो, म्हणायचं, माझ्यासारख्या 'निवृत्ति'नाथानी तरी !!! Wink

काहीतरी ऐकायला जाणार्‍या सो कॉल्ड दर्दी लोकांपेक्षा
अशा लोकांची तुलना फक्त गाणे ऐकायला जाणार्‍या खर्‍या दर्दी लोकांशी करा.
केवळ पैसे आहेत म्हणून क्रिकेट मधले कळत नसूनहि चांगल्या जागा पटकावणार्‍यांची, टीव्ही वर आपला चेहेरा दाखवण्यासाठी धडपड करणार्‍या लोकांची तुलना उधारी-उसनवारी करुन, अभ्यासाच्या ओझ्यातुन वेळ काढुन आपापल्या आवडत्या खेळाडूंना बघण्यासाठी जाणारे सामान्य लोक यांच्याशी करा.

नि जर आवडते खेळाडूच पहायला जायचे तर बाकीच्या भानगडी कडे लक्ष देऊ नये.
सगळे उद्देश एकत्र साध्य होतील अशी अपेक्षा करणे म्हणजे निराशेला आमंत्रण देण्यासारखे आहे.

हळू हळू २०-२० मधल्या क्रिकेटचे तंत्रज्ञान असा लेख कुणि प्रसिद्ध करेल, तसे तंत्रज्ञान शिकवणारे व शिकणारे लोक होतील, मग माझ्या सारखे लोक केवळ क्रिकेट खेळ आवडतो म्हणून बघायला जातील, कोण खेळतोय या पेक्षा बघायला मजा येते की नाही हे मला जास्त महत्वाचे वाटते.

सगळ्याच गोष्टींचा सखोल अभ्यास करता येतो, पण तो केलाच पाहिजे असे मला वाटत नाही, त्यापेक्षा अभ्यासाच्या वेळी अभ्यास नि करमणुकीच्या वेळी करमणूक हे माझे मत आहे.

आर आर ने आपल्या परंपरेला अनुसरुन स्टेबल सुरुवात करुन शेवटच्या ओव्हर्समध्ये हल्ला करायला सुरुवात केली आहे Happy
कमॉन शाह

चर्चेनुरुप व्यंगचित्र मस्त भाऊ Happy
>>जो जें वांच्छिल तें तो लाहो,
अगदी खरय्....उगीच कुणी कुणाला कमी लेखायचे कारण नाही!

>>पण नंतर नंतर त्याचा खेळ बराच घसरला!
आणि कप्तान म्हणून तर तो निव्वळ हाइप होता.>>
आजचा खेळ बघा त्याचा
धडकी भरवलेली दिल्लीला आणि त्याच्या हाताखाली पुण्यासारखी कमजोर टीम टॉप४ मध्ये आहे

अरे दादाला नावे ठेवायला सगळे लगेच जमतात आणि आज तो भारी खेळतोय तर कोणी इकडे फिरायला तयार नाही Sad
दादाची गोलंदाजीत पण दादागिरी
कसला काढला पीटरसनला..सही!

वा मस्त जिंकले पुणे. दादाबद्दल मीसुद्धा साशंक होतो पण आज त्याने मॅच खेचुन आणली. सेहवाग/केपी ची बॅटिंग बघायला पण मजा आली.

Pages