राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> एकदा बसायला हवं.. <<<<
हो हो सम्या अन रामभौ, बसु की आपण, मिल बैठेन्गे हम चारों , तुम दोनो, मै और .......... मेरे पन्चान्ग! Wink

टिळक, दाते किंवा कालनिर्णय यांपैकी कोणते पंचांग वापरावे?
टिळक पंचांगाचे कालमापन जरा वेगळे आहे असे ऐकले.

होय पंचांग घेऊन बसू, पण कुंडली थोडी बदलते टेबलावर..
हा म्हणजे तु पंचांगाप्रमाणे जाशील, आणि उगाच विश्वास उडेल पंचांगावरचा.. :p

राम Lol

लिम्बुभो.. घ्या
मी
चंद्र रास : धनु रास
लग्न रास : कुम्भ

बायको
चंद्र रास : मिथुन

आता तुला कळाले असेलच माझ्या मोठ्या ढेरीचे रहस्य. Proud

माझी रास वृश्चिक आहे. वरील सगळे पोस्ट वाचले
<<<<<<<<<< वृश्चिक
१) एकदा एखादि व्यक्ती 'वाईट' ठरली कि ते मत बदलायला भगिरथ प्रयत्न लागतात.
२) वृश्चिकेचा एक चांगला गुण म्हणजे ते कायम असमाधानी असतात. असमाधान असते ते स्वत:च्याच कामगिरीवर. त्यामूळे ते सतत प्रगती करायचा प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी प्रचंड कष्ट करायची त्यांची तयारी असते. त्यांच्या तूलनेत बाकिचे कष्ट करण्यात कमी पडतात, आणि त्याचा त्यांना राग येतो. संशोधन क्षेत्रात ते जास्त यशस्वी होतात.
३) प्रचंड हुशार, कष्टाळू, आणि कायम गुणवत्तेचा ध्यास घेतलेला. काही प्रमाणात फटकळ सुध्दा.
४) सतत डोक्यात कसले ना क्सले विचार सुरू...घरी वा हपिसात स्वस्थ बसणे जमत नाही. जे डोक्यात येतं ते करण्यासाठी प्रचंड धडपड करण्याची वृत्ती. ५०% हळवी (भावनाप्रधान) +५०% प्रॅक्टीकल...तसेच बेस्ट फ्रेंड आणि वर्स्ट एनिमी. प्रेम असो, मैत्री असो, राग-रुसवा असो,आनंद-दु:ख व्यक्त करणे असो....सारं काही एक्स्ट्रीम!
५)सहसा राग येत नाही, पण आला की लवकर निवळत नाही. साठलेल्या रागाचा उद्रेक झाला की कुणीही त्यांना थांबवू शकत नाही. स्वानुभवावरून सांगतेय स्कॉरपियन्स नागासारखे डूक धरून मग सावकाश वार करायला कमी करत नाहीत.

१००% सहमत.. इथे फक्त एक च सांगायच एखाद्यला जीव लावला तर अगदी मनापासुन त्याच्या साठी काही करु पण एखाद्याने आपल वाईट केल तर मात्र त्याच खर नाही..................

नवरा : मेष
धड्पडा,खुप कष्टाळु. पन बोलतान नेहमी तिरकाय्त घुसणार. कोतुक तर कधीच नाही.

माझा भाऊ सिंह :
सिंह लोकांकडे नेतृत्व आपसूक येते. बर्याच क्षेत्रातली त्यांना (जुजबी) माहिती असते त्यामुळे ते सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतात. प्रेम केले तर मनापासून आणि दुस्वास केला तर तोही मनापासून. एखाद्याला आपले मानले तर, त्याच्यासाठी रक्ताचे पाणी करतील. पण मेहनतीत कमी पडतात (अंगात आळस असतो.)

लिंब्या माझी पत्रिकेप्रमाणे रास कर्क आहे, आणि तारखेप्रमाणे सिंह
यातली चंद्र रास आणि सूर्यरास कशी ओळखू? लग्न रास मीन आहे बहुतेक. Sad
छ्यॅ मल्तैबैकैकळत्चनै Proud

निलम माझी पण रास वृश्चिक आपल्या पोष्टला संपुर्ण अनुमोदन Happy
मला अजुन कुणीच वृश्चिक आणि कर्क या कॉम्बीनेशन बद्द्ल सांगितलं नाही जरा लिहाना या जोडीबद्द्ल देखील...

ए येडपट दक्स. चंद्र रास कर्क आहे तुझी आणि सूर्य रास शिंह.
तुझ्या डोळ्यापुढे चांदण्या चमकल्या वाटतं ह्या लिंब्याने जे सांगितल त्यामुळे.

ह्या लिंब्याने जे सांगितल त्यामुळे.>>
लिम्ब्याच्या प्रोफाइलीत जाउन त्याचा मोटो ऑफ लाइफ वाचलेला दिसत नाहियेस तु.
जुन्या माय्बोलीवर तो असा होता " if you cannot convince them, confuse them"
लिम्ब्या सगळ्याना कन्फ्युज करतो त्यामुळे. Lol

.

http://www.findyourfate.com/deathmeter/deathmtr.html

वरच्या साईटवर आपण स्वतः कधी खपणार ( म्हणजे स्वर्गवासी, कैलासवासी, पैगंबरवासी, ख्रिस्तवासी, अल्ला को प्यारे, देवाज्ञा वगैरे वगैरे ) ते कळते.

माझी तारीख २२ ऑगस्ट १९४५ आलीय !!! बाप्रे !!!

कुणाला जिज्ञासा होती ती ?

२२ ऑगस्ट १९४५>>> बापरे दिनेशदा! तुम्ही ऑलरेडी खपलेले आहात म्हणजे! मग आता जे मायबोलीवर आहे, ते तुमचं भूत का? Lol

काही म्हणा लिंबुजी च्या पोस्टीमुळे हा बाफ एकदम लाईव्ह झाला आहे Happy

कोण म्हणत (मला वाटत मंदार जोशी म्हणाले Uhoh ) मिथुन बायको आणि वृश्चिक नवरा हे बेकार काँबिनेशन आहे? मी मिथुन आणि नवरा वृश्चिक! २७ वर्ष चांगले नांदतोय. खर सांगू का तो सच्चा मित्र आहे. माझ्या त्रुटी, माझे दोष अगदी मनमोकळेपणाने सांगतो. आणि मी कशी सुधारू शकते याचा प्लॅन पण देतो. आणि मला आयुष्यात पुढे जायला या गोष्टींची खूपच झाली आहे. बाकी नांग्या मारण वगैरे ---एकदम खर! कर्क लग्नाचा असल्यामुळे असेल पण he is a very responsible parent.

मला वाटत नाही तुमची रास तुमचा स्वभाव पूर्णपणे सांगते. मी मिथुन असल्याने खूप चिकित्सक असायला पाहिजे. जी मी आहे.. माझ्या व्यवसायाकरता आणि इतर फार कमी गोष्टींकरता. मला कुतुहल खूप असत पण चिकित्सा कमी. मात्र देवाच अस्तित्व ठामपणे आहे हेच मानून चालते. तिथे नो चिकित्सा! वृश्चिक नवर्‍याच्या मते--डोक बाजूला ठेऊन! Happy

मामी, मग बरंय की. माबोवर लिहायला भरपूर वेळ आहे हातात Wink मी २०५९
दिनेश, तुम्ही त्या साईटवर असं काय टाकलंत की तुमच्या खर्‍या जन्माआधीच तुम्हांला खपवलं Wink

.

Pages