राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स टुनटुन! Happy मेष आणि मीन हे अगदी परस्पर विरुद्ध कॉम्बो आहे ना!? Proud अष्टमेश लग्नी म्हणजे काय? पण अति काळजीचं अगदीच बरोबर ओळखलं तुम्ही! Proud

>>> मेष आणि मीन हे अगदी परस्पर विरुद्ध कॉम्बो आहे ना!?

तसं असलं तरी मेषेची बायको व मीनेचा नवरा हे अत्यंत सुखी कॉम्बिनेशन आहे.

मेष आणि मीन हे अगदी परस्पर विरुद्ध कॉम्बो आहे ना!? >>>हो का
मेष ची मुलगी अनि तुळ मुलगा हे कॉम्बो कसे आहे ????

>>> मेष ची मुलगी अनि तुळ मुलगा हे कॉम्बो कसे आहे ????

हे जरा परस्परविरोधी आहे. मुलगी मुलावर वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करणार. त्यामुळे कधीकधी चकमक होऊ शकते.

हे जरा परस्परविरोधी आहे. मुलगी मुलावर वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करणार. त्यामुळे कधीकधी चकमक होऊ शकते.>>>माझ्याकडे अगदी विरुध्द उदाहरण आहे.. जाउ देत...
तुळेचे निगेटिव्ह पॉईटस काय असतात ???

तूळ रास सौम्य स्वभावाची व दुसर्‍याला त्रास न देणारी असते. त्यामुळे त्यांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.

चिमेघ तुमची लग्नरास मीन म्हणजे प्रथम स्थानात १२ आकडा आलाय, ते पत्रिकेचे पहिले स्थान त्यासमोर ६ आकडा ते सप्तम म्हणजे पती अथवा पत्नीचे स्थान. तर ७ आकडा जिथे ते अष्टम स्थान म्हणजे मृत्युस्थान ( मृत्यु म्ह्टल्यावर घाबरु नये तर ते एक अशुभ स्थान आहे, पण त्यावरुन वारसा हक्क आणी २ नंबरचे धन बघतात ), आणी तिथे जी तुळ रास येते ( ७ आकडा ) त्याचा मालक शुक्र मीनेत उच्चीचा ,पण ते तब्येतीचे अन व्यक्तीमत्वाचे स्थान म्हणून म्हटले की अष्टमेश लग्नी.

तुळ शक्यतो वाद टाळणारी, समाजशील अन मिळून मिसळुन वागणारी रास आहे, त्यामुळे कलहापासुन ते दूर असतात.
मेष धाडसी पण उतावीळ, तापट, मनमोकळी आणी खरे आहे ते तोंडावर बोलणारी, पण काही मेष ते मेष नसुन वृश्चीक आहेत की काय असे वाटावे इतपत डुक धरणारे असतात, अर्थात सगळेच मेष तसे नसतात अन सगळे वृश्चीक ही वाईट नसतातच.
. वृश्चीक हे मित्र केले तर अतीशय जीवाला जीव देतात, तेव्हा वाद अन गैरसमज टाळुन मैत्री अवश्य करावी.

टुनटुन, स्पष्टीकरणासाठी धन्यवाद!
मास्तुरे, नाही नाही, माझी चंद्ररास मेष, sun sign Pisces, लग्न रास मीन ( भरणी नक्षत्र, शुक्र उच्चीचा) म्हणून मेष आणि मीन परस्पर विरुद्ध कॉम्बो आहे ना (स्वभाव आणि व्यक्तीमत्व बघता) असं म्हणाले Happy

चिमेघ, आमावस्येच्या आसपास (दोन दिवस आगेमागे) सूर्योदयाच्या वेळी जन्म झाला होता का हो तुमचा? सहज म्हणून विचारतोय. Happy
आ.न.,
-गा.पै.

गामा, अमावस्या होती का याची काही कल्पना नाही हो, का बरे काही specific significance? Proud जन्म १५ मार्च १९८६, माझा सूर्योदय स़काळी ७ नंतर झाला Proud , तुम्हीच सांगा आता होती का अमावस्या. हे अमावस्या वगैरे ऐकायला deadly वाटतं ना जरा Uhoh horror movies/serials, भयकथांचा परिणाम Wink

चिमेघ,

खास महत्त्व काही नाही हो. सहज म्हणून विचारलं. तुमची लग्नरास मीन आहे, याचा अर्थ तुमच्या जन्माच्या वेळेस पूर्व क्षितिजावर उगवती रास मीन होती. आणि सूर्यही नेमक्या याच राशीत आहे. म्हणजे तुमचा जन्म सूर्योदयाच्या वेळेस झाला असावा.

चंद्र लगेचच पुढच्या राशीत (मेष) होता. म्हणजे दोनतीन दिवसांपूर्वी तो सूर्याबरोबर मीनेत असणार. म्हणून म्हंटलं की तुमचा जन्म आमावस्येच्या आगेमागे झाला होता का ते.

रच्याकने, आमावस्येला जन्मलेलं बालक भाग्यवान असतं म्हणे! Happy

आ.न.,
-गा.पै.

गामा, अतिशय सोप्या पद्धतीने समजवण्याबद्दल धन्स! Happy
आंतरजालावर शोधल्यावर अशी माहिती मिळाली कि १९८६ मधे मार्च महिन्यात १० तारखेला अमावस्या होती, so close! Happy
To be precise, माझा जन्म सकाळी ७.३८ चा! मला Sun Sign/Zodiac Sign जन्म तारखेनुसार आणि चंद्ररास जन्मवेळेनुसार ठरते एवढीच माहिती होती.
तर माझी स्वभाववैशिष्टे काय असतील बरं?! Proud

चिमेघ,

मला माहीत नाही हो! मी आपलं सहज म्हणून पडताळा करून पहात होतो! Happy मी आपणांस नाराज तर केलं नाही?

आ.न.,
-गा.पै.

>>> मीन नवरा आणि वॄश्चिक बायको हे कसे काँबीनेशन असते?? गरीब बिचारा नवरा आणि सूड घेणारी बायको असं तर नसतं ना!!

छे, छे! उलट वृश्चिक बायको खमकी आणि व्यवहारी असल्याने आपल्या गरीब बिचार्‍या, देवभोळ्या नवर्‍याचा कोणाला गैरफायदा घेऊन देत नाही व ती एकटीच नवर्‍याची नौका तीराला लावते. मीनेचा नवरा वृश्चिकेच्या मुठीत राहतो. मीन नवर्‍यांना नेहमी खमकी आणि व्यवहारी बायको असावी लागते (उदा. मेष, वृश्चिक, सिंह, मिथुन इ. राशींची). त्यांना जर मीन, कर्क, तूळ इ. राशींची समानधर्मी बायको मिळाली तर त्या भोळ्या सांबाला कोणीही हातोहात फसवेल.

मला एक विचारावेसे वाटते की मायबोलीकर ज्या आपल्या राशी सांगतात, त्या नावावरुन समजतात की त्यांच्या जन्मनावावरुन?

उदाहरणार्थ, कर्क राशीची अक्षरे ही ह आणी ड आहेत. म्हणजे आष्लेशा नक्षत्राचे ड नाव ( मग त्या मुलीचे नाव ड वरुन सुचत नसेल तर दुसरेच ठेवले जाते, उदा. निमा सीमा, कल्पना इ. मग निमा असेल तर वृश्चीक , सीमा असेल तर कुंभ आणी कल्पना असेल तर मिथुन. कळले? ) मग ह म्हणजे पुष्य रास आणी नावे हेमांगी हर्षदा वगैरे.

मग मायबोलीकर इथे कोणती रास नक्की अपेक्षीत धरुन लिहीतात?

>>> तूळ रास सौम्य स्वभावाची व दुसर्‍याला त्रास न देणारी असते. त्यामुळे त्यांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
>>> तुळ शक्यतो वाद टाळणारी, समाजशील अन मिळून मिसळुन वागणारी रास आहे, त्यामुळे कलहापासुन ते दूर असतात.

तुला राशीचे ही वैशिष्ट्ये बरोबरच आहेत Happy
मात्र, तुला राशीच्या व्यक्तिला, कुन्डलितील इतर ग्रहान्ची स्थानगत/भावेशात्मक साथ असेल तर काहीच प्रश्न नसतो, मात्र तशी साथ नसेल, तर समसमान झालेल्या तराजुच्या कोणत्याही पारड्यात एखादी काडीचे वजन जरी पडले तरी एक पारडे खाली व एक वर हे जसे होईल, तशीच गत वेळेस तुला व्यक्तिची होऊ शकते. ही सगळ्यात मोठी तृटी आहेच, पण या तृटीवर उपजतरित्या मात करताना, तुला व्यक्तिची मानसिक दमछाक फार होते.

तूळ रास सौम्य स्वभावाची व दुसर्‍याला त्रास न देणारी असते>>>
तुळ शक्यतो वाद टाळणारी, समाजशील अन मिळून मिसळुन वागणारी रास आहे, त्यामुळे कलहापासुन ते दूर असतात>>>

उलट प्रचंड हेकट, संगीत मानापमान साजरे करणारे, रागीट, तडकाफडकी निर्णय घेणारे, सहानुभुती नसणारे आणि प्रचंड भांडखोर असे काहि तर्हेवाइक नातेवाइक पाहिलेत तुळ राशीचे. Uhoh

<उलट प्रचंड हेकट, संगीत मानापमान साजरे करणारे, रागीट, तडकाफडकी निर्णय घेणारे, सहानुभुती नसणारे आणि प्रचंड भांडखोर असे काहि तर्हेवाइक नातेवाइक पाहिलेत तुळ राशीचे. > +१

उलट प्रचंड हेकट, संगीत मानापमान साजरे करणारे, रागीट, तडकाफडकी निर्णय घेणारे, सहानुभुती नसणारे आणि प्रचंड भांडखोर असे काहि तर्हेवाइक नातेवाइक पाहिलेत तुळ राशीचे>>

कदाचित ते तुळ-वृश्चिक बोर्डर वरचे असतील

उलट प्रचंड हेकट, संगीत मानापमान साजरे करणारे, रागीट, तडकाफडकी निर्णय घेणारे, सहानुभुती नसणारे आणि प्रचंड भांडखोर असे काहि तर्हेवाइक नातेवाइक पाहिलेत तुळ राशीचे. >>>>>> +१

मला सांगा ,,प्रत्येक राशीत ३ चरण अस्तात ना..मग शेवटच्या चरणातल्या लोकांवर पुढच्या राशीच्या गुणधर्माचा चा परीणाम होता का ???

उलट प्रचंड हेकट, संगीत मानापमान साजरे करणारे, रागीट, तडकाफडकी निर्णय घेणारे, सहानुभुती नसणारे आणि प्रचंड भांडखोर असे काहि तर्हेवाइक नातेवाइक पाहिलेत तुळ राशीचे. >>>>>> +२

Pages