राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे ! मी फक्त राशींचे वरचे गुण सांगीतले होते, मूळ पत्रिकेच्या ग्रहाबद्दल बोललेच नाही ना.

समजा माझी रास ( चंद्र रास ) जर तुळ असेल आणी लग्न रास मेष, सिंह किंवा वृश्चिक असेल किंवा लग्नस्थान वा इतर ठिकाणी मंगळ असेल तर तापटपणा वाढुन हेकटपणा रुजतो. ( अर्थात माझी राशी ही तुळ नाही अन मला मंगळ ही नाही )

तसेच पत्रिकेत शनी प्रभावशाली उदा. लग्नी वगैरे असेल तरी हुकुमशाही स्वभाव असतो.

पुष्य नक्षत्र जरी देवगणी असले तरी मालक शनी मुळे ही माणसे पण खूप हेकट अन हम करे सो कायदा या टाइपची असतात. कारण शनी कायद्याचा ग्रह आहे. नक्षत्र कोणते आहे त्यावरुन पण खूप काही सांगता येण्यासारखे आहे.

वृषभ लग्नी शनी असणारी एक व्यक्ती माझ्या नात्यातली आहे, जरी चंद्राचे देखणे सौम्य रोहिणी नक्षत्र या व्यक्तीचे असले तरी केवळ शनी मुळे आज संसार आहे की नाही अशी अवस्था आहे. बर, या व्यक्तीला मंगळ पण नाहीये. मग काय एकट्या तुळेला तुम्ही दोष देणार की हेकट व संतापी आहे म्हणून?

वर लिंबुने बरोबर सांगीतले आहे. नुसती रास कामाची नाही. या विषयाची व्याप्ती खूप मोठी अन खोल आहे म्हणुन मी राशीचे वरवरचे गूण सांगीतले.

आणी प्रत्येक राशीत ३ नक्षत्रे असतात व शेवटच्या नक्षत्रातील उरलेले १, २ किंवा ३ चरण पुढच्या राशीत जातात. शेवटचा चरण हा बॉर्डरवर असतो, गमभन यु आर राइट.

उदा. एका नक्षत्राचे ४ चरण असे एका राशीत ३ नक्षत्रे अन त्यांचे मागे पुढे होणारे चरण हा खरोखर अभ्यासु विषय आहे.

मेषेत आश्विनीचे ४, भरनीचे ४ अन कृतिकेचा १ असे ९ चरण आहेत, कृतिकेचे उरलेले ३ चरण हे पुढच्या वृषभेत जातात.
आणी त्याचा परिणाम हा त्या नक्षत्रानुसार होतोच.

मेषेत आश्विनीचे ४, भरनीचे ४ अन कृतिकेचा १ असे ९ चरण आहेत, कृतिकेचे उरलेले ३ चरण हे पुढच्या वृषभेत जातात.
आणी त्याचा परिणाम हा त्या नक्षत्रानुसार होतोच.>>>>>>मग जर कोणी मेष रास पन , कृतिकेचे चरण असेल तर ती व्यक्ती तुलनेने कमी तापट अस्ते का ????

>>> उलट प्रचंड हेकट, संगीत मानापमान साजरे करणारे, रागीट, तडकाफडकी निर्णय घेणारे, सहानुभुती नसणारे आणि प्रचंड भांडखोर असे काहि तर्हेवाइक नातेवाइक पाहिलेत तुळ राशीचे. <<< आणि अनुमोदन देणारे<<<<<
अहो मी वर सान्गितल तस, त्या त्या तुला व्यक्तिन्च्या एका पारड्यात कुठली तरी काडी नैतर भला मोठ्ठा धोन्डा फिक्स पडला असेल, उपाय सोप्पा आहे, दुसर्‍या पारड्यात आपली काडी नैतर धोन्डा टाकायचा. Proud
टुन्टुन म्हणिन्ग राईट्ट!

तुमच्याकडचा का नको? ( प्रश्नार्थक बाहुली )

म्हणुनच परमेश्वराने गाठी स्वर्गात बांधल्यात, इथे खाली नाही. खरे तर लग्न झाल्यावर राशी जुळवण्यात काहीच अर्थ नाही, कारण ( स्वानुभव ) गण, चरण, नक्षत्र याहीपेक्षा गंमत म्हणजे माणसे आपला स्वभाव बदलत नाहीत. ( खी खी हसनारी बाहुली )

माझ्या आजारपणात मला हॉस्पिटल मध्ये न्यायची वेळ आली तरी मला हिने ( म्हणजे मी ) बरोबर यायचे आमंत्रण दिलेच नाही यावरुन घरात मानापमान झाले होते, त्यात सहभाग होता एका कर्केचा अन एका वृश्चिकेचा. आता बोला, मग कर्केला हळवी रास म्हणू कशी?

>>>>मग कर्केला हळवी रास म्हणू कशी? <<<<
सोप्पय, सूडि वृश्चिकेने कर्केला "फुसकुलीसदृष" पीन मारली असेल, अन अशी पिन बिनडोकासारखी मारुन घेणे हेच तर कर्केचे "हळवेपण" ना! Wink

>>>> मेषेत आश्विनीचे ४, भरनीचे ४ अन कृतिकेचा १ असे ९ चरण आहेत, कृतिकेचे उरलेले ३ चरण हे पुढच्या वृषभेत जातात.
आणी त्याचा परिणाम हा त्या नक्षत्रानुसार होतोच.>>>>>>मग जर कोणी मेष रास पन , कृतिकेचे चरण असेल तर ती व्यक्ती तुलनेने कमी तापट अस्ते का ???? <<<<<<<<<<<
नाही, कृत्तिकेची जास्त कृतिपूर्ण तापट असेल असे मला वाटते. Happy

आपल्या देवांच्या राशी आणि गुण पहा.

कार्तिकेयाचा जन्म कृतिका नक्षत्रावर झाला, म्हणुन त्याचे नाव कार्तिकेय.
कार्तिकेयाचा पराक्रम पाहावा, कुमार वयातच देवांचा सेनापती झाला (कर्तृत्ववान).
पार्वतीमातेवर विवाहाच्या कारणावरुन रुसुन समस्त स्री जातीलाच शाप दिला. (रागीट, फार विचार न करता निर्णय घेणे)

श्रीरामचंद्र : पुष्य नक्षत्र, कर्क रास
प्रेमळ (भरतमिलाप), कुटुंबासाठी (पितृवचनासाठी) वनवास देखील भोगण्याची तयारी, हळवा स्वभाव (लक्ष्मणाला जेव्हा बाण लागतो तो प्रसंग), क्षमाशीलता

श्रीकृष्ण : रोहिणी नक्षत्र, वृषभ रास
कलाकार (बासुरी, रास), रसिक( रासलीला), आकर्षक व्यक्तिमत्व (गोकुळाला भुलवले)

राहुल द्रविड - मीन रास

सभ्य व्यक्तिमत्व, मैदानावर वा मैदानाबाहेर कोणत्याही वादात पडला नाही, कोणत्याही गटात नाही किंवा स्वभावात राजकारण नाही, व्यसन नाही, नाकासमोर चालणारा, आक्रमक स्वभाव व आक्रमक खेळ नाही आणि त्यामुळे कर्णधार म्हणून फारसा यशस्वी नाही, हळवा स्वभाव व अरे ला कारे म्हणणार नाही आणि त्यामुळे थोडी टीका होताच लगेच कर्णधारपद सोडले. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर अपयशी ठरताच कोणाची वाट न बघता काही काळातच निवृत्तीचा निर्णय.

>>>मी कुंभ..नवरा मकर ..ह्या बद्दल सांगा ब>>><<<
खरच सान्गू?
अहो आख्ख आयुष्य "नवर्‍याला हल्याऽऽहोऽ करीत हलविण्यातच" जाईल Wink
जोक्स अपार्ट, नवरा नशिबवान आहे की त्याला कुम्भ राशीची बायको मिळाली.
वैचारिक/बौद्धिक दृष्ट्या तसेच केल्याविचाराबरहुकुम प्रत्यक्ष कृतिप्रवणतेबाबतही, कुम्भ रास मकरेपेक्षा कित्येक पटीन्नी उजवी असते. तेव्हा तुमचेही अभिनन्दन "होयबा" नवरा मिळाल्याबद्दल. Proud

अय्यो रामा पापं !

मकर रास नवरर्याची ! खूप नशीबवान आहात. मकर राशीचा नवरा बायको अन मुलांवर ( स्वतःच्याच) फार प्रेम करतो, हवे ते लाड अन हट्ट पुरवतो. थोडास्सा संशयी स्वभाव असतो, पण लिव्ह इट. थोडा निराशावादी असतो, शनीची रास त्यामुळे कष्ट फार.

>>> कुंभ पुरुषाला मकर बायको मिळाली तर... <<<<
मकरेची लोक कष्टाळू असतात. सबब, जर बायको घर साम्भाळत असेल, तर चिन्तेचे कारणच नाहि, अन बायको नोकरी करीत असेल तरी ती घरचेहि तितकेच साम्भाळेल. अशा पुरुषाला भाजीचिरा, दळण आणा, अन्थरुणे घालाकाढा, पोरे साम्भाळा असले कधिच करावे लागणार नाही.
मात्र, कुम्भेची अक्कल त्याने घरातील प्रकरणात्/कामात पाजळवू नये हेच उत्तम राहील.

श्रीरामचंद्र : पुष्य नक्षत्र, कर्क रास
>>> हे वाचून जाम गंमत वाटली. सतिशचा जन्मदेखील रामनवमीचा आहे. शिवाय त्याची पण कर्क रास पुष्य नक्षत्र. हळवा आणि क्षमाशील वगैरे मात्र अजिबात नाहीये तो.

>>> लिंबूकाका, तुम्ही माझी लग्न रास नाही ओळखलीत आजून!
माझी चांद्ररास इथे आहे आणि सौररास इथे! <<<<
अहो आता फक्त जन्मवेळ (तारिख नव्हे) सान्गा, दोन मिन्टात लग्नरास सान्गतो, हाय काय अन नाय काय त्यात. मीन ही तुमची सौररास याचा अर्थ सुर्योदयाचे वेळेस मीन रास उदित होती व सूर्य त्या राशीत होता. यावरुन उरलेल्या चोविस तासान्चा हिशोब करायला काय अवघडे?
बायदिवे, महाराष्ट्राची चन्द्ररास काये? मला आठवत नाहिये, ती कळली तर कोणत्या तिथीला जन्म झाला ते ही लग्गेच कळेल.

Pages